Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पत्र...

प — प. शी., Sun, 09/17/2017 - 12:38
प्रिय, तु विचारत होतास, कि corporate life कशी आहे. मुळात नाटकात आणि यात जास्त काही फरक नाही. फरक फक्त इतकाच, कि नाटकात तु होतास आणि इथे manager आहे. नाटकाचे प्रयोग असायचे, इथे projects असतात. इथे ही उशिर झाला कि बोलणी बसतात, बर का... उलट ११ चे १२ झाले कि तु फार शिव्या घालायचास... इथ मात्र manager फक्त "Good Morning" असा टोमणा मारतो. इथली लोक यास sarcasm म्हणतात... इथे हि नाटकाप्रमाणे night shifts असतात... फरक फक्त इतकाच, नाटकात सोबती ला चहा असायची इथ मात्र coffee असते. पण इथे night shift ला झोप येते रे... कदाचीत इथल्या coffee त अापल्या चहा सारखी किक् नाही... इथे ही project यशस्वी झाल्यावर लोक उबदार हातांनी अभिनंदन करतात. अगदी अापल्या नाटकाच्या यशस्वी प्रयोगाप्रमाणेच... फरक फक्त इतकाच, प्रयोगानंतर अभिनंदन करणार्या हातांना आलेली उब ही टाळ्यांमुळे असायची... पण, इथ मात्र कोणी टाळ्या ही वाजवत नाही, पुर्ण दिवस AC मधे असतात... तरीमात्र त्यांचे हात उबदार कसे असतात कोण जाणे? असो... माझ सर्व सुरळीत सुरू आहे... तुझ पुढील नाटक कधी आहे कळव... जमल तर Weekend ला ठेव, मलापण येता येईल. अगदी पहिल्या रांगेत तिकीट काढुन पाहिल, आता ते तिकीट परवडत मला... तुझा, प. शी.

प्रतिक्रिया द्या
2037 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा