Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्राध्यापक रिचर्ड थेलर यांना नोबेल पारितोषिक आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स

म
मिल्टन
Mon, 10/09/2017 - 20:09
💬 103 प्रतिसाद
अर्थशास्त्रातील सर्वोच्च मानाच्या नोबेल पारितोषिकासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचेही नाव विचारात घेतले जात आहे असे क्लॅरीव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या कंपनीने म्हटल्याची बातमी शनीवारी ७ ऑक्टोबरला आली आणि अर्थशास्त्रातील हे मानाचे पारितोषिक नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकता चाळावली गेली. त्यानंतर काही मिपाकरांशी ई-मेलवर चर्चा करताना रघुराम राजन यांना नोबेल पारितोषिक मिळायची शक्यता बरीच कमी आहे असे मी म्हटले होते. त्याचवेळी अर्थशास्त्रातील युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक रिचर्ड थेलर आणि जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक डॉनल्ड बोडरॉक्स यांना कधीतरी नोबेल मिळावे असे मला फार वाटते असे म्हटले होते. आज दुपारी रिचर्ड थेलर यांना नोबेल पारितोषिक जाहिर झाले आणि मला जी गोष्ट व्हावी असे वाटत होते त्यासाठी फार वर्षे थांबावे लागले नाही या विचाराने खरोखरच आनंद झाला. या लेखातून प्राध्यापक रिचर्ड थेलर यांचे काम आणि त्यांचा विषय बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स याचा आढावा घेऊ. 1 प्राध्यापक रिचर्ड थेलर क्लासिकल इकॉनॉमिक्स मानवी समाजाची रचना कशी असावी, मनुष्यप्राणी विचार करताना नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करतो याचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. हा विषय मानवी स्वभाव आणि मानवी समाजाशी निगडीत असल्यामुळे मानवी संस्कृतीची सुरवात झाली आणि माणूस समाजात राहायला लागला तिथपासूनच सुरू झाला. अगदी प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल यांनीही विचार मांडले आहेत त्यातले अनेक अर्थशास्त्राशीच निगडीत आहेत असे म्हणायला हरकत नसावी. पण मध्ययुगाचा अंत आणि आधुनिक जगाची सुरवात यांच्या संधीकाळात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आधुनिक अर्थशास्त्राचा पाया रचला गेला असे म्हणतात. तो पाया रचला अ‍ॅडम स्मिथ या स्कॉटिश तत्वज्ञाने. त्याने १७७६ मध्ये लिहिलेले An Inquiry into the Nature and Causes of the Wealth of Nations (थोडक्यात The Wealth of Nations) या पुस्तकातून तो पाया रचला गेला असे समजले जाते. हे पुस्तक म्हणजे एका अर्थी स्मिथने युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो मध्ये दिलेल्या व्याख्यानांवर आधारीत आहे. या पुस्तकात अ‍ॅडम स्मिथने ज्याला मार्केट इकॉनॉमी म्हणता येईल त्या पध्दतीचा पुरस्कार केला होता. त्या पुस्तकातील पुढील वाक्य बरेच प्रसिध्द आहे: "Every individual... neither intends to promote the public interest, nor knows how much he is promoting it... he intends only his own security; and by directing that industry in such a manner as its produce may be of the greatest value, he intends only his own gain, and he is in this, as in many other cases, led by an invisible hand to promote an end which was no part of his intention." या वाक्याचा असा अर्थ लावला जातो की माणूस हा मुळात स्वार्थी आहे असे अ‍ॅडम स्मिथला म्हणायचे आहे. प्रत्यक्षात अ‍ॅडम स्मिथला अभिप्रेत असलेला "own interest" चा अर्थ नक्की कोणता हे त्याने वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकापूर्वी १७ वर्षे लिहिलेल्या "The Theory of Moral Sentiments" या पुस्तकात सापडेल. या पुस्तकात स्मिथ म्हणतो की प्रत्येक माणसात एक 'इनर सेल्फ' (ज्याला सद्सदविवेकबुध्दी म्हणता येईल) असतो आणि आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर या 'इनर सेल्फ' चे लक्ष असते. हा इनर सेल्फ एखाद्या निष्पक्ष पंचाप्रमाणे असतो. बहुतांश वेळी या इनर सेल्फला न आवडणारी कृती टाळण्याकडे माणसाचा कल असतो. तसेच माणसाची 'पॅशन्स' आणि हा निष्पक्ष इनर सेल्फ यांच्यात झगडा चालू असतो. कधी कधी पॅशन्सचा विजय होतो आणि इनर सेल्फ पराभूत होतो. तरीही आपल्याच कृतीकडे त्या इनर सेल्फचे लक्ष असते हे अ‍ॅडम स्मिथने अधोरेखित केले आहे. तेव्हा या इनर सेल्फला मान्य होईल अशी कृती म्हणजे "own interest" असा अर्थ अ‍ॅडम स्मिथला अभिप्रेत होता असे काही लोक म्हणतात.तरीही अ‍ॅडम स्मिथ म्हटले की तो अदृश्य हात आणि स्वार्थी माणूस हे चित्र उभे राहिलेच. स्मिथने हे पुस्तक लिहायच्या ३८ वर्षे आधी म्हणजे १७३८ मध्ये गणितज्ञ डॅनिएल बरनॉली याने ज्या प्रकारच्या खेळांमध्ये नक्की निकाल काय लागणार हे माहित नसते (उदाहरणार्थ रॉलेट व्हिल, फासे इत्यादी) अशा खेळांमध्ये नक्की कोणत्या आधारावर माणसे निर्णय घेतात याविषयीची एक थिअरी मांडली. त्या थिअरीमध्ये 'युटीलिटी' (एका अर्थी समाधान) या एका संकल्पनेचा उल्लेख केला. विस्तारभयास्तव याविषयी अधिक लिहित नाही. पण थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्याकडील पैशातून आपण समजा काही संत्री आणि काही मोसंबी घेऊ शकतो. आपल्याला वाटल्यास आपण नुसती संत्रीच किंवा नुसती मोसंबीच किंवा काही संत्री आणि काही मोसंबी घेऊ शकतो. आता माणसे नक्की किती संत्री आणि किती मोसंबी विकत घेणार हे ठरवायचे कसे? तर त्यासाठी त्याने 'युटिलिटी' या संकल्पनेचा उल्लेख केला. संत्रे खाल्यावर समजा 'क्ष' एकक समाधान मिळते आणि मोसंबे खाल्ल्यावर 'य' एकक समाधान मिळते. (यातही जितकी जास्त संत्री/मोसंबी खाऊ त्याप्रमाणे जास्तीच्या खाल्लेल्य संत्र्या/मोसंब्यांची युटिलिटी कमी असते). तर माणूस अशा पध्दतीने संत्री आणि मोसंबी निवडेल ज्यातून त्याला मिळणारी एकूण युटिलिटी सर्वात जास्त असेल. या संकल्पनेचा अर्थशास्त्रासाठी पुढे विलिअम स्टॅनले जेवोन्सने विस्तार केला. त्यानंतर आल्फ्रेड मार्शलने १८९० मध्ये लिहिलेल्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकात या संकल्पनेला आधार धरून आणखी अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. आल्फ्रेड मार्शलचे हे पुस्तक त्यानंतर किमान २०-२५ वर्षे अर्थशास्त्रावरील प्रमाण मानले जात होते आणि विद्यापीठांमध्येही ते पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जात असे. वरकरणी दिसायला हे साधेसरळ गणित वाटते. पण प्रत्यक्षात परिस्थिती तितकी साधी नाही. एक तर हे 'मॅक्झिमम युटीलीटी' चे गणित सोडवायचे तर संत्री आणि मोसंबी खाऊन नक्की किती युटिलिटी मिळेल हे त्या माणसाला माहित पाहिजे. आता एखाद्या गोष्टीपासून नक्की किती युटीलिटी मिळते या प्रश्नाचे उत्तर आकड्यात कसे देणार? आणि प्रत्यक्षात निर्णय घेताना संत्री आणि मोसंबी असा साधासरळ हिशेब नसतो तर इतरही अनेक घटक असतात. ते सगळे घटक माहित हवेत. आणि त्यातून विलक्षण गुंतागुंतीची युटिलिटीची गणिते करून माणूस निर्णय घेतो असे या सगळ्या मॉडेलचे सार होते. आणि अर्थातच या सगळ्या गोष्टी करता येण्यासाठी प्रत्येक माणूस 'रॅशनल' आहे हे गृहितक धरावेच लागेल. अन्यथा हे मॉडेल कोलमडेल. या रॅशनल माणसाची लक्षणे कोणती? तर ती व्हॉन न्यूमान आणि मॉर्गन्स्टिन या दोन प्राध्यापकांनी १९४७ मध्ये लिहिलेल्या एका पेपरमध्ये सापडतील. हा पेपर बर्‍यापैकी गुंतागुंतीचा आहे. तो पेपर वाचताना माझे तरी डोके आऊट झाले होते. तेव्हा प्रत्यक्षात आपल्यापैकी कोणीही ही युटिलिटीची गणिते करून निर्णय घेत नाही त्यामुळे हे मॉडेल मनुष्यस्वभावाचे अचूक निर्देशक नाही हे तर नक्कीच. तरीही हे मॉडेल आणि त्या मॉडेलवर आधारीत इतर मॉडेल्स अर्थशास्त्रात अनेक वर्षे बर्‍यापैकी लोकप्रिय होती, अजूनही आहेत. ज्याला निओक्लासिकल इकॉनॉमिक्स म्हणतात त्याचा आधार या मॉडेलमध्ये आहे. हर्बर्ट सायमन आणि जॉर्ज कॅटोना आता मिपाकर मला विचारायच्या बेतात असतील की प्राध्यापक रिचर्ड थेलरचे काम नक्की कोणते हे लिहायचे सोडून भलतेच कुठले चर्‍हाट लावले आहे. पण हे सगळे लिहिले नाही तर त्यांचे काम नक्की कोणते होते हे समजणार नाही त्यामुळे हे सगळे रामायण लिहिणे गरजेचे आहे. तेव्हा माणूस नक्की कसा विचार करतो म्हणजेच माणसाचे मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र याची सांगड घालायची गरज काही अभ्यासकांना वाटू लागली. यातूनच बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स पुढे आले. १९६० च्या दशकात पिट्सबर्गच्या कार्नेगी टेक विद्यापीठात (सध्याचे कार्नेगी मेलॉन) हर्बर्ट सायमन या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी आणि अ‍ॅन आर्बरच्या युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमध्ये जॉर्ज कॅटोना या मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हे काम सुरू केले. अर्थात १९६० च्या दशकात 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स' हा शब्दप्रयोग वापरला गेला नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे तो शब्दप्रयोग सर्वप्रथम केला जॉर्ज कॅटोनांनी १९८० मध्ये. १९६० च्या दशकात कार्नेगी टेकमध्ये निओक्लासिकल इकॉनॉमिक्सने भारावलेले फ्रॅन्को मोडिग्लिआनीसारखे प्राध्यापक होतेच तर भविष्यात ज्याला बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स म्हटले गेले त्याने भारावलेले हर्बर्ट सायमन सारखेही प्राध्यापक होते. या दोन्ही प्राध्यापकांना भविष्यात अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. आणि हे दोघेही एकाच वेळी एकाच विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यावेळी कार्नेगी टेकमध्ये ज्यांना शिकायला मिळाले असेल त्यांचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही. हर्बर्ट सायमन आणि जॉर्ज कॅटोनांच्या प्रयत्नांना त्यामानाने मर्यादित यश आले. त्याचे कारण त्यांच्या कामात काही कमी होती का? तर तसे नक्कीच नाही. माझ्या मते त्याचे कारण म्हणजे काळाचा महिमा. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात आपली युध्दसामग्री, दारूगोळा इत्यादींचा सर्वात जास्त परिणामकारक वापर व्हावा यासाठी अनेक आघाडीच्या प्राध्यापकांची मदत अमेरिकन लष्कराने घेतली होती. मी माझा मिपा आय.डी ज्यांच्या नावावरून घेतला आहे ते मिल्टन फ्रिडमन सर्वात परिणामकारक ठरण्यासाठी दारूगोळ्यातील बॉम्बचा आकार नक्की किती असावा हे ठरवायच्या मॉडेलिंगमध्ये सहभागी होते. म्हणजे मोठा गोळा असेल तर अधिक भागावर तो परिणाम घडवेल पण त्यामानाने त्याची परिणामकारकता 'डिफ्युज्ड' असेल आणि लहान गोळा असेल तर तो कमी भागावर परिणाम घडवेल पण अधिक 'कॉन्सन्ट्रेटेड' असेल. अशाप्रकारे अनेक गोष्टींसाठी गणित आणि संख्याशास्त्राचा वापर केला आणि गरज ही शोधांची जननी असते या न्यायाने ऑपरेशनल रिसर्च, संख्याशास्त्र यातील अनेक नव्यानव्या गोष्टींचा उगम त्यातून झाला. त्यातूनच तो काळ आकडे, समीकरणे यांचा होता. त्या काहीशा रूक्ष वाटणार्‍या वातावरणात बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स तितकेसे परिणामकारक ठरले नाही. बिहेविअरल इकॉनॉमिक्सची लोकप्रियता: डॅनिएल कॅनेमन आणि अ‍ॅमोस Tversky यांचे योगदान पण १९७० च्या दशकात प्रिन्सटन विद्यापीठाचे प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन आणि स्टॅनफर्डचे अ‍ॅमॉस Tversky या दोन मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी अनेक प्रयोग केले आणि त्यातून क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या महत्वाच्या गाभ्यालाच (माणसे रॅशनल असतात) धक्का लावला. माणसे खरोखरच रॅशनल नसतात हे 'गट फिलिंग' कोणाला नसेल असे वाटत नाही. पण संशोधनाच्या जगतात नुसते 'गट फिलिंग' कामाचे नाही. तर आपले म्हणणे एका मॉडेलच्या स्वरूपात मांडता आले पाहिजे. कॅनेमन आणि Tversky यांनी अनेक प्रयोग केले, आकडेवारी गोळा केली आणि आपले मॉडेल मांडले. त्यांनी हे खूपच महत्वाचे काम केले. या सर्व प्रयोगांविषयी प्राध्यापक कॅनेमन यांनी Thinking, Fast and Slow या पुस्तकात विस्ताराने लिहिले आहे. जर एखादे पुस्तक वाचून आंतर्बाह्य हादरून जाणे म्हणजे काय हा अनुभव घ्यायचा असेल तर हे पुस्तक जरूर वाचावे ही विनंती. आपण फार रॅशनल आहोत असा आपल्या सगळ्यांचाच (विशेषतः आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांचा) समज असतो तो किती मोठा गैरसमज आहे याचा अनुभव ते पुस्तक वाचताना अगदी पदोपदी येतो. ज्या गृहितकावर पूर्ण क्लासिकल इकॉनॉमिक्सचा डोलारा अवलंबून होता त्यालाच धक्का लावणे ही गोष्ट साधीसुधी नव्हती. या महत्वाच्या कामाबद्दल प्राध्यापक डॅनिअल कॅनेमनना २००२ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. प्राध्यापक अ‍ॅमॉस Tversky यांचे त्यापूर्वीच निधन झाले होते म्हणून त्यांना नोबेल मिळू शकले नाही. रिचर्ड थेलर आणि बिहेव्हिअरल फायनान्स प्राध्यापक डॅनिअल कॅनेमन यांचे कार्य अफलातून होते यात तीळमात्र शंका नाही. पण ते मानसशास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांचे काम जास्त मानसशास्त्राच्या अंगाकडे झुकणारे होते. निओक्लासिकल इकॉनॉमिक्सच्या पायालाच हादरवायचे काम त्यांनी केले. पण त्या बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सच्या तत्वांचा अर्थशास्त्रात अधिक उपयोग कसा करता येईल याविषयी काम केले रिचर्ड थेलर यांनी. अमेरिकेत विद्यापीठांमध्ये 'फ्रेशवॉटर स्कूल' आणि 'सॉल्टवॉटर स्कूल' हा प्रकार आहे.फ्रेशवॉटर स्कूल म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगो, कार्नेगी मेलॉन आणि युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर यासारखी गोड्या पाण्याच्या ग्रेट लेक्सजवळ वसलेली विद्यापीठे तर सॉल्टवॉटर म्हणजे हार्वर्ड, प्रिन्सटन, कोलंबिया, बर्केले, यु.सी.एल.ए इत्यादी समुद्राजवळ वसलेली विद्यापीठे. फ्रेशवॉटर स्कूलमध्ये निओक्लासिकल इकॉनॉमिक्स, फ्री मार्केट आणि एकंदरीत उजव्या विचारांचे तर सॉल्टवॉटर स्कूलमध्ये समाजवादी, डाव्या विचारांचे प्राबल्य. आता हा फरक बराच कमी झाला तरी आहे पण प्राध्यापक थेलर पी.एच.डी झाले तेव्हा (१९७५ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर या फ्रेशवॉटर विद्यापीठातून) फ्रेशवॉटरमधून पी.एच.डी झाल्यास सॉल्टवॉटरमध्ये (आणि व्हाईस-व्हर्सा) प्राध्यापक म्हणून घेतले जायचे प्रमाण बरेच नगण्य होते. त्यातून थेलर पी.एच.डी झाल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून लागले (जिथे रघुराम राजन सध्या प्राध्यापक आहेत). युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोचा उल्लेख मुद्दामून करत आहे. कारण याच विद्यापीठात मिल्टन फ्रिडमन हे उत्युंग व्यक्तीमत्व एकेकाळी अर्थशास्त्राचे (बूथ स्कूलमध्ये नव्हे) प्राध्यापक म्हणून होते.) तसेच ज्यांना 'फादर ऑफ मॉडर्न फायनान्स' म्हटले जाते ते प्राध्यापक युजीन फामा हे पण बूथ स्कूलमध्येच प्राध्यापक होते. मिल्टन फ्रिडमन यांनी १९५० च्या दशकात फायनान्शिअल मार्केटमधील किंमती कशा ठरविल्या जातात याविषयी सुरवातीचे काम केले. त्यावेळी फ्रिडमनने म्हटले की सर्व फायनान्शिअल सेक्युरीटी (शेअर/बॉन्ड इत्यादी) त्यांच्या योग्य त्या किंमतीला (म्हणजे भविष्यात येणार्‍या सर्व कॅश-फ्लो ला डिसकाऊंट करून आलेल्या प्रेझेन्ट व्हॅल्यूला) विकल्या जातात. जर का काही काळ ही किंमत त्यापेक्षा वेगळी असेल तर 'आर्बिट्रेजर' त्याचा फायदा उठवतात आणि सर्व फायनान्शिअल सेक्युरीटींची किंमत त्यांच्या 'फंडामेन्टल किंमतीला' विकली जातील अशी परिस्थिती निर्माण करतात. १९७० मध्ये प्राध्यापक युजिन फामा (२०१३ चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते) यांनी त्यात आणखी भर टाकून 'एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस' मांडले. प्राध्यापक रिचर्ड थेलर यांनी सुरवातीला एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस वर बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स (किंबहुना बिहेव्हिअरल फायनान्स) च्या अंगाने काम केले. या हायपोथिसिससाठीही माणसे रॅशनल असतात हे गृहितक होते. थेलर आणि इतर प्राध्यापकांच्या कामातून फायनान्शिअल मार्केटमध्ये सर्व भाग घेणारे रॅशनल असू शकत नाहीत हे दाखवून दिले. युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोमध्ये राहून मिल्टन फ्रिडमन आणि युजीन फामा यांच्यासारख्या stalwarts चे काम पूर्णपणे बरोबर नव्हते हे दाखवून देणे ही खूप मोठी गोष्ट होती. नज इंग्लिशमध्ये नज (nudge) या शब्दाचा अर्थ आहे: "prod (someone) gently with one's elbow in order to attract attention.". रिचर्ड थेलर आणि हार्वर्ड विद्यापीठाचे कायद्याचे प्राध्यापक कॅस सनस्टीन यांनी अधिक चांगल्या पॉलिसी मेकिंग साठी 'नज' चा वापर कसा करता येईल याविषयी नज हे पुस्तक लिहिले आहे. अर्थशास्त्रात नजचा अर्थ हा की जर समोरचा माणूस योग्य ते निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर आपण अशी परिस्थिती निर्माण करायची ज्यातून तो माणूस योग्य तो निर्णय घेण्याकडे एका अर्थाने 'ढकलला' जाईल. म्हणजे आपण त्याला 'नज' करायचे. हे उदाहरणे देऊनच अधिक स्पष्ट करता येईल. १. शाळेतील विद्यार्थ्यांना 'तुम्ही जंक फूड' न खाता फळे आणि सॅलड खा असे कितीही सांगितले तरी ते त्यांना पाहिजे तेच पिझ्झा बर्गर इत्यादी खाणार. म्हणून शाळेच्या कॅफेट एरिआमध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष जाईल या उंचीवर पुढे फळे, सॅलड इत्यादी सकस खाणे ठेवायचे आणि जंक फूड मागे ठेवायचे. २. अमेरिकेत अनेक कंपन्यांमध्ये रिटायरमेन्ट फंडांमध्ये इच्छा असल्यास तुम्ही सबस्क्राईब करा असा पर्याय असतो. त्यातून होते असे की सबस्क्राईब करायचे असेल तर त्यासाठी नव्या नोकरीच्या ठिकाणी जॉईनिंग फॉरमॅलिटी करताना मुद्दामून एक टिक करावा लागायचा. आपल्याला वाटेल की एका टिकमध्ये काय मोठेसे. पण प्रत्यक्षात तसे नसते. लोक बहुतांश वेळा जो काही 'डिफॉल्ट ऑप्शन' असेल तोच चालू ठेवतात. मग कल्पना अशी की डिफॉल्टच 'ऑप्ट-इन' ठेवला तर? म्हणजे कर एखाद्याला रि टायरमेन्ट फंडात पैसे गुंतवायचे नसतील तर त्याने/तिने बाहेर पडायच्या ऑप्शनवर टिक करावे. तसे न केल्यास 'बाय डिफॉल्ट' तो कर्मचारी आपोआप रिटायरमेन्ट फंडात गणला जाणार!! म्हणजे डिफॉल्ट ऑप्शन समोरच्या माणसाच्या हिताचा ठेवायचा. याचा सर्वात नाट्यमय फायदा बघायला मिळाला युरोपात. ड्रायव्हर्स लायसेन्स काढताना 'अपघाती मृत्यू झाल्यास तुमचे अवयव इतरांना दान करावेत का' हा प्रश्न होता. ज्या देशांमध्ये 'बाय डिफॉल्ट' दान करावेत (आणि अवयव दान करू नयेत अशी इच्छा असेल तर टिक करून त्या माणसाने 'ऑप्ट आऊट' करायचे) हा पर्याय होता त्या देशांमध्ये ९०% पेक्षा जास्त लोकांनी तोच पर्याय निवडला. तर ज्या देशांमध्ये 'बाय डिफॉल्ट' अवयवदान करू नये हा पर्याय होता (आणि अवयव दान करावे अशी इच्छा असेल तर टिक करून 'ऑप्ट इन' करायचे) त्या देशांमध्ये १०% लोकांनीच अवयवदानाचा पर्याय स्विकारला होता. नज या पुस्तकात अशी अनेक उदाहरणे आहेत. हा लेख आधीच प्रचंड मोठा झाला आहे म्हणून विस्तारभयास्तव ती टाळतो. एकूणच काय की कोणावरही कसलीही सक्ती न करता त्या माणसाच्या हिताचा निर्णय घ्यायला तो आपण होऊन उद्युक्त होईल अशी परिस्थिती निर्माण करणे म्हणजे 'नज'. इंग्लंडच्या सरकारने पब्लिक पॉलिसीमध्ये नज कसे अंमलात आणता येतील यासाठी रिचर्ड थेलर यांचा सल्लाही घेतला होता. इफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस आणि नज याव्यतिरिक्त प्राध्यापक थेलर यांचे इतरही काम आहे. पण त्याविषयी लिहायचे झाले तर आणखी एक लेख लागेल. तेव्हा ते टाळतो. या लेखातून बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स या माझ्या अत्यंत आवडत्या विषयावर थोडेफार लिहायला मिळाले याचे समाधान वाटते. लेख संपविण्यापूर्वी एक गोष्ट लिहितो. टोरोंटोमधील रॉटमन स्कूल ऑफ बिझनेसमधील प्राध्यापक दिलीप सोमण यांनी शिकॅगोमधील बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधून पी.एच.डी केली आणि त्यांच्या डिफेन्स कमिटीमध्ये प्राध्यापक रिचर्ड थेलरही होते. आज रिचर्ड थेलरना नोबेल पारितोषिक मिळालेच आहे. त्यानंतर त्यांच्या दिलीप सोमण या विद्यार्थ्याकडूनही असेच काम व्हावे आणि आणखी १५-२० वर्षांनंतर त्यांच्यावरही असाच लेख लिहायची संधी मिळावी ही इच्छा. रिचर्ड थेलरना नोबेल मिळाल्यानंतर खरं सांगायचं तर मला खूपच आनंद झाला आहे. त्यांच्यावर आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सवर एखादा छोटेखानी लेख आजच मिपावर लिहावा असे त्यांना नोबेल मिळाल्याची बातमी दुपारी वाचल्यापासून फार वाटत होते. (हा लेख छोटेखानी न राहता मोठेखानी झाला आहे ही गोष्ट वेगळी :) ) तसे करता आले याचे समाधान आहे.

