माणसं !
माणसं !
महाग झालेली पुस्तकं परवडत नाहीत हल्ली
पण स्वस्त झालेली माणसं वाचायला मिळतात !
अन सगळीकडे उपलब्ध पण असतात !
कधी कधी पटकन वाचून होतात माणसं
कधी समजतच नाहीत, कळतंच नाहीत माणसं !
छोटी माणसं , मोठी माणसं
जाड माणसं , बारीक माणसं !
खरी माणसं , खोटी माणसं ,
सगळ्या साईजची ,सगळ्या विषयांची माणसं !
काही अबोल, अव्यक्त, मनकवडी माणसं
काही बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं
आपणंच विशेषणे दिलेली माणसं
स्वतःला विशेषणे लावून घेतलेली माणसं !
काही आपली , काही परकी माणसं
दूर जाऊनही जवळ असलेली माणसं !
खोल खोल मनामधली, मनकवडी माणसं !
विसरलो असं म्हणून आठवणारी माणसं !
खोल खोल मनामधली, प्रेमाची माणसं !
विसरलो असं म्हणून आठवणारी माणसं !
तुझं , माझं , ज्याचं त्याचं करणारी माणसं
मातीतून आलेली मातीतंच हरवणारी माणसं
पाठीवर थाप, हातावर टाळी देणारी माणसं
थरथरत्या हातानेही घट्ट धरून ठेवणारी माणसं
स्वतःला देव मानणारी माणसं ,
तर कधी माणसांमधे देव शोधणारी माणसं !
खूप खूप प्रकारची नसलेली आणि असलेली माणसं ,
वाचून उरलेली काही …..
तर काही संपलेली पण अजूनही वाचावीत अशी ....... माणसं !
-----------------------फिझा
खोल खोल मनामधली, प्रेमाची माणसं ! विसरलो असं म्हणून आठवणारी माणसं !__/\__