Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खूप बिअर शिल्लक आहे

च
चामुंडराय
Fri, 10/06/2017 - 14:36
🗣 24 प्रतिसाद
घरी २ क्रेट बिअर शिल्लक आहे. पिणारे तोंड १ च आहे. कृपया नशादायक विल्हेवाट / पर्याय सुचवा. १. पिउन टाकणे हा पर्याय करून झाला आहे. जास्त प्यायला जमत नाही. चढते. २. कॅलरी कॉन्शस असल्याने एकावेळी जास्त पित नाही. हे मला प्रश्नोत्तरे मध्ये लिहायचे होते. पण ब्रेथ अनालायझर मध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त सापडल्याने access denied. धन्यवाद. ताक (बिअर नव्हे) : पार्टी करा, आम्हाला बोलवा, आम्ही संपवू असे पर्याय सुचवू नयेत. सपे पुणेरी घाऊक अपमान केल्या जाईल.

प्रतिक्रिया द्या
6384 वाचन

💬 प्रतिसाद (24)
आ
आदूबाळ Fri, 10/06/2017 - 14:53 नवीन
केसाला लावा. घने मुलायम काले बाल, खिले खिले मतवाले बाल. (एका मित्राची गर्लफ्रेंड खरोखर हा प्रकार करत असे. तिचे केस खरंच घमुकाबाखिखिमबा होते.) बाकी दुसरा पर्याय हवा असल्यासः https://en.wikipedia.org/wiki/Beer_cocktail
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 10/06/2017 - 15:55 नवीन
पार्क अवेन्युचा बीअर शाम्पू पण मिळतो. बीअरच्या बाटलीच्या आकारात. त्याने केसं (केसाचे अनेकवच्चन) गळतात लैच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सूड Sun, 10/08/2017 - 18:34 नवीन
महाभृंगराज केसांसाठी उत्तम, पण अगदीच दौलतजादा करायची असेल तर केस धुवायचा ऑप्शन चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पगला गजोधर Fri, 10/06/2017 - 15:24 नवीन
नै फ्लॅट बियर त्वचेला चांगली असते म्हणतात... बाथटब मधे ड्रेनप्लग लावून, बियरने टब भरा... मस्तपैकी त्यात नग्न होऊन एकटे डुंबत रहा .... किंवा कोणी जोडीदार / जोडीदारीण (तुमच्या ओरिएन्टेशन नुसार), बरोबर घेऊन डुंबा.... निदान दगड घेऊन पाठ चोळायला बोलावा / पाठ चोळून द्या (तुमच्या "आवडी" नुसार... इथे "आवड" ही तुम्ही चोळणार किंवा चोळून घेणार या बाबत लिहिलीय , पाठ किंवा दुसरे अवयव .... या बाबत नाही, गैरसमज नको )
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 10/06/2017 - 15:33 नवीन
बिअर शिल्लक राहिलीय? अशक्य! काहीच्या काही फेकू नका. =))
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 10/06/2017 - 16:35 नवीन
सपे पुणेरी म्हणायचं आणि बीयर शिल्लक राहिली ?? अशक्य !!
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Fri, 10/06/2017 - 17:10 नवीन
नक्कीच सपे पुणेरी. मुंबईकरांना असले प्रश्न पडतच नाहीत. दोन क्रेट बिअर कशाला अंघोळ करायला आणली होती का? जर अपेक्षित मित्रांनी पांडू केला असेल आणि बायको येण्यापूर्वी सम्प्व्यायाची असेल तर शेजाऱ्यांना बोलवा. सपे असल्याने शेजाऱ्यांना तुम्ही बोलावणार नाही आणि तुम्ही बोलावले तरी ते येणार नाहीत. तेव्हा मोरीत ओतून टाकणे हा चांगला पर्याय आहे. बायको कडून मार खायचा नसेल तर मोरी फिनेल्ने धुवायला विसरू नका. दुसऱ्या दिवशी आंघोळ करताना काल इथे किती बिअर ओतली होती याची नशा घ्यायला विसरू नका!
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Fri, 10/06/2017 - 18:32 नवीन
सगळे च वादा चे मुद्दे सपे पुणेरी 2 क्रेट बियर घेवू शकतात का ? अन दुसऱ्या ना कधी सल्ले विचारतात का ?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 10/07/2017 - 06:10 नवीन
साहेब आम्ही लिहीलेले "बियरच्या १००१ आरोग्यदायी पाककृती" हे पुस्तक विकत घ्या. किम्मत फक्त रु ३००/- पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 10/07/2017 - 06:53 नवीन
जवळच्या प्राणिसंग्रहालयात जा. तिथे एखादे बेअर असल्यास त्याला दोन्ही क्रेट भरुन पाजा. त्यानंतर ते बेअर डान्स करेल, किंवा तुम्हाला बेअर करेल, गुदगुल्या करायला.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 10/07/2017 - 08:28 नवीन
नशादायक विल्हेवाट म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sat, 10/07/2017 - 18:20 नवीन
मला मद्यपी मिपाकरांकडून मोठी अपेक्षा होती !! नशादायक विल्हेवाट याची दोन उदाहरणे देतो. पाण्याचे आईस क्यूब्ज करतो तसे बिअरचे क्यूब्ज करा आणि पाण्यात किंवा फळांच्या रसात टाकून प्या. कुल्फी मेकरच्या साच्यामध्ये बिअर ओतून कुल्फीची काडी खोचून फ्रिजर मध्ये ठेवा आणि बियरुल्फी खा. येन्जॉय. मला मद्यपी मिपाकरांकडून अश्या बिअरोव्हेटिव्ह कल्पनांची अपेक्षा होती. हा हंत हंत, मिपाकरांची कल्पना कुठे गेली? केव्हढा हा अपेक्षाभंग !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
पगला गजोधर Sun, 10/08/2017 - 10:05 नवीन
नशादायक विल्हेवाट याची दोन उदाहरणे देतो. . .
तुम्हास ठाऊक आहे काय ? मानवी शरीराचा सर्वात मोठा अवयव की जो शरीरारात द्रव्य शोषून घेऊ शकतो....कोणता ?? तर तुमची त्वचा.... म्हणून तुम्हाला फ्लॅट बियर मधे डुंबून रहा असा, "नशादायक" म्हणण्यास पात्र, असा सल्ला दिलेला होता.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
ए
एस Tue, 10/10/2017 - 06:21 नवीन
पण शेवटी तुम्ही काय केलंत त्या बिअरचं हे सांगितलंच नाही. प्रतिसादाचंही विडंबन करता आलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
अ
अभ्या.. Tue, 10/10/2017 - 08:50 नवीन
च्ययला कैपण. हे असले टाकाऊतून टीकाऊ करणार्‍या गृहशोभिका वाचकांचा लै राग येतो. आज बिअरची कुल्फी करायला सांगताय, उद्या चकण्यापासून पंचपक्वान्नाचे जेवण बनवायला सांगताल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
प
पगला गजोधर Tue, 10/10/2017 - 09:08 नवीन
हम्म... कोणीतरी गृहशोभिका नियमित व तपशीलवार वाचत आहे म्हणायचं ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नाखु Sat, 10/07/2017 - 14:38 नवीन
सरकार दरबारी जमा करा सरकारी दप्तरी​ नोंद फक्त एकच बाटलीची राहिल याची खात्री बाळगा. धाग्यावर ही बिअर पासुन निर्लेप नाखुश आमचे ईथे कशाचे काय करावे याचे वर्ग घेतले जातात अभामिपा फावेडोस समिती
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sun, 10/08/2017 - 09:46 नवीन
सम्द्यास्नी काय बी कललं नाय आवो ते दूध शिल्लक हायचं विडंबन हाय.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 10/08/2017 - 18:28 नवीन
अभामिपा फावेडोस समिती फावल्या वेळेत डोकेबाज सल्ला समिती आपलं स्वागत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 10/09/2017 - 05:56 नवीन
श्या... पोपट झाला... आम्ही उगाचच आमचे पुस्तक खपवायच्या मागे लागलो. सर्व विडंबकांना नम्र विनंती जेव्हा विडंबन करत असाल तेव्हा पेरणेची लिंक जरुर टाका. नाहीतर माझ्या सारख्या सरळमार्गी लोकांचा असा घोळ होतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
च
चामुंडराय Mon, 10/09/2017 - 06:16 नवीन
दर्ददेकर सर, आधीच ती बिअरची नशा आणि त्यात आणखी ती संपवायचं टेन्षण त्यामुळे तो प्रेर्ना दुवा टाकायचा राहिला बघा. सवारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
स
सूड Tue, 10/10/2017 - 11:25 नवीन
दर्ददेकर साठी तुम्हाला एक बीयर मस्तानी देण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
च
चामुंडराय Sat, 10/14/2017 - 15:06 नवीन
वा व्वा, बिअर मस्तानी, बिअरोव्हेटिव्ह आयडिया. बिअर मस्तानीचा आस्वाद घेऊन बाजीराव होऊ इच्छिणारा चामुंडराय.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
च
चामुंडराय Sat, 10/14/2017 - 15:06 नवीन
वा व्वा, बिअर मस्तानी, बिअरोव्हेटिव्ह आयडिया. बिअर मस्तानीचा आस्वाद घेऊन बाजीराव होऊ इच्छिणारा चामुंडराय.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा