Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देवीची शेजारती

व — वैभवदातार, Mon, 09/25/2017 - 09:25
|| देवीची शेजारती || नीज अंबे अर्पितो तुजला शेज फुलांची अंबे शेज फुलांची पुरले मनोरथ घ्यावी आरती भक्तांची ||धृ.|| पूजन केले तुझे आम्ही नवविधा भक्ती अंबे नवविधा भक्ती | ज्ञानदीपातूनी प्रगटल्या आज आत्मज्योती || १ || षड्रिपूंचा पंखा करुनि वारा घालितो अंबे वारा घालितो | पंचप्राण एकवटून शेजारती गातो || २ || दया क्षमा शांती यांचा नाजूकसा शेला अंबे नाजूकसा शेला | सगुण साकार रूपावरी मी प्रेमे पांघरला ||३|| सहस्रकोटी सूर्य तेज असे हास्यमुद्रा अंबे असे हास्यमुद्रा | वेळ झाली निजावयाची सुखे करी निद्रा ||४ || जागे कराया येऊ आम्ही पहाटेच्या प्रहरी अंबे पहाटेच्या प्रहरी | चरणदास वैभव प्रार्थितो अंबे कृपा करी ||५ || -- शब्दांकित

प्रतिक्रिया द्या
2576 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा