Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी ते रोमन लिप्यंतरण ! मराठी शिकणाऱ्यांसाठी नवीन सुविधा

क
कौशिक लेले
Wed, 10/18/2017 - 08:35
🗣 0 प्रतिसाद
मागच्याच आठवड्यात मी माझ्या "ऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली" उपक्रमाबद्दल लिहिले होते (http://www.misalpav.com/node/41267). मला सांगायला आनंद होतो की एका आठवड्याच्या आतच मराठी शिकणाऱ्यांसाठी अजून एका सुविधेला मी सुरुवात केली आहे . मराठी ते रोमन लिप्यंतरण ! http://learnmarathiwithkaushik.com/transliteration_parentpage.html आता मराठी(देवनागरी) लिपी नीट वाचता येईपर्यंत शिकणाऱ्यांचे मराठी वाचन अडून राहायला नको. मराठीत जे वाचत असतील ते इथे कॉपी पेस्ट करून रोमन लिपीत ते शब्द वाचू शकतील आणि सराव करू शकतील. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुरुवातीला मराठी शिकताना याचा फायदा होऊ शकतो. जर तुम्ही कोणाला मराठीत ई-निरोप पाठवत असाल आणि काही कारणाने त्या व्यक्तीकडे मराठी नीट दिसत नसेल तर, तुमचा निरोप रोमन लिपित लिप्यंतरित करून त्याला पाठवू शकता. पूर्ण निरोप पुन्हा रोमन मध्ये टाईप करायची गरज नाही ही सुविधा कशी वाटली सांगा; वापरताना काही समस्या आली तरी कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचवा. धन्यवाद, कौशिक लेले (LearnMarathiFast@gmail.com) MarathiToRomanTransliteration

प्रतिक्रिया द्या
958 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा