पाककृती
बाप्पाचा नैवेद्यः स्ट्रॉबेरी कलाकंद
Primary tabs
स्ट्रॉबेरी कलाकंद
साहित्य:
स्ट्रॉबेरी क्रश १०० ग्रॅम,
पनीर १०० ग्रॅम,
साखर १०० ग्रॅम,
खवा १०० ग्रॅम,
वेलची पावडर,
बदाम काप
कृती:
मी तयार मॅप्रोचा स्ट्रॉबेरी क्रश वापरला पण ताज्या असतील तर जास्त चांगल्या!
खवा, साखर, पनीर आणि स्ट्रॉबेरी क्रश सर्व एका कढईत एकत्र करावे.
मंद गॅसवर ढवळत राहावे.
ताटाला तुपाचा हात लावून घ्यावा.
बदामाचे काप करावे.
मिश्रण घट्ट होऊ द्यावे. गोळा होऊ लागला की खाली उतरून वेलची पावडर घालावी, छान घोटावे.
गोळा झाला की ताटात थापावा.
बदामाच्या कापानी सजवून वड्या पाडाव्या. झटपट कलाकंद तयार आहे!
.

.
.

वा .....
झकास दिसतंय .........
खऱ्याखुऱ्या स्त्राबेर्या असत्या तर त्यांचे तुकडे करून मधेच खाताना छान लागले असते नाई ????
पण आत्ता मिळत नाहीत ना!
वा! झकास!
भारी च
मस्त रंग आलाय!
मस्तच.
पटकन उचलून तोंडात घालावीशी वाटतेय. खूप सुंदर!
ए आता स्ट्रॉबेरी कुठे मिळाल्या ग तुला?
बघ वाचलं नाहीस हा नीट
छान पाकृ व रंगीत फोटू.
वाह मस्त
सर्वांचे
छान च दिसतेय
क्रश ऐवजी स्ट्रॉबेरी वापरली तर छान आंबटगोड क्रंची चव येईल अस वाटतय. आता ताज्या बेरीज मिळाल्या की नक्की करून बघणार
सोपी वाटतीय पाकृ, खव्या ऐवजी दुसरं काय घालता येईल? खवा इथे मिळणार नाही बहुतेक.
सानिका सांगू शकेल, रिकोटा चीज? की शब्द चुकला माझा?
वापरून बघायला हरकत नाही
रिकोटा चीज पासून खवा किवा दूध पावडरीपासून खवा करू शकशील .
स्वाती
सुंदर पाकृ !
सुंदर रंग, सुरेख पाकृ.
आहा! खासच.
काय झटपट झाले आहे स्ट्राबेरी कलाकंद. नक्की करते!