पाककृती

बाप्पाचा नैवेद्य : आमरसाच्या सांजोर्‍या

Primary tabs

सर्वांना गेणेशोत्सावाचा हार्दिका शुभेच्छा!!
घरोघरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले आहे आणि त्यांच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ बनवले जात आहेत. मीसुद्धा अशीच एक पारंपारीक पाककृती बाप्पांसाठी येथे देत आहे.

.

साहित्यः

१ वाटी जाड रवा
१ वाटी पाणी
१ वाटी आमरस
३/४ वाटी साखर (आपल्या आवडीप्रमाणे किंवा आमरसाच्या गोडीप्रमाणे प्रमाण घ्यावे)
३ टेस्पून साजुक तूप
दीड टीस्पून वेलचीपूड

सांजोर्‍यांसाठी जे पीठ तयार केले आहे त्यात दीड वाट्या मैदा + १/३ वाटी कणिक + मीठ + तेल मिक्स करुन नेहमीप्रमाणे पीठ मळून घेतले आहे.

.

पाकृ:

प्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करून रवा हलक्या गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.
नेहमी भाजतो शिर्‍यासाठी तितका भाजायचा नाही. आपल्याला हे रव्याचे सारण थोडे चिकटचं हवे आहे.
हलका गुलाबी होता आला की त्यात एक वाटी पाणी व एक वाटी आमरस घालावा आणि परतून, झाकून एक वाफ काढावी.
आता त्यात साखर व वेलचीपूड मिसळून चांगले एकत्र करावे.
सांजा शिजला की ताटात गार होण्यासाठी काढून घ्यावा.

.

मळलेल्या पिठाचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची पारी लाटावी.
तवा गरम करायला ठेवावा.
पारीत लिंबाएवढाच सांजेचा गोळा भरून हलक्या हातानी पारीचे तोंड बंद करून घ्यावे.
थोडासा मैदा भुरभुरून हलक्या हाताने सांजोर्‍या लाटाव्यात.
तव्यावर दोन्ही बाजूंनी गुलाबी रंगावर शेकून घ्यावे.
वरून तूप सोडून शेकावे.

.

गरमा-गरम आमरसाच्या सांजोर्‍या आमरस किंवा साजुक तुपासोबत किंवा दोन्हीसोबत खायला द्यावे.

.

नोटः

आमरस नसेल वापरायचा तर २ वाट्या पाणी किंवा १ वाटी पाणी + १ वाटी दुध घालून सांजा बनवू शकता.

मस्तच ग सानिका,
आमरसाच्या सांजोर्‍या खाऊन बाप्पा खूष झाला असेल ग, :)
स्वाती

अजया

अहाहाहा!
मला फार आवडतात या सांजोर्या . अग्रजकडे याचे पॅकेट मिळते हीच रेसिपी माहित होती :प. अशा करतात काय!

पैसा

कसल्या सुंदर दिसत आहेत ग!

मागच्या दहा हजार वर्षांत पाकृचे असे।फोटो कोणी काढले नसतील.

सूड

वाह!! आमरस म्हणजे वीक पॉइंट आहे.

रेवती

मस्त दिसतायत सांजोर्‍या. आता संधी पाहून मीही करीन म्हणते.

पिंगू

जबरी दिसतोय. चवीला पण भारीच असणार..

इशा१२३

सांजोर्यांचा रंग अप्रतिम दिसतोय.मस्त पाकृ नेहेमीप्रमाणे!

सविता००१

केवळ जोरदार..
कसली मस्त पाकृ.. नक्की करणार.
आमरस तर काय स्वप्नातही चालतोच ;)
सुरेख आणि अप्रतिम फोटो.
तुझ्या प्रत्येक रेसिपीसाठी सुरेख आणि अप्रतिम फोटो.ही कॉमेंट माझ्याकडून आली आहे असं धरूनच ठेव.
प्रत्येक वेळी मला टाईप करायला लागतं नाहीतर ;)

सिरुसेरि

अप्रतिम रेसिपी आणी फोटो . मे महिन्याचे दिवस आठवले .

आहा किती मस्त! नेहमीप्रमाणेच देखणे फोटो आणि नेटकी पाककृती.

इरसाल

ह्या बै परत त्रास द्यायला. (इथे तोंड मुरकुटलेली बाहुली ).
मी धागा वाचला नाही, ह्यात आंब्याविषयी लिहीलेलं नाही आणी मी त्या दोन वाट्या, चार पुरणाच्या पोळ्यांचे फोटोतर अजिबातच पाहिले नाही !

##सही ##
"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
## सही समाप्त ##

पर्णिका

वॉव, काय सुंदर केशरी दिसताहेत सांजोर्‍या... घरातील छोट्या मेम्बर्सना आवडतात, नक्की करणार !

नूतन सावंत

अप्रतिम,सानी!
जोरदार पुनरागमन.
बाप्पापण पहातच राहतील थोडावेळ आणि नैवेद्य उचलायला गेलं की सोंडेचा फटकारा देतील.

Mrunalini

खुप छान पाकृ सानि. अप्रतिम दिसतोय बाप्पाचा नैवेद्य. :)

जुइ

हाही अनोखा प्रकार आहे. करुन बघेन.

स्मिता.

खाण्यापेक्षा बघतच रहावे असा फोटो आहेत! एकदम कातिल... नक्कीच करून बघेन.

आमच्याकडे सांजोर्‍या जाडसर आणि पुरीएवढ्या असतात (कचोरी सारखे) आणि तळून घेतात.

कंजूस

वर्षांत कितीवेळा करता हा प्रकार?