Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं

क — कल्पक, Fri, 09/15/2017 - 20:44
सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं फार विचार न करता गपचूप राहायचं! आधाशी आणि नालायक लोकांची होर्डिंग्स शहराला विद्रुप करतात सणांच्या नावाखाली थिल्लर गाणी वाजतात स्पीकरच्या भिंती कानाचे पडदे फाडतात पण सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं फार विचार न करता गपचूप राहायचं! बेकायदेशीर बांधकामं आणि अतिक्रमणं शहराला विळखा घालतात कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी ओसंडून वाहतात खड्ड्यांमध्ये अधूनमधून दिसणारे रस्ते दुर्मिळ होतात पण सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं फार विचार न करता गपचूप राहायचं! अस्मितांची भांडणं लावली की राजकीय मार्ग सुकर होतात रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य हे मुद्दे मग बाजूला पडतात दर पाच वर्षांनी निरर्थक भावनिक वाद व्यवहारावर मात करतात पण सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं फार विचार न करता गपचूप राहायचं! नियमित टॅक्स भरणारे दररोज ट्रॅफिकच्या धुळीत सरपटत असतात किमान काही सुविधा मिळतील का अशी भाबडी आशा बाळगतात या टॅक्सवर शेफ़ारलेले आणि सुजलेले दररोज पंचतारांकित मजा करतात पण सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं फार विचार न करता गपचूप राहायचं! - निखिल वेलणकर

प्रतिक्रिया द्या
675 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा