Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू । अखंड जिल्बिचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।

च — चामुंडराय, Sun, 09/03/2017 - 17:22
डूआयडीचे आठवावे लेख । डूआयडीचा आठवावा ताप । डूआयडीचा आठवावा प्रतिसाद । मिपामंडळी ।।१।। डूआयडीचे कैसें लिहिणें । डूआयडीचे कैसें पिंकणें । डूआयडीचे काडी टाकणे । कैसें असे ।।२।। मुळायडीचा केला त्याग । म्हणोनि साधिजें ट्यार्पीचा योग । जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।। वापरावे विविध आयपी । तेव्हा मिळे डूआयडी । वापरावे फेक आयडी । पाडण्या जिल्बी ।।४।। सकल डूआयडी आठवावे । फेकायडी डिलीटवत् मानावे । आंजालोकी मिपालोकी उरावे । पिंकरूपें ।।५।। प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू । अखंड जिल्बीचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।६।।

प्रतिक्रिया द्या
7979 वाचन

💬 प्रतिसाद (27)
ब
बाजीप्रभू Sun, 09/03/2017 - 18:55 नवीन
जमलंय जमलंय
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 09/03/2017 - 18:59 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 09/03/2017 - 19:01 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 09/03/2017 - 19:43 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 09/04/2017 - 06:25 नवीन
हे डु आयडी कसे ओळखावे | कोण कोणाचा अवतार कसे शोधावे | या बद्दलही मार्गदशन करावे | आम्हा पामरांना || पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 09/04/2017 - 16:06 नवीन
पैजार बुवा, आपल्या तुकोबांनी फार पूर्वी सांगून ठेवलंय जे का ट्रोलले पिंकले, त्यासी ज्याने अंजावर पीडले । तोची डूआयडी ओळखावा, फेकायडी तेथेची जाणावा ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
S
sagarpdy Mon, 09/04/2017 - 06:51 नवीन
भारीच.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Mon, 09/04/2017 - 08:13 नवीन
आणी एवढा अभ्यास!
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 09/06/2017 - 03:41 नवीन
आयडी ते डू-आयडी करिता सायास कारण नवा आयपी मिपा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
ध
धर्मराजमुटके Mon, 09/04/2017 - 08:44 नवीन
मुजरा घ्यावा म्हाराज !
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 09/04/2017 - 08:47 नवीन
खल्लास!!!!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 09/04/2017 - 08:52 नवीन
नमस्कारहो दमामि।
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 09/04/2017 - 09:26 नवीन
कल्ला.
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Mon, 09/04/2017 - 09:43 नवीन
हल्ली खूप डुआयडी दिसत नाहीत पुर्वीसारखे ,२०११ १२ १३ हा डुआयडींसाठी सर्वोत्तम काळ होता.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 09/04/2017 - 09:45 नवीन
झब्री!!!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 09/04/2017 - 09:57 नवीन
संजय पाटिल, धर्मराजमुटके, जेम्स वांड आणि कंजूस यांचे प्रतिसाद एकत्र वाचले की ओवी तयार होते.
आणी एवढा अभ्यास! । मुजरा घ्यावा म्हाराज ! ॥ (जाहलो एकदम) खल्लास!!!! । नमस्कारहो दमामि ॥
यावरून हे चार एकमेकांचे डूआयडी धरावेत का? -गा.पै.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Mon, 09/04/2017 - 10:13 नवीन
जमलंय. लगे रहो.
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 09/05/2017 - 13:47 नवीन
=)))))))
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 12/13/2017 - 08:14 नवीन
हुच्च्भ्रुनची लक्षणे वरून इकडे आलो तुमची पण कविता जबरी आहे. दंडवत घ्यावा साहेब __/\__
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 12/13/2017 - 09:32 नवीन
हे कसं राहून गेलं वाचायचं!!
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 12/15/2017 - 03:51 नवीन
जोहार मिपाकर जोहार। तुमच्या प्रतिसादांचे आभार । बहु संतुष्ट जाहलो। तुमच्या प्रेमासाठी आलो।।
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 12/15/2017 - 04:47 नवीन
खणखणीत आहे "आयडी"यांची कल्पना नसलेला नाखु
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Sat, 12/16/2017 - 15:20 नवीन
लै भारी
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Sat, 12/16/2017 - 16:13 नवीन
कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे जिथे तिथे पिंका टाकी, तुझ्या कळा ही नाना रे ...
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 12/17/2017 - 23:31 नवीन
व्वा मूवाजी, छान या निमित्ताने माझे दोन पैसे.... दादा बाबा रूपे तुझी, बाई माई अन ताई रे मी फुरो तू फ्रती गामी, नाना विध कळा अंगी रे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
प
पगला गजोधर Sat, 12/16/2017 - 17:59 नवीन
डुआयडी जीवनभर भक्तची, रहाणे || धृ || विदा नसो वा, लॉजिक नसू दे | सभ्य भाषा, फिकिर नसू दे || फुगवु छाती, मठ्ठ बाण्याने | ट्रोलिंग निरंतर करीत रहाणे || १ || कधी फेकीतो, कधी नेमाने | दंश नकळत, कधी सवयीने || कधी फुत्कारने, कधी बांग देणे | उगळीत बसतो विष सहाणे || २ || व्हा, मिपाकरहो, भक्त माझ्यासंगे | जिव्हेवरी घ्या, तर्कट तरंगे || तुमच्या मुखीही, सक्तीचे हे | उसळो भक्ती, भलेतो देशही भंगे || ३ ||
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 12/27/2017 - 20:09 नवीन
व्वा पग साहेब, एक सेपरेट जिलबीच होऊन जाऊ दे या विषयावर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा