Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोदीप्रेम आणि मोदीद्वेष: -१०० ते +१००

A
arunjoshi123
Fri, 10/06/2017 - 14:34
🗣 91 प्रतिसाद
मित्रहो, तुमच्या मते तुमची आणि मिपावरच्या इतर आयडींची मोदीभावना काय आहे? याच्या सर्व्हेमधे जर तुम्हाला रस असेल तर सहभागी व्हा. शून्यापेक्षा जास्त ते १०० = चढती चांगली भावना. शून्यापेक्षा कमी ते -१०० = चढती वाईट भावना. इथे चांगली आणि वाईट हे शब्द पात्रता, चांगुलपणा, नशीब, क्षमता, इ इ अनेक गुण आणि तसलेच अवगुण अशा अर्थाने आहेत. ============================ अर्थातच लोकांचं मत नेहमी तेच नसतं. शिवाय प्रत्येक मुद्द्याबद्दल तेच नसतं. प्रत्येक मुद्द्याचं महत्त्व तेच नसतं. कोणाला हे रिलेटीव नजरेने पाहायचं असेल, कोणाला संदर्भ पाहायचे असतील, कोणाला देशाचं पडलं असेल, कोणाला संकुचित अस्मितांचं पडलं असेल, कोणाला काही दूरगामी बाबी आवडत असतील. तर मोदी आहेत, असतील, पंतप्रधान झालेत, होतील, काही करताहेत, काही करत नाहीयेत, खरे आहेत, खोटे आहेत, सच्चे आहेत, नाटकी आहेत, सक्षम आहेत, अक्षम आहेत, असायला पाहिजेत, असायला नको होते, इ इ अनेक विचार असणार. या सर्वांचं एकत्रीकरण करून, गेल्या ७० वर्षांत जे पंतप्रधान होऊन गेले आणि येत्या १०-१५ वर्षांत जे होतील (मोदी राजकारणात असेपर्यंत), त्यांच्या तुलनेत वा अशी काही तुलना न करता, -१०० ते १०० पैकी किती मार्क द्यावे वाटते? =================================== तुम्ही तुमचे मार्क्स या धाग्यात बदलू शकता, एकदा दिलेले मार्क्स लढवायची फार आवश्यकता नाही. वाटल्यास स्पष्टीकरण देऊ शकता. एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या एकूणत्वात त्या त्या संदर्भात तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं हे तुम्ही कसं ठरवता हे तुम्ही सांगाल तर उत्तमच. ========================= रेंजच्या बाहेरची उत्तरे बाद. अग्राह्य. ============================================= ज्यांचे उत्तर ० नाही ते लोक देखिल संतुलित मानण्यात येतील. असल्यास. ==================================== लेखात तुम्ही मार्क दिले मंजे तुम्ही मत देणार असं मानलं जाणार नाही. त्याचा संदर्भ वेगळा असू शकतो. ============================ व्यक्तिशः मला लोक जेव्हा एखाद्या सार्वजनिक व्यक्तिस "खोटा तो खोटा" वा "खरा तो खराच" हे कसे, कधीपासून, का मानायला चालू करतात यात रुची आहे.
वर्गीकरण
राष्ट्रीय राजकारण
शब्द बुडबुडे आणि गोलगप्पा

प्रतिक्रिया द्या
24587 वाचन

💬 प्रतिसाद (91)
न
नितिन थत्ते Sat, 10/07/2017 - 15:25 नवीन
>>वर अनेक लोकांनी नेहरूंना -१०० मार्क दिले आहेत. अतिद्वेषाबद्दलचा हा सल्ला त्यांना देखिल लागू पडतो. याबद्दल सहमत आहे. पण माणसाची काही तडजोड न करता येण्यासारखी मते असतात त्यामुळे माणूस -१०० पर्यंत जातो. नेहरूंबाबतही कदाचित तसेच आहे. बघण्यासारखी रोचक गोष्ट म्हणजे नेहरूंनी स्वातंत्र्यानंतरच्या काळात खूप पायाभूत कामे केली. आणि त्यांची फळे आपण भोगतो आहोत. पण काश्मीर आणि चीन या दोन बाबतीत त्यांचे निर्णय चुकले असे लोक मानतात आणि त्यामुळे त्यांची सर्व चांगली कामे धुवून जातात. उलट इंदिरा गांधी यांनी राजकारण म्हणून खूप वाईट कामे केली. लोकशाही खिळखिळी करणे, व्यक्तिकेंद्रित राजकारण, राजकारणाचे भणंगीकरण, आणीबाणी आणून विरोधाचा गळा घोटणे वगैरे. आणि बांगला देश निर्मितीचे एक काम चांगले केले. त्या एका गोष्टीने त्यांची सगळी पापे धुवून निघाली. आज अनेक लोक नेहरूंपेक्षा इंदिरा गांधी चांगल्या पंतप्रधान असे मानतात. खरे पाहिले तर चीन / काश्मीर आणि बांगलादेश यात जे काय चांगले वाईट झाले त्याने देशातल्या बहुतांश जनतेच्या आयुष्यात फार काही चांगले किंवा वाईट होणार नव्हते/झाले नाही. ----------------------------------------------------- त्याचप्रमाणे मोदींनी सध्या जे आर्थिक क्षेत्रात चालवले आहे त्याचे दीर्घकालात खूप फायदे होतील असे म्हटले जाते. तसे झालेले दिसले तर आम्ही त्यांना ६० - ७० मार्क देऊ. (सब्जेक्ट टु हिंदुत्ववाद्यांचा हिंसाचार हाताबाहेर जाऊ न देण्यात त्यांनी यश मिळवले). ----------------------------------------------------- राव पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खूप आरोप झाले. राजीव गांधींच्या जवळच्यांनी बोफोर्स प्रकरणात पैसे घेतले असे आरोप झाले. पण राव यांच्यावर स्वतःच पैसे घेतल्याचे आरोप झाले. हर्षद मेहताने "मी राव यांना एक कोटी रुपये सूटकेसमधून दिले" असा आरोप केला . त्याचप्रमाणे लखुभाई पाठक या लोणचेसम्राटाने "मी कुठल्यातरी परमिट्साठी राव यांना पैसे दिले" असा आरोप केला. त्याचप्रमाणे झारखंड मुक्ती मोर्चाच्या शिबू सोरेन यांना लोकसभेत सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी पैसे दिले गेल्याचे प्रकरण गाजले आणि राव यांना आरोपी बनवण्यात आले. परंतु आज राव यांना लोक खूप मानतात असे दिसते. राव हे गांधी कुटुंबातले असते तर त्यांना हे भाग्य लाभण्याची शक्यता नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
मामाजी Sun, 10/08/2017 - 04:36 नवीन
थत्ते साहेब, (सब्जेक्ट टु हिंदुत्ववाद्यांचा हिंसाचार हाताबाहेर जाऊ न देण्यात त्यांनी यश मिळवले). मोदि सत्तेवर आल्यापासून हिंदुत्ववाद्यांनी केलेला हिंसाचार व हिंदुत्ववाद्यांवर झालेला हिंसाचार याची आकडेवारी आपण देउ शकाल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सुबोध खरे Wed, 10/11/2017 - 18:33 नवीन
पाकिस्तानचे सैन्य शरणागत आले असताना आणि त्यांचे 93000 सैनिक युद्ध कैदी असताना आणि तशी लेखी कबुली दिली असताना काश्मीरचा प्रश्न कायमचा सोडवण्याची सुसंधी असताना ती वाया घालवली यातच बांगला युद्धाचे श्रेय फुकट गेले. बाकी राजकारण संपूर्ण स्वकेंद्रित केल्याबद्दल त्यांना -1000
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
श
श्रीगुरुजी Sat, 10/07/2017 - 17:08 नवीन
वर अनेक लोकांनी नेहरूंना -१०० मार्क दिले आहेत. अतिद्वेषाबद्दलचा हा सल्ला त्यांना देखिल लागू पडतो. खरं तर नेहरूंना उणे इन्फिनिटी गुण द्यायला पाहिजेत. भारतातील सांप्रत सर्व भीषण समस्यांंचे जनक नेहरू आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पिंट्याराव Sat, 10/07/2017 - 14:43 नवीन
स्वच्छ वैयक्तिक आणि राजकीय चारित्र्य, प्रचंड टीका होत असूनही न खचता, न थकता काम करणे आणि लोकांना न रुचणारे परंतु देशहिताचे निर्णय घेण्याचे धाडस दाखवणे यासाठी... नकारात्मक - इतर पक्षाच्या भ्रष्ट लोकांना संधी देणे
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sat, 10/07/2017 - 14:48 नवीन
वाजपेयी + ५०, बेस्ट बाकी सगळे त्यांच्याहुन कमी. वाजपेयींचे ग्राम सडक योजना, गोल्डन क्वाड्रिलॅटरल हे प्रकल्प २००३-०७मधल्या भारताच्या नेत्रदीपक प्रगतीची मह्त्वाची कारणं होती. पेंशन रिफॉर्म हे अजून एक अति महत्वाचा निर्णय. याचे फायदे अजून ३०-४० वर्षांनी दिसतील. आज जो एन्पीएचा प्रॉब्लेम आहे तसाच वाजपेयी सरकारच्या काळात देखील होता जो सिन्हा/जसवंतसिंग त्यांनी व्यवस्थित सोडवला. याखेरीच शेअर बाजारातदेखील चांगले बदल आणले होते. वाजपेयी सरकारचा २००४मधला पराभव हे फार वाईट ठरलं आहे. मोदी वाजपेयींच्या जवळपास देखील नाहीत. मनमोहनसिंग -९०. वर्स्ट वाजपेयी यांनी चांगली बनवलेली अर्थव्यवस्था युपीएने उडवली. आणि मग १०-१२% महागाईने जगायची वेळ आली. २०११ पासून. एवढे नावाजलेले अर्थतज्ञ पंतप्रधान असून. याखेरीच ९३वी घटनादुरुस्ती सारखी विषवल्ली पेरणारे हेच. IBचा राजकारणासाठी वापर करणे, मनमानीने राज्य सरकारे बरखास्तं करणे वगैरे प्रकार होतेच. आत्ता देखील ममो तुम्ही परत या सारखा कढ काढणारे दिसतात. १२% महागाईची झळ यांना बसली नसावी. आज ज्या एन्पीएच्या शिव्या मोदींना बसतायत ती कर्जे सर्व मनमोहनाने दिली होती. मल्ल्याला देखील. बर अजुन २जी, कोळसा, चॉपर, कॉमनवेल्थ घोटाळ्याचा विषय देखील नाही. ते प्रताप वेगळेच. एअर इंडिया, बिएसेनेल वगैरे वाजएयींच्या काळी फायद्यात असलेल्या कंपन्या अगदी व्यवस्थित दिवाळखोरीत नेल्या. नोटबंदीचे फायदे असोत नसोत. त्याला निर्लज्जपणे ओर्गनाइज्ड लूट म्हणणारे हेच. देशाला नागवे करणारे हे दुसर्‍यावर ऑर्गनाइज्ड लूटचे आरोप करतात? न्युक्लिअर डील ते एकच पॉझिटीव्ह. पण ते देखील न्युक्लिअर लायबिलिटी लॉने टूथलेस यांनीच केलं.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 10/07/2017 - 16:56 नवीन
रोचक सर्वे ! या सर्वेत तुलनात्मक मतप्रदर्शन करताना उपयोगी पडेल अशी (एका लोकप्रिय कार्यक्रामाचा भाग असलेली) एक किंचित चित्रफीत (केवळ ३९ सेकंद) कर्मधर्मसंयोगाने आजच कायप्पावरून फिरत आली. काहींना कदाचित तिचा उपयोग होईल. या उपक्रमाला माझे दोन पैशांचे सहाय्य म्हणून ती इथे देत आहे. काहींना कदाचित तिचा उत्तरे देताना उपयोग होईल.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 10/07/2017 - 18:55 नवीन
राजीव गांधी -१०० नरसिंह राव ९० अटलबिहारी वाजपेयी ८० मनमोहन सिंग -३० नरेंद्र मोदी -१०
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sat, 10/07/2017 - 19:00 नवीन
देश स्वतंत्र झाल्या नंतरची माझी दुसरी पिढी. शाळेत शिकताना जाणवायचे कि एखाद दुसरा थोर शास्त्रज्ञ फक्त भारताचा. बाकी सर्व परदेशातील. त्या काळी जे कोणी परदेशात जाऊ शकत ते त्या प्रदेशाची इतकी स्तुती करत कि असे वाटे कि स्वर्ग असला तर तो परदेशातच. भारतात सणासुदीच्या दिवसांमध्ये अन्नधान्य बाजारातून गायब होणे हि तर नित्याची बाब. दुष्काळ जणू काही पाचवीला पुजलेला. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, वीज या सगळ्यांची वानवा. माझ्या वडिलांना, शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्याकडे नोकरी करायची या अटीवर एका बँकेने कर्ज दिले होते. त्या काळी कुठलीही कंपनी भांडवली बाजारात उतरली कि त्यांची एक कॅच लाईन ठरलेली असे: मागणी आणि पुरवठा या मध्ये असलेली प्रचंड तफावत, या मुळे उत्पादन विक्रीला कुठलाच अडसर नाही. कल्पना करा, आज भक्त मोदींना कुठली गोष्ट जमली नाही तर साठ वर्षांच्या 'घाणीची' सबब सांगतात. नेहरूंना तर दीडशे वर्ष पुरता लुटलेला देश हातात मिळाला होता. देशाला स्वतःची घटना नाही, रोजगार पुरविणारे मोठे उद्योग नाही, पटकी, क्षय अशा रोगांचे थैमान असायचे (कारण पाण्याची उपलबध्दता नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य असायचे). तेथपासून सुरुवात करून त्या काळात भिलईचा पोलाद प्रकल्प, भाक्रा नांगलसारखे मोठे प्रकल्प, या प्रकल्पांच्या नियोजन आणि पूर्ततेसाठी पंचवार्षिक योजनांची चौकट अशा गोष्टींची निर्मिती केली. इंदिरा गांधींनी याच पायावर अनेक सरकारी उद्योगांची निर्मिती केली. औषध निर्मितीमध्ये हिंदुस्थान एन्टीबीओटीक, हाफकिन इन्स्टिटयूट, इंजिनीरिंगमध्ये HMT, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन, दळणवळणासाठी VSNL, कॉम्प्युटरसाठी CMC. हि यादी फार मोठी आहे. आज आपण सिंहावलोकन करताना फार गोष्टी सहज सोप्या होत्या असे गृहीत धरतो. जसे देशाचा दृष्टिकोन समाजवादी असायला हवा होता कि भांडवलशाही, देश चालवण्यासाठी सरकारने उद्योगांची निर्मिती का केली वगैरे. आज मोठी स्वप्न दाखवून काम करताना जेव्हा सध्याचे सरकार अडखळते तेव्हा खरे तर नेहेरुंचे मोठेपण जास्तच जाणवायला हवे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 10/07/2017 - 21:01 नवीन
सर टोबी, तुमचं हे विधान रोचक आहे :
नेहरूंना तर दीडशे वर्ष पुरता लुटलेला देश हातात मिळाला होता.
नेहरूंनी मोठमोठाले प्रकल्प उभारले खरे, पण त्यांचा फायदा होण्यासाठी जी प्रशासकीय यंत्रणा हवी होती ती उभारण्यासाठी अक्षरश: काहीच प्रयत्न केले नाहीत. काळाबाजारवाल्यांना फासावर द्यायला पाहिजेत म्हणून गर्जना करणाऱ्या नेहरूंच्या कारकिर्दीत प्रत्यक्षात एकही काळाबाजारवाला फासावर गेला नव्हता. विकासाची फळं जनतेला एकतर मिळाली नाहीत किंवा निवडक लोकांच्या घशात गेली. लायसन्स राज खास नेहरूंची देणगी. जर प्रशासकीय सहाय्य मिळालं असतं तर भारत कधीच विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसला असता. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
A
arunjoshi123 Sat, 10/07/2017 - 23:04 नवीन
आपलं बरंच म्हणणं ग्राह्य वाटतं.
आज आपण सिंहावलोकन करताना फार गोष्टी सहज सोप्या होत्या असे गृहीत धरतो.
मग व्यवस्था फेल गेलेल्या, फेल्यूअर स्टेट म्हणून मानल्या गेलेल्या, आपल्या शेजारच्याच, आपणच भंग केलेल्या किमान पाकिस्तानपेक्षा भारतीय जीवन विकासांक बरे असायला हवेत कि नै? म्हणजे श्रीलंका, भूतान, चीन, अफगाणिस्तान, म्यानमार, हे सगळे तर नेहरू मरताना भारताच्या पुढे होतेच पण पाकिस्तानपण होता. जसं पाकिस्तानच्या इतिहासात त्या भूमिचा गौरवशाली पूर्वेतिहास शिकवला जात नाही तसं आपण देखिल आपल्या शेजार्‍यांपेक्षा आपलं असलेलं मागासलेपण लपवून ठेवायचो. आजही तसा थोडासा प्रयत्न करतो. (उदा. चीन भारतापेक्षा जितके पट पुढे आहे तितके पट आपण त्याला मान देत नाही. स्वातंत्र्य नसलेल्या दबलेल्या लोकांचा देश असंच चित्र प्रामुख्यानं मांडतो.). सिंहावलोकन करताना ३०० वर्षे ब्रिटिशांनी लुटलेला पाकिस्तान देखिल त्याच्या प्रथम शासकांनी कसा विकसित केला - (विकिपेडिया)
1950s and 1960s: Initial Decades[edit] Between 27 October 1958 and 25 March 1969 under Ayub Khan Pakistan economic growth averaged 5.82% growth during his eleven years in office. Manufacturing growth in Pakistan during this time was 8.51%, far outpacing any other time in Pakistani history. It was the time when Pakistan first got an automobile industry, a cement industry and few other heavy manufacturing industries. However tax collection was low averaging less than 10% of GDP.[15] The Export Bonus Vouchers Scheme (1959) and tax incentives stimulated new industrial entrepreneurs and exporters. Bonus vouchers facilitated access to foreign exchange for imports of industrial machinery and raw materials. Tax concessions were offered for investment in less-developed areas. These measures had important consequences in bringing industry to Punjab and gave rise to a new class of small industrialists.[16] Land reform, consolidation of holdings, and stern measures against hoarding were combined with rural credit programs and work programs, higher procurement prices, augmented allocations for agriculture, and, especially, improved seeds were introduced as part of the green revolution. However, academics have argued that while the HYV technology enabled a sharp acceleration in agricultural growth, it was accompanied by social polarization and increased inter personal and inter regional inequality.[17] Mahbub ul Haq blamed the concentration of economic power to 22 families which were dominating the financial and economic life of the country controlling 66% of the industrial assets and 87% of the banking.[18] During the same period there were construction of several infrastructure projects (notably Tarbela Dam and Mangla Dam), including canals, dams and power stations, began Pakistan's space programme. In 1959 the country began the construction of its new capital city.[19] A Greek firm of architects, Konstantinos Apostolos Doxiadis, designed the master plan of the city based on a grid plan which was triangular in shape with its apex towards the Margalla Hills.[20] The capital was not moved directly from Karachi to Islamabad; it was first shifted temporarily to Rawalpindi in the early sixties and then to Islamabad when the essential development work was completed in 1966.[21]
पाकिस्तानात जे काही केलं गेलं ते भारतापेक्षा उत्तम होतं. (आर्थिक, ई.) नेहरूंच्या जागी कोण्याही सोम्या गोम्याला बसवलं असतं तरी हेच सिंहावलोकन झालं असतं. वास्तविक, नेहरू एक जस्ट सोम्या गोम्या होते. पण आता इतकी हजार वर्षे पारतंत्र्य आणि गुलामीत राहिलेल्या लोकांच्या पहिल्या निवडीला सोम्या गोम्या म्हणायचं म्हणजे एक मोठा आत्मापमान होता. आपल्याच आनंदात विरजण. शिवाय पंतप्रधान कोण आहे यापेक्षा आपण स्वतंत्र आहोत, आपलाच कुणी आहे, कसा का असेना अशीच भावना जास्त होती. त्यात चिकित्सा, टिका इ बुद्धी नव्हती. लोकही अशिक्षित होते. माय मेली म्हणून ४०५ सिटा देणारांपेक्षा अशिक्षित होते!!! ============================================== सर्वधर्मसमभाव, शांति, शेजार्‍यांशी सलोख्याचे संबंध, जमिनीची लालसा नसणे, युद्धखोर नसणे, समाजवाद, स्वातंत्र्य, समता, बंधुता, खेड्याकडे चला, समाधान, मर्यादित विकास, आपल्या अस्मितांना आपण कसे चार हात दूर ठेवतो, नोबेल लालसा, केंद्रिय प्लॅनिंग, इ इ तेव्हाची पुरोगाम्याची फॅडं होती. आणि नेहरू अर्थातच या सगळ्या फॅशनचे व्हिक्टिम होते. यातलं काहीही त्यांचं स्वतःचं, नवं नव्हतं. त्यांचेसारखे लोक जगभर हेच करत होते. जिथे अनागोंदी माजली तिथे असले भोळसट सोम्या गोम्या लष्करशहांनी गिळले. अन्यत्र लोकांनी हाकलले. भारतात मात्र नेहरू, गांधी खानदानातल्या समोर ठेऊन (जसं अगोदर ब्रिटिशांना ठेवलं होतं) देशाला लुटणार्‍या नेत्यांचं , बाबूंचं, उद्योजकांचं, गुंडांचं, शत्रूंचं, अधिकार्‍यांचं विस्तृत जाळं निर्माण झालं. =================================================================== लांब सर्व करणं पण महान नव्हे. इथे राजघराण्याचे नसलेले जगातले नेते आहेत ज्यांनी खूप खूप लांब सत्ता केली. https://en.wikipedia.org/wiki/List_of_longest-ruling_non-royal_national_leaders_since_1900 यांच्यात नेहरूंचं नाव पण नाही. तेव्हाच्या लोकांना असले येडचोट सतत निवडून देणे , सत्तेत राहू देणे सामान्य वाटत असावे. आत्ता हा ट्रेंड बदलला आहे. ======================================================================================== नेहरूंच्या समकालीन जागतिक नेत्यांत आपल्या देशाचे हित करणारे वा उत्तुंग दिर्धकालीन हित साधणारे म्हणून नेहरू एक मेडीऑकर पंतप्रधान होते. तत्कालिन उपलब्ध काँग्रेसच्या आणि विरोधक नेत्यांतही नेहरू एक मेडिऑकर नेते होते. त्यांच्यानंतरच्या झालेल्या अनेक नेत्यांच्या तुलनेत देखिल ते मेडिऑकर आहेत. मंजे "व्यक्तिगत अवगुणांमुळे" देशाच्या केलेल्या नुकसानाचे गुण वजा करण्यापूर्वी १५-२० गुण द्यावे असे. ============================================================ जगात तीन क्रमांकाचे जास्त पाणी असलेल्या नदीवर धरण बांधणे, जगात दुसर्‍या क्रमांकावर जास्त असलेल्या खनिजाचा धातू काढणे हे सुचायला फार अक्कल लागत नाही. ते ही नेमकं त्यांच्याच डोक्यात सुचायची गरज नाही. (जशी नोटबंदी नेमकी नेमकी मोदींच्या दोक्यात सुचली याची जगाला का जाणो खात्री आहे!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
च
चौकटराजा Mon, 10/09/2017 - 04:50 नवीन
भारतीय लोकांचे एक अत्यंत आवडते वाक्य आहे ते असे " ही सुवर्ण भूमी होती इथे सोन्याचा धूर निघत होता.....! " इतके भंपक धादांत खोटारडे वाक्य मी आज तागायत ऐकले नाही. नेहरूं पुढे दीडशे वर्षे लूटून नेलेला भारत होता असे जर असेल तर इंग्रजानी भारतीय वास्तू लूटून नेल्या, तलावे नेले, की नदीचे घाट .. शेते नेली की गंगाकाठची सुपीक भूमी... ? भारतीय लोकानी मिळेवेलेली पेटंट्स की आणखी काही... ? दोन हजार वर्षात राजे लोकांनी स्वतः चे मोठमोठे महाल बांधण्याखेरीज काय केले याची जरा यादी इथे इतिहासाचे अभ्यासक देतील काय..? हजारो साल भारतीय लोक धर्म प्रेमी, देव प्रेमी रूढी प्रेमी , जातीभेद प्रेमी च राहिले, आळशी राहिले व गरीब राहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
म
मामाजी Mon, 10/09/2017 - 11:54 नवीन
चौरा साहेब, भारतीय लोकांचे एक अत्यंत आवडते वाक्य आहे ते असे " ही सुवर्ण भूमी होती इथे सोन्याचा धूर निघत होता.....! " इतके भंपक धादांत खोटारडे वाक्य मी आज तागायत ऐकले नाही. . साधा सरळ प्रश्न की हजारो वर्षे आपल्या देशावर आक्रमणे कशासाठी केली गेली? कंगाल, भिकार्यां च्या घरी लूटपाट करायला कोणी जात नाही. थोडक्यात इथे असलेली संपत्ती लूटून नेण्यासाठी सुद्धा आक्रमकांना हजारों वर्षे लागली. जी व्यक्ति स्वत:च्या डोळ्यांवर पुरोगामी, विज्ञानवादी, नास्तिक इत्यादी झापडे लाऊन घेते ती व्यक्ति स्वत:ची सारसार विचार करण्याची क्षमता गमावून बसते याची मला खात्री पटली. स्वामि विवेकानंदांनी सांगीतलेली ही एक गोष्ट. ऐका विहीरीत एक मोठा तगडा बेडूक रहात होता. जन्मापासून ते अत्तापर्यंतच सर्व आयुष्य त्याने त्या विहीरीतच घालवले होते. तो चांगला हट्टाकट्टा असल्यामूळे बाकि सर्व बेडके त्याच्या आज्ञेत रहात असत. ऐके दिवशी चुकून त्या विहीरीत समुद्रातला ऐक बेडूक येउन पडला. सर्व बेडके कुतूहलाने त्याच्याकडे पाहू लागली. राजा बेडकाने त्याला विचारले की तू कुठून आला आहेस. पाहुण्या बेडकाने सांगीतले की मी समुद्रातून आलो आहे. राजाने परत विचारले समुद्र म्हणजे काय? तेव्हा पाहुण्या बेडकाने सांगीतले की समुद्र म्हणजे खूप मोठा जलाशय असतो. ते ऐकून त्या राजा बेडकाने विहीरीच्या एका टोका पासून दुसर्या टोकापर्यंत लांबलचक उडी मारली आणि विचारले की या माझ्या विहीरी पेक्षा सुद्धा तूझा समुद्र मोठा आहे? त्यावर पाहुणा बेडूक हसून म्हणाला मित्रा तूझ्या या विहीरीची तुलना समुद्राशी कदापीही होऊ शकणार नाही. हे ऐकून त्या राजाला राग आला व तो बाकीच्या बेडकांना म्हणाला हा पाहुणा बेडूक खोटारडा आहे. आपल्या या विहीरीपेक्षा मोठा जलाशय असूच शकत नाही. याला ताबडतोब हाकलून द्या. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की पुरोगामी, विज्ञानवादी, नास्तिक इत्यादी झापडे काढून कूपमंडूक वृत्तीतून स्वत:ला बाहेर काढा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Mon, 10/09/2017 - 14:03 नवीन
नक्की काय लुटून नेले व किती याचे उत्तर नसल्याने मामाजी तुमचा प्रतिसाद फाट्यावर मारण्यात येत आहे. आपण तपशील दिला तर मी माझे विधान मागे घेतो. अन्यथा भारतावर हल्ले का झाले याचे उत्तर .. एक तर पराक्रमाचा अभाव ,आंभी सारखे फितूर , आपापसातील भांडणे ई आहेत असे मी तरी इतिहासाच्या पुस्तकात शिकलो आहे. आता तो इतिहास साहेबाने लिहिला आहे असे आपले म्हणणे असणारच यात शंका नाही मला . बाकी मी या विहिरीच्या बाहेरही जाऊन आलो आहे . मी जर भारत देश महान ( माझीच विहीर महान ) असे म्हटलो असतो तर आपले बेडकाचे उदाहरण युक्त होते. सबब बेडकाचे हे उदाहरणही फाट्यावर मारण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
म
मामाजी Mon, 10/09/2017 - 17:58 नवीन
चौरा साहेब, प्रतिसादासाठी धन्यवाद, काय लुटून नेले हे कळण्यासाठी काय होते याची नोंद असावी लागते ती माझ्याकडे नाही. सबब काहीही लुटून नेले नाही इथ पासुन ते जे होते ते सर्वकाही लुटून नेले इथपर्यंत हा माझ्याकडून तर्किक शेवट. हो एका कोहिनूर हीरा घेऊन गेले त्याची नोंद आहे. आता तो इतिहास साहेबाने लिहिला आहे असे आपले म्हणणे असणारच यात शंका नाही मला . या प्रकारे उल्लेख करून आपण पूर्वानुमानानेच मला संघ परिवातील वा तत्सम संस्थांचा समर्थक या श्रेणि मधे समाविष्ट करून टाकलेत. असो आपल्याला आलेल्या अनुभवांवरून हे अनुमान काढल्याची शक्यता असावी. या पैकी कोणत्याही संस्थेशी माझा संबंध नाही. कूपमंडूक वृत्तिचे ऊदाहरण देण्यामागचा माझा उद्देश हा पूर्णपणे वैचारिक प्रगल्भतेच्या दृष्टिकोनातून होता पण आपण त्याचा संबंध देशाशी जोडलात असो. शालेय जीवनापासून स्वामी विवेकानंदांचे साहित्य अभ्यासून व माझ्या कुवतीनुसार त्यांची पडताळणी करून मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे की आपला धर्म ( फक्त आपलाच नव्हे) (स्वामी विवेकानंदांच्या व्याख्येनुसार सनातन हिंदु धर्म), देश व संस्कृति महान होती, महान आहे व महान राहील. आपल्याला जर उत्सुकता असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. यात 12 पीडीफ पुस्तके आहेत. आपल्याच शब्दात सांगायचे तर साहेबानी नोंद केलेला ( सन 1780 ते 1850 ) पण आपल्या समोर कधीही न आणलेला ईतिहास आहे. धर्मपाल नावाच्या ऐका गांधीवादी गृहस्थाने ब्रिटन मधे जाऊन तेथील दस्तावेज पडताळून त्यांचे संकलन केले आहे. जर शक्य असल्यास वरील पुस्तके वाचुन आपल्या सारख्या अनुभवी व्यक्तिकडून माझ्या ज्ञानात भर पडावी ही अपेक्षा अन्यथा फाट्यावर मारण्यचा पर्याय आपल्यापुढे आहेच. https://1drv.ms/f/s!AuFt4YPB-CeYzkwZwKYJ5LQYlCVh
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
N
nanaba Wed, 10/11/2017 - 04:32 नवीन
इथली नैसर्गिक साधन सम्पत्ती आणि प्रत्येक खेड्याची स्वायत्तता. आपल्या इथे लागणारा पक्का माल आपल्या इथेच तयार व्हायचा. सेल्फ सस्टेनिन्ग सिस्टीम होती. गेलेली स्वायत्तता, आलेली मानसिक गुलामगिरी, लाचारी. त्याच पद्धतीचे शिक्शण घेऊन त्याच पद्धतीने नोकरी करत रहाणे ह्याला आलेले ग्लोरिफिकेशन. निसर्गाची झालेली अवस्था (त्या आधी आपण निसर्गाधारीत जगायचो. प्रत्येक ठिकाणचा निसर्ग त्या ठिकाणी रहाणार्‍या लोका न्ना पोसण्यास समर्थ असतो.) एक साध उदाहरण द्यायच तर पूर्वी एकरी शेतसारा न घेता आलेल्या प्रोड्युस वर घेतला जायचा. एकरी पद्धत आल्यापासून गरजेचे अन्न पिकवणे हळूहळू परवडेनासे झाले. मग हळूहळू कॅश क्रॉप्स कडे कल वाढला. आजच्या शे तीच्या दुरावस्थेचे मूळ तिथे आहे एखाद्या वर्षी दुष्काळ झाला तरी गतवर्षी साठवून ठेवलेले धान्य वगैरे उपयोगी पडायचे. इन्ग्रजानी हे लुटून नेले. होलोकास्ट इन व्हिक्टोरियन एरा म्हणून गुगल करा. तुम्हाला थोडा अन्दाज येऊ शकेल मी काय म्हणतेय त्याचा. नवीन बिलिफ्स देऊन ट्रॅडिशनल विज्डम मागे टाकायला लावले - हे लुटुन नेले. कुठलाही समाज स्वायत्त असतो तेव्हा वेगळ्या सोन्याच्या धुराची गरज नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
म
मराठी_माणूस Wed, 10/11/2017 - 07:11 नवीन
कुठलाही समाज स्वायत्त असतो तेव्हा वेगळ्या सोन्याच्या धुराची गरज नसते.
फार सुंदर मांडलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba
प
पगला गजोधर Wed, 10/11/2017 - 09:01 नवीन
कुठलाही समाज स्वायत्त असतो तेव्हा वेगळ्या सोन्याच्या धुराची गरज नसते.
म्हणूनच "चातुर्वर्ण" आधारित समाज, "स्वायत्त" असणे, शक्य नसतो. त्यामुळेच व्हाट्सएपी गळे काढणाऱ्यांच्या सुपीक मेंदूतून, सोन्याचा धुराचे, पिल्लू निपजले असावे बहुदा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba
S
sagarpdy Mon, 10/09/2017 - 14:35 नवीन
https://infogram.com/share-of-world-gdp-throughout-history-1gjk92e6yjwqm16 हे बघा - ऐतिहासिक अंदाजे GDP चा आलेख आहे. हा जगाच्या एकूण gdp चा % आहे हे लक्षात घ्या. टीप : gdp चा % आणि लोकांचे स्टॅंडर्ड ऑफ लिविंग यात सरळ संबंध सांगता येणार नाही. जास्तीत जास्त इथले स्टॅंडर्ड ऑफ लिविंग आणि दुसऱ्या एका देशाचे स्टॅंडर्ड ऑफ लिविंग यात तुलना होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
य
यशोधरा Sat, 10/07/2017 - 20:56 नवीन
रोचक धागा आणि चक्क शांततापूर्ण (अजून तरी) पद्धतीने चाललेली चर्चा वगैरे. वाचतेय.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Mon, 10/09/2017 - 09:06 नवीन
1) जवाहर लाल नेहरू : +100 (आधुनिक भारताचे जनक,शेणापासून अणूयुगाकडे नेणारे,सामान्य चहावाला सुद्धा प्रधानमंत्री होऊ शकेल इतकी सक्षम लोकशाही बनवणारे ) 2) गुलझारीलाल नंदा : ०० 3) लाल बहादुर शास्त्री : +२५ 4) इंदिरा गांधी : +७५ (-२५ आणीबाणी आणि शास्त्री गव्हर्नमेंट मध्ये हस्तक्षेप ) 5) मोरारजी देसाई : -१०० 6) चरण सिंह : +२० ( + २० स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग व शेतकरी नेते ) 7) राजीव गांधी : +५० (+५० दृष्टा नेता ,माहिती तंत्रज्ञान क्रांती , -५० शाहबानो , लिट्टे,बोफोर्स) 8) वी. पी. सिंह : +२०(-८० मंडल कमिशन ) 9) चंद्र शेखर : -५० 10) पी. वी. नरसिम्हा राव : ७५ (इकॉनॉमिक रिफॉर्म्स ) 11) अटल बिहारी वाजपेयी : -२० (मशीद पाडून आलेले सरकार ,पोखरण मुळे आर्थिक निर्बंध ओढवून घेतले,चान्गले रस्ते ) 12) एच. डी. देवेगौडा : - १०० 13) इंदर कुमार गुजराल : -१०० 14) मनमोहन सिंह : युपीए १ +५० , यूपीए २ -५० 15) नरेंद्र मोदी : +४० (- जी एस टी ,नोटबंदी ,फेकाफेक,महागाई,GDP , + एकहाती निर्णय घेण्याची क्षमता, काश्मीर पॉलिसी,फॉरेन पॉलिसी,अजून शिल्लक असलेली २ वर्षे )
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 10/09/2017 - 09:16 नवीन
चौकटराजा,
दोन हजार वर्षात राजे लोकांनी स्वतः चे मोठमोठे महाल बांधण्याखेरीज काय केले
जगात कुठली संस्कृती दोन हजार वर्षं टिकून राहिली आहे? एक चीनी सोडल्यास दुसरी कुठलीच नाही. भारत ही सुवर्णभूमी होती हे परदेशी प्रवाशांनी लिहिलेलं आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आकाश कंदील Mon, 10/09/2017 - 12:04 नवीन
मोदी + १०० कायप्पावरून – मी खूपच निराश झालो होतो, हताश झालो होतो. कोणीच मला भाव देत नसे रस्त्यावरचा कुत्रासुद्धा मला विचारात न्हवता. ""कशातच मला कर्तृत्व दाखवता येत न्हवत ....."" : : : : मग मी चौकात उभा राहून मोठयाने ओरडलो - ""मोदीने देशाची वाट लावलीय, देश विकायला काढलाय”" : : : : प्रत्येक ग्रुपवर मोदींविरोधात मेसेज (स्वतः ला न कळलेले/ पूर्ण न वाचलेले देखील) फॉरवर्ड करू लागलो. आज प्रत्येक वाहिनी आणि वृत्तपत्र मला ""परखड, अभ्यासू, राजकीय विश्लेषक आणि आलम दुनियेतील कोणत्याही विषयाचा तज्ज्ञ"" म्हणून बोलावतात
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 10/11/2017 - 11:51 नवीन
मी खूपच निराश झालो होतो, हताश झालो होतो. कोणीच मला भाव देत नसे रस्त्यावरचा कुत्रासुद्धा मला विचारात न्हवता. परफेक्ट! याची प्रत्यक्ष उदाहरणे म्हणजे शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा, अरूण शौरी . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आकाश कंदील
श
श्रीगुरुजी Mon, 10/09/2017 - 20:08 नवीन
अमेरिकन अर्थतज्ज्ञ रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर आहे. त्यांनी मागील वर्षी भारतातील निश्चलीकरणाचे समर्थन केले होते. अमेरिकेच्या दबावामुळे मोदींनी नोटाबंदी केली हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Mon, 10/09/2017 - 20:12 नवीन
अमर्त्य सेन यांनाही अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते नाही का? पण असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/09/2017 - 20:32 नवीन
बरोबर. परंतु या दोघांची तुलना अप्रस्तुत आहे. थेलर यांचा भारताचा तसा काही संबंध नाही किंवा त्यांचे भारतात काही हितसंबंधही गुंतलेले नाहीत. त्यामुळे एक निष्पक्ष अर्थतज्ज्ञ या भूमिकेतून ते या निर्णयाचा विचार करू शकतात. मात्र अमर्त्य सेन यांच्याबाबतीत असे म्हणता येणार नाही. एकतर ते भारतीय असल्याने त्यांची स्वतःची एक ठाम विचारसरणी आहे व ती डावी विचारसरणी आहे. दुसरं म्हणजे २०१५ मध्ये त्यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची पहिली ३ वर्षांची टर्म संपल्यानंतर त्यांना इच्छा असूनसुद्धा दुसरी टर्म मिळाली नाही (त्यावेळी त्यांचे वय ८१ होते). त्यामुळे तसेही ते मोदींवर खार खाऊन होते. त्यामुळे त्यांचे मत निष्पक्ष मानता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
थ
थॉर माणूस Mon, 10/09/2017 - 20:57 नवीन
>>>अमेरिकेच्या दबावामुळे मोदींनी नोटाबंदी केली हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे. कसे? आणि काय रेफरंस आहे याचा? इधरभी तुम उधरभी तुम खेळताय काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Tue, 10/10/2017 - 04:32 नवीन
बहुतेक उपरोध असावा..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
थ
थॉर माणूस Tue, 10/10/2017 - 08:34 नवीन
उपरोध आहे म्हणुनच रेफरंस मागितला आहे. नसेल तर त्या वाक्याला कुचाळक्या या पलीकडे किंमत उरत नाही. बाकी चालूद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
थ
थॉर माणूस Tue, 10/10/2017 - 09:04 नवीन
>>>त्यांनी मागील वर्षी भारतातील निश्चलीकरणाचे समर्थन केले होते. त्यांच्या आणि राजन यांच्या मतात फरक असेल तर याविषयी अधिक वाचायला नक्की आवडेल. काही दुवा वगैरे उपलब्ध आहे का त्यांच्या लेखाचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
शाम भागवत Tue, 10/10/2017 - 13:26 नवीन
अर्थव्यवस्था कॅशलेस कडे जाण्यासाठी ते मोठ्या नोटांना विरोध सुचवतात. तसेच त्यामुळे भ्रष्टाचार कमी होतो असे त्यांचे म्हणणे आहे. थोडक्यात पाठिंबा व विरोध दोन्हीही आहे ५०,१०० व २०० च्या नोटा भरपूर छापून झाल्यावर व वितरण व्यवस्था व्यवस्थित स्थापीत झाल्यावर २००० च्या नोटा रद्द होऊ शकतात. तसेच छोट्या नोटांचा व्यवस्थित पुरवढा असेल तर मागील वर्षीच्या चूका टाळता येतील. असे झाले तर मात्र त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 10/10/2017 - 13:39 नवीन
त्या खालील रामदास२९ यांनी दिलेली लिंक पण जरूर पहावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Tue, 10/10/2017 - 13:48 नवीन
अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास भष्टाचारी, निवडणूकात पैशाचा उपयोग करणारे राजकारणी, अतिरेकी, गुन्हेगार, काळाबाजारवाले, हवालावाले यांना मोठ्या नोटांबद्दल काय वाटते त्याचा अभ्यास करून त्या ठेवायच्या की नाहीत हे ठरवणे. त्यांना जर त्या हव्या असतील तर त्या रद्द करणे. तसेच या लोकांना १०, २०, ५०, १००, २०० वद्दल काय वाटते हे लक्षात घेणे. त्यांना त्या त्रासदायक वाटत असतील तर त्यांचे प्रमाण वाढवणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ग
गामा पैलवान Wed, 10/11/2017 - 09:14 नवीन
नानबा,
कुठलाही समाज स्वायत्त असतो तेव्हा वेगळ्या सोन्याच्या धुराची गरज नसते.
काय बोललात. समाज स्वायत्त असणे ही नव्या युगाच्या भाषेत अधोगती आहे. सगळ्यांना सगळं जग एकमेकांना जोडलं गेलेलं बघायचंय. ही जोडणी करतांना आर्थिक स्वायत्ततेचा बळी द्यायलाच हवा का, यावर काहीच विचारमंथन होत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रतापराव गुरुवार, 10/12/2017 - 16:39 नवीन
नेहरु 80 इंदिरा गांधि 70 राजिव गांधि 80 अटलबिहारी वाजपेयी 5 व्हि पि सिंग १०० नरेंद्र मोदी 5
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 19:15 नवीन
नेहरु ९० इंदिरा गांधि ९० राजिव गांधि ९० अटलबिहारी वाजपेयी ३ व्हि पि सिंग ८० मनमोहन ९० नरेंद्र मोदी ( १५ लाख दिले तर ९० नाहीतर ० )
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 06:56 नवीन
या धाग्यात नेहरूंबद्दल मी टाकलेल्या प्रतिसादांत विखार पाहणारांस ................ च्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 03/20/2018 - 10:21 नवीन
मनमोहन ९० नरेंद्र मोदी ( १५ लाख दिले तर ९० नाहीतर ० ) जबरदस्त न्याय मोगा !! ज्याच्या का ळात देशातला काळा पैसा बाहेर गेला त्याला ९० मार्क ज्याने हा बाहेर गेलेला काळा पैसा परत आणण्याचा निर्धार केला त्याला ० मार्क ? १५ लाख फुकटचे मिळणार म्हणुन गेले ४ वर्ष लाळ टपकत आहे ह्याचा अर्थ खालिल गोष्टी तुम्हाला मान्य आहे !! १. बराच पैसा बाहेरर्च्या देशात गेलेला आहे २. सध्याच सरकार बाहेत गेलेला पैसा परत आणण्याचा प्रयत्न करत आहे
  • Log in or register to post comments
ब
बोलघेवडा Tue, 03/20/2018 - 12:00 नवीन
नेहरु 70 इंदिरा गांधी 40 राजिव गांधी 30 अटलबिहारी वाजपेयी 80 व्हि पि सिंग हे कोण??? ओळखत नाही. मनमोहन 10 नरेंद्र मोदी 50
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 13:21 नवीन
जवळजवळ प्रत्येक प्रतिसादकाने सर्वच पक्षांच्या पंतप्रधानांना कमीअधिक मार्क्स दिले आहेत. तेव्हा जालावर दिसते तितकी कट्टरता नसावी.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा