जे न देखे रवी...
विसरून जायचे तुला
Primary tabs
*(शुध्दलेखनाच्या चुका बद्दल माफी)
विसरून जायचे तुला
विसरून हेच जातो
श्वासा गनिक माझ्या
मी नाव तुझेच घेतो
कळते माला ही सारे
साराच भास आहे
समजाऊ कसे मनाला
कसली त्या आस आहे
डोळ्यात आसवे अन
ख़ोटेच हासू ओठी
तुजविन भासते गे
आयुष्य रेघ मोठी
विसरून जायाचे तुला
विसरून हेच जातो
श्वासा गनिक माझ्या
मी नाव तुझेचा घेतो....
विसरून जायाचे तुला
विसरून हेच जातो
श्वासा गनिक माझ्या
मी नाव तुझेचा घेतो....
ही ओळ मस्त आहे.
- प्राजु.
कळते माला ही सारे
साराच भास आहे
समजाऊ कसे मनाला
कसली त्या आस आहे
डोळ्यात आसवे अन
ख़ोटेच हासू ओठी
तुजविन भासते गे
आयुष्य रेघ मोठी
हम्म! मनोज, तुझा प्रॉब्लेम जरा सिरियसच दिसतोय मला! सावर बाबा वेळीच स्वत:ला! :)
*(शुध्दलेखनाच्या चुका बद्दल माफी)
अहो साहेब, माफी वगैरे मागण्याची मुळीच गरज नाही. शुद्धलेखनाचे घालून दिलेले जे काही नियम आहेत त्या नियमांनुसार शुद्धलेखनाचे महत्व मिसळपावही जाणते, नाही असं नाही! परंतु मिसळपावला शुद्धलेखानाचे अवास्तव आणि फाजिल महत्व नाही. कवतिक तर नाहीच नाही! मिसळपाववर शुद्धीचिकित्सक नाही! :) तेव्हा शुद्धलेखनाची वगैरे नसती काळजी न करता बिनधास्त लिवा ही विनंती! :)
व्याकरण, शुद्धलेखनाची वगैरे सगळी शाणपट्टी तिकडे, त्या तिथे पलिकडे! :)
आपला,
तात्या वाळिंबे!
प्राजु ,तात्या - आपली प्रतिक्रिया वाचुना खूप समधान वाटले. धन्यावाद.
आपलाच,
मन्या
छान !
डोळ्यात आसवे अन
ख़ोटेच हासू ओठी
तुजविन भासते गे
आयुष्य रेघ मोठी
या ओळी विशेष आवडल्या.
-विजय
खुप छान लिहिले आहे!!!!
गझल अतिशय छान जमली आहे.
वाट पहात आहे....
अशाच नविन गझल वाचायला मिळतील याची.
गझल छान आहे.
ही गझल आहे का? वाटत नाही. तज्ज्ञांनी मार्गदर्शन केल्यास आनंद होईल.
येथून गायब झालेल्या एक विडंबनात्मक गझलेत 'काफिया छान निभावला आहे', 'वृत्तबद्ध', 'गेय' वगैरे प्रतिक्रिया नोंदवणार्यांनी मार्गदर्शन केले तर अधिकच उत्तम!
(जिज्ञासू)बेसनलाडू
श्री बेसनलाडू,
आपल्यला जास्त काही कळत नाही हो :( तरी आपल्या सरख्या तज्ञांनी वेळोवेळी मार्गदशन करावे.
(शिकाऊ) मन्या
तुला मार्गदर्शन? तूच अनेकांच्या गझला कशा हव्यात आणि कशा नकोत ते सांगत असतोस ना?
बापू
सुंदर कविता!!
डोळ्यात आसवे अन
ख़ोटेच हासू ओठी
तुजविण भासते गे
आयुष्य रेघ मोठी
वा!! मस्तच!!
पु. ले. शु.
(अवांतरः ही कविता चुकून गझल विभागात टाकली आहे काय?)