Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जगाचा अंत १५ ऑक्टोबरला?? सिरिअसली ??

ह
हर्मायनी
Wed, 10/11/2017 - 07:05
🗣 32 प्रतिसाद
आम्ही मॅच व्यतिरिक्त संध्याकाळचा tv लावणं केव्हाच बंद केलंय . काल जेवण झाल्यावर कोणीतरी tv लावला तो बातम्या बघण्यासाठी.. एकीकडे दिवाळीच्या फटाक्यांवर लोकं खडे फोडत होते, तर दुसरीकडे वीज पडूनही टोपली खाली असलेली मुलगी जिवंत राहिली आणि हा एक वैद्यकीय(dude, really?) चमत्कार आहे असा एक डॉक्टर सांगत होता.आणि तिसऱ्या चॅनेल वर न्यूज रिपोर्टर बाई आपल्या नाटकी धीर-गंभीर आवाजात जगाचा अंत अगदी ५ दिवसांवर येऊन ठेपलाय हे सांगत होती. तिचा म्हणणं परीणामकारक करायला २०१२, डीप इम्पॅक्ट वगैरे चित्रपटांमधील दृश्य दाखवली जात होती. हे जवळजवळ १५ ते २० मिन चालू होतंआणि यानंतर त्यांनी एक चर्चा सत्र आयोजित केलं होतं. यात ब-ऱ्याच प्रसिद्ध आणि सर्व धर्माच्या व्यक्तींना बोलावलं होतं. तर , तिच्या म्हणण्याप्रमाणे 'डेविड मीडे'(आम्ही आधी चुकून भिडे ऐकलं! :D) या शास्त्रज्ञाने पृथ्वीचा अंत १५ ऑक्टोबरला होईल असा प्रेडिक्ट केलं आहे. मेक्सिको आणि उत्तर भारतातील मधील भूकंप, अमेरिकेतील चक्रीवादळे हा याचाच परिपाक आहे. अधिक माहितीनुसार, प्लॅनेट X निबीरू हा ग्रह पृथ्वीवर आदळणार किंवा पृथ्वीला घासून जाणार आहे आणि यामुळे भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळे इत्यादी होऊन पृथ्वीचा नाश होणार आहे. आणि याची तारीख आहे १५ ऑक्टोबर. Such a short notice! यासंदर्भात आंतरजालावर अनेक किस्से उपलब्ध आहेत. आणि नासाच्या म्हणण्यानुसार हा फक्त एक ऑनलाईन hoax आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं शेअर करा. We have survived 2012. ;) Let's hope for 2017.. :D
वर्गीकरण
काथ्याकूट

प्रतिक्रिया द्या
8896 वाचन

💬 प्रतिसाद (32)
म
मराठी कथालेखक Wed, 10/11/2017 - 09:32 नवीन
हं... उगाच आलो ऑफिसला .. चला घरी जावून आराम करतो.. अरे पण हे काय ? जगाचा अंत होणार म्हणून सगळेच जण घरी चाललेत आराम करायला.. वाण्याने दुकान उघडलं नाहीये.. दूध, भाजी, फळे मिळणं शक्य नाहीये... तिकडे वीजनिर्मिती केंद्रातही ही बातमी पोचली म्हणे आणि तिकडचे कर्मचारीपण घरी चाललेत ४ दिवस आराम करायला.. म्हणजे वीज पण खंडीत होणार असं दिसतंय.. अग्निशामक , पोलीस सगळेच घरी गेलेत... आता ४ दिवस आराम करु म्हणतात.. नाही आलो कामावर तर कारवाई होईल.. होवू देत.. कुणाला पडलीये.. नाहीतरी ४ दिवसांनी मरायचेच आहे. .. ते बघा तिकडे रुग्णालयातले कर्मचारी , डॉक्टर पण चाललेत .. तो पेशंट बोंबलतोय.. "बोंबलूदेत.. नाहीतर ४ दिवसांनी मरणारच आहे, आज मरेल.. काय फरक पडतो" पोलीस वगैरे नाहीयेत तर गुंड काय म्हणतायत ..."च्यायला आता कुठेही सहज हात मारता येईल रे.. पण काय करु चोर्‍या करुन तरी.. मग त्यापेक्षा मस्त कोणाच्याही घरात घुसतो, आवडेल ती मुलगी /बाई धरतो आणि..." तर चला चार दिवस मस्त मजा करु .. दोन दिवसांनी : हे काय घरातल्या बर्‍याच जिन्न्स, भाजी, दूध संपलंय.. आता फक्त वरण भात खावून रहावं लागेल.. पण ज्यांच्याकडे ते ही नाहीये ते आधीच मरत आहेत भुकेने.. कुणी रुग्णालयात मरत आहेत. बरेच खून आणि बलात्कार पण झालेत.. पण न्यूज चॅनेलही बंद आहेत त्यामुळे नेमकी खबर नाही.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 10/11/2017 - 16:18 नवीन
पण न्यूज चॅनेलही बंद आहेत त्यामुळे नेमकी खबर नाही. अंगावर काटाच आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Wed, 10/11/2017 - 16:58 नवीन
अरे हो.. पालिकेचं पाणी पण बंद होईल.. म्हणजे जगाचा अंत होईल पण तो धुमकेतू वा एखादा ग्रह आदळल्याने नाही तर जगाचा अंत होईल यावर जगाने विश्वास ठेवल्याने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
भ
भंकस बाबा Wed, 10/11/2017 - 15:37 नवीन
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 10/11/2017 - 16:46 नवीन
कोर्टातली केस आणि अशी भाकिते यांत साम्य हे की, कायम पुढची तारीख पडत रहाते पण निकाल(निक्काल) कधीच लागत नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 10/11/2017 - 18:48 नवीन
भूतकाळात असे हाकारे असंख्य वेळेला केले गेले आहेत आणि जोपर्यंत माणूसजमात आस्तित्वात आहे तोपर्यंत होत राहतील. लोकांचे मनोरंजन करण्याव्यतिरिक्त त्यांचा फारसा उपयोग नाही... झाडाचे पान पडल्यावर आकाश कोसळले असे समजणाइतके सशाचे काळीज असणार्‍या लोकांचा अपवाद वगळता ! :) अवकाशात (आणि म्हणून सूर्यमालेतही) दगडमातीबर्फाचे असंख्य लहानमोठे तुकडे (अ‍ॅस्टेरॉईड्स) फिरत आहेत. त्यातले काही पृथ्वीच्या जवळून जाताना वातावरणात शिरून उल्केच्या (तुटलेला तारा) स्वरूपात दिसतात. त्यातले बहुतेक सर्व वातावरणाशी घर्षण होऊन तयार होणार्‍या उष्णतेने वायूरूप होऊन विरून जातात. जमीनीपर्यंत पोचून खड्डा पडेल इतकी मोठी उल्का अनेक शतकात एखादीच असते. पृथ्वीवर हाहा:कार माजवणारी उल्का सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी पडली असावी असा अंदाज आहे... हीच ती उल्का जिच्यामुळे सुमारे २३.१ कोटी वर्षांपूर्वी आस्तित्वात येऊन सुमारे १५ कोटी वर्षे पृथ्वीवर राज्य गाजवणार्‍या डायनॉसॉर्सचा नाश झाला, असा अंदाज आहे. 2012 TC4 नावाची १३ मीटर व्यासाची एक उल्का ११-१२ (१५ नाही) ऑक्टोबर रोजी पृथ्वीपासून ४३,००० किमी दूरून जाणार आहे व अर्थातच, पृथ्वीवर आदळणार नाही... तेव्हा चिंता नसावी :) या उल्केचा मार्ग खालील संगणकीय सिम्युलेशन चलत्चित्रात पाहता येईल... Image removed. (निळा ठिपका = पृथ्वी; जांभळा ठिपका = पृथ्वीसभोवती जिओसिन्क्रोनस कक्षेतून फिरणारा उपग्रह; पांढरा ठिपका = चंद्र; पृथ्वीजवळून काहीश्या वक्राकार आडव्या मार्गाने जाणारा ठिपका = 2012 TC4 उल्का. हे चलत्चित्र जालावरून साभार.)
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 10/12/2017 - 06:55 नवीन
पृथ्वीजवळून काहीश्या वक्राकार आडव्या मार्गाने जाणारा ठिपका = 2012 TC4 उल्का.
स्लिपच्या बाजूने कॅच निघून गेल्यासारखी वाटतेय ही उल्का पाहून. :) असो. १३ मीटर व्यासाची उल्का असल्याने तसे पण पृथीवर येईपर्यंतच तिची राख झाली असती. आपले जगप्रसिद्ध लोणारचे सरोवर हे उल्कापात होऊनच तयार झाले आहे. हा अपवाद वगळता एवढे मोठे सरोवर तयार होण्यासारख्या उल्का पडल्याचे मी तरी कधी ऐकलेले वाचलेले नाही. फक्त गेल्या वर्षी भारतात एका व्यक्तीचा डोक्यात उल्का पडून मृत्यू झाल्याची बातमी होती. http://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/india/12146928/Indian-bus-driver-killed-by-meteorite-strike.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 10/12/2017 - 14:17 नवीन
2012 TC4 नावाची १३ मीटर व्यासाची एक उल्का ११-१२ (१५ नाही) ऑक्टोबर रोजी पृथ्वीपासून ६,८०० किमी दूरून जाणार आहे एक शंका. ६'८०० किमी हे अंतर पृथ्वीपासून असेल तर चित्रात उल्का जिओसिन्क्रोनस कक्षेतून फिरणाऱ्या उपग्रहाच्या बाहेरून जाताना दिसत आहे. हा उपग्रह पृथ्वीपासून अंदाजे ३६,००० किमी उंचीवरून फिरत असतो. म्हणजे उल्का पृथ्वीपासून ३६,००० किमी पेक्षा जास्त दूरून जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 10/13/2017 - 10:31 नवीन
बरोबर. ते अंतर ४३,००० किमी होते. टंकनचूक ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद ! मी पाहिलेल्या एका दुव्यात (http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-4779600/What-happen-asteroid-TC4-did-hit-Earth.html) ते अंतर चुकीने 4,200 miles (6,800 kilometers) असे दिलेले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ओ
ओरायन Mon, 10/16/2017 - 20:05 नवीन
वा..याेग्य शास्ञीय माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
द
दीपक११७७ गुरुवार, 10/12/2017 - 09:16 नवीन
जसा या संगणकीय सिम्युलेशन चल-चित्रात उल्केने पृथ्वी जवळुन जातांना दिशा बदलली , त्याप्रमाणे एखाद्या दुस-या ग्रहा जवळुन जाणा-या उल्केने दिशा बदलली तर ती सरळ पृथ्वी वर सुध्दा येऊ शकते.......................
  • Log in or register to post comments
ए
एक छायाचित्रकार गुरुवार, 10/12/2017 - 15:00 नवीन
१५ ऑक्टोबर ते ठिक. वर्ष कोणते ?
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस गुरुवार, 10/12/2017 - 20:23 नवीन
आप मेला जग बुडाले मग आख्खे जग बुडाले, तर काय बिघडले तसेही कोणासाठी काळ थाम्बत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक छायाचित्रकार
उ
उदय Fri, 10/13/2017 - 17:19 नवीन
तसाही काळ हा एक भास आहे, असे एक सर म्हणाले होते इथेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 10/13/2017 - 07:57 नवीन
पूर्वी दोन तीन दिवस कोकणात संततधार पाउस पडला की 'आता जगबुडी होणार' अशी चर्चा व्हायची. आता तशीच चर्चा चॅनेल्सवर होते.
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 10/13/2017 - 13:35 नवीन
चला, ठिकच आहे.. ह्यावर्षीच्या दिवाळीचा खर्च वाचवणार ही उल्का..
  • Log in or register to post comments
ए
एमी Fri, 10/13/2017 - 15:06 नवीन
यीप्पी पार्टी टाइम \(◎o◎)/
  • Log in or register to post comments
स
स्थितप्रज्ञ Sun, 10/15/2017 - 00:03 नवीन
त्यांना त्यांचा पाणी प्यायचा "जग" म्हणायचं असेल :D
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sun, 10/15/2017 - 15:26 नवीन
प्यायचा नाही हो , वाढायचा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ
च
चौकटराजा Sun, 10/15/2017 - 02:44 नवीन
पृथ्वी नष्ट होणार नाही बहुदा . पर्यावरण काहीसे नष्ट होईल , माणूस नष्ट झाला तर आनंद॑च होईल. हा प्राणी प्रबुद्ध आहे की भ्रमिष्ट हे एक मोठे कोडेच आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 10/15/2017 - 19:50 नवीन
बांगलादेशाचा १५ ऑक्टोबर संपला. तो अजूनतरी जिवंत आहे. येत्या चाळीसेक मिनिटांत भारत देखील या पीडेपासून मुक्त होईल. -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 10/15/2017 - 19:52 नवीन
चुकलो, ब्रह्मदेश म्हणायचं होतं. बांगलादेशास आजून ८ मिनिटे आहेत. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चामुंडराय Sun, 10/15/2017 - 21:12 नवीन
जगाचा अंत झाला. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार थोर शात्रज्ञ दाऊद भिडे यांचा काचेचा जग खाली पडून फुटला आणि त्याचा अंत झाला. अश्या रीतीने या थो(चो)र शात्रज्ञांचे जगाच्या अंताचे भविष्य खरे ठरले आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 10/16/2017 - 05:16 नवीन
जगाचा अंत झाला? च्यामारी आम्हांला गाढ झोप लागल्याने कळलंच नै. हॅत तेरी की!
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Mon, 10/16/2017 - 08:32 नवीन
जगाचा अंत झाला तरी चालेल.. पण स्वर्गात मिपा वाचायला मिळूदेत म्हणून प्रार्थना केली होती दसऱ्यात. रच्याकने, ऑफिसमधल्या सगळ्या बाया रंभा-उर्वशी भासताहेत.
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Mon, 10/16/2017 - 08:33 नवीन
जगाचा अंत झाला तरी चालेल.. पण स्वर्गात मिपा वाचायला मिळूदेत म्हणून प्रार्थना केली होती दसऱ्यात. रच्याकने, ऑफिसमधल्या सगळ्या बाया रंभा-उर्वशी भासताहेत.
  • Log in or register to post comments
ओ
ओरायन Mon, 10/16/2017 - 19:59 नवीन
जर उल्का पडून पृथ्वी संपणार अशी शक्यता जर कधी भविष्यात निर्माण झाली तरी प्रगत तंञाने कदाचित आपण टाळू पण शकतो.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 10/16/2017 - 20:07 नवीन
'आर्मागेडॉन' सारख्या हॉलिवूडपटांमध्ये दाखवलंय तसे जर महाकाय अशनीवर यान उतरवून किंवा क्षेपणास्त्र सोडून वगैरे अणुस्फोटाने त्या अशनीच्या ठिकऱ्या उडवणे ही खरेतर अतिशय घातक गोष्ट ठरेल. प्रत्यक्षात अशा अशनीचा मार्ग योग्य अंतर आधीच थोड्याश्या स्फोटकाने बदलणे हा जास्त शास्त्रीय उपाय आहे. अगदी काही अंश इतका दिशाबदलदेखील पृथ्वीशी संभाव्य टक्कर टाळण्यासाठी पुरेसा ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओरायन
च
चौकटराजा गुरुवार, 10/19/2017 - 05:34 नवीन
उल्केला टॅनजानशल धक्का लावून तिला न फोडता तिचा मार्ग बदलणे असा काही सिनेमा पाहिल्याचे आठवत आहे.पण नक्की कोणता हे आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अनन्त्_यात्री Tue, 10/17/2017 - 12:42 नवीन
मरणात खरोखर जग जगते अधि मरण अमरपण ये मग ते ॥ -- भा.रा.तांबे
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 10/20/2017 - 10:23 नवीन
च्यामारी ! जगाचा अंत होणार म्हणून मोबाईलची बिले वगैरे भरली नव्हती, किराणा सामान आणले नव्हते. आता हे सगळे करावे लागणार ! मायची कटकट :)
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 10/20/2017 - 16:06 नवीन
उल्केला टॅनजानशल धक्का लावून तिला न फोडता तिचा मार्ग बदलणे असा काही सिनेमा पाहिल्याचे आठवत आहे.पण नक्की कोणता हे आठवत नाही. -- द कोअर -- the core
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा