Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'कोणीतरी आहे तिथं!'

उ
उपयोजक
Tue, 09/19/2017 - 12:56
🗣 10 प्रतिसाद
आज सर्वपित्री! सर्वपित्री म्हटलं की आत्मे भूत यांचा विषय निघतोच! याच विषयावर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घनघोर चर्चा झाली.अनेकांनी त्यांना तसे आलेले अनुभवही सांगितले.देवाधर्माची अावड असणार्‍यांना असे अनुभव बर्‍याचदा येतात पण देवाधर्माची फारशी आवड नसणार्‍या काही लोकांनाही असे अनुभव सांगितले. काहीजणांनी असं काही नसतं.मनाचे खेळ असतात असंही म्हटलं.अर्थात प्रत्येकाचा अनुभव आणि तो सांगण्याची पध्दत निराळी! एखाद्या देववादी माणसाला तो आत्मा वाटेल.एखादा विज्ञानवादी माणूस यामागचं वैज्ञानिक कारणही सांगेल.तर्कहीन म्हणेल. तुम्हालाही आलेत का असे काही अनुभव?किंवा असंही झालं असेल की अनुभव तर आलाय पण त्याचं विश्लेषण मात्र करता आलं नाही.खरंच पितर आजच्या दिवशी खाली येतात का? आले तर ते फक्त कावळा या पक्षाला आणि काही ठराविक लोकांनाच का दिसतात? सगळ्यांना का नाही दिसू शकत? ट्रेकींगच्या निमित्याने गड किल्ल्यांवर बरेच जण जातात.काही वेळा रात्री तिथेच मुक्काम करणं भाग पडतं अशा वेळी अालेले अनुभव हे सर्वाधिक आहेत.हे आत्मे किंवा ज्या काही शक्ती असतील त्या खास करुन गड किल्ल्यांवर का येत असाव्यात? या शक्तींची वावरण्याच्या विशिष्ट अशा काही जागा असतात का? कावळ्याला म्हणे चौथ्या मितीत पाहता येतं.म्हणून त्याला आत्मे दिसतात म्हणे! खरंच असं असतं का? हे मानवानेच निर्माण केलेले मनाचे खेळ की खरंच 'कोणीतरी आहे तिथं?' संदर्भ म्हणून मिपावरचेच हे काही 'तंतरवणारे धागे' भुतेखेते-हडळी अनुभव http://www.misalpav.com/node/3945 कोकणी भुते http://www.misalpav.com/node/31225 भूतांचे प्रकार http://www.misalpav.com/node/36139 भूत कसे बनते?। सर्वपित्री पेश्शल http://www.misalpav.com/node/19247 जगात खरंच भुते आहेत काय? http://www.misalpav.com/node/26246 तुम्ही कोण म्हणून काय पुसता? हिम्मत असेल तर वळा मागे http://www.misalpav.com/node/28439 भुते http://www.misalpav.com/node/5654 मी भूत पाहिले आहे (विश्वास नाही बसत?... माझा पण नाही बसत) http://www.misalpav.com/node/5180 करणी/भानामती खरे की खोटे? http://www.misalpav.com/node/20719 वारं येणे,भूत काढणे वगैरे वगैरे http://www.misalpav.com/node/17167 एक भुताचा अनुभव http://www.misalpav.com/node/39976 कोकणातली भुतं http://www.misalpav.com/node/28780 चकवा http://www.misalpav.com/node/8223 गूढ...थरारक....भीती वाटेल अशी भुताटकी http://www.misalpav.com/node/5166 एक पिल्लू तिचं आणि आमचं http://www.misalpav.com/node/33501 प्रतापगड अनुभव http://www.misalpav.com/node/35718 भयकारक भानगड http://www.misalpav.com/node/27190 अशीच एक गोष्ट... | मिसळपाव www.misalpav.com/node/9100 सुधागड एक 'नाईट ट्रेक' http://www.misalpav.com/node/35466
वर्गीकरण
जीवनमान अनुभव

प्रतिक्रिया द्या
9478 वाचन

💬 प्रतिसाद (10)
आ
आनन्दा Tue, 09/19/2017 - 15:22 नवीन
वा वा.. बऱ्याच दिवसांनी असा धागा आला. माबो वरच्या अमानावीयची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 09/19/2017 - 16:50 नवीन
आंबोळीच्या कंदील शिवाय वरची लिस्ट पूर्ण नाही.
  • Log in or register to post comments
R
Ranapratap Tue, 09/19/2017 - 17:29 नवीन
अरे येऊ दया अजुन काही अनुभव, भूतांचे
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Tue, 09/19/2017 - 17:50 नवीन
मला एक अनुभव माहिती आहे माझा एक मित्र एका तिस-याच मित्र्ाला घेऊन रात्र्ीचा गाडीवर निघाला होता. त्या रोडवरच्या एका ठराविक ठिकाणी भुते असतात हे ह्याला टाऊक होते तरीही त्याने गाडी नेण्याचे ठरवले. नेमक्या त्याच भागात आल्यावर गाडी बंद पडली. किक मारून दोघे थकले पण गाडी चालु होण्याचे नाव घेईना थोड्यावेळाने तिथे एक माणुस आला. तो दोघांना म्हणाला की या भागात ही गाडी चालु होणार नाही गाडी थोडी पुढे नेऊन चालू करा. त्यांनी हातानी थोडी गाडी ढकलत नेली आणि पहिल्याच किकला गाडी चालु झाली हा सगळा प्रकार सरळसोट रस्त्यावरच होत होता जिथे वळण वगैरे काही नव्हते तरीही गाडी सुरु झाल्यावर जेव्हा मित्र्ाने मागे वळून पाहिले तेव्हा तो माणुस तिथे नव्हता. हा प्रकार भुताताच आहे असा कोणताही दावा मी करत नाही. याचे तार्किक स्पष्टिकरण दिल्यास आवडेल. माणुस आजूबाजूला जाणे आपण समजु शकतो पण १०-१२ किमी प्रवासात गाडी फक्त एकदाच बंद पडणे तिही त्याच ठिकाणि बंद होऊन पुढे चालु होणे यास योगायोग म्हणावे का ? Some questions भुत किती अंतर कापु शकते ? अर्थात त्यांचे प्रभावक्ष्ेत्र बाहेर ते जाऊ शकतात का .. ज्यांना अवकाशात मरण आले आहे त्यांचे प्रभावक्ष्ेत्र कुठे असेल ? मेल्यानंतर एखादा माणूस ठरवून भुत होऊ शकतो का ? एवढी चांगली माणसे इथे असतात तर चांगली भुते जास्त असतात का ? समाजसेवा म्हणून ती आपणास टरबाईन फिरवून देऊन फुकटात मदत करु शकतील का ? अतिरेक्यांविरुद्ध ते मदत करतील का ? भुतांवर कपडे कुठून येतात ? भुत जर अचाट वेगाने प्रवास करू शकत असेल तर आईस्टाईनच्या सिद्धांताप्रमाणे ते भुतकाळात जाऊ शकते का ? भुतकाळात जाऊन स्वताःच स्वताःचे मरण टाळता येऊ शकते का ? एखाद्या वस्तुत भुत अडकल्याचे आपण ऍकले असेल. कोणकोणत्या वस्तुमसदधे भुत शिरू शकत नाहित ?
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 09/20/2017 - 07:19 नवीन
अतिशय उत्तम धागा. जे मि.पा.चे सदस्य नाहीत आणि ज्यांना या विषयात रस आहे त्यांच्यासाठी या सगळ्या कथा एकत्रित वाचायला मिळणे म्हणजे पर्वणीच. आधी मायबोलीवर या संदर्भात असणारे धागे देतो. अमानवीय...? आणि अमानवीय...? - १ या शिवाय ईथेच मि.पा.वर बरेच लिखाणं झाले आहे. स्पार्टाकस यांच्या "थोडे अदभुत थोडे गुढ" या मालिकेच्या शेवटच्या भागाची लिंक देतो. त्यात ईतर भागाच्या लिंक आहेतच. थोडे अद्भुत थोडे गूढ - १० (अंतिम) भयकथा आणि स्पा यांचे नाते अतुट, हि घ्या त्यांच्या "ते" ची लिंक "ते" - ७ त्यांच्याच सकस लेखणीतून उतरलेली आणखी एक भयकथा सायबानू मीच त्यो .... अंतिम मि.पा.वरची हि प्राचीन भयकथा. दिवाळी जवळ आली आहे तेव्हा जपुनच वाचा. ;-) कंदील आणि हि कंदील २ या शिवाय बिपीन कार्यकर्ते यांच्या या कथा फेड... भेट... या!!! अजुनही भयकथांच्या धाग्याच्या लिंक जुणे जाणते मि.पा.कर घालतीलच.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 09/20/2017 - 09:03 नवीन
वर धाग्यात ट्रेकच्या अनुभवाविषयी लिहीले आहे म्हणून माझे दोन शब्द. खरे तर किल्ले हे तसे पाहिले तर रणक्षेत्र, साहजिकच अनेक मृत्यु ईथे झालेले असतात. तेव्हा भुताखेतांचे अनेक अनुभव सर्वाधिक ईथेच यायला हवेत.पण मला आज अखेर एकही वेडावाकडा अनुभव आलेला नाही. माझे काही मित्र दुर्ग ढाकोबा ट्रेकला गेले असताना त्यांना एक गुढ अनुभव आला होता. पुढच्या महिन्यात दुर्ग ढाकोबाविषयी धागा टाकणार आहे त्यात याविषयी लिहीनच. पण ट्रेकर्समधे काही जागा फेमस आहेत जिथे असे अनुभव येतात. उदा.- कांदाट खोर्‍यातील महिमंडणगड- या ठिकाणी कुत्र्याची जत्रा पहायला मिळते. सुधागड- या ठिकाणी रहायच्या वाड्यामागे दाट झाडी असल्यामुळे बर्याचदा भास होत असावा. तोरणा- याबाबतीत सर्वात बदनाम. इथे ब्रम्हपिश्चाच आहे असे म्हणतात. आणखीही सांगता येतील आता काही लिंक देतो. अर्थात यातील मताशी मी सहमत नाही आणि या लिंक स्वजबाबदारीवर उघडाव्या हि विनंती. सुधागडचा गडपुरुष भूतांचे अस्तित्व मिटत नाही ! The Haunted Encounter on Sudhagad Fort हरिश्चंद्रगडावरचा हा अनुभव अमानवीय.....? या शिवाय प्रा. प्र. के. घाणेकर लिखीत " साद सह्याद्रीची भटकन्ती किल्ल्यान्ची" या पुस्तकात तोरण्या वरच्या लेखात असेच दोन अनुभव दिलेले आहेत. इच्छुकांनी ते वाचावेत. "सह्याद्रीच्या दर्याखोर्यात " लेखक वसंत चिंचाळकर, या पुस्तकात विशाळगडाचा विचित्र अनुभव दिलेला आहे. पुस्तक कदाचित उपलब्ध होणार नाही म्हणून थोडक्यात लिहीतो. सदर लेखक नागपुरचे असून विजयराव देशमुखांबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील किल्ले पहण्यासाठी आले होते. विशाळगडावरती लेखक थोडे एकटेच बाजुला गेले असताना एका हिरवी साडी आणि चुडा घातलेल्या बाईने त्यांना बोलावून हनुमान मंदिरपरिसराकडे ट्कमक टोकाकडे नेण्यास सुरवात केली. त्यांना आपण काहीतरी चुकतोय हि जाणीव असूनसुध्दा त्यातून बाहेर पडता येत नव्हते. अखेरीस त्यांच्या ग्रुपमधील कोणीतरी त्यांना शोधत त्यांच्या मागे येउन त्यांना परत घेउन गेले. खोदमान चालु असताना मि.पा.वरच्या दोन कथा सापडल्या त्यांच्या लिंक टाकतो. भूतकथा - किल्लेदार भूतकथा - "दुराई"
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Wed, 09/20/2017 - 11:11 नवीन
http://www.misalpav.com/node/35961 - विखार http://www.misalpav.com/node/34780 - अ‍ॅडमिट किडा http://www.misalpav.com/node/33688 - पाश - भाग २
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 09/20/2017 - 13:55 नवीन
खरे अनुभव?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 09/21/2017 - 12:01 नवीन
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण!
  • Log in or register to post comments
र
रामपुरी गुरुवार, 09/21/2017 - 19:29 नवीन
सहज दिसलं म्हणून.. "ते फक्त कावळा या पक्षाला" पक्षाला नव्हे पक्ष्याला... :-) -छिद्रान्वेषी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा