माझं मला
माझं मला
खूप जगले तुमच्यासाठी
आता माझं मला जगायचंय
आभाळाचं निळं पाखरू
उरात भरून घ्यायचंय
धुंद अवखळ झऱ्या काठी
तृप्त पाणी प्यायचंय
हसऱ्या वेड्या तृणफुलातून
बेभान होऊन धावायचंय
खोल शांत सागराच्या
कुशीत थोडं निजायचंय
ईश चरण स्पर्शणाऱ्या
हिमशिखरात विरघळायचंय
त्याच्या अस्तित्वाच्या खुणांत
स्वतःलाच शोधायचंय
खूप जगले तुमच्यासाठी
आता माझं मला शोधायचंय
ईश चरण स्पर्शणाऱ्या हिमशिखरात विरघळायचंयखुप आवडले.