प्रतिक्रिया द्या
39689 वाचन

💬 प्रतिसाद (103)
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/10/2017 - 16:45 नवीन
सुंदर विश्लेषण ! माणूस रॅशनल नाही हे बर्‍याच अंशी मान्य करायला तरी काहीच हरकत नसावी. यावर जरासे... आधुनिक शास्त्रिय संशोधनासारखे कडक नियमांनी बांधलेले काही विशिष्ट विषय सोडले तर, सर्वसाधारण व्यवहारांत माणूस रॅशनल कधीच नव्हता. सर्वप्रथम, एखाद्या गोष्टीबद्दल रॅशनल निर्णय घ्यायला त्यासंबंधीची सर्व तथ्ये आणि आकडे उपलब्ध असायला हवे, जे सर्वसामान्यपणे उपलब्ध असणे शक्य नाही *. त्यानंतर, त्यांचा कार्यकारण संबंध लावायला योग्य ती व योग्य तेवढी बौद्धीक संपत्ती असायला हवी, जी सगळ्या सर्वसामान्य लोकांत असत नाही. वादाकरिता एखाद्या आदर्श व्यवस्थेत हे सगळे शक्य झाले आहे असे समजूया. तरीही... १. इतक्या सर्व प्रक्रियेतून जायला लागणारी चिकाटी सर्वसामान्य माणसात नसते आणि / किंवा तो सहजपणे गोंधळून जातो; आणि २. एवढे करून मिळणार्‍या खरोखरच्या रॅशनल निर्णयाचे फलीत सुखकारक असेलच असेही नाही ! अर्थात, ते सर्वसामान्य माणसांच्या गळी उतरणे / उतरवणे ही कठीण गोष्ट असते. सर्वसाधारणपणे, माणूसाची मूळ प्रवृत्ती, तत्कालिक परिस्थिती जमेल तसे "सेल्फप्रिझर्वेशन (स्व-जतन)" करणे आणि ते जमल्यानंतर "सेल्फ ग्लोरिफिकेशन (स्व-गौरव)" साधण्याकडे, केंद्रित असते. ते करण्याची प्रक्रिया आणि मिळणारे फलित, दोन्ही शक्य तेवढे सुखकारक व्हावे ही त्याची धडपड असते. शिवाय, हे करताना समान परिस्थितीतही प्रत्येक माणूस तोच निर्णय घेईल असे नाही कारण, प्रत्येकाच्या सुखाच्या अपेक्षा, फलिताच्या अपेक्षा आणि ते मिळविण्यासाठी 'प्रयत्न करण्याची, वेळ द्यायची व धोका पत्करण्याची' क्षमता वेगवेगळी असते. वरचे सगळे पाहता, सर्वसाधारण माणसाचे वागणे-बोलणे-निर्णय हे, त्याला उपलब्ध असलेली तथ्ये व आकड्यांपेक्षा जास्त; त्याच्या अपेक्षा, वैयक्तिक "भीती आणि लोभ (fear and greed) व (असलेच तर) भूतकालातील तत्सम अनुभव यांच्यावर शक्य असलेल्या फलिताच्या कल्पनेवर अवलंबून असतात. भूतकालातील तत्सम अनुभव नसले तर त्यात चिंतेची (अज्ञाताची भीती) भर पडते. या प्रकारे घेतलेले निर्णय रॅशनल (तर्कप्रामाण्याधिष्ठीत) कसे असू शकतील ? मानवंशशास्त्राच्या दृष्टीने हे तसे वाईटही नाही... माणूस मुळात जर स्वजतन करण्यात अयशस्वी झाला नसता तर (माणूसच नाही म्हटल्यावर) आता अभिमान वाटणार्‍या त्याच्या इतर गमज्यासुद्धा आस्तित्वात आल्या नसत्या... हे कितीही बरे-वाईट वाटले तरी, निर्विवाद सत्य आहे ! सर्वच जीवन (आणि म्हणून इकॉनॉमीही) बहुतांश याच तत्वांवर चालते. याच, स्व-जतन आणि स्व-गौरव तत्वांवर माणूस दोन लाख वर्षे टिकून राहिला आहे आणि (संस्कृती, अर्थ, शास्त्र, इत्यादींच्या दृष्टीने) समृद्ध झाला आहे. ================ * : नेहमीच्या सत्य व्यवहारात, व्यापार-राजकारण-जीवनासकट कोणत्याही बाबतीतले अगदी तज्ज्ञांनी घेतलेले व शास्त्रिय प्रक्रियेतून जाणारे निर्णयसुद्धा तात्कालील उपलब्ध असलेल्या अपूर्ण माहितीवर आणि तात्कालील उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या साधनसंपत्तीच्या व भूतकालातील तत्सम अनुभवांच्या पार्श्वभूमीवरच घेतलेले "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" असतात, आणि तेवढ्याच भांडवलावर कारवाई करावी लागते. नाहीतर, तुमचा प्रतिस्पर्धी तशा प्रकारे घेतलेल्या निर्णयांवर आधारीत कारवाई करून तुमच्यावर कुरघोडी करण्याची दाट शक्यता असते. सर्व खरी तथ्ये आणि आकडे, फक्त भूतकालात झालेल्या (पक्षी : संपलेल्या) गोष्टींबद्दलच उपलब्ध होतात ! :) *************** नज ही थिअरीही टाकाऊ नक्कीच नाही. कधी आणि कोणत्या परिस्थितीत नज वापरावे हे त्या परिस्थितीवर अवलंबून राहिल. 'नजिंग' हे तर माणुस 'विचारी' प्राणी झाला तेव्हापासून व्यवहारात आहे. माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे करणारी ही एक कळीची गोष्ट आहे... इतर बहुतेक फरक तिचे परिणाम आहेत. 'नजिंग हे संकल्पना बनवण्याच्या (गोष्ट सांगण्याची उर्फ स्टोरी टेलिंग) क्षमतेचा एक भाग आहे. देव, जात, धर्म, राज्य, देश, संस्था, नैतिकता, कायदा, इत्यादी सर्व मनात असलेल्या (व नंतर कागदावर उतरवलेल्या संकल्पनाच आहेत). माणसांनी माणसांना या जीवनातली सुरक्षा, समृद्धी, सामाजिक, आर्थिक, इत्यादी फायदा आणि पारमार्थिक फायद्याच्या गोष्टी (संकल्पना) गळी उतरवून माणसांचे प्रचंड मोठे समुदाय बनविण्यासाठी 'नज' केले... येथेही "फियर आणि ग्रीड" यांचा उपयोगच कामी येतो. इतर प्राण्यांना हे शक्य झाले नाही / होत नाही. 'नज' करताना आपल्या हेतूला सकारात्मक असलेल्या गोष्टीला जास्त महत्व देणे आणि नकारात्मक गोष्टीला कमी महत्व देणे /लपवून ठेवणे; हे काही रॅशनल म्हणता येणार नाही, पण, ते अनेक कारणे सांगून/न सांगून माणसांच्या व्यवहारात सतत दिसते. :) 'नज'चे नेहमीच्या व्यवहारातले एक उत्तम उदाहरण म्हणजे सुपरमार्केटमध्ये बिल चुकते करण्याच्या जागांच्या (कॅशियर पॉइंट्स) जवळपास दिसणारी चॉकलेट्स (पिल्लू मंडळीना शेवटचा नज, उर्फ, 'मम्मा/पप्पा, हे हवंच्च मला' क्षण, उर्फ, ती वस्तू सरळ उचलून पैसे चुकते होईपर्यंत हातात घट्ट धरून ठेवणे); दाढीची आयुधे (पुरुषांचा 'आयला, हे संपलंय/संपत आलंय की' क्षण); आणि टिकल्या व तत्सम नेहमीच्या वापरातल्या प्रसाधन वस्तू ('अय्या, कित्ती छान आहे' क्षण)... :) सुपरमार्केटमध्ये कोणती वस्तू कोठे ठेवावी यावर "एमबीए (रिटेल)" मध्ये अख्खे मोड्युल असते, ते याच (कस्टमर) बिहेवियरल एकॉनॉमिक्सचे ऑफशूट आहे. जाहिरातबाजीतला (आम्ही हे विकतो यापेक्षा, "काय म्हणता, हे तुमच्याकडे नाही ?!", असा संदेश देणारा (पक्षी : ग्राहकाच्या मनात असा कमतरतेचा संदेह उत्पन्न करणारा) उपयोग तर नेहमीचा झाला आहे. *************** व्यवस्थापनशास्त्राचे मानवी स्वभावावर आधारित दोन मूलभूत नियम आहेत; ते मानवी जीवनात सर्वत्र लागू होतात : १. "(दुसर्‍यांचे) मन बदला, (त्यांचे) शरीर अनुसरण करेल (चेंज द माईंड, बॉडी विल फॉलो)." २. "त्यात माझा काय फायदा ? (व्हॉट इज इन इट फॉर मी ?)" याचे सकारात्मक उत्तर देऊ शकलात तर लोकांची समजूत घालायला इतर कोणत्याही पुराव्याची जरूर पडत नाही. माणूस सारासार विवेकापेक्षा (तर्कप्रामाण्यापेक्षा) जास्त हितसंबंधांवर अवलंबून वागतो, याची चपखल उदाहरणे पावलो-पावली दिसतात, हे काय फार मोठे गुपित आहे काय ? ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
म
मिल्टन Tue, 10/10/2017 - 18:15 नवीन
सुंदर प्रतिसादाबद्दल धन्यवाद डॉक्टरसाहेब. तुम्ही प्रतिसादाच्या पहिल्या भागात माणूस रॅशनल असतो या गृहितकावरचे सगळे आक्षेप (उदाहरणार्थ अपूर्ण माहिती असणे, सर्व आकडेमोड करायची क्षमता नसणे इत्यादी) थोडक्यात मांडले आहेत.
नेहमीच्या सत्य व्यवहारात, व्यापार-राजकारण-जीवनासकट कोणत्याही बाबतीतले अगदी तज्ज्ञांनी घेतलेले व शास्त्रिय प्रक्रियेतून जाणारे निर्णयसुद्धा तात्कालील उपलब्ध असलेल्या अपूर्ण माहितीवर आणि तात्कालील उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या साधनसंपत्तीच्या व भूतकालातील तत्सम अनुभवांच्या पार्श्वभूमीवरच घेतलेले "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" असतात,
असे "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" हेच आपण निर्णय कसे घेतो याचे योग्य मॉडेल आहे. माझ्या माहितीतील कोणीही सगळी युटिलिटीची आकडेमोड करून मग सर्वात जास्त युटिलिटी मिळेल तो निर्णय घेत नाहीत. आणि माझी खात्री आहे की मिपावरील कोणीही अशा गोष्टी करणार्‍या कोणाला ओळखत असेल. याच "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" ला हर्बर्ट सायमन यांनी 'सॅटिसफायसिंग" असे म्हटले. म्हणजे घेतलेला एखादा निर्णय अगदी सर्वोत्तम नसला तरी समाधानकारक असला तरी बहुतांश लोकांना चालण्यासारखे असते. याचे सर्वात चपखल उदाहरण म्हणजे एखाद्याला घर विकायचे असेल आणि जास्तीतजास्त १ कोटी येतील अशी अपेक्षा असेल आणि एक ग्राहक १ कोटी ५ लाख द्यायला तयार झाला तर ते घर विकण्याकडेच मालकाचा कल असेल. आता आणखी किंमत देणारा कोणी गिर्‍हाईक मिळणार नाही का? मिळेलही कदाचित. रॅशनॅलिटीच्या आकडेमोडीत एक गृहितक आहे की सगळे पर्याय आपल्यापुढे एखाद्या पत्त्याचा डाव उघडावा त्याप्रमाणे एकाच वेळी आहेत. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसते. सगळे गिर्‍हाईक एकाच वेळी येणार नाहीत (हा काही लिलाव नाही). त्यामुळे एकाला घर विकायचे नाकारले तर दुसरा गिर्‍हाईक विचारात घेतला जाणार. अशा प्रसंगी कोणी आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे द्यायला तयार झाले तर त्यालाच घर विकण्याकडे कल असतो. (घर विकायच्या प्रक्रीयेत आपल्याला नक्की किती पैसे मिळू शकतील ही अपेक्षा बदलली-- म्हणजे १ कोटीवरून १ कोटी १० लाख झाली तर त्यापेक्षा जास्त पैसे देऊ इच्छिणार्‍या गिर्‍हाईकाला घर विकले जाईल).
देव, जात, धर्म, राज्य, देश, संस्था, नैतिकता, कायदा, इत्यादी सर्व मनात असलेल्या (व नंतर कागदावर उतरवलेल्या संकल्पनाच आहेत).
रिचर्ड थेलर यांना अभिप्रेत असलेल्या "नज" यापेक्षा देव, जात, धर्म इत्यादी गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे चांगले वागल्यास कसलेतरी प्रलोभन आणि वाईट वागल्यास शिक्षेची भिती या दोन्ही गोष्टी त्यात नाहीत. बहुतांश वेळा "नज" झालेल्या माणसाला आपण "नज" झाले आहोत हे लक्षातही येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/10/2017 - 18:45 नवीन
धन्यवाद ! रिचर्ड थेलर यांना अभिप्रेत असलेल्या "नज" यापेक्षा देव, जात, धर्म इत्यादी गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे चांगले वागल्यास कसलेतरी प्रलोभन आणि वाईट वागल्यास शिक्षेची भिती या दोन्ही गोष्टी त्यात नाहीत. मी वर 'नज' बाबत केवळ रिचर्ड थेलर यांना अभिप्रेत असलेल्या वित्तव्यवस्थेतील सकारात्मक उपयोगात बद्दल लिहित नव्हतो. तर 'नज' आदीम कालापासून मानवी जीवनातल्या सर्व अंगांना स्पर्श करून आहे, असे मला म्हणायचे आहे. नजिंग ही, आदिम कालापासून सर्वसाधारण माणसाच्या जीवनात एक सर्वसाधारणपणे वापरली जाणारी पद्धत आहे... आणि त्यात इतरांनी आपले म्हणणे मानावे यासाठी "भीती आणि लोभ (फियर आणि ग्रीड)" या मानवाच्या मूळ प्रवृत्तींचा उघड-छुपा उपयोग केला जातो. ही दुधारी तलवार आहे... ती कधी इतरांनी योग्य निर्णय घ्यावा यासाठी वापरली जाते (उपकारक), तर इतर वेळेस स्वार्थ साधण्यासाठी. हे जेवढे गुप्त ठेवता येईल तितका तिचा परिणामकारकपणा जास्त. यासंबंधिचे एक विनोदी (पण सत्य) वचन असे, "Expert motivator is the one, who will ask you to go to hell, in such a way that, you start looking forward to the journey !" *************** "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" : हे बनवतानाही 'माणूस / संस्था' यांच्या "मिशन-व्हिजन" यांच्या संबंधात सद्य परिस्थितीत असणारे "भीती आणि लोभ (फियर आणि ग्रीड)" हे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असतेच. थोडक्यात, "भीती आणि लोभ" यांच्याविना मानवी निर्णय केवळ सैद्धांतिक जगातच (theoretical world) शक्य आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
च
चौकटराजा Sun, 10/15/2017 - 12:29 नवीन
मानव विकसित होत असल्यापासून एक माणूस दुसर्‍यावर फिअर व ग्रीड चा प्रयोग करीत असतो. बाय पास केली नाहीत तर आताच पेशंट पाच मिनिटात मरू शकतो व आमच्या एक एल एम मधे सामील वा कामाला लागा एकदिवस तुम्हाला इंडिका मिळेल बक्षिस ही दोन उदाहरणे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Mon, 10/16/2017 - 09:47 नवीन
आहार निद्रा भय आणि मैथुन या चार कोणत्याही प्राण्याच्या अंत:प्रेरणा ( instincts) आहेत. यावर बहुसंख्य विपणनाचे डावपेच अवलंबून आहेत (marketing strategy). आहार --हॉटेलं, विविध खाद्यवस्तू त्या तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल किंवा निद्रा -- सुखाची झोप येईल यासाठी लागणाऱ्या वस्तू उदा गाद्या, तेलं, कपडे, हा कसा आणि किती आकर्षक तर्हेने मांडला कि विकता येतो हे सर्व मार्केटिंगच्या लोकांना माहिती आहे. भय -- विविध तर्हेचे आरोग्याचे चेक अप पासून गाड्यांचे आणि उपकरणांचे ऍन्युअल मेन्टेनन्स अनिसर्व्हिसिंग, विविध विमा कंपन्या आणि त्यांचे विम्याचे प्लॅन, वास्तू, फेंगशुई, नारायण नागबळी, ग्रहशांती, गर्भसंस्कार पासून ऑटो कॉप, कुलुपे, इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स सिस्टिम्स या सर्व वस्तू भय या भावनेला हात घालून विकल्या जातात. राहिले मैथुन --sex always sells. विविध तर्हेची औषधे, कायाकल्प, चिर तारुण्य मिळवण्यासाठी , जपण्यासाठी असणारी औषधे, उपाय या उघडपणे दिसणाऱ्या गोष्टी आहेत. बायका सुंदर दिसण्यासाठी आणि पुरुष रुबाबदार दिसण्यासाठी असणाऱ्या सर्व गोष्टी या सुद्धा अशाच छुप्या अंतस्थ हेतूंनी विकत घेतल्या जातात. हा विषय फार मोठा गहन आणि खोल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ग
गंम्बा Wed, 10/11/2017 - 06:51 नवीन
वैयक्तीक रित्या माणुस रॅशनल नसतो, पण समुहानी आणि एका मोठ्या कालावधी मधे माणुस* रॅशनल असतो. मार्केट एफिसियंट नसते पण मोठ्या कालावधीत मीन मात्र एफिशियंट मार्केट चा असतो, * : प्रगत देशांसाठी हे लागु आहे. पण ह्याला एक मोठा अपवाद आहे, पण ते अवांतर होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
म
मिल्टन Wed, 10/11/2017 - 19:35 नवीन
वैयक्तीक रित्या माणुस रॅशनल नसतो, पण समुहानी आणि एका मोठ्या कालावधी मधे माणुस* रॅशनल असतो.
हो बरोबर. याची फायनान्शिअल मार्केटसंदर्भातील कारणमिमांसा अशी की जे कोणी irrational लोक असतात ते रॅन्डमली ट्रेड करतात. त्यामुळे काही शेअर विकत घेतील तर काही तोच शेअर विकतील. त्यामुळे या दोन बाजू एकमेकांना कॅन्सल करतात आणि समुह म्हणून रॅशनॅलिटी शिल्लक राहते. एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस पूर्ण गंडलेले नाही आणि त्याच्या यशस्वीतेचे जेवढे काही पुरावे मिळाले आहेत त्यामागे हे कारण असावे असे मला वाटते. याला अपवाद म्हणजे 'मेंढरांसारखे वागायची' (हर्ड बिहेव्हिअर) प्रवृत्ती काही परिस्थितीत निर्माण होते हे आहे का? उदाहरणार्थ २००७-०८ चे आर्थिक संकट हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण ठरावे. सुरवातीला काही इन्व्हेस्टर्स (अर्थातच संस्था, व्यक्ती नव्हे) सी.डी.ओ घेत आहेत म्हणून ते इतरांनी घेणे, त्यात नक्की जोखीम काय याकडे लक्ष न देणे, आणि सगळा बुडबुडा फुटायची वेळ आल्यावर आपले पैसे बुडतील या भितीने नॉर्दन रॉक या इंग्लंडमधील बँकेवर रन होणे या सगळ्या गोष्टी त्याचे उदाहरण आहेत आणि अर्थातच हे रॅशनल वागण्याचे लक्षण नक्कीच नाही. यातून झाले असे की बिअर स्टर्न किंवा लेहमन ब्रदर्स कोसळायच्या आधी काही महिने अशा घातक सी.डी.ओ मध्ये गुंतवणुक नसलेली नॉर्दन रॉक बँक विनाकारण बुडली हा दैवदुर्विलास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
व
वकील साहेब Tue, 10/10/2017 - 17:46 नवीन
लेख आवडला. धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
मिल्टन Tue, 10/10/2017 - 19:19 नवीन
या चर्चेत एक प्रश्न येईल असे वाटले होते. तो प्रश्न म्हणजे जर का माणूस रॅशनल आहे हे मुळातले गृहितकच चुकीचे असेल तर त्यावर आधारीत असलेले निओक्लासिकल इकॉनॉमिक्स पूर्णच बोगस आहे का? तर तसे नक्कीच नाही. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की माणूस रॅशनल आहे या गृहितकावर कळत-नकळतपणे अगदी अ‍ॅडम स्मिथच्या नंतरच्या काळापासून सगळा डोलारा आधारीत होता. ते गृहितक चुकीचे आहे हे संशोधना अंती बर्‍यापैकी सिध्द झाले.पण तरीही या निओक्लासिकल इकॉनॉमिक्सने केलेली भाकिते बर्‍यापैकी बरोबरही आली आहेत. उदाहरणार्थ किंमत वाढल्यास मागणी कमी होणे आणि पुरवठा वाढणे हे निरीक्षण बर्‍याच अंशी योग्यच आहे. तसेच निओक्लासिकल इकॉनॉमिक्स म्हणजे नुसती रॅशनॅलिटी नाही. तर त्या निओक्लासिकल इकॉनॉमिक्समधून निर्माण झालेले उजव्या बाजूचे विचार आणि मॅक्रोइकॉनॉमिक्सचा विचार करता नक्की कोणत्या प्रकारची धोरणे ठेवावीत ही गोष्ट सुध्दा. जगात डाव्या राजवटी पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या (खुद्द रशियात ७०-७५ वर्षात तर पूर्व युरोपात ५० वर्षाच्या आत) पण बर्‍यापैकी उजव्या राजवटी मात्र अनेक शतकांपासून टिकल्या आहेत ही गोष्टही लक्षात घेतली पाहिजे. तसेच एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस म्हणते की शेअरच्या किंमती नवीन माहिती आली की ताबडतोब बदलतात. हे हायपोथिसिसही अमेरिकन शेअरबाजारात अनेक प्रसंगांमध्ये योग्य आहे असे आकडेवारी सांगते. म्हणजे गंमत बघा की मुळातले गृहितक चुकीचे असले तरी भाकिते मात्र बर्‍याच वेळी बर्‍यापैकी अचूक आली . हे का होते? भौतिकशास्त्रातले उदाहरण घ्यायचे तर मॉडेल्समध्ये घर्षण नसणे वगैरे गृहितके असतातच. तरीही त्यातून काढलेली फोर्सची वगैरे भाकिते अगदी १००% नाही तरी बर्‍यापैकी योग्य असतात. तसेच काहीसे निओक्लासिकल इकॉनॉमिक्सविषयीही. जर का रॅशनॅलिटीच्या गृहितकामुळे सगळाच प्रकार गंडलेला असता तर एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस मांडणार्‍या युजिन फामांना अगदी २०१३ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले नसते. यातही एक गंमत लक्षात घ्यायला हवी. २०१३ मध्ये एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस मांडणार्‍या युजिन फामांबरोबरच ते नक्की कोणत्या परिस्थितीत अयोग्य मॉडेल आहे हे म्हणणे मांडणार्‍या रॉबर्ट शिलरनाही नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्याचे कारण दोघांच्याही कामातून त्या क्षेत्रात मूलभूत नवे ज्ञान निर्माण झाले. तरीही मग बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्ससारखी इतर मॉडेल का विचारात घ्यायची? याचे कारण कोणतीही थिअरी परिपूर्ण नसते. जर एखाद्या मॉडेलमधील काही कमकुवत दुवे दुरूस्त करता येत असतील तर त्यातून कदाचित प्रत्यक्ष जगात नक्की काय चालू आहे हे आपल्याला अधिक चांगल्या पध्दतीने कळेल. म्हणूनच या रॅशनिलिटीच्या बर्‍याच अंशी चुकीच्या गृहितकाने आभाळ कोसळत नसले तरी असे कमकुवत दुवे जर दुरूस्त करायचा प्रयत्न होत असेल तर तो करायलाच हवा. पण अर्थशास्त्रासारख्या समाजशास्त्राची एक मर्यादा आहे. अशी मर्यादा भौतिकशास्त्रासारख्या शास्त्राला नाही. समजा एखाद्या गोष्टीवर तपमानाचा नक्की काय परिणाम होतो हे शोधून काढायचे असेल तर प्रयोगशाळेत वेगवेगळ्या पातळींवर तपमान स्थिर ठेऊन वेगवेगळ्या तपमानात नक्की काय परिणाम होतो हे तपासून बघता येते. पण तसे 'कंट्रोल्ड प्रयोग' सामाजिक शास्त्रांमध्ये करता येत नाहीत.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Wed, 10/11/2017 - 08:45 नवीन
माणूस rational च की irrational च आहे हे एकाच वाक्यात सर्रास पणे शिक्का मारुन ठरवणेच अश्यक्य आहे, Human behavior is some time rational and some time irrational due to two reasons, (म्हणुन rational आणि irrational दोन्ही थेअरी मानवाला लागु होतात.) first :- मुळात माणुस एखादा निर्णय घेतो तेंव्हा त्यात दोन गोष्टी समाविष्ट असतात एक म्हणजे बुध्दी आणि दुसर मन (इच्छा/ आवड) उदा:- १. दारु पिणे, पिझ्झा खाणे वाईट बुध्दी ला पटते पण मन (इच्छा/ आवड) खायला-प्यायला लावते. खाल्ले-प्याले तर irrational , नाही खाल्ले-प्याले तर rational २. मन (इच्छा/ आवड) खुप वाटतं स्पोर्ट बाईक्/कार घ्यावी पण बुध्दी सांगते price EMI, average -resell value ई. मग त्याप्रमाणे rational निर्णय घेतला जातो , जर मन (इच्छा/ आवड)( अरे मग मज्जा कधी करायची) प्रमाणे निर्णय घेतला तर irrational... कर्जाचे डोंगर... म्हणजे कायतर कधी बुध्दी तर कधी मन (इच्छा/ आवड) यांच्या दबावात घेतलेला निर्णय हा ब-याचदा अणुक्रमे rational , irrational ठरत असतो second:- दुसर म्हणजे काळ (सोप्याभाषेत नशीब) आज घेतलेला rational निर्णय काळाच्या ओघात पुढे irrational ठरणे किंवा आज घेतलेला irrational निर्णय काळाच्या ओघात पुढे rational ठरणे याच सोप उदाहरण म्हणजे (not for each and every individual) उदा:- 1994-1997 ज्यांनी engineering केलं त्याच काळातील काही जणांनी कुठेच admission मिळत नाही म्हणुन BA-B.Sc. केलं पण पुढे lecturer-govt service (यात केवळ typist म्हणुन सुध्दा कोर्टात लगलेले ई. ई.) ला लागले, ते जेंव्हा एकमेकांचा विचार करतात तेंव्हा वरील rational की irrational चा अनुभव करतात परिणामी rational आणि irrational ह्या दोन्ही थेअरी मानवाला लागु पडतातं आणि कसोटीवर ख-यापण उतरता . मॉल मध्ये तुम्ही डेली निड कुठेही ठेवा केवळ तेच घेऊन जाणरे सुध्दा आहेत आणि केवळ डेली निड घेण्यासाठी म्हणुन आलेले पण इतर वस्तुही दिसतात म्हणुन घेणारे सुध्दा आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
म
मिल्टन Wed, 10/11/2017 - 19:38 नवीन
माणूस rational च की irrational च आहे हे एकाच वाक्यात सर्रास पणे शिक्का मारुन ठरवणेच अश्यक्य आहे,
हो बरोबर. पण मुद्दा हा की निओक्लासिकल मॉडेलमध्ये गृहित धरले आहे तितक्या प्रमाणावर माणूस रॅशनल नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
द
दीपक११७७ गुरुवार, 10/12/2017 - 08:30 नवीन
दोन्ही theory equally correct. एकाच नाण्यच्या दोन बाजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
A
Anand More Tue, 10/10/2017 - 20:17 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील Wed, 10/11/2017 - 06:18 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 10/11/2017 - 20:40 नवीन
आत्ताच वाचनात आल्याप्रमाणे, थेलरना (अथवा आधीच्या कुठल्याच पारीतोषिक मिळालेल्या) अर्थतज्ञांना नोबेल पारीतोषिक मिळालेले नाही! :) नोबेल पारीतोषिकांच्या संस्थळावर अर्थशास्त्राच्या पारीतोषिकच्या पानावर या संदर्भात एक मथळा आहे, Not a Nobel Prize. त्यानुसार, इंग्रजीतलेच चोप्य्पस्ते करतो: The Prize in Economic Sciences is not a Nobel Prize. In 1968, Sveriges Riksbank (Sweden's central bank) instituted "The Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel", and it has since been awarded by the Royal Swedish Academy of Sciences according to the same principles as for the Nobel Prizes that have been awarded since 1901. The first Prize in Economic Sciences was awarded to Ragnar Frisch and Jan Tinbergen in 1969. अमुक-तमुकचे नोबेल नॉमिनेशन झाले आहे असे कायम ऐकतो. किंबहूना एका नामवंत अर्थतज्ञाच्या संदर्भात असे नॉमिनेशन झाल्याचे ९०च्या दशकात बर्‍याचदा ऐकले होते. ;) पण नोबेलच्या संस्थळावर दिलेल्या माहितीनुसार ही सर्व पद्धती खूप गोपनीय असते आणि नॉमिनेट झालेल्यांची नावे किमान ५० वर्षे गोपनीयच राहतात!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 10/11/2017 - 21:24 नवीन
सुंदर लेखन ! आजच रिचर्ड थेलर यांच्या विषयीची बातमी वाचली होती, संदर्भ म्हणुन इथे ती देत आहे. Nobel Economist Thaler Says He's Nervous About Stock Market “We seem to be living in the riskiest moment of our lives, and yet the stock market seems to be napping,” Thaler said, speaking by phone on Bloomberg TV. “I admit to not understanding it.” मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- US sends SECOND nuclear warship and 7,500 marines within strike range of North Korea
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 10/11/2017 - 21:56 नवीन
प्रतिसादहीआवडले
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Wed, 10/11/2017 - 22:35 नवीन
गॅरी भाऊ लेख आवडला!!! नोबेल कमिटीने गॅरी भाऊना लिहिते केल्याबद्दल जाहीर आभार !!! असेच लिहिते रहा
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 10/11/2017 - 23:18 नवीन
मिल्टन, लेख आवडला. आजून येऊ द्या. माणसाच्या तार्किकतेवर (म्हणजे ऱ्याशन्यालिटीवर) अस्मादिकांनी कोणे एके काळी बरंच चिंतन केलंय. अगदी दारू पिऊन सामूहिक चिंतन देखील केलंय. अशा मंथनमालिकेतनं निर्माण झालेलं रत्न प्रस्तुत करतो. त्याचं काय आहे की तार्किकता ही एक अत्यंत फसवी संज्ञा आहे. ही मुळातून निरर्थक असते. हिला अर्थ प्राप्त करून देणारं रसामृत आहे ते माणसाचं उद्दिष्ट. अमुक एक कृती वा पर्याय तार्किक आहे की नाही हे तपासण्यासाठी पार्श्वभूमीवर उद्दिष्टाचा पट हवाच. याचा दुसरा अर्थ असा की आपलं उद्दिष्ट पक्कं असेल तर तर्क त्याच्या भोवती बांधता येतो. Logic should be constructed around aim. तर्काने हेत्वनुरूप आकार घेतला पाहिजे. नुसता तर्क कामाचा नाही. जर तार्किक विचार केला असता तर तानाजी कधीच सिंहगडाचा कडा चढू शकला नसता. तर्कबुद्धीने विचार करू पाहता शिवाजीमहाराज पन्हाळ्यावरून निघूच शकले नसते. पण एकदा का निघायचं ठामपणे ठरलं, की मग तर्काने आपली भूमिका चोख बजावली. तर्काची भूमिका म्हणजे शिवा काशीदची तयारी, मावळ्यांच्या दोन तुकड्या करून एकीने खिंड अडवणे तर दुसरीने विशाळगडाकडे कूच करणे, महाराजांनी तोफांनी बाजीप्रभूंना सांगावा धाडणे, इत्यादि. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 10/12/2017 - 06:17 नवीन
त्याचं काय आहे की तार्किकता ही एक अत्यंत फसवी संज्ञा आहे. ही मुळातून निरर्थक असते. हिला अर्थ प्राप्त करून देणारं रसामृत आहे ते माणसाचं उद्दिष्ट. अमुक एक कृती वा पर्याय तार्किक आहे की नाही हे तपासण्यासाठी पार्श्वभूमीवर उद्दिष्टाचा पट हवाच.
पटलं.. पण मग उद्दिष्ट साध्य झालं तरंच कृती तार्किक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गंम्बा गुरुवार, 10/12/2017 - 06:34 नवीन
गा.पै. खरे तर सिंहगडाची चढाईचा प्लॅन आणि विशाळगडावरुन सुटकेचा प्लॅन ही तर्कबुद्धीचीच ( लॉजिकल विचारांची ) उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मिहिर गुरुवार, 10/12/2017 - 03:38 नवीन
उत्तम लेख. आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 10/12/2017 - 06:22 नवीन
लेख अतिशय आवडला.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 10/12/2017 - 06:29 नवीन
उत्तम लेख आणि प्रतिसाद देखील.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 10/12/2017 - 13:30 नवीन
गंम्बा,
खरे तर सिंहगडाची चढाईचा प्लॅन आणि विशाळगडावरुन सुटकेचा प्लॅन ही तर्कबुद्धीचीच ( लॉजिकल विचारांची ) उदाहरणे आहेत.
प्रस्तुत उदाहरणांतली तुम्ही म्हणता ती तर्कबुद्धी एका धडाडीच्या उद्दिष्टाभोवती लपेटलेली आहे. अन्यथा हिला काहीच अर्थ नव्हता. उद्दिष्ट ठरवणे ही एक तार्किक प्रक्रिया असेलंच याचीही खात्री नाही. या धाग्यात अर्थशास्त्राची चर्चा चालू आहे. या शास्त्राच्या गृहितकानुसार प्रत्येक माणसाचं उद्दिष्ट स्वत:चा पैसा वाढवणे आहे. मात्र सरसकटरीत्या हे उद्दिष्ट असेलंच याची खात्री नाही. नेमक्या याच कारणासाठी मी आधुनिक अर्थशास्त्रास अर्धशास्त्र म्हणतो. Economics is half science. आ.न., -गा.पै. वि.सू. : half म्हणजे टाकाऊ नव्हे.
  • Log in or register to post comments
म
मिल्टन गुरुवार, 10/12/2017 - 13:50 नवीन
या शास्त्राच्या गृहितकानुसार प्रत्येक माणसाचं उद्दिष्ट स्वत:चा पैसा वाढवणे आहे.
हे तुम्ही नक्की कुठे वाचलेत हे समजू शकेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 10/12/2017 - 14:13 नवीन
पैसा हे समाधान नसेल तर दुसरं काय आहे? किंवा असू शकतं? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
म
मिल्टन गुरुवार, 10/12/2017 - 14:25 नवीन
पैसा हे समाधान नसेल तर दुसरं काय आहे? किंवा असू शकतं?
हे तुमचे गृहितक झाले. पैशामुळे समाधान मिळत असले तरी पैशामुळेच समाधान मिळते असे नाही. आणि अगदी क्लासिकल इकॉनॉमिक्सही केवळ युटिलिटी असाच शब्दप्रयोग करते. ती युटिलिटी (समाधान) पैसा किंवा अमुक एका गोष्टीतूनच यायला पाहिजे असे गृहितक अजिबात नाही. एकाच गोष्टीमधून दोघांना मिळणारी युटिलिटी वेगळी असू शकेल. तुम्ही बहुदा 'बजेट लाईन' आणि 'युटीलीटी लाईन' मध्ये गल्लत करत आहात. क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या गृहितकांप्रमाणे आपल्याकडे जितके पैसे आहेत (आपले बजेट) त्यात जास्तीत जास्त युटिलिटी म्हणजे समाधान देणारा पर्याय लोक निवडतात. पण मुळातली युटिलिटी नक्की कशातून येईल हे त्या माणसावर सोडलेले असते. वरकरणी या मांडणीत चुकीचे असे काहीच नाही. फक्त युटिलिटी मोजता न येणे, सगळी माहिती नसणे, युटिलीटीची सगळी आकडेमोड (जर अशी आकडेमोड करता आलीच तर) सगळ्यांनाच करता येईल असे नाही वगैरे वगैरे आक्षेप निघाले. कारण या सगळ्या गोष्टी करता यायला माणूस कोणीतरी सुपरनॅचरल हवा (ज्याला काही लेखकांनी 'इकॉन' म्हटले आहे). पण माणूस हा 'इकॉन' नसतो तर सामान्य 'ह्युमन बिईंग' असतो म्हणून हे सगळे युटिलिटीचे मॉडेल आपण नक्की निर्णय कसे घेतो त्याचे योग्य मॉडेल नाही हा आक्षेप आहे आणि त्यातूनच बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स पुढे आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 10/12/2017 - 17:46 नवीन
मिल्टन, अर्थशास्त्राचा उपयोग नक्की कोण करतो आणि कोणासाठी करतो? सत्ताधारी करतात का? माझं पैशाचं गृहीतक मलातरी बरोबर वाटतं कारण शासनाच्या आर्थिक धोरणांत सतत पैसे येत असतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
म
मिल्टन गुरुवार, 10/12/2017 - 18:26 नवीन
शासनाच्या धोरणात पैशाचा उल्लेख असतो कारण पैसा हे पाहिजे त्या गोष्टी साध्य करायचे साधन आहे. सरकारला कोणत्या गोष्टी हव्या असतात (किंवा हव्या असणे अपेक्षित आहे)? एक उद्देश हा की देशात लोकांना काही गोष्टी (भारतासारख्या देशात या काही गोष्टी म्हणजे घर, पाणी इत्यादी मूलभूत गोष्टी असतील तर विकसित देशांमध्ये या 'काही गोष्टींची' व्याख्या बदलेल) मिळायला हव्यात. त्या काही गोष्टी मिळवायच्या असतील तर मग तितक्या प्रमाणात नोकर्‍या लोकांना हव्यात, लोकांची क्रयशक्ती वाढायला हवी. त्या नोकर्‍या कशा निर्माण करायच्या? एक तर सरकारनेच काही उद्योगात उतरून किंवा सरकारने स्वतः न उतरता खाजगी उद्योग उतरतील अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून. सरकार स्वतः उतरले तर नक्की किती प्रमाणात उतरावे हे ठरवायचे कसे? तर त्याचे एकक पैसा. खाजगी उद्योगांना पाहिजे ती परिस्थिती निर्माण करायची असेल तर परत एकदा त्या पैशाची किंमत (व्याजाचे दर) किंवा त्या पैशाचा पुरवठा (मनी सप्लाय) किती ते ठरवून. म्हणजे पैसा हे या सगळ्या गोष्टी मोजायचे एकक आहे. पैसा हे साध्य नाही पण पैसा नसेल तर काहीच मोजता येणार नाही. म्हणून शासनाच्या धोरणात पैशाचा उल्लेख असतो. नुसता पैसा हे साध्य नाही हे हिटलर सत्तेवर येण्यापूर्वी जर्मनीतील किंवा काही वर्षांपूर्वी झिम्बाब्वेमध्ये आलेल्या महाप्रचंड महागाई या उदाहरणावरून समजेलच. ब्रॉडली, अर्थशास्त्र हे निर्णयशास्त्र आहे. काही गोष्टी साध्य करायला सरकारने कसे निर्णय घ्यावेत हे सरकारच्या पातळीवर तर आपल्याकडे मर्यादित साधने (परत एकदा पैसे) आहेत आणि त्या मर्यादित साधनातून आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टी कोणत्या प्रमाणात घ्याव्यात हे निर्णय वैयक्तिक पातळीवर घ्यायचे. हे वैयक्तिक पातळीवरील निर्णय 'मायक्रोइकॉनॉमिक्स' मध्ये तर पूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील निर्णय 'मॅक्रोइकॉनॉमिक्स' मध्ये अभ्यासले जातात. बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सचे नाव ऐकण्यापूर्वीच्या काळात मला 'मॅक्रोइकॉनॉमिक्स' जास्त आवडत असे पण आता 'मायक्रोइकॉनॉमिक्स' जास्त आवडते. या लेखात उल्लेख केलेल्या गोष्टी (युटिलिटी वगैरे) मायक्रोइकॉनॉमिक्सशी संबंधित आहेत. बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स मॅक्रोमध्ये वापरता येईल का? तर येईल. किंबहुना येते. अमेरिकन फेडच्या गव्हर्नर जॅनेट येलेन यांचे पती जॉर्ज अ‍ॅकरलॉफ (२००१ चे नोबेल पुरस्कारविजेते) यांनी या क्षेत्रात काम केले आहे. ते नक्की काय आहे हे मला याक्षणी माहित नाही कारण त्याविषयी काहीही वाचलेले नाही. पण बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स मॅक्रोमध्येही वापरले जाते हे नक्कीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
थ
थॉर माणूस गुरुवार, 10/12/2017 - 19:04 नवीन
ज्याव्यक्तीविषयी धागा आहे त्याने याच विषयावर (युटीलिटी म्हणजे काय आणि नज त्या अनुषंगाने कसे उपयुक्त आहे) बरेच काम केले आहे. या निमित्ताने उत्तम चर्चा चालू आहे त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
म
मिल्टन गुरुवार, 10/12/2017 - 19:01 नवीन
तसेच आपण सगळेच निर्णय घेताना कळत-नकळत नुसत्या पैशाचा (किंमत) विचार करत नाही तर इतरही अनेक गोष्टींचा विचार करत असतो. कॉफीच प्यायची झाली तर बाहेर टपरीवर ५-१० रूपयात मिळू शकेल. पण तरीही आपण स्टारबक्ससारख्या ठिकाणी जातो आणि त्याच कॉफीसाठी १५०-२०० रूपये द्यायला तयार होतो. म्हणजे आपल्याला किंमतीबरोबरच इतरही काही गोष्टी महत्वाच्या असतात.त्यात आपली हौस, आरामात एसीमध्ये बसून कॉफी पिता येणे, चव, 'स्टेटस' आणि इतरही अनेक गोष्टी त्यात असतात. जर का पैसा हा एकच घटक निर्णय घेताना असता तर आपण सगळ्यांनी प्रत्येकवेळी सर्वात स्वस्त वस्तूच खरेदी केली असती. पण तसे होत नाही. आपण निर्णय घेताना नुसता पैसाच नाही तर इतर काही गोष्टींचाही विचार करतो यावर रिचर्ड थेलर यांचा The ultimatum game हा पेपर जबरदस्त आहे. अल्टीमेटम गेम या खेळात दोन खेळाडू (अ आणि ब) असतात. 'अ' कडे सुरवातीला १० डॉलर दिलेले असतात. त्यातील काही रक्कम त्याने 'ब' ला द्यायची ऑफर द्यायची. जर 'ब' ला ती ऑफर मान्य झाली तर 'ब' तितकी रक्कम स्वतःकडे ठेवेल आणि 'अ' कडे १० डॉलरमधून 'ब' ला दिलेले पैसे सोडून उरलेली रक्कम राहिल. पण जर 'ब' ला ती रक्कम कमी वाटली तर तो ती ऑफर नाकारू शकतो. जर 'ब' ने ती ऑफर नाकारली तर दोघांनाही एक सेंटही मिळणार नाही असे या खेळाचे नियम आहेत. जर पैसा हा एकच घटक निर्णय घेताना असता तर 'ब' ने अगदी १ सेंटही मान्य करायला हवा. कारण त्याने ती ऑफर नाकारल्यास त्याला (आणि 'अ' ला पण) काहीही मिळणार नाही. आणि काहीही न मिळण्यापेक्षा १ सेंट मिळणे चांगलेच नाही का? पण या खेळातील निकाल बघता असे कळते की साधारण ५ डॉलरच्या आसपास रक्कम 'अ' ने देणे कबूल केले तरच बर्‍याचशा 'ब' नी ती ऑफर मान्य केली . पण जर 'अ' ने बरीच कमी रक्कम दिली तर ती 'ब' ची भूमिका करणार्‍या बहुतेकांनी नाकारली. म्हणजेच काय की पैशाबरोबरच आपल्याला योग्य ती वागणूक मिळाली पाहिजे अशीही अपेक्षा लोकांची असते आणि 'अ' ने कमी ऑफर केली तर आपल्याला योग्य ती वागणूक मिळत नाही असा त्याचा अर्थ 'ब' काढतो आणि ती ऑफर नाकारतो--- ही ऑफर नाकारून त्याचेही नुकसान होणार आहे हे माहित असूनही. जर 'ब' हा 'रॅशनल' असेल तर मात्र त्याने १ सेंटही मान्य करायला हवा. पण तसे होताना दिसत नाही. रिचर्ड थेलर यांनी या जर्नल ऑफ इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हज या जर्नलमध्ये १९८० च्या दशकात साधारण २० च्या आसपास लागोपाठच्या अंकांमध्ये असेच वेगवेगळे विषयांवर इंटरेस्टींग पेपर लिहिले होते. त्यातला हा एक पेपर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/12/2017 - 19:30 नवीन
पैसा हे समाधान नसेल तर दुसरं काय आहे? किंवा असू शकतं? पैसा आणि समाधान यांचा तडक (डायरेक्टली प्रपोर्शनल) संबंध (असलाच तर) अत्यंत कमी वेळा असतो. मानवी जीवनात पैशाचे एकदिशा नकारात्मक महत्व नक्की आहे... पुरेसा पैसा नसला तर दु:ख/असमाधान बहुदा असतेच, मात्र, भरपूर पैसा असला तर सुख/समाधान असतेच असे नाही... या दुसर्‍या मनःस्थितीचे कारण माणसाची मुलभूत मानसिकता आहे, जिच्यामुळे जसजसा पैसा वाढत जातो तसतसे त्याच्या सुख-समाधानाच्या अपेक्षा क्षितिजाप्रमाणे विस्तारत (दूरदूर जात) राहतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 10/12/2017 - 21:52 नवीन
मिल्टन, हे सगळं अर्थशास्त्रापेक्षा सारीपाटशास्त्र (= गेम थियरी) वाटतं. त्याचा संबंध अर्थशास्त्राशी जोडणं कितपत व्यवहार्य असेल अशी शंका आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मिल्टन Fri, 10/13/2017 - 19:17 नवीन
हे सगळं अर्थशास्त्रापेक्षा सारीपाटशास्त्र (= गेम थियरी) वाटतं. त्याचा संबंध अर्थशास्त्राशी जोडणं कितपत व्यवहार्य असेल अशी शंका आहे.
गेम थिअरी हा अर्थशास्त्राचाच भाग आहे. एकूणच अर्थशास्त्र म्हणजे निर्णयशास्त्र आहे-- वेगवेगळ्या परिस्थितीत निर्णय कसे घ्यावेत/घेतले जातात याचे शास्त्र. यात गेम थिअरी हा एका विशिष्ट परिस्थितीतील निर्णयप्रक्रियेची थिअरी आहे. ती विशिष्ट परिस्थिती म्हणजे आपण एखादी कृती करत असू त्यावरून समोरचा माणूस त्याची कृती करेल आणि आपल्या दोघांच्याही कृतीचा एकमेकांवर परिणाम होईल पण आपल्या कृतीला समोरचा काय उत्तर देणार हे आपल्याला माहित नसते तेव्हा. उदाहरणार्थ समजा ५ मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. आपल्या कंपनीला खर्च जास्त होतो म्हणून तोटा व्हायची वेळ आली म्हणून जर दर वाढवायचे आहेत असे समजू. पण यावर इतर कंपन्या नक्की कशा प्रतिक्रिया देतात यावर बरेच काही अवलंबून आहे. जर इतर कंपन्यांना पण दर वाढवायची ही योग्य वेळ वाटली तर ठिक. पण इतर कंपन्यांनी दर वाढवले नाहीत तर? त्यातून होईल असे की आपण आपले ग्राहकही गमावून बसू कारण आपले दर इतर कंपन्यांपेक्षा जास्त असतील आणि त्यातून आपल्या अडचणी वाढतील. इतर कंपन्या काय करतील हे आज सांगता येणार नाही. म्हणजे आपल्या कृतीचा समोरच्यावर आणि समोरच्याच्या कृतीचा आपल्यावर परिणाम होणार आहे पण समोरचा नक्की काय करणार आहे याची कल्पना आपल्याला नाही अशा परिस्थितीत नक्की कसा निर्णय घ्यावा याचा अभ्यास 'गेम थिअरी' मध्ये केला जातो. आपण वाण्याच्या दुकानात सामान घ्यायला गेलो तर तिथे गेम थिअरी लागू होणार नाही. कारण आपल्याकडे आहे त्या किंमतीला वस्तू विकत घेणे किंवा न घेणे हे दोनच पर्याय असतील. आपल्या कृतीमुळे समोरच्यावर आणि समोरच्याच्या कृतीमुळे आपल्यावर परिणाम होणार असली भानगड तिथे नाही. हा विषय पण प्रचंड इंटरेस्टींग असेल हे नक्कीच. गेम थिअरी या विषयातले प्राध्यापक अविनाश दिक्षित हे 'दादा' आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
विकास Fri, 10/13/2017 - 01:22 नवीन
पैसा हे समाधान नसेल तर दुसरं काय आहे? सर्वप्रथम डिसक्लेमरः पैसे कमवू नका अथवा पैशाची गरज नाही असे म्हणायचा उद्देश नाही! ;) इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे: Money buys comforts, not happiness त्या व्यतिरिक्त खालचे चित्र बरेच काही असेच सांगते... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सिंथेटिक जिनियस गुरुवार, 10/12/2017 - 19:22 नवीन
लेख वाचला ,पण कळला नाही.ज्याअर्थी कळला नाही त्याअर्थी चांगलाच लेख असावा.
  • Log in or register to post comments
र
राही Fri, 10/13/2017 - 04:41 नवीन
अतिशय सुंदर लेख. चवीचवीने वाचला. एरवी क्लिष्ट वाटला असता असा विषय सोप्या भाषेत चान समजावून सांगितला आहे. demonatisation च्या प्रथम वर्धापनदिनी येणार असलेल्या आपल्या सविस्तर लेखाची आतुरतेने प्रतीक्षा आहे.
  • Log in or register to post comments
म
मिल्टन Fri, 10/13/2017 - 19:23 नवीन
बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स या विषयावर टोरोंटोमधील रॉटमन स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक दिलीप सोमण यांचा edX वरील कोर्स इथे आहे. या कोर्समध्ये नज विषयी अधिक माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 10/14/2017 - 13:36 नवीन
मिल्टन,
एकूणच अर्थशास्त्र म्हणजे निर्णयशास्त्र आहे-- वेगवेगळ्या परिस्थितीत निर्णय कसे घ्यावेत/घेतले जातात याचे शास्त्र.
ही फार ढोबळ व्याख्या झाली. अर्थात त्यामुळे काही बिघडत नाही. पण त्यामुळे या शास्त्राची व्याप्ती बरीच वाढते. निर्णय तर प्रत्येक जण सतत घेतंच असतो. मग इकॉनॉमिक्सला नोबेल कशासाठी? जरी सामान्य माणसाला याची सीमा ठाऊक नसली तरी नोबेल पारितोषिक समितीस नक्कीच ठाऊक असावी. अन्यथा नोबेल देणं अवघड होऊन बसायचं. तर नोबेल निवड समितीने अर्थशास्त्राची व्याप्ती कशी ठरवली असेल याचं कुतूहल आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मिल्टन Sat, 10/14/2017 - 19:36 नवीन
अर्थशास्त्राला अर्धशास्त्रापासून सर्व्यव्यापी शास्त्र म्हणण्यापर्यंत दोन दिवसात खूपच मोठा पल्ला गाठलात तर :) तसे निर्णय सगळेच घेत असतात. अनेकदा आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात निर्णय घेत असतो ते अर्थशास्त्राशी निगडीत असतात (किंवा अर्थशास्त्राच्या कक्षेत येतात) याचा आपण दरवेळा विचार करतोच असे नाही. अगदी एक साधे उदाहरण द्यायचे तर घरून स्टेशनला जाताना बसनी जायचे की रीक्षानी जायचे यात वेळ आणि पैसा या दोन्हींचा विचार करून आपण निर्णय घेत असतो. अर्थशास्त्र नेमक्या अशाच (आणि इतर बर्‍याच) गोष्टींचा विचार करत असते. अर्थशास्त्रासाठी गणिताचा मोठा आधार आहे. प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे अर्थशास्त्रातील अनेक पेपर क्लिष्ट वाटणार्‍या गणिताने भरलेले असतात. म्हणजे गणितातील पध्दती वापरून अर्थशास्त्रातील प्रश्न सोडविले जातात. दुसरे म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे अर्थशास्त्रात मानसशास्त्राचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये वाढला आहे.
तर नोबेल निवड समितीने अर्थशास्त्राची व्याप्ती कशी ठरवली असेल याचं कुतूहल आहे.
ही व्याप्ती नोबेल समितीने ठरविलेली नाही. एखादा प्रश्न अर्थशास्त्राशी निगडीत होऊ शकेल की नाही हे त्या प्रश्नाकडे बघून कळते. एका अर्थी सगळीकडेच अर्थशास्त्र निगडीत असले तरी किती प्रमाणात हा अंदाज येईलच. मार्केटिंग शेवटी ग्राहकाला एखादी गोष्ट विकायला काय करता येईल यासाठी आहे. अर्थातच त्यात किंमत हा महत्वाचा घटक असतो आणि म्हणून अर्थशास्त्र त्यात आले. फायनान्समध्ये तर अर्थशास्त्र आलेच आले. पण ऑपरेशन्ससाठी (इन्व्हेंटरी मॅनेजमेन्ट इत्यादी) अर्थशास्त्र तितक्या प्रमाणावर लागणार नाही. इमारती बांधायच्या शास्त्रात अर्थशास्त्र किंमतीद्वारे येत असले तरी तो त्या क्षेत्रातील निर्णय घ्यायचा मुख्य गाभा नाही. अशाप्रकारे एखादा प्रश्न बघून अर्थशास्त्र त्यात किती प्रमाणात आहे हे समजेलच. नोबेल समितीने आतापर्यंत फायनान्समध्ये काम केलेल्या प्राध्यापकांनाही नोबेल दिले आहे. ऑप्शनची किंमत काढायच्या ब्लॅक-शोल्स-मर्टन मॉडेलचे संशोधक शोल्स आणि मर्टन यांना १९९७ मध्ये नोबेल पारितोषिक दिले गेले होते (ब्लॅकचे १९९५ मध्ये निधन झाले म्हणून त्यांना ते मिळू शकले नाही). हे काम मुख्यत्वे फायनान्समधले आहे. पण अर्थशास्त्र हा फायनान्सचा महत्वाचा गाभा आहे म्हणून त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल दिले गेले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 10/14/2017 - 23:10 नवीन
मिल्टन, १.
अर्थशास्त्राला अर्धशास्त्रापासून सर्व्यव्यापी शास्त्र म्हणण्यापर्यंत दोन दिवसात खूपच मोठा पल्ला गाठलात तर :)
होय तर. आहेच मुळी मी पल्लेबाज! ;-) पण या व्याप्तीविस्तारामुळे एक प्रश्न उद्भवतो. तो असा की .... २.
अर्थशास्त्रासाठी गणिताचा मोठा आधार आहे. प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे अर्थशास्त्रातील अनेक पेपर क्लिष्ट वाटणार्‍या गणिताने भरलेले असतात.
गंमत अशी की सत्येंद्रनाथ बसूंना नोबेल नाकारण्यात आलं कारण की बोस-आईनस्टाईन सांख्यिकी विज्ञानात मोडंत नसून निव्वळ गणिती कार्य आहे. ठीके. शुद्ध गणित तर शुद्ध गणित. पण अर्थशास्त्राच्या वेष्टनात सादर केलं तर नोबेल मिळू शकतं. पण विज्ञानाशी संबंधित असेल तर मिळू शकंत नाही. हे जरा किंवा बरंच उफराटं दिसतंय. ३.
अशाप्रकारे एखादा प्रश्न बघून अर्थशास्त्र त्यात किती प्रमाणात आहे हे समजेलच.
अशा प्रकारे एखादा प्रश्न बघून त्यात विज्ञान आहे अथवा नाही हे शोधण्याची काही रीत असती तर प्रा. सत्येंद्रनाथ बसूंना केंव्हाच नोबेल मिळालं असतं. शेवटी नशीब आपापलं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मिल्टन Sun, 10/15/2017 - 19:08 नवीन
सत्येंद्रनाथ बसूंना नोबेल नाकारण्यात आलं कारण की बोस-आईनस्टाईन सांख्यिकी विज्ञानात मोडंत नसून निव्वळ गणिती कार्य आहे.
हे माहित नव्हते. नोबेल समितीने नक्की कोणता विचार केला हे आपल्याला सांगता येणार नाही.
ठीके. शुद्ध गणित तर शुद्ध गणित.पण अर्थशास्त्राच्या वेष्टनात सादर केलं तर नोबेल मिळू शकतं.
नाही ते शुध्द गणित नाही तर ज्याला' 'अ‍ॅप्लाईड गणित' म्हणता येईल असे गणित अर्थशास्त्रातील पेपरमध्ये असते. शुध्द गणित अजून जास्त क्लिष्ट आणि व्विविध प्रकारच्या नोटेशननी भरलेले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 10/15/2017 - 19:46 नवीन
मिल्टन, शुद्ध गणित म्हणजे प्युअर म्याथ्स असं शब्दश: नका घेऊ. सत्येंद्रनाथ बसूंचं गणित देखील उपायोजक (=अप्लाईड) च आहे. पण तो वैज्ञानिक शोध म्हणता येणार नाही. नोबेल समितीकडून सायंटिफिक ही संज्ञा काटेकोरपणे वापरण्यात आली आहे. याउलट तीच समिती इकॉनॉमी ही संज्ञा मात्र बऱ्याच अघळपघळपणे वापरते. हा विरोधाभास आहे. मग इकॉनॉमीस अर्धशास्त्र म्हणावं का, असा प्रश्न पडतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
म
मिल्टन Sun, 10/15/2017 - 20:06 नवीन
नोबेल समिती कोणते मापदंड वापरते हे अर्थातच आपल्यासारख्यांना सांगता येणार नाही. जर बराक ओबामांना ७-८ महिन्यात नुसत्या मोठ्या गप्पांच्या आधारावर नोबेल पारितोषिक ते देऊ शकत असतील तर काहीतरी चुकत असेल ही शक्यता आहेच. तरीही नोबेल समितीने समजा चूक केली असली तरी अर्थशास्त्राला 'अर्धशास्त्र' असे वाटण्याचेही काही विशेष कारण समजले नाही. एका अर्थी ते 'अर्धशास्त्र' आहेच कारण तो कला शाखेचा हा विषय असला तरी गणित या महत्वाच्या शास्त्रशाखेच्या विषयाचा मोठ्या प्रमाणावर वापर अर्थशास्त्रात असतो. त्या अर्थी ते 'अर्धशास्त्र' आणि 'अर्धकला' आहे :) माझा मुद्दा नोबेल समितीपेक्षाही अर्थशास्त्राशी निगडीत आहे. मला गणिताची आवड असली तरी विज्ञानाची फारशी आवड नाही आणि गती तर अजिबात नाही. त्यामुळे त्या विषयावर काही मुद्दामून विशेष वाचावे असे कधीच वाटले नाही. त्यामुळे तुमचे विज्ञानावरचे मुद्दे लक्षात येत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
र
रानरेडा Mon, 10/16/2017 - 15:11 नवीन
नोबेल तर यासर अराफत सारख्या दहशतवादी खुन्याला पण मिळाले होते . मी एका ( ओसामाला मारण्यापूर्वीच्या ) लेखात तर वाचले होते कि जर ओसामा शरण आला आणि काही दिखाव्याची चांगली कामे करू लागला तर त्यालाही नोबेल मिळेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
म
मिल्टन Mon, 10/16/2017 - 17:59 नवीन
हो बरोबर. अनेकदा शांततेचे नोबेल पारितोषिक म्हणजे एक विनोदच असतो. पण अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देताना मात्र नोबेल समितीने नामवंत अर्थतज्ञांना दिले आहे. त्यातही संबंधित व्यक्तीची विचारसरणी कुठलीही असली (उजवी/डावी) तरी त्या व्यक्तीने विचारांना नवी दिशा देऊन काही मूलभूत योगदान दिले आहे हे लक्षात घेऊनच बहुतांश वेळा पारितोषिक दिले आहे. या नोबेल पारितोषिक विजेत्यांमध्ये उजव्या बाजूचे फ्रेडरिक हायेक, मिल्टन फ्रिडमन, गॅरी बेकर यासारखे होते तर समाजवादी/डाव्या विचारांचे जोसेफ स्टिगलिझ, पॉल क्रुगमन इत्यादीही होते. त्या अर्थी नोबेलचे मापदंड असे लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानरेडा
ग
गामा पैलवान Mon, 10/16/2017 - 18:00 नवीन
रानरेडा, शांततेचं नोबेल नॉर्वेची समिती देते. बाकीची स्वीडची समिती देते. शांततेचं नोबेल हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मोठ्ठा व हिणकस विनोद आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानरेडा
च
चौकटराजा Sun, 10/15/2017 - 12:41 नवीन
लहान पणी माझ्या मनात कै. जादूगार रघुवीर यानी सांगितलेले एक वाक्य आठवते. "दुसरी शक्यता विचारात घेण्यासाठी मानसिक कष्ट करावे लागतात . आम्ही जादूगार बोलण्यात अत्यंत प्रवाही व पटाईत असतो. माणसाला ऐकण्यातच गुंगून ठेवून पोटासाठी मी तुमच्याशी खोटे बोलत असतो. नाणे माझ्या डाव्या हाताच आडवे पाडतो पण तुम्हाला सांगताना तो उजव्या हातात घेतले आहे असे सांगतो. हजारात एखादाच असा असतो की त्याच्या मनांत कष्ट करण्याची उर्जा असते. तो म्हण्तो " अहो, डाव्या हातात नाणे असण्याचीही शक्यता आहे तो उघडून दाखवा बरे. " बाकी ९९९ म्हणतात जादूगार रघुवीर एक मोठे सदगृहस्थ आहेत. इमानदारीत गावोगावी जाऊन व्यवसाय करतात मग ते कशाला खोटे बोलतील ? ? मानवाच्या रॅशनल न राहाण्यामागे ही मिमांसा त्यानी भर चौकात सर्वाना सांगितली. आजही प्रत्येक क्षेत्रात ही अटकळ वापरली जाते. मग तो डॉक्टर असो, सी ए की वकील ! मी स्वतः ही माणूस असल्याने काही वेळेस मानसिक " कष्ट" करण्याचा आळस करतो तरीही मी बर्यापकी " संशयी" बनण्यात यशस्वी झालो आहे. नेटवर , पुस्तकांत दिलेले सर्व खरे असते असे मी मानत नाही.
  • Log in or register to post comments
म
मिल्टन Sun, 10/15/2017 - 19:55 नवीन
याविषयी आज लोकसत्तामध्ये डॉ.अजय ब्रम्हनाळकर यांचा हा लेख आला आहे. माझ्याकडून या लेखात राहिलेल्या एका मुद्द्याचा-- रिचर्ड थेलर यांच्या 'काजूच्या किस्स्याचा' उल्लेख केला आहे. तसेच या लेखातील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे बर्‍याच शब्दांना चपखल मराठी शब्द दिले आहेत. उदाहरणार्थ बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स ला 'वर्तनात्मक अर्थशास्त्र' हा चपखल शब्द त्यांनी वापरला आहे. यापुढे तो शब्द वापरायला हरकत नसावी. मला असे मराठी प्रतिशब्द पटकन सुचत नाहीत. मागे एकदा प्रयत्न केल्यावर सुचलेले शब्द बर्‍यापैकी बोजड निघाले त्यामुळे त्यानंतर तो प्रयत्न बंद केला. लोकसत्तातील या लेखातही प्रा.डॅनिएल कॅनेमन यांच्या Thinking, Fast and Slow या पुस्तकाचा उल्लेख आहे. तसेच या लेखात एक उल्लेख आहे-- वर्तनात्मक अर्थशास्त्राची सुरवात १९७४ मध्ये डॅनिएल कॅनेमन आणि अ‍ॅमॉस Tversky यांच्या Judgment under Uncertainty: Heuristics and Biases या शोधनिबंधातून झाली असे म्हणता येईल असे म्हटले आहे. अनेकांचा तो दावा असतो. पण तसे म्हणता येईल का याविषयी मला शंका वाटते. हर्बर्ट सायमन यांनी 'मर्यादित तर्कबुध्दी' (bounded rationality) ही संकल्पना १९५० च्या दशकातच मांडली होती. लेखात उल्लेख केल्याप्रमाणे अ‍ॅडम स्मिथने १७५९ साली The Theory of Moral Sentiments हे पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकातील कित्येक उल्लेख २० व्या शतकात वर्तनात्मक अर्थशास्त्र विकसित झाले त्याच्याशी मिळतेजुळते आहेत असे हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या (आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापिका नवा अश्रफ , कॅलिफॉर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक कॉलीन केमरर आणि कार्नेगी मेलॉन विद्यापीठाचे प्राध्यापक जॉर्ज लोवेन्स्टाईन यांनी लिहिलेल्या Adam Smith, Behavioral Economist या नितांतसुंदर शोधनिबंधात म्हटले आहे.म्हणजे त्या अर्थी अ‍ॅडम स्मिथ हा आद्य वर्तनात्मक अर्थशास्त्री झाला. पण नंतरच्या काळात विलिअम स्टॅन्ले जेवोन्स यांनी युटिलिटीचा वापर अर्थशास्त्रात केला आणि त्यानंतर आल्फ्रेड मार्शल इत्यादींनी त्यावरच आधारीत काम पुढे नेले आणि अ‍ॅडम स्मिथ या मुळातल्या वर्तनात्मक अर्थशास्त्र्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आणि अ‍ॅडम स्मिथ म्हटले की 'स्वार्थी माणूस' आणि 'अदृश्य हात' सोडून तिसरी गोष्ट कोणाच्या डोळ्यासमोर येईनाशी झाली. या प्रतिसादात उल्लेख केलेले दोन शोधनिबंध मुद्दामून वाचावेत असे आहेत. उगीचच क्लिष्ट आणि बोजड गणित न मांडता सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सगळे मुद्दे मांडले आहेत. अ‍ॅडम स्मिथवरच्या शोधनिबंधात संदर्भ म्हणून दिलेल्या इतर शोधनिबंधांपैकी काही Games and Economic Behavior या जर्नलमधले आहेत. लोक असे काही काम करत असतात हे बघितले की खरोखरच भारावून जायला होते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा