Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सध्या रोज संध्याकाळी येणार्या पावसावर मी केलेली कविता...

व — वैभवदातार, Tue, 10/10/2017 - 11:42
सध्या रोज संध्याकाळी येणार्या पावसावर मी केलेली कविता... आता कशाला पावसा तू उगाच कोसळतोस उभी राहिली पिके ही का त्यांना भिजवतोस नक्षत्रे पावसाची सारी संपली ती आता रे सरला आश्विन आता अन् आली आली दिवाळी रे असा अवेळी तू येता उडे खूपच धांदल मेघ गर्जना विद्युत काळे काळे हे बादल नको रागाने बरसू नको आणू रोगराई दिवस सण उत्सवाचे आहे लगबग घाई निरोप घेऊन धरणीचा पुढल्या वर्षी रे तू यावे आगमन होईल शिशिराचे तू आता उगी राहावे -- शब्दांकित (वैभव दातार )

प्रतिक्रिया द्या
1675 वाचन

💬 प्रतिसाद (5)
स
सूड Tue, 10/10/2017 - 12:38 नवीन
किती सुंदर लिहीता तुम्ही, प्रत्येक ऋतुवर असं काव्य का नाही करत? उदा. लांबलेली थंडी, मुक्कामी राह्यलेला उन्हाळा असं काहीतरी?
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 10/11/2017 - 03:02 नवीन
चांगली आहे कविता. आवडली. एकूणच ऋतुचक्र बदलले आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
व
वैभवदातार Wed, 10/11/2017 - 07:50 नवीन
तुमच्या कंमेंट बद्दल आभारी आहे. मी उन्हाळ्यासाठी पण शीच कविता केली होती मे महिन्यात.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 10/11/2017 - 09:22 नवीन
वाह, टाका ना ती पण!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभवदातार
व
वैभवदातार Wed, 10/11/2017 - 15:50 नवीन
धरणीचे मनोगत हि कविता मी पोस्ट केली आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा