एव्हढ्यातच काय गुंतवणुक केलीत?
एव्हढ्यातच काय बचत केलीत? या धाग्यावरुन सुचले म्हणुन टंकतो आहे. एव्हढ्यातच काय गुंतवणुक केलीत?
माझे सांगयचे तर फार पुर्वी उत्पन्न कमी असताना आणि राष्ट्रीय बचत पत्रे ऑन मॅच्युरीटी (मराठी शब्द?) करमुक्त असताना त्यात पैसे गुंतवायचो. शिवाय पी.पी.एफ मध्ये पैसे टाकयचो. आणि एल. आय. सी च्या २-३ पॉलिसी होत्या (अजुन आहेत, पण केवळ पुर्ण करायच्या म्हणुन चालवतोय).
पण राष्ट्रीय बचत पत्राच्या उत्प न्नावर कर लागु झाला, पी.पी.एफ चे व्याजदर कमी झाले. मग काही काळ सोन्यात गुंतवणुक केली. पण घर घेताना ते सर्व विकले. शिवाय मध्येच गृहकर्जाचे हप्ते सुरु झले त्यामुळे बचत करणे काही काळ थांबलेच.
कालांतराने गृहकर्ज फेडले. मग बँकेत एफ. डी. करु लागलो, पण त्याच्या व्याजावर पुन्हा आयकराचा प्रश्न आला. शिवाय एफ. डी चे व्याजदर दिवसेन्दीवस कमी होत चालले आहेत. शेअर्स चांगला पर्याय आहे, पण रोज च्या रोज लक्ष ठेवायला वेळ नाही. शिवाय चुकिच्या शेअर्समध्ये पैसे घालुन नुकसान होण्याची भिती आहेच.
सेकंड होम किवा जमिन घेउ नये अशा मताचा मी आहे कारण लागेल तेव्हा हुकमी पैसे मिळतीलच याची खात्री नाही. शिवाय फायदा (अॅप्रिसिएशन) किती होइल सांगता येत नाही.
१-२ मित्रांशी बोलुन आता म्युच्युअल फंडा विषयी माहिती घेतो आहे. स्मॉल कॅप, मिड कॅप , लार्ज कॅप, इक्विटी फंड, डेट फंड, ई एल एस एस, हायब्रीड फंड, ब्लबॅलन्स,बॅलन्स फंड वगैरे वगैरे. वेबसाईटस वर त्यातील काहिचा परतावा फारच चांगला म्हणाजे २० ते २५ टक्के वार्षिक आहे. थोडे प्रयोग चालु आहेत.
तर मंडळी आपण कुठे गुंतवणुक करता/करावी?
एका ओळखीच्या बिल्डरची स्किम काही कारणाने अडकली आहे.स्किम अडकली आहे... पण ती का अडकली आहे ते माहीत नाही... म्हणजेच समस्या काय आहे याबद्दल खात्रीची माहिती नाही.तो पुढच्या ६ -८ महिन्यात सर्व काम पुर्ण करुन फ्लॅट विकेल आणि १६-१८ टक्के व्याजाने पैसे परत करेल.वरचे तथ्य पाहिले तर, या वाक्याच्या सत्यात येण्याबद्दल, फारच मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे. समस्येबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही तोपर्यंत, ती सुटेल की अजून जास्त गंभीर होईल हे ठरवणे, अंधारात दगड मारल्यासारखे होईल.