गहन हे मर्म दु:खाचे
गहन हे मर्म दु:खाचे
उमजणे कठिण किती असते
साचले युगांचे अवघे
निमिषात अश्रुरूप घेते
उफराटे गणित विषाचे
समजणे कठिण किती असते
मरण्यास पुरे इवलेसे
जगण्यास कितीही कमी पडते
शब्दांच्या निबिड अरण्यी
बहरणे कठिण किती असते
अमरत्व उमलण्या आधी
का मरण विकटसे हसते
💬 प्रतिसाद
(2)
य
यशोधरा
Fri, 09/22/2017 - 12:55
नवीन
खरेच, खरेच!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
गुरुवार, 09/28/2017 - 07:47
नवीन
प्रतिसादबद्दल आभार
- Log in or register to post comments