Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कॅशलेस अर्थव्यवस्था आणि चोरी/भ्रष्टाचार

म
मिल्टन
Tue, 10/24/2017 - 17:02
🗣 98 प्रतिसाद
साधारण चार महिन्यांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतत होतो आणि कुर्ला स्टेशनवर नव्या मुंबईकडे जाणार्‍या लोकल ट्रेनची वाट बघत होतो. बर्‍याचदा संध्याकाळी भूक लागली की मी स्टेशनवरून खायला एखादा बिस्किटाचा पुडा घेतो.त्याप्रमाणे त्या दिवशी मी एक बिस्किटाचा एक पुडा घेतला. तो पुडा होता १० रूपयाचा. मी त्या स्टॉलवाल्याला १०० ची नोट दिली. वरचे पैसे परत देताना त्याने ५० ची एक नोट दिली आणि २० रूपयाच्या दोन नोटा दिल्या. तेवढ्यात माझी गाडी आली त्यामुळे त्या नोटा घेऊन घाईघाईतच मी गाडीत चढलो. नंतर लक्षात आले की त्या ५० रूपयाच्या नोटेला एका बाजूला पूर्ण भागावर लाल रंग लागला होता आणि त्यामुळे कोणीही ती नोट घेणे शक्य नव्हते. दुसर्‍या दिवशी मी त्या स्टॉलवाल्याला त्या नोटेविषयी विचारले असता त्याने अपेक्षेप्रमाणे ती नोट दिल्याचेच नाकारले. विनाकारण ५० रूपयाचा खड्डा पडला. हा प्रकार म्हणजे माझी झालेली फसवणूकच होती. त्याची चांगली ४ दिवस चुटपुट लागून राहिली होती. वास्तविकपणे ५० रूपये ही ४ दिवस चुटपूट लागावी इतकी मोठी रक्कम होती का? नक्कीच नाही. तरीही चुटपूट लागायची ती लागलीच. आपल्या चुकीने पैसे गमाविण्यापेक्षा दुसर्‍या कोणी फसविल्यामुळे पैसे गमावायला लागले त्याचे दु:ख कितीतरी जास्त असते. ते कारण होते का? तर तसेही वाटत नाही. कारण अशाप्रकारे इतर कोणी फसविल्यामुळे यापूर्वीही असे पैसे गमावले होते आणि त्यावेळी इतकी चुटपूट लागली नव्हती. अशाप्रकारची दोन उदाहरणे पटकन लक्षात आली. पहिले उदाहरण होते २००८ मधील. माझ्या आईच्या फोनवरील प्रिपेड कार्ड रिचार्ज करायला मी आय.सी.आय.सी.आय बँकेच्या खात्यातून १०० रूपये ऑनलाईन बँकिंगद्वारे भरले होते. माझ्या खात्यातून पैसे तर गेले पण रिचार्ज शेवटपर्यंत झालेच नाही. बँकेत विचारले तर ते म्हणत होते की फोन कंपनीला विचारा आणि फोन कंपनी म्हणत होती बँकेला विचारा. मधल्यामध्ये माझे मात्र नुकसान झाले. २००८ मधील माझी एकूण परिस्थिती आणि उत्पन्न लक्षात घेता त्यावेळच्या १०० रूपयांचे मला २०१७ मधील ५० रूपयांपेक्षा कितीतरी जास्त महत्व होते. तरीही त्या फसवणुकीची मला ४ दिवस चुटपूट लागल्याचे लक्षात नाही. दुसरे उदाहरण म्हणजे २०१५ मधील. फोनवर मी यु.टी.एस म्हणून एक अ‍ॅप डाऊनलोड केले होते. त्या अ‍ॅपद्वारे फोनवर मुंबईतील लोकल ट्रेनची तिकिटे काढता येतात. फोनवरील जी.पी.एस वरून आपण नक्की कुठे आहोत हे ट्रॅक करून आपण जर स्टेशनच्या १ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरात असू तर तिकिट फोनवर काढता येईल असे त्या अ‍ॅपविषयी ऐकले होते. त्या अ‍ॅपवरील वॉलेटमध्ये मी २०० रूपये टाकले. माझे घरही स्टेशनच्या १ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरात असल्यामुळे माझी कल्पना होती की मला घरूनही तिकिट काढता येईल. अगदी घरून नाही तरी स्टेशनला जात असताना तरी तिकिट नक्कीच काढता येईल अशी माझी अपेक्षा होती. पण कुठचे काय. कुठेही असले तरी 'स्टेशनच्या जवळ जा आणि मग तिकिट काढा' हेच पालुपद त्या अ‍ॅपने चालू ठेवले. शेवटी वैतागून मी ते अ‍ॅप अन-इन्स्टॉल करून टाकले. अर्थातच त्या अ‍ॅपच्या वॉलेटमधील २०० रूपयेही गेले. या गोष्टीची मला किती वेळ चुटपूट लागली होती? तर फार वेळ नाही. या तीन उदाहरणात झालेली फसवणुक हा एक समान घटक असला तरी एक महत्वाचा फरक आहे. पहिल्या उदाहरणात मी रोख पैसे दिले होते आणि मला फटका बसला होता तो रोख स्वरूपात बसला होता. तर उरलेल्या दोन उदाहरणात बसलेला फटका कॅशलेस होता. हा फरक वगळता तीनही उदाहरणात फार फरक नव्हता. उलट बसलेल्या फटक्याची रक्कम पहिल्या उदाहरणात बरीच कमी होती तरीही त्याची चुटपूट मला कितीतरी जास्त प्रमाणात लागली होती. हे का होत असावे? कुर्ला स्टेशनवर फटका बसण्यापूर्वी मी एम.आय.टी चे प्राध्यापक डॅन एरिअली यांचे Predictably Irrational हे एक नितांतसुंदर पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकात त्यांनी केलेल्या प्रयोगाचा उल्लेख केला आहे. त्यांनी एम.आय.टी च्या विद्यार्थ्यांच्या डॉर्ममधील फ्रिजमध्ये एक डॉलर किंमतीच्या दहा कोकच्या बाटल्या ठेवल्या. आठवड्याभराने त्यांनी त्या बाटल्या तिथे आहेत का हे तपासले असताना एकही बाटली तिथे राहिली नव्हती. याचाच अर्थ कोणीतरी त्या बाटल्या लंपास केल्या होत्या. दुसर्‍या प्रयोगात त्याच फ्रिजमध्ये त्यांनी एक डॉलरच्या दहा नोटा ठेवल्या. आठवड्याभराने परत तपासले असताना त्यांना आढळले की सगळ्या नोटा जिथल्या तिथे होत्या. एकही नोट लंपास झाली नव्हती. म्हणजेच एक डॉलर किंमतीच्या कोकच्या बाटल्या हातोहात लंपास झाल्या पण नोटा मात्र जशाच्या तशा राहिल्या. एक डॉलरच्या कोकच्या बाटलीची चोरी करण्यात संबंधित व्यक्तींना आपण फार काही वावगे करत आहोत असे वाटलेही नसावे पण एक डॉलरच्या नोटेची चोरी करताना मात्र ती नोट घेऊन आपण काहीतरी चुकीचे करू असे त्यांना नक्कीच वाटले असणार. अन्यथा त्या नोटा तशाच तिथे राहिल्या याची कारणमिमांसा देता येणार नाही. याचा अर्थ काय?प्राध्यापक डॅन एरिअली म्हणतात की रोख रक्कम आणि तितक्याच किंमतीची वस्तू या दोन गोष्टींविषयी आपली मानसिकता वेगळी असते. जेव्हा रोख रकमेचा संबंध असतो तेव्हा आपल्या विवेकाची अधिक टोचणी आपल्याला लागते. पण एखादी गोष्ट जितक्या प्रमाणात रोख स्वरूपापासून दूर जाते तेवढ्या प्रमाणात आपल्या विवेकाचे आपल्यावरील नियंत्रण कमी होत जाते. कुर्ला स्टेशनवरील त्या घटनेनंतर मला जाणवले की नुसत्या चोरीच्या बाबतीत नाही तर नुकसानीच्या बाबतीतही नेमके असेच घडत असावे. म्हणजे रोख नुकसान झाल्याची चुटपूट आपल्याला कॅशलेस नुकसान झाल्यापेक्षा जास्त लागते का? बहुतेक तसेच असावे. अर्थात माझ्या या लेखाचा विषय नुकसान हा नाही तर भ्रष्टाचार (म्हणजे चोरीच) हा आहे. ही घटना त्या दृष्टीने विचार करायला लावणारा केवळ एक ट्रिगर होता. मी त्या पुस्तकातील संबंधित भाग परत एकदा वाचून काढला. कुर्ला स्टेशनवरील घटना घडण्यापूर्वी केवळ एक चांगला (आणि मनोरंजक) अभ्यास यापेक्षा जास्त महत्व मी त्या भागाला देत नव्हतो. त्यातील अनेक गोष्टी नंतर अधिक प्रमाणात पटायला लागल्या. प्राध्यापक डॅन एरिअली म्हणतात त्याप्रमाणे आपण ऑफिसच्या स्टेशनेरीमधून पेन घेतले आणि आपल्या स्वतःच्या कामांसाठी वापरले असे किती वेळा होते? ऑफिसचे पेन घेऊन ते आपल्या स्वतःच्या कामांसाठी वापरले तरी ती कंपनीमधून केलेली चोरीच असते. तरीही आपण तसे करताना काही चुकीचे करत आहोत हा विचारही आपल्या मनाला बर्‍याचदा शिवत नाही. समजा आपण घेतलेले पेन १० रूपयांचे आहे असे धरून चालू. आपल्यापैकी किती जण कंपनीमधील पेटी कॅशमधून १० रूपयाची नोट उचलून ती आपल्या खिशात घालतील? मला वाटत नाही की आपल्यापैकी कोणीही तसे करेल. म्हणजेच काय तर रक्कम सारखीच असली तरी तेवढ्याच रकमेच्या नोटेची चोरी करायचा आपण विचारही करू शकणार नाही. याचे कारण आपली विवेकबुद्धी रोख रक्कम आणि रोख रकमेपेक्षा दूर असलेली गोष्ट यांच्यात फरक करते. मी नक्की कोणत्या रोखाने बोलत आहे हे एव्हाना मिपाकरांच्या लक्षात आलेच असेल. एखादी गोष्ट जेवढी रोख रकमेपेक्षा दूर जाते तितक्या प्रमाणात आपल्याच विवेकबुध्दीचे आपल्यावरील नियंत्रण कमी होते. बरं आतापर्यंत मी जी उदाहरणे दिली आहेत त्यातील रक्कम किरकोळ होती (५० रूपये, १० रूपये इत्यादी). मोठ्या रकमेचा संबंध असेल तर आपली (आपली म्हणण्यापेक्षा माणसाची) विवेकबुध्दीची टोचणी जास्त लागून ती चोरी टाळण्याकडे कल असेल का? असेलही कदाचित. प्राध्यापक डॅन एरिअलींनी आणखी एक प्रयोग केला होता आणि त्यात निष्कर्ष निघाला की संधी मिळाल्यास आणि पकडले जाणार नाही याची बर्‍यापैकी खात्री असेल तर बहुतांश लोकांचा फसविण्याकडे कल असतो. पण असे फसविणे अमर्याद नसते. म्हणजे बहुसंख्य लोकांचा फसविण्याकडे कल जरी असला तरी ते मऊ लागले म्हणून कोपरापासून खणत नाहीत आणि थोडेसेच फसवितात. याचे कारण काय---तर एका मर्यादेपेक्षा जास्त फसवणुक करताना माणसाच्याच विवेकबुध्दीची टोचणी लागते असे म्हणायला हरकत नसावी. म्हणजे हा निष्कर्ष म्हणजे मी म्हणत आहे त्याचा विरोधाभास झाला का? वरकरणी तसे वाटू शकेल. पण यातही काही गोष्टींचा विचार करायला हवा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे 'एका मर्यादेपेक्षा कमी' ही बरीच फसवी संकल्पना आहे. समजा ५ रूपयांची चोरी ही ती मर्यादा असेल आणि ती एकदा गाठल्यावर ५ रूपयांची मर्यादा वाढून १० मग २० मग ५० मग १०० रूपये व्हायची शक्यता आहेच. आपल्यासारख्यांना (किमान माझ्यासारख्यांना) चोरी करायचीच असेल तर फार तर एखादे पेन चोरणे किंवा गेलाबाजार खोट्या रिसीट्स देणे, इकॉनॉमी क्लासने जाऊन बिझनेस क्लासचे तिकिट घेणे यापेक्षा फार मोठी उडी सध्या तरी मारता येणार नाही. पण मोठ्या अधिकाराच्या व्यक्तींकडे चोरी करायच्या बर्‍याच जास्त संधी उपलब्ध असतात. आणि जर का 'एका मर्यादेपेक्षा जास्त' चोरी करायची नसेल तरी ती मर्यादा अमर्याद वाढू शकेल इतके अधिकार आणि संधी त्यांच्याकडे असतात. याचे सर्वात योग्य उदाहरण म्हणजे एनरॉनचा घोटाळा.कॉर्पोरेट अमेरिकेमधील २००१ मधील तोपर्यंतचा हा सर्वात मोठा घोटाळा होता. हा घोटाळा काही शे बिलिअन डॉलर्सचा होता. अर्थातच इतका घोटाळा काही एका रात्री झालेला नाही. अकाऊंटिंगमधील घोटाळे त्यापूर्वी कित्येक वर्षे सुरू झाले होते. आपली चोरी पकडली जात नाही म्हटल्यावर हळूहळू धीर चेपून आधीचे घोटाळे पचवून केनेथ ले आणि इतरांनी अधिकाधिक मोठे घोटाळे केले असतील हे म्हणायला नक्कीच जागा आहे. भारतातही रामलिंग राजूने सत्यममध्ये प्रत्यक्षात कंपनीत कामाला नसलेले १२ हजार कर्मचारी दाखवून त्यांचे खोटे सॅलरी अकाऊंट तयार करून त्या खात्यांमध्ये येणारे पैसे स्वतःच्या खिशात घातले होते असे म्हणतात. आता रामलिंग राजूने अशी चोरी एका रात्रीत सुरू केली का? तसे वाटत नाही. सुरवात कदाचित १०० खोट्या सॅलरी अकाऊंटमधून झाली असेल. मग हळूहळू धीर चेपून आणखी खोटे अकाऊंट त्याने तयार केले असतील हे म्हणणे अधिक सयुक्तिक वाटते. तेव्हा 'एका मर्यादेपेक्षा' जास्त मोठी चोरी करताना विवेकबुध्दीची टोचणी लागते हे म्हणणे 'त्या मर्यादेपर्यंतच' लागू ठरेल. महत्वाची गोष्ट म्हणजे ती मर्यादा अधिकाधिक वाढत जायची शक्यता आहेच. आपल्यापैकी कोणी मोठा रामलिंग राजू होईल याची शक्यता फारच थोडी. पण माझा मुद्दा हा आहे की असे छोटे रामलिंग राजू आपल्या अवतीभोवती (कदाचित आपल्यातच) लपलेले असतात. मी अमेरिकेत असताना (२००३ मध्ये) मी ज्या विद्यापीठात होतो त्या विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांना डॉट. कॉम क्रॅशमधून नुकत्याच सावरणार्‍या अमेरिकन अर्थव्यवस्थेत भारतातील पूर्वीचा आय.टी अनुभव नसेल तर नोकरी मिळणे कठिणच होते. खोटे सी.व्ही बनविणार्‍या एजंटांचे प्रस्थ त्यावेळी तितक्या प्रमाणात आमच्या विद्यापीठात आलेले नव्हते. अशावेळी अनेक भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत नोकरी न मिळाल्यामुळे भारतात परत जावे लागले होते. जाताना अशा अनेकांनी क्रेडिट कार्डावरील बिले न भरताच भारतात प्रयाण केले होते (काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही रक्कम एकापेक्षा जास्त कार्डांवर मिळून १० हजार ते १५ हजार डॉलर्सपर्यंत होती) हे भारतीय विद्यार्थ्यांच्या कम्युनिटीमध्ये अगदी उघडे गुपित होते. अशा काही विद्यार्थ्यांना मी स्वतः ओळखतो. त्यांनी १० ते १५ हजार डॉलर्स काय तर इतरांचे १० रूपयेसुध्दा रोखीमध्ये चोरले नसते. तरीही असे काही हजार डॉलर्स चोरण्यात आपण काही चुकीचे करत आहोत ही जाणीव त्यांच्याकडे असली तरी ती जाणीव ती कृती करण्यापासून रोखण्याइतकी प्रबळ नव्हती. वॉलमार्टमध्ये एखादी वस्तू वापरायची आणि मग ती परत करायची असे करणारे लोक आपणही आजूबाजूला बघितले असतीलच. ती पण एका अर्थी चोरी झाली नाही का? पण तरीही असे लोक २०-५० डॉलरची रोखीत चोरी कधीच करणार नाहीत हे आपल्यालाही जाणवेलच. एनरॉन घोटाळ्यात समजा अमेरिकेतील प्रत्येक माणसामागे सरासरी १०० डॉलर्सचे नुकसान झाले असे समजू. केनेथ ले आणि इतरांनी रस्त्यात दिसलेल्या कोणाही माणसाचे पाकिट मारून त्यातील १०० डॉलर्स चोरले असते हे जरा असंभवनीयच वाटते. आता वळू कॅशलेस जगताकडे. मागच्या वर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी जाहिर केली आणि त्यामागे कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देऊन भ्रष्टाचार कमी करणे हे एक कारण आहे असे म्हटले गेले होते. पण माझा दावा असा आहे की वर दिलेल्या उदाहरणांवरून आपल्याला दिसते की रोख रक्कम आणि रोख रकमेपेक्षा दूर असलेल्या गोष्टी (वस्तू किंवा ऑनलाईन नेटबँकिंगद्वारे केलेले व्यवहार) यांच्यात आपल्याच विवेकबुध्दीचे आपल्यावरील असलेल्या नियंत्रणाचे प्रमाण वेगळे असते. अशावेळी समजा सगळे व्यवहार कॅशलेस झाले (भारतात सध्या तरी तसे होणे कठिणच आहे पण समजा अजून ५० वर्षांनी ते शक्य झाले) तर भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढू शकेल का? आपण अगदी लहानपणापासून रोख रकमेला पैसा म्हणूनच ओळखतो आणि वर दिलेल्या उदाहरणांवरून लक्षात येईल की ऑनलाईन/कॅशलेस व्यवहारांमध्ये आपल्या विवेकबुध्दीचे आपल्यावरील नियंत्रण रोख रकम हाताळताना असते तितक्या प्रमाणात नसते. तरीही आपल्यावर ऑनलाईन/कॅशलेस व्यवहारात विवेकबुध्दीचे जितके कितके नियंत्रण असते त्यात 'हा पण पैसाच आहे' ही भावना असेल का? आणि जर मुळात रोख रक्कम हाताळलीच नाही तर 'हा पण पैसाच आहे' ही भावना आणखी कमी होऊ शकेल का? सुरवातीला जर लहान कॅशलेस चोरी केलेली पकडली गेली नाही म्हणून धीर चेपत मोठ्या चोर्‍या व्हायला लागल्या आणि मुख्य म्हणजे रोख रक्कमेचा संबंध नसेल तर अजून जास्त मोठे घोटाळे केले जायची शक्यता आहे का? कोणी म्हणेल की अकाऊंटिंग मधील घोटाळे पहिल्यापासूनच 'कॅशलेस' होते. मग कॅशलेस अर्थव्यवस्था आणल्यामुळे त्यात होणार्‍या भ्रष्टाचारात काय मोठा फरक पडेल? त्यावर माझे म्हणणे असे की जर पूर्ण कॅशलेस व्यवहार झाल्यास पूर्वीपेक्षा अधिक लोकांना असे घोटाळे करायची संधी मिळेल कारण पूर्वी असे मार्ग मोठ्या पदांवरील लोकांनाच खुले होते पण सगळे कॅशलेस झाल्यास नेटवर्क आणि आय.टी यामुळे जास्त लोकांना तो मार्ग खुला होईल. त्यातच रोखीत व्यवहार नसतील तर अनेक लोकांच्या विवेकबुद्धीचे नियंत्रण ढिले पडेल. हे करता येणे कसे शक्य होईल? मी काही चोर नाही त्यामुळे असे करता येणे कसे शक्य होईल याविषयी माझ्या कल्पनाशक्तीची उडी मर्यादितच असेल. तरीही आपण जिथेजिथे पैसे भरतो (स्टोअरमधून सामान विकत घेताना किंवा अन्य कुठेही) तिथेतिथे संबंधीत व्यवसाय करणार्‍या कंपनीला आपल्याला गंडा घालायची संधी अधिक प्रमाणात मिळेल ही भिती आहे.आपण महिन्याभरात कित्येक व्यवहार करत असतो. समजा हे सगळेच व्यवहार कॅशलेस असतील तर त्याचे कुठेतरी (बँक खात्यात किंवा क्रेडिट/डेबिट कार्डात) स्टेटमेन्ट येईल. असे कित्येक व्यवहार असतील तर काही व्यवहारात आपल्याला गंडा घातला गेला तरी तो आपल्याला लक्षातही येणार नाही. आणि त्यातून सगळे कॅशलेस असेल तर गंडा घालणार्‍यावर त्याच्या विवेकबुध्दीचे नियंत्रण काही प्रमाणावर ढिले पडलेले असेल ही शक्यता आहे आणि कॅशलेस गंडा पडल्यास आपल्यालाही त्याविषयी तितक्या प्रमाणावर दु:ख न वाटल्यास आपणही ते प्रकरण तडीस न्यायचा प्रयत्न करूच असेही नाही. असा गंडा घालण्यासाठी फार काही करायला लागेल का? कदाचित आय.टी सिस्टिममध्ये बॅक-एन्डला थोडे फेरफार केले तरी तसा गंडा घालता येऊ शकेल. आतापर्यंत असे घोटाळे करणार्‍यांनी घोटाळे करायचे नवेनवे मार्ग शोधून काढले आहेतच. १९९५ मध्ये नीक लिसन या एकट्या ट्रेडरने २३० वर्षे जुनी बेरिंग्ज बँक बुडवली. ज्या ट्रेडमध्ये तोटा होईल असे ट्रेड तो ८८८८८८८८ या खोट्या खाते क्रमांकात तो पोस्ट करत असे आणि ज्या ट्रेडमध्ये फायदा होईल असे ट्रेड तो कंपनीच्या अकाऊंटमध्ये पोस्ट करून कंपनीला मोठा फायदा करून दिल्याचे श्रेय घेऊन स्वतः गलेलठ्ठ बोनस घेत असे. जोसेफ जेट या ट्रेडरने किडर पीबॉडी कंपनीतील सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या बगचा गैरफायदा उठवून कंपनीने न केलेला फायदा दाखवून त्यानेही त्याचे श्रेय स्वतःकडे घेऊन असाच गलेलठ्ठ बोनस घेतला होता. नीक लिसन आणि जोसेफ जेट यांचे ग्रह फिरले म्हणून त्यांचे कृत्य उघडकीस आले. पण कदाचित त्यांच्या नंतरच्या ट्रेडमध्ये फायदा झाला असता तर ते आपले चोरीचे कृत्य लपवूही शकले असते आणि ते कोणाला समजलेही नसते. आजही असे किती नीक लिसन आणि जोसेफ जेट आहेत कुणास ठाऊक. माझी भिती ही आहे की सगळ्या गोष्टी कॅशलेस झाल्यास पूर्वी मूठभर ठिकाणी अशा फसवणुक करायच्या संधी उपलब्ध होत्या त्या इतर अनेकांना उपलब्ध होतील. त्यातून रोखीत व्यवहार कधी केलेच नसतील आणि त्यामुळे विवेकबुध्दीचे नियंत्रण ढिले पडले तर त्यामुळे अधिक प्रमाणावर आणि वेगवेगळ्या पध्दतीने भ्रष्टाचार होऊ शकेल ही भिती वाटते. घोटाळे करणारे प्रत्येकवेळी नवीन नवीन मार्ग शोधून काढतीलच. तो मार्ग आजही उपलब्ध असला तरी सध्या रोखीत व्यवहार केल्यामुळे काही प्रमाणात तरी विवेकाची टोचणी असते. तीच जर का कमी झाली तर मात्र मोठ्या समस्या निर्माण होतील ही भिती वाटते. कदाचित हे सगळे स्वप्नरंजन असेलही.कदाचित यापैकी काहीही प्रत्यक्षात उतरणारही नाही. तसे झाल्यास फारच उत्तम. पण असे व्हायची शक्यता आहे का? याविषयी आपले मत काय?
वर्गीकरण
अर्थकारण
नितीमत्ता

प्रतिक्रिया द्या
24491 वाचन

💬 प्रतिसाद (98)
स
सुबोध खरे Fri, 10/27/2017 - 09:41 नवीन
कॅशलेस काय किंवा रोखीचा व्यवहार काय. कंपन्या आपल्या अटी लहान अक्षरात आणि आपल्याला फायदेशीर अशाच ठेवतात. पावसाळ्याच्या अगोदर निर्मल लाईफ स्टाईल मधून मी नाईकी या कंपनीच्या दुकानातून बूट विकत घेतले. त्याचा सोल सारखा निघत असे. पावसाळा आला तेंव्हा मी ते बूट माळ्यावर टाकले. आता बाहेर काढले आणि कंपनीच्या शोरूम मध्ये गेलो तर त्यांनी हा उत्पादनाचा दोष ( manufacturing defect) आहे मान्य केले पण आता सहा महिने झाले तुमची वॉरंटी संपली आता आम्ही बुटाचा सोल लावून देणार नाही. मी त्यांना पैसे घेऊन लावून द्या सांगितले तर त्यांनी कंपनीची पॉलिसी आहे कि आम्ही कोणतेही दुरुस्ती काम करीत नाही. सहा महिन्याच्या आत असेल तर बद्लीचा दुसरा बूट देतो आणि सहा महिन्यानंतर काहीच नाही. मी काय करावे सांगितल्यावर त्यांनि लोकल माणसाकडून शिवून घ्या सांगितले. manufacturing defect आहे हे मान्य करूनही कंपनी काहीही करण्याची तयारी दाखवत नाही हि फसवणूक आहे. याचा कॅशलेसशी संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
द
दीपक११७७ Fri, 10/27/2017 - 11:14 नवीन
१. मेडीक्लेम पॉलसी (छुपे नियम फसवणुक कॅश-कॅशलेसशी संबंध नाही) २. चिट फंड (संचयनी पासुन सुरु करुन पुढे बरेच ....... हा कॅश घोटाळा) ३. तेलगी घोटाळ्यावर उपाय म्हणुन Franking,estamp paper and eSBTR ह्या ई सुविधा. ४. रेल्वे ई टिकीटींग मुळे मिळत असलेली सुविधा ५. सेतु सेवा केंद्र ई ई ई असे बरेच घोटाळे आहेत ज्या वर उपाय म्हणुन ई सुविधेचा पर्याय शोधला आहे, जो अजुनही पुर्वी पेक्षा उत्तम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मिल्टन Fri, 10/27/2017 - 11:35 नवीन
यात एक महत्वाची गोष्ट विसरली जात आहे का? अशी फसवणुक व्हायची शक्यता बुटाच्या दुकानात जास्त पण वाण्याच्या दुकानात कमी. म्हणजे एखादी खराब झालेली गोष्ट वाण्याच्या दुकानातून बदली करून मिळायची शक्यता जास्त. हे का? एक कारण आहे की बुटाची शोरूम असेल नाईके, आदिदास इत्यादी बूट ठेवणारी असतात पण वाण्याच्या दुकानातील गोष्टी वेगळ्या असतात. त्यापेक्षाही महत्वाचे कारण म्हणजे समोरासमोर आणि वारंवार व्यवहार झाल्यामुळे ग्राहक आणि दुकानदार यांच्यात एक रिलेशन तयार झालेले असते. बुटाच्या दुकानात तसे रिलेशन तयार व्हायची शक्यता कमी कारण बुटाच्या दुकानात समोरासमोर व्यवहार झाला तरी वरचेवर होत नाही. असे रिलेशन तयार झाल्यावर त्या ग्राहकांना फसविणे त्या दुकानदाराला तितके सोपे जाणार नाही. आता ऑनलाईन वेबसाईट, अ‍ॅपद्वारे केलेल्या खरेदीत असे रिलेशन तयार होणे फारच कठिण आहे. अगदी एकाच अ‍ॅपवरून मी कित्येकवेळा खरेदी केली तरी असे रिलेशन तयार व्हायला गरजेचे असलेले प्रत्यक्षातील इंटरॅक्शन समोरासमोर होत नाही. त्यामुळे जुन्या ग्राहकांसाठी काही टक्के सूट अशास्वरूपाच्या सवलती वगळता त्यापेक्षा जास्त असे रिलेशन तयार होऊ शकणे कठिण आहे. अशा व्यवहारांमध्ये ग्राहक हा एक अनोळखी फेसलेस मनुष्य असतो. आणि ओळखीच्या माणसापेक्षा अनोळखी आणि त्यातही कधी बघायची शक्यता नसलेल्या माणसाची फसवणुक केली जायची शक्यता जास्त. म्हणूनच अनेकदा प्रतिसादांमध्ये 'अनोळखी' या शब्दाचा वापर केला आहे. कार्ड भराभर स्वाईप करून मोठ्या प्रमाणावर खरेदी करणारे कित्येक लोक दिसतील. पण रोखीत मात्र खरेदी करताना हातातून तितकी रक्कम जात असल्यामुळे किती खर्च केला जात आहे हे समजते आणि काही प्रमाणात हात आखडता घेतला जातोच ना? कुठच्या का कारणाने असेना आपला रोख आणि कॅशलेस रक्कम डिल करायचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यातूनच फसले जायची आणि फसविले जायची शक्यता जास्त असे मला वाटते. कारण एक तर सगळे आकडेच. हातातून पैसे जाताना दिसत नाहीत. तसेच सगळेच कॅशलेस झाल्यास काही शे व्यवहारांमधून नक्की कुठे फसवणुक झाली हे तपासून बघता येणेही कठिण. आणि जरी फसवणुक झालेली कळली तरी तितक्या प्रमाणात रक्कम मोठी नसेल तर त्या फसवणुकीची तड लावता येणे शक्य नसेल. जेव्हा कॅशलेसमध्ये फसवणुक होईल ती ऑनलाईनच असेल का? तर तसेही नाही. रिक्षावाल्याचे उदाहरण दिलेच आहे. १२६ ऐवजी १६२ चे कार्ड त्याने स्वाईप केले आणि घाईत आपण पिन दाबून चालू पडलो तर २५-३०% चा खड्डा पडणारच. हे रोख व्यवहारात व्हायची शक्यता त्यामानाने कमी. सुट्ट्या पैशावरून किंवा माझ्या बाबतीत झाले त्याप्रमाणे खराब नोटा देऊन फसवणुक होऊ शकते. पण मुळात १२६ रूपये झाले असतील तर बहुसंख्य वेळा १२५/ १३०/१५० वगैरे रूपये दिले जातात त्यामुळे १६२ रूपये रिक्षावाला घेईल ही शक्यता कमी. परत एकदा मी गुड ओल्ड डेजविषयी गळे काढणारा माणूस नाही. आताच्या काळात अशी ऑनलाईन खरेदी आणि कॅशलेस व्यवहार हे यापुढच्या काळात असणारच आहेत आणि त्याचे प्रमाण वाढत जाणार आहे. पण त्या बरोबरच ही एक नवी डोकेदुखी यायची शक्यता आहे याकडे दुर्लक्ष केले गेले नाही तर चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
द
दीपक११७७ Fri, 10/27/2017 - 11:49 नवीन
१२६ ऐवजी १६२ चे कार्ड त्याने स्वाईप केले आणि घाईत आपण पिन दाबून चालू पडलो तर २५-३०% चा खड्डा पडणारच
घाई घाईत काही पण होउ शकते. समजा मी रीक्शा तुन उतरलो ५०० रु ची नोट दिली गडबडीत त्याने १२६ रु कापुन २७४ हातात दिले मी गडबडीत खिशात टाकेल आणि निघालो मग समजा मी भाजीवाल्या कडे ४-५ वेगवेगळ्या भाज्या घेतल्या त्याने सांगीले ९५ रु झाले मी ते देतो आणि घरी येतो घरी आल्यावर हिशोब केला तर ८५ रु होतात. म्हणजे काय तर गडबड केल्यावर कॅश-कॅशलेस दोन्ही मध्ये गडबड होऊ शकते यात कॅशलेस पध्दतीचा गळा धरणे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
म
मिल्टन Fri, 10/27/2017 - 13:19 नवीन
यात जर १२६ रूपये बिल झाले असेल आणि आपण १५० रूपये दिले तर तितकी सावधगिरी बाळगू असे नाही पण जर ५०० रूपये दिले तर नक्कीच जास्त सावध असू. तेव्हा ५०० रूपये दिले तर नक्की ३७४ रूपये परत यायला हवे हे गणित पटकन जमले नाही तरी ३०० पेक्षा नक्कीच जास्त यायला पाहिजेत हे तरी समजेलच. विशेषतः जेवढे बिल झाले आहे त्यापेक्षा बरीच जास्त रकमेची नोट दिली असेल तर आपसूकच आपण अधिक सावधगिरी बाळगू. अर्थातच अशी फसवणुक होणारच नाही असे नक्कीच नाही पण माझा दावा असा आहे की कार्ड पेमेन्टमध्ये ही शक्यता जास्त असेल. समजा ५० ची नोट दिसल्यावर २६ ही रक्कम ५० पेक्षा कमी आहे पण ६२ ही त्यापेक्षा मोठी आहे हे अधिक सुलभतेने समजेल पण स्क्रिनवरच्या तीन आकडी संख्येत केवळ दशक आणि एकक यांची अदलाबदल केली तर ते समजणे सगळ्यांनाच सोपे जाईल असे नाही कारण ५० रूपयाची नोट एक रेफरन्स देईल तसा कोणताही रेफरन्स अशा कार्डावरील व्यवहारात नसेल. तरी तुम्ही म्हणता म्हणून हा मुद्दा मान्य केला तरीही कॅशलेस व्यवहारात फेसलेस अनोळखी व्यक्तीबरोबर व्यवहार असतो त्यामुळे रिलेशन तयार होणे कठिण आहे याविषयी तुमचे काय मत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
ग
गंम्बा Fri, 10/27/2017 - 13:37 नवीन
मिल्टन, तुम्ही "पैसे देणार्‍याचा मूर्खपणा, वेंधळेपणा , चुका " म्हणजे भ्रष्टाचार असे काहीतरी करता आहात. चुका, मुर्खपणा, फसवणुक कॅशलेस मधे पण होणार आणि कॅश मधे पण. फक्त कॅश असताना पण भ्रष्टाचार आत्ता इतकाच होता. कॅशलेस मधे करचुकवेगिरी कमी होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
द
दीपक११७७ Fri, 10/27/2017 - 14:17 नवीन
सहमतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
म
मिल्टन Fri, 10/27/2017 - 14:36 नवीन
मिल्टन, तुम्ही "पैसे देणार्‍याचा मूर्खपणा, वेंधळेपणा , चुका " म्हणजे भ्रष्टाचार असे काहीतरी करता आहात.
नाही. काही महिन्यांपूर्वी (बहुदा एबीपी माझा की झी मराठीवर) एक बातमी बघितली होती. एक मनुष्य फर्स्ट क्लासचा पास काढायला स्टेशनवर गेला होता आणि त्याने क्रेडिट कार्डाने पैसे भरले. नजरचुकीने खिडकीच्या आतल्या माणसाने एक शून्य जास्त दाबले. नक्की रक्कम किती होती हे आता लक्षात नाही पण माझा पास ७९० रूपयांचा आहे तेव्हा ती रक्कम ७९० रूपये होती असे गृहित धरू. म्हणजे पास ७९० रूपयांचा असेल तर त्याने त्याच्या दहापट म्हणजे ७९०० रूपयांचे कार्ड स्वाईप केले होते. हे काही त्या माणसाने फसविण्याच्या उद्देशाने केले नव्हते पण ते नजरचुकीने झाले होते. या प्रकाराची लिंक मला मिळू शकलेली नाही त्यामुळे हा मुद्दा इतका वेळ मी आणला नव्हता. तो माणूस कार्ड कंपनीकडे आणि रेल्वेकडे तक्रार करत होता पण त्याचा ती बातमी आली तोपर्यंत तरी फायदा झाला नव्हता. या बातमीची लिंक नाही म्हणून समजा असे काही झालेच नाही असे जरी मानले तरी एक गोष्ट सांगा-- जेव्हा आपण कार्डाचा पिन भरतो त्यावेळी (बहुतेक वेळा स्क्रिनवर नक्की किती रक्कम आहे यापेक्षा आपले लक्ष की-पॅडकडेच असते) ७९०.०० आणि ७९००.०० या दोन आकड्यांमधील फरक समजणे अधिक सोपे की प्रत्यक्ष रोखीत पैसे देताना ७९० रूपये आणि ७ हजार ९०० रूपयांच्या नोटांमधील फरक समजणे अधिक सोपे? पण समजा समोरच्याने अशा प्रकारे ठरवून आपली फसवणुक केली तर कोणत्या प्रकारच्या व्यवहारात माणूस फसवला जायची शक्यता जास्त? आणि हो. चिगो म्हणत आहेत त्याप्रमाणे भ्रष्टाचार हा केवळ सरकारमध्येच असतो पण इतर ठिकाणी नसतो असा दृष्टीकोन असल्यास मात्र त्यावर काहीही उत्तर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
म
मराठी_माणूस Sat, 10/28/2017 - 08:54 नवीन
खालील प्रसंगात तर ४० रु. ऐवजी ४ लाख स्वाइप करण्यात आले होते. https://timesofindia.indiatimes.com/city/mangaluru/karnataka-doctors-card-swiped-for-rs-4-lakh-instead-of-rs-40-at-toll-booth/articleshow/57622466.cms पिन टाकण्यापुर्वी रक्कम बघणे आवश्यक आहे. त्यातही समस्या अशी की काही मशीन्स वर ती दिसते काही वर दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
म
मिल्टन Sun, 10/29/2017 - 16:30 नवीन
धन्यवाद. ४० ऐवजी ४ लाख स्वाईप होणे हे अगदीच रेअरेस्ट ऑफ द रेअर प्रसंगांमध्ये होईल.तरीही फसवायचे म्हटले तर थोडेसे आकडे इकडचे तिकडे करून १० हजार पटींनी नाही तरी १०-१५% रक्कम जास्त उकळली तरी ते लगेच लक्षात येईलच असे नाही. रोखीतही अशी फसवणुक होऊ शकते पण अन्य एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे रोखीत व्यवहार करताना आपल्याला नोटेवरील किंमतीमुळे व्यवहारासाठी एक अ‍ॅन्करींग पॉईंट मिळतो तसे कॅशलेस व्यवहारांमध्ये होणे कठिण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
श
श्रीगुरुजी Sun, 10/29/2017 - 18:23 नवीन
बातमी फेक वाटते. कार्ड पेमेंटची मर्यादा जास्तीतजास्त १ लाखापर्यंत असते. तसेच पेमेंट करताना पिन टाकावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Mon, 10/30/2017 - 06:14 नवीन
अजुन काही लिंक्स. गुगल वर अजुनही लिंक्स मिळतील. http://www.deccanchronicle.com/nation/in-other-news/140317/karnataka-toll-employee-swipes-rs-40-lakh-instead-of-rs-40-from-doctors-card.html https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/karnataka-doctors-card-swiped-for-rs-4-lakh-instead-of-rs-40-at-toll-booth/articleshow/57626141.cms फेक असेल तर कारण काय असेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/30/2017 - 09:50 नवीन
प्रत्येक डेबिट कार्डला पीओएस मध्ये वापरण्यासाठी कमाल रकमेच्या मर्यादा असतात. चार लाख इतकी मोठी मर्यादा असणारे कार्ड कधी ऐकण्यात नाही आले. फक्त ४० रूपयांसाठी कार्ड वापरणे अविश्वसनीय वाटते. कोणत्या बँकेचे आणि कोणते कार्ड होते ते लिहिलेले नाही. इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार approve करण्याआधी bank ग्राहकांना फोन करून खात्री करून घेतात. इथे तसे झालेले दिसत नाही. डॉक्टरांनी उरलेले पैसे (३,९९,९६0) रोख कसे घेतले? लोकांनी डिजिटल पेमेंट वापरू नये हा छुपा संदेश यातून द्यायचा असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
द
दीपक११७७ Tue, 10/31/2017 - 07:19 नवीन
सहमतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Tue, 10/31/2017 - 07:28 नवीन
मलाही जरा आश्चर्य वाटले. कारण मी राजावत ज्वेलर्स कडे जाऊन मुलींसाठी ७५००० रुपयाचा सोन्याचा दागिना घेतला आणि एच दि एफ सी बँकेचे कार्ड स्वाईप केले तर तो व्यवहार पूर्ण व्हायच्या आत म्हणजे पुढच्या अर्ध्या मिनिटात मला एच डी एफ सी बँकेतून फोन आला आणि त्यांनी हा व्यवहार तुम्हीच करत आहात याची खात्री केली. राजावतचा माणूस पण व्यवहार होईस्तोवर थंड होता( त्याला बहुतेक याची सवय असावी). त्यामुळेच ४० रुप्याच्या व्यवहाराऐवजी ४ लाख रुपये खात्यातून वळते होतात कसे आणि ते झाले तरी त्याबद्दल त्यांना बँकेतून फोन येत नाही हे पचायला जडच जाते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 10/31/2017 - 09:42 नवीन
मी २ वर्षांपूर्वी पुण्यात कल्याण ज्वेलर्सकडून दागिने घेताना (रक्कम १ लाखापेक्षा कमी होती) एचडीएफसी बँकेचे डेबिट कार्ड वापरल्यानंतर मला सुद्धा काही सेकंदातच बँकेच्या कॉल सेंटरकडून फोन आला व त्यात अनेक प्रश्न विचारून माझ्या आयडेंटिटीची खात्री करून हा व्यवहार करणारा मीच आहे हे सिद्ध केल्यानंतर त्यांनी ती रक्कम मंजूर केली. हे डॉक्टर उडूपीहून मुंबई इतक्या लांबच्या प्रवासावर निघाले होते. त्यांच्याकडे ४० रूपये रोख नसावेत यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. त्यांच्या खात्यात इतकी प्रचंड शिल्लक असेल तर ते आपले कार्ड व कार्डचा गुप्त पिन चालकाला सांगून फक्त ४० रूपयांचा व्यवहार करतील यावर सुद्धा विश्वास ठेवणे अवघड आहे. कार्डवर ४ लाख रूपयांचा व्यवहार होणे हे सुद्धा अविश्वसनीय वाटते कारण माझ्या माहितीप्रमाणे एटीएममधून पैसे काढणे किंवा कार्डने पेमेंट करणे किंवा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे यावर एका विशिष्ट रकमेची मर्यादा आहे व ही मर्यादा बहुतेकांसाठी १ लाखापर्यंतच असते (एटीएमसाठी एका दिवसात जास्तीत जास्त ३०-४० हजार व ऑनलाईन ट्रान्सफरसाठी २४ तासात जास्तीत जास्त ५० हजार व दुकानात पेमेंटसाठी जास्तीतजास्त १ लाख रूपये अशी मर्यादा आहे). अजून एक संशयास्पद मुद्दा म्हणजे नाक्यावरील माणूस ४० रूपयांऐवजी चुकून एखादे शून्य जास्त टाकून ४०० रूपये घेऊ शकेल. परंतु ४० रूपयांवर अजून ५ जास्तीची शून्ये केवळ अनावधनाने टाकणे संभवत नाही. सगळ्यात कहर म्हणजे शेवटी नाक्यावरील माणसाने यांना जास्तीचे ३,९९,९६० रुपये रोख परत केले. इतके पैसे रोख परत करणे व तेसुद्धा पोलिसादेखत, यावर सुद्धा विश्वास ठेवणे कठीण आहे. त्याऐवजी ट्रांझॅक्शन रिव्हर्स करणे हे जास्त सोपे होते. एकंदरीत ही बातमी फेक वाटते. वर लिहिल्याप्रमाणे नोटाबंदीविरूद्ध माध्यमांनी जी आघाडी उघडली होती त्याचाच एक भाग म्हणून अशा खोट्या नकारात्मक बातम्या प्रसिद्ध करून जनतेला ऑनलाईन पेमेंटपासून परावृत करावे हा यामागे उद्देश असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
महेश हतोळकर गुरुवार, 10/26/2017 - 11:38 नवीन
रोखीच्या व्यवहारात जास्त सावधानता बाळगली जाते याबद्दल सहमत. पण हे व्यक्तीगत पातळीवर झाले. सामुहीक / सार्वजनीक पातळीवर बराच फरक पडेल असं वाटतं. ंमुळात बहुतांश समाज गुन्हे टाळतो तो शिक्षेच्या भितीने (पोलीस पहात नाही ना? मग तोड सिग्नल), नियमांची क्लिष्टता आणि नियम मोडल्याने होणारी सुविधा (तिकीटाची रांग वि. ब्लॅक). सुरुवातीच्या गफलती नेहमीच होतात. आजूनही ऑनलाईन खरेदीमध्ये मोबाईलच्या खोक्यात दगड भरण्याचे प्रकार चालतातच. पण समा़ज शिक्षेच्या भितीने गुन्हे टाळतो. ऑनलाईन व्यवहारात माग रहात असल्याने पकडले जाण्याची शक्यता फारच वाढते. त्यामुळे सामन्य माणूस यापासून लांबच राहील. एकाला जरी पकडलं तरी माऊथ पब्लीसिटीमुळे बाकीचे बरेच लांब रहातात. हे झालं सामान्य माणसांचं. उपरोल्लेखित स्मॉल टिकेट घोटाळ्यांबाबतही हेच म्हणता येईल पण वेगळ्या संदर्भात. ऑनलाईन फिडबॅक / रिव्ह्यु बाबत सर्वच कंपन्या खूप जागरूक असतात. त्यामुळे नकारत्मक प्रतीसादाची ते नककीच दखल घेतील असं वाटतं. त्यामुळे घाटाळे / चोर्‍या वाढतील याबद्द्ल असहमत, हां पद्धती मात्र बदलतील. शेवटी हा चोर-पोलीसाचा खेळ निरंतर चालतच रहाणार.
  • Log in or register to post comments
म
मिल्टन गुरुवार, 10/26/2017 - 14:35 नवीन
सर्वांना चर्चेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद. या चर्चेतून काही मुद्दे पुढे आले आहेत. १. समजा नोटा फ्रिजमध्ये ठेवल्या तर त्यात काहीतरी झोल आहे असे वाटून फ्रिजमधल्या नोटा घेतल्या नाहीत. पण नोटा फ्रिजमध्ये न ठेवता समजा फ्रिजच्या बाजूला असतील तर? आपण सहजपणे ऑफिसमधील पेन घेतो पण ऑफिसमधील नोट मात्र कधीच घेणार नाही त्याप्रमाणेच सुशिक्षित लोकांची प्रतिक्रिया असेल असे मला वाटते. अर्थातच कोणीही नोट घेणार नाही असे नक्कीच नाही पण जर कोकच्या बाटल्या १००% लंपास होत असतील तितक्या प्रमाणात तरी रोख रक्कम जाणार नाही असे मला वाटते. यात आणखी एक मुद्दा आहे. कुणाही एका माणसाला एकाच वेळी कोकच्या १० बाटल्या संपविणे/घेऊन जाणे नक्कीच कठिण आहे पण १० नोटा मात्र सहज खिशात टाकता येतील. तेव्हा यातून ठोस निष्कर्ष काढायला बर्‍याच वेगवेगळ्या परिस्थितीत आणि ठिकाणी नोटा ठेऊन काय होते हे बघावे लागेल. मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवर आणि इतर ठिकाणी पाकिटमारीच्या किती घटना होत असतील? असे प्रकार करणार्‍यांपैकी किती लोक असे सुशिक्षित/उच्चपदस्थ (जे पुढे अकाऊंटिंग घोटाळे करायची शक्यता जास्त कारण ती संधी त्यांनाच मिळते) सापडतील? असे करणारे उच्चपदस्थ फार (किंबहुना कोणीच) असेल असे वाटत नाही. हे तथाकथित सुशिक्षित आणि उच्चभ्रू लोक मात्र कोणाचे पाकिट मारताना दिसणार नाहीत पण कित्येक पटींनी मोठे घोटाळे मात्र बेमालूमपणे करतील. प्रत्येक वेळी पकडले जायची भिती त्यांना ते कृत्य करण्यापासून रोखत असेल का? प्रत्येक वेळी तसे असेलच असे वाटत नाही. उदाहरणार्थ रस्त्यावरून जाताना मुलींना/स्त्रियांना धक्के मारून जाणारे सुशिक्षित उच्चपदस्थ लोकही दिसतीलच. त्यावेळी त्यांना पकडले जायची, चार कानफाटात खायची, बदनामी व्हायची भिती नसते का? किंबहुना अनेकदा असे उच्चपदस्थ लोक कामाच्या ठिकाणीही स्त्रियांबरोबर आक्षेपार्ह वर्तन करतानाही आढळतात. अशा काही केसेस झाल्याही आहेत. पण तेच कोणाचे पाकिट मारायला जातील असे वाटत नाही. तेव्हा हा नक्की काय फरक आहे? जी पकडले जायची भिती/ बदनामी व्हायची भिती इतर काही गोष्टी करण्यापासून रोखत नाही पण अशी चोरी करण्यापासून मात्र रोखते हे काय गौडबंगाल आहे? यावरून रोख रक्कम आणि इतर गोष्टी (कॅशलेस) यात कळत-नकळत फरक केला जातो असे मला तरी वाटते. २. सगळ्याच गोष्टी कॅशलेस झाल्या तर मोठे घोटाळे जास्त सहजपणे पकडले जातील म्हणून बंद होतील पण छोटे घोटाळे (कमी रकमेचे पण खूप मोठ्या लोकसंख्येवर परिणाम करणारे) वाढतील का? तसे होईल अशी मला भिती वाटत आहे तर इतर अनेकांना तसे होणार नाही असे वाटत आहे. याबाबतीत अजून तरी आपल्याकडे कुठलीही आकडेवारी नाही. त्यामुळे कोणतीही एक बाजू आता या क्षणी सिध्द करता येणार नाही. स्वीडनसारख्या जवळपास संपूर्ण कॅशलेस देशातही असा विदा असेल असे वाटत नाही कारण तो देश गेल्या पाचेक वर्षातच कॅशलेस झाला आहे. आणि त्यानंतर लहान प्रमाणातले भ्रष्टाचार/ घोटाळे/ फसवाफसवी/चोरी वाढलेत का हे सांगता येणे तसे कठिणच आहे. कारण स्मॉल टिकेट घोटाळे झाले तर ते उघडकीस यायची शक्यता कमीच असते. उदाहरणार्थ आपल्याला एक हजार रूपयांचा फटका बसला तर आपण तितक्या प्रमाणात त्याची तड लावायला जाऊ असे नाही. पण जर लाख रूपयाचा फटका बसला तर अगदी जीवाचे रान करू. तेव्हा हे सगळे शक्यतांचे खेळ आहेत. तरीही असे घोटाळे होणारच नाहीत असे वाटण्यात आणखी एक दुसरा घटक असू शकेल का? म्हणजे सुरवातीपासूनच आणि विशेषतः मागच्या वर्षीच्या नोटबंदीनंतर कॅशलेस म्हणजे कमी भ्रष्टाचार हेच सतत म्हटले जात आहे त्या वातावरणाचा प्रभाव असू शकेल का? असो. या निमित्ताने वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायला मिळाली हे पण काही कमी नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/26/2017 - 17:18 नवीन
उदाहरणार्थ आपल्याला एक हजार रूपयांचा फटका बसला तर आपण तितक्या प्रमाणात त्याची तड लावायला जाऊ असे नाही. पण जर लाख रूपयाचा फटका बसला तर अगदी जीवाचे रान करू. याचा कॅशलेसशी काय संबंध आहे? तुमचे पाकीट मारले आणि त्यात १००० रुपये आले तर तुम्ही पोलिसात तक्रार करायला जात नाही कारण ते मुलण्याची शक्यता कमी असते हेच एखाद्याचा घरात चोरी झाली आणि १ लाख रुपये रोख चोरीला गेले तर तो नक्कीच पोलीस स्टेशन मध्ये खेटे घालेल माहीतीतील नगरसेवक/ आमदाराकरवी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल. मूळ विचार रक्कम किती आहे आणि आणि ती आपल्याला परत मिळण्याची शक्यता किती आहे यावर अवलंबून आहे रोकड आहे कि कॅशलेस आहे याचा संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
म
मिल्टन गुरुवार, 10/26/2017 - 17:52 नवीन
याचा कॅशलेसशी काय संबंध आहे?
कॅशलेसशी संबंध हा की कॅशलेस व्यवहारांमुळे 'पोहोच' वाढली आहे. वर म्हटल्याप्रमाणे अ‍ॅप वगैरे गोष्टींमुळे ज्यांच्याशी अन्यथा कधीही गाठभेट झाली नसती त्या लोकांबरोबर व्यवहार व्हायला लागले आहेत. आणि कॅशलेसमुळे मोठे (हजारो कोटींचे गैरव्यवहार) पकडले जातील हे नक्कीच. मुद्दा हा की अशा अनोळखी लोकांबरोबर कॅशलेस (ज्यात रोख व्यवहारापेक्षा विवेकाचे नियंत्रण कमी प्रमाणावर असते आणि दुसर्‍या माणसाचेही लक्ष कमी असते--- चिगोंनी याचे उदाहरण दिलेच आहे) व्यवहारांमुळे हजार कोटींच्या एका घोटाळ्याऐवजी हजार रूपयांचे कोटी घोटाळे होतील ही आणि समाजाचे एकूण होणारे नुकसान कदाचित तेवढेच किंवा जास्तही असेल ही भिती आहे. आणि हजार रूपये गेले तर कोणी त्याची तड लावायला जाणार नाही हे लिहिण्याचा उद्देश हा की ऑनलाईन व्यवहार बहुतांश स्मॉल टिकेटच असतील.ऑनलाईन घरे, गाड्या घ्यायचे प्रकारही होतात पण एकूण ऑनलाईन व्यवहाराच्या ते फारच नगण्य आहेत. त्यामुळे अशा स्मॉल टिकेट व्यवहारांमध्ये अशी फसवणुक झाली तर ते बातम्यांमध्ये येईलच असे नाही. म्हणजेच काय कॅशलेस म्हणजे भ्रष्टाचारावर (फसवणुक/चोरी/घोटाळा काहीही म्हणा) रामबाण उपाय असेल असे चित्र गेल्या वर्षभरापासून उभे केले गेले आहे तसे होईलच असे नाही. कॅशलेसमुळे करचुकवेगिरी कमी होईल हे मान्य पण त्याबरोबर दुसर्‍या मार्गाने समाजाचे नुकसान वाढेल ही भिती मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 10/26/2017 - 17:22 नवीन
हे तथाकथित सुशिक्षित आणि उच्चभ्रू लोक मात्र कोणाचे पाकिट मारताना दिसणार नाहीत पण कित्येक पटींनी मोठे घोटाळे मात्र बेमालूमपणे करतील.पाकीट मारण्यासाठी लागणारे हस्त कौशल्य त्यांच्या कडे कुठून येईल? प्रत्येक जण आपल्याला असलेल्या कौशल्याचा वापर करूनच दुसऱ्याला थुका लावत असतो. एखादा सर्जन तुम्हाला गंभीर आजार आहे असे सांगूनच अनावश्यक शल्यक्रिया करेल. किंवा एखादा वकील प्रतिपक्षाच्या वकील बरोबर साटेलोटे करून केस लांबवत नेईल आणि आपला मीटर चालू ठेवेल. तो सायबर फ्रॉड करायला जाणार नाही कारण त्यासाठी लागलेले कौशल्य त्याच्या जवळ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
स
सुबोध खरे गुरुवार, 10/26/2017 - 17:27 नवीन
नोटा फ्रिजमध्ये ठेवल्या तर त्यात काहीतरी झोल आहे असे वाटून फ्रिजमधल्या नोटा घेतल्या नाहीत. नोटा रस्त्यावर ठेवून पहा. दोन मिनिटात लंपास होतील. तोच कोकचा कॅन ठेवून पहा साधारण कोणी त्याला हात लावणार नाही. हो, कारण असा रस्त्यावर असलेला कॅन पिऊन उगाच काही झाले तर काय हि भीती असेल पण हेच मॉल मधल्या फ्रिज मध्ये असेल तर कोणी पाहत नाही हे पाहून लंपास नक्की होईल. कोणताही आर्थिक गुन्हा आपण पकडले जाण्याची शक्यता किती आणि त्यातून होणार त्रास किती यावर अवलंबून असतो ( वैमनस्यातून केलेला खून किंवा बलात्कार असे भावनेच्या भरात केलेले गुन्हे यात धरू नका).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मिल्टन गुरुवार, 10/26/2017 - 17:58 नवीन
पाकीट मारण्यासाठी लागणारे हस्त कौशल्य त्यांच्या कडे कुठून येईल?
आणि समोरच्याचे पाकिट पॅन्टच्या खिशातून अगदी डोकावत जरी असले, पडत असले तरी उच्चपदस्थ लोक (जे कदाचित अकाऊंटींगमध्ये फ्रॉड करतील) ते मारायला जाणार नाहीत.
किंवा एखादा वकील प्रतिपक्षाच्या वकील बरोबर साटेलोटे करून केस लांबवत नेईल आणि आपला मीटर चालू ठेवेल. तो सायबर फ्रॉड करायला जाणार नाही कारण त्यासाठी लागलेले कौशल्य त्याच्या जवळ नाही.
वकिल नाहीच जाणार हो. पण आता कित्येक लोक आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी थाटून, त्याचे अ‍ॅप/वेबसाईट बनवून स्वतःचे बिझनेस काढत आहेत. अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्याबरोबरच अनोळखी, ज्यांचे अन्यथा कधीही तोंडही बघणार नाही अशा लोकांना स्मॉल टिकेट कॅशलेस फसवायची संधी त्यातून उपलब्ध होत आहे हाच मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 10/26/2017 - 17:38 नवीन
ऑफिसमधील नोट मात्र कधीच घेणार नाही याचे मुख्य कारण म्हणजे ऑफिस मधील प्रत्येक पैशाचा हिशेब असतो आणि तो हिशेब लागला नाही तर त्याची शहानिशा होण्याची शक्यता असते. पेन किंवा पेन्सिल या व्यय होणाऱ्या ( expendable) गोष्टी आहेत आणि एकदा त्या एखाद्याला इशू झाल्या कि त्याचा हिशेब(audit) संपतो. त्यामुळे त्या गोष्टी खिशात टाकल्या तर त्याचा गहजब होण्याची शक्यता नसते. ज्याचे पेन किंवा पेन्सिल आहज्या, ती गहाळ झाली म्हणून सोडून देण्याची शक्यता जास्त आहे. हेच ५०० ची नोट सोडून देण्याची शक्यता कमी आहे आणि २ हजाराची तर नाहीच नाही. शेवटी वस्तूची किंमत आणि त्याची जबाबदेही(अकाऊंटॅबिलिटी) हि फार महत्त्वाची आहे. पोलिसात किंवा लष्करात ५०० ची नोट हरवली तर चालते पण एक बंदुकीची गोळी हरवली तर गहजब होतो. एक ७.६२ सेल्फ लोडींग रायफल हरवली तर सैनिकाचे कोर्ट मार्शल होते आणि त्याला शिक्षा होते पण बंदुकीची किंमत म्हणून ११०० रुपये फक्त त्याच्या पगारातून वसूल होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
र
रंगीला रतन गुरुवार, 10/26/2017 - 19:40 नवीन
तुम्ही नक्की समस्या काय आहे ते एकदा पक्कं ठरवा हो... कारण तुमच्या प्रतिसादात पण नक्की तुम्ही कुठली बाजू घेताय हे ठरवणे कठीण जातंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
व
विशुमित गुरुवार, 10/26/2017 - 14:38 नवीन
मुद्दा क्रमांक २ शी सहमत.
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 10/26/2017 - 14:56 नवीन
नोटा आणि कॅशलेस ह्या दृश्य-अदृश्यतेचा फरक आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय तो प्रकार होणारच. नुसती चोरीच असं नाही पण कॅशलेस व्यवहारात आपण आपसुकच थोडे सहज (किंवा निष्काळजीपण) होतो, आणि त्यात फसवणुकीचा चान्सदेखील असतो.. मी फेसबुकच्या अ‍ॅड्समध्ये आलेल्या एका ऑफरनुसार एक पॉवरबॅन्क, जी कि फारच आकर्षक किंमतीत होती, खरेदी केली. त्यासाठी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले. ती पॉवरबॅन्क मला कधीच आली नाही. हा कॅशलेस फसवणुकीचा नमुना. दुसरं उदाहरण म्हणजे एक मिपाकर पुर्वी पुस्तकांचा व्यवसाय करायचे. त्यांनी मी ऑनलाईन विकत घेतलेली पुस्तके मला काही पाठवली नाहीत. मी 'पैसे परत करा किंवा पुस्तके परत करा' म्हटल्यावरही 'करतो, करतो..', पण अद्याप काही झालेले नाही. आता ह्यातदेखील रक्कम फारशी नाहीये, पण प्रत्यक्ष रोखीतल्या व्यवहारात हेच झालं असतं, तर जास्त झोंबलं असतं हे नुकसान.. त्यामुळे 'जोर का झटका धीरे से लगे' हे कॅशलेस व्यवहारात होण्याचे चान्सेस जास्त.. ह्यातीलच एक उदाहरण आणखी.. (हे फसवणुकीबद्दल नाही, तर 'कॅशलेसच्या अदृश्यतेमुळे सौम्य होणार्‍या' खर्चाचे आहे.) आयफेल टॉवरची टुर मी ऑनलाईन बुक केली, ८३ युरोमध्ये. आता ह्यालाच मी रोखीत दिले असते, त्यातल्या त्यात भारतीय रकमेत, तर ८३*७६ = ६,३०८ रुपये रोख मी नक्कीच मोजले नसते, आणि त्याऐवजी कमी दराचं टिकीट काढून पायर्‍या चढून वर गेलो असतो... ;-) ह्या वृत्तीचा फायदा घेऊन कॅशलेस फसवणुक किंवा चोर्‍या वाढण्याचे चान्सेस आहेत. मात्र त्याने भ्रष्टाचार वाढेल, असं वाटत नाही..
  • Log in or register to post comments
म
मिल्टन गुरुवार, 10/26/2017 - 15:23 नवीन
आपण भ्रष्टाचार नक्की कशाला म्हणतो यावर बरेच काही अवलंबून असेल. अशी फसवाफसवी किंवा चोरी हा पण एका प्रकारे भ्रष्ट असा आचारच आहे की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
स
सुबोध खरे गुरुवार, 10/26/2017 - 17:30 नवीन
हा कॅशलेस फसवणुकीचा नमुना. आता केवळ तंत्रज्ञान सुधारले आहे म्हणून असे होते. पूर्वी VPP ने वस्तू मागवल्या आणि आलाय नाही असे सर्रास होत असे. याच मिपाकरानी आपल्याकडून रोख पैसे घेऊन पुस्तके पाठवतो म्हणून पाठवली नाही तर तो रोखीतील घोटाळा म्हणून गणला जाईल. हा मूळ विश्वासाचा (किंवा विश्वासघाताचा) प्रकार आहे. तेंव्हा याचा आणि कॅशलेसचा संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
च
चिगो Fri, 10/27/2017 - 13:44 नवीन
एक भला मोठा प्रतिसाद टाईपला होता, पण तो गंडला मिपावर. आता संक्षेपात सांगतो. कॅशलेस = अदृश्यता / तुलनात्मक बेफिकीरी as compared to cash transaction. दृष्टीआड सृष्टी attitude. कॅशलेस > COD (COD is costlier than cashless in most of the cases) ऑनलाईन = जास्त पोहच / स्केल + अनामिकता/ अदृष्यता / Out of direct physical reach ----> Easier to cheat Hence, Cashless plus online transactions give an easier opportunity with better chances of escaping culpability. This may encourage the fraudsters more. Cashless + Online transactions also provide opportunities for 'Small ticket but more voluminous' cheating. I think that is what the author wanted to say.. लेखक महोदय, तुम्हारा भी चुक्याच.. कसं आहे, 'भ्रष्टाचार' ह्या संज्ञेला लोक सरकार किंवा सरकारी लोकांशीच जोडतात.. प्रायव्हेट कंपन्या किंवा सामान्य जनतेचा तो प्रांतच नव्हे जणू.. म्हणूनच तुमच्या 'कॅशलेस'ला चोरी/घोटाळ्याशी जोडल्या जाण्याच्या संभावनेला लोकांचा कडाडून विरोध आहे. कारण की कॅशलेस तर ८ नोव्हेंबर २०१६ नंतरच आलंय, आणि सद्य सरकार तर प्रचंड भ्रष्टाचारविरोधी आहे.. तर अशी गफलत पुन्हा करु नका. (ता.क.) मी दिलेली दोन्ही उदाहरणे ८/११/२०१६ पुर्वीच घडलेली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
असंका Fri, 10/27/2017 - 14:15 नवीन
आईशप्पथ!!!! अनेक वेळा हे लिहायला घेतलं... पण इतके नेमके शब्द न सुचल्याने पोस्ट कलं नाही!!! अगदी परफेक्ट! धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
S
sagarpdy Fri, 10/27/2017 - 14:39 नवीन
खरं आहे. गमतीची गोष्ट अशी कि पैसा हा प्रकारचं अस्तित्वात नसता तर ? म्हणजे आज बार्टर सिस्टीम मध्ये समाज असता तरी घोटाळे कमीच झाले असते नाही का ? १०० रुपये असणारं खिशातलं पाकीट चोरुन नेणं १-२ किलो तांदूळ चोरण्यापेक्षा सोपेच आहे. चेक सिस्टीम आली म्हणून त्या फ्रॅंक अबिग्नाली ने घोटाळा केला ना ? सगळं कॅश मध्ये असत तर चेक फ्रॉड करतांच आले नसते. एकदम सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
द
दशानन Sat, 10/28/2017 - 18:51 नवीन
म्हणजे आज बार्टर सिस्टीम मध्ये समाज असता तरी घोटाळे कमीच झाले असते नाही का ?/code> असाच काहीसा व्यवहार मी करायला गेलो होतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
स
सुबोध खरे Fri, 10/27/2017 - 14:54 नवीन
यात पण एक फरक आहे. आपण फ्लिपकार्ट वरून काही गोष्टी मागवल्या तर तो ऑनलाईन व्यवहार होतो पण कॅश ऑन डिलिव्हरी केल्यास तो कॅशलेस होत नाही. मग आपण मोबाईल फोन मागवला आणि पाठवणाऱ्याने साबणाची वडी पाठवली( अशा केसेस झाल्या आहेत) तर हा रोखीचा व्यवहार( कॅशलेस नसताना) असून भ्र्रष्टाचाराचाच होतो. अशा बऱ्याच केसेस मध्ये अमेझॉन किंवा फ्लिपकार्टने पैसे हि परत केले आहेत. यातही एका डांबरट बाईंनी या २४ तासात वस्तू परत करण्याच्या नावावर अमेझॉनच्या ७० लाख रुपयाचा गंडा घातला (आता ती पकडली गेली हा भाग वेगळा) थोडक्यात काय भ्रष्टाचार आणि कॅशलेस याचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
र
रंगीला रतन गुरुवार, 10/26/2017 - 19:29 नवीन
एक मिपाकर पुर्वी पुस्तकांचा व्यवसाय करायचे. त्यांनी मी ऑनलाईन विकत घेतलेली पुस्तके मला काही पाठवली नाहीत. मी 'पैसे परत करा किंवा पुस्तके परत करा' म्हटल्यावरही 'करतो, करतो..', त्यांचं नाव किंवा आयडी कळेल का? म्हणजे पुढे सावधानगिरी बाळगता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
द
दशानन Sat, 10/28/2017 - 18:41 नवीन
ते माझ्याबद्दल बोलत आहेत. काही हरकत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन
द
दशानन Sat, 10/28/2017 - 18:49 नवीन
जे मी केले त्याला फसवणूक याच गणले गेले पाहिजे व ते मी मान्य करतो कारण ती रक्कम भले एक रुपये असो की 300 किंवा 3 लाख, अथवा तीन करोड! चोरी ही चोरीच असते व ती माझ्याकडून झाली आहे, फक्त त्यात तुम्ही एकटे नाही आहात, त्यात दुर्दैवाने अनेक ओळखीचे लोक देखील आहेत, का, कसे इत्यादी कारण देत नाही ना देण्याची इच्छा आहे, पण सगळेच चोर असतात अशी तुमच्यासारख्या सहदय व्यक्तीची, समाजाची गैरसमजुत होऊ नये एवढीच इच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
च
चिगो Tue, 11/07/2017 - 12:11 नवीन
दशानन, मी पुस्तकांबद्दल जे उदाहरण दिले, ते 'फसवणुक' म्हणून दिलेले नाही. पॉवरबॅन्कच्या उदाहरणासोबतच ते देत असल्याने ती समजुतीची गफलत झाली असावी. मला त्या उदाहरणाद्वारे फक्त हेच म्हणायचे होते कि रोखीचा व्यवहार थेट असतो, 'इस हाथ ले, उस हाथ दे'.. ह्याउलट ऑनलाईन केलेला कुठलाही व्यवहार हा 'इनडायरेक्ट' असतो. तुम्ही पुस्तकांचा व्यवसाय का सोडलात, ह्याची पुर्णतः नसली तरी अंधुकशी कल्पना आहे. मी दिलेल्या उदाहरणामुळे आपणास त्रास झाला त्याबद्दल क्षमस्व..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दीपक११७७ Fri, 10/27/2017 - 09:39 नवीन
@ मिल्टन
सर्वांना धन्यवाद........................................
मुद्दा क्र १. -- नोटा कुठे ही ठेवा त्याची चोरी शक्य आहे. जेंव्हा पासुन बँक .. एटिएम.. सुरु झाले तेंव्हा पासुन पाकीटमारी हा व्यवसाय जवळ जवळ बंद पडायला आला आहे. याअर्थी एटिएम मुळे फायदा झाला आहे. पुढे कॅशलेस ने सुध्दा होईल. एटिएम मधुन पण चोरी होते पण प्रमाण खुपच अल्प आहे मुद्दा क्र २ ह्यत जी फसवा फसवी होते ती ब-याचदा फ्री अ‍ॅफर च्या मागे गेल्यामुळे, सरळ सरळ मार्गाने गेलेतर फसवणुक होत नाही. एसबीआय किंवा भिम अ‍ॅप वापरावी. कॅशलेस मध्ये फसवणुक झाली तर ट्रेस करता येते आणि मुळा पर्यंत जाता येते ता. क. :- येथुन पुढे रुपया सहज येईल पण आणि तसाच सहज जाईल पण, पुर्वी सारखं २-५ रु. साठी जीवाला खात बसायची गरज नाही. आज समजा १० रु ची नोट रेल्वेतुन जतांना खाली पडली तर कीती जणं विनाकारण १० रूपयाचा खड्डा पडला म्हणुन जीवाला खात बसतील.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 10/27/2017 - 15:11 नवीन
मिल्टन, तुम्हाला माहितीये की आपण व्यवहारात वापरतो तो पैसा एम-४ प्रकारचा असतो. याला रोखीचा पैसा म्हणतात. जरी प्रत्यक्षात कार्ड वापरलं तरी तो पैसा एम-४ च असतो. आस्थापनीय स्तरावरचे मोठमोठे घोटाळे होतात ते एम-३ वा एम-२ मधले असतात. त्यांचा प्रत्यक्ष रोख रकमेशी थेट संबंध फारसा येत नाही. सांगायचा मुद्दा काये की क्याशलेस पद्धतीमध्येच घोटाळ्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे रोखीचे व्यवहार निरोख झाले तरी घोटाळ्याची शक्यता राहतेच. किंबहुना घोटाळ्यांचे नवेनवे मार्ग शोधले जातील. माझ्या अंदाजाप्रमाणे निरोख पैसा हा एखाद्या अडथळ्यासारखा प्रस्तुत करून त्यात पैसे मारले जाण्याचं प्रमाण वाढेल. एक उदाहरण देतो. आंतरजालावर उत्तानचित्रादि करमणुकीची असंख्य स्थळं आहेत. त्यांतल्या काही स्थळांवर एक ढाचा दिसून येतो. त्यांत सुरुवातीला काही चित्रं फुकट दाखवून मनोरंजन केलं जातं. नंतर तो साठा संपला की सदस्यत्व घ्यायला लावतात. ते तसं सरळपणे न लिहिता अधिक मनोरंजनाची लालूच दाखवली जाते. नवीन मनोरंजन सुरू होणार म्हणून ग्राहक भलताच खुशीत आलेला असतो. अशा वेळेस नेमका केएलपीडी करून त्याला क्रेडिट कार्डची माहिती भरायला लावतात. सबब अशी की ग्राहक १८ वर्षांपेक्षा मोठा आहे हे पडताळून पहायचंय. ग्राहकाच्या मनात अशा वेळेस निरोख पैसा हा एक अडथळा आहे अशी भावना रुजते. इतर व्यवहारांतही अशीच भावना रुजवण्याचं धोरण अंगिकारला जाईलसं वाटतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Sat, 10/28/2017 - 06:14 नवीन
मिल्टन साहेब, तुमचा लेख आणि वरील सर्व प्रतिसाद वाचले. मी तुमच्या निरीक्षणाशी बऱ्यापैकी सहमत आहे. मला आकलन झालेले तुमचे दोन प्रमुख मुद्दे हे आहेत असं मला वाटतं. १) रोखीच्या व्यवहारात आपली सदसदविवेकबुद्धी जास्त जागरूक असते, त्यामुळे साधारण मनुष्यप्राणी कोणाला फसवायला धजत नाही तसेच स्व:ता फसलो तर ते दु:ख जास्त टोचते. २) कॅशलेस व्यवहारात प्रत्यक्ष कॅश हाताळावी न लागल्यामुळे अशा सदसदविवेकबुद्धीची टोचणी कमी होते व त्यामुळे अशा व्यवहारात फसवणुकीचे प्रसंग जास्त होऊ शकतात. तुमचे दोन्ही मुद्दे पटण्यासारखे आहेत, फक्त तुमच्या शीर्षकातील 'भ्रष्टाचार' ह्या शब्दामुळे संभाषणाची गाडी थोडीशी मूळ मुद्द्यापासून दूर गेली. साधारणत: 'भ्रष्टाचार' हा शब्द सरकारशी जोडला गेला आहे. त्यात मोदी सरकारने कॅशलेस व्यवहाराची पुष्टी केली आहे त्यामुळे त्याविरुद्ध कोणी बोलल्यास ते मोदींच्या धोरणां विरोधात बोलल्याचा संशय येतो व संभाषणाची गाडी भरकटते. शीर्षकात 'भ्रष्टाचार' च्या ऐवजी 'लबाडी' किंवा 'फसवणूक' हे शब्द असते तर चर्चा अपेक्षित मुद्द्यांवर झाली असती असं वाटतं. वरील दोन मुद्द्याव्यतिरिक्त, पकडले गेल्यास शिक्षेचे भय, समाजात होणारी नाचक्की आणि त्या अनुषंगाने होणारे सामाजिक दुष्परिणाम ह्या गोष्टी देखील सदसदविवेकबुद्धीवर परिणाम करतात. रोखीच्या व्यवहारात देणाऱ्या-घेणाऱ्याची चूक जरी झाली तरी ती सिध्द करणे कठीणच जाते. १) एकदा मी माझ्या बारा वर्षाच्या मुलाला शंभर रुपयाची नोट देऊन एक लिटर दुध आणायला पाठवले. दुधाची किंमत त्यावेळी २५ रुपये लिटर होती. तो दुधवाला ओळखीचा होता. त्याने मुलाला एक लिटर दुध दिले व पंचवीस रुपये परत दिले, मुलाने ७५ रुपये परत मागितले असता, "तुमने तो सिर्फ पचास रुपये दिये" असं सांगून हुज्जत घालू लागला. मुलगा रडवेला होऊन परत आला, त्याला घेऊन मी परत त्या दुधवाल्याकडे गेलो असता त्याने तेच सांगायला सुरवात केली. शेवटी कटकट नको म्हणून उरलेल्या ५० रुपयांवर पाणी सोडून परत घरी आलो. आता ह्या व्यवहारात त्या दुधवाल्याची खरोखरीच समजण्यात चूक झाली होती की त्यानी लहान मुलगा बघून फसवणूक करायचे ठरवले हे सिद्ध करणे कठीण आहे. त्या दिवसापासून कधीही कोणालाही रोखीने पैसे दिले असता ती रक्कम तोंडी सांगायला कधीच विसरलो नाही. उदा.: "भैया, ये लो सौ रुपये" कधी कधी बँकेतून पैसे घेऊन आपण बाहेर पडलो आणि लगेच लक्षात आले की आपल्याला पैसे कमी आले आहेत व आपण परत जाऊन सांगितले तरी त्या दिवसाची कॅश टॅली झाल्या शिवाय बँकही आपल्याला पैसे देत नाही. कॅशलेस व्यवहाराचे मला आलेले दोन अनुभव इथे शेअर करू इच्छितो. १) माझ्या माहितीतील एका गृहस्थाने इथे अमेरिकेत एक ग्रोसरी स्टोर विकत घेतले. दुकानात येणारे कस्टमर त्यांना हव्या त्या वस्तू घेऊन रजिस्टरवर आले की हे गृहस्थ समोर असलेल्या कस्टमरच्या एकूण रंगरूपाकडे बघून एखादा ग्रोसरीचा आयटम दोनदा मारत असे. उदा.: एकच ब्रेड घेतला असेल तरी तो जिन्नस दोनदा दाखवायचा. बहुतेक सर्व कस्टमर सामान आणि रिसीट घेऊन निघून जात, जर एखाद्या कस्टमरने रिसीट नीट पाहिली व दुकानातून बाहेर पडायच्या आधी चूक निदर्शनास आणली तर साळसूदपणे, "I am sorry" म्हणून ते दोनदा चार्ज केलेले पैसे परत करायचे. दिवसाच्या शेवटी असे लबाडीने कमावलेले २०-२५ डॉलर्स तो सहज घेऊन जायचा. आणि हे सर्व त्या गृहस्थानेच मला सांगितले. २) एकदा माझ्या क्रेडीट कार्डावर ३५० डॉलर्सचा फ्रॉड झाला, क्रेडीट कार्ड कंपनीने लगेच माझे जुने कार्ड बंद केले व मला नवीन कार्ड पाठवून दिले. पण असे करताना त्यांनी फ्रॉड झालेली रक्कम माझ्या स्टेटमेंटमधून बाद केली नाही. नेहेमीप्रमाणे पुढच्या महिन्यात मी पूर्ण पैसे भरले व ही गोष्ट विसरून गेलो. ही माझी चूक होती, हलगर्जीपणा होता हे मला मान्य आहे, पण ते घडण्यामागे तो 'कॅशलेस व्यवहार' होता हे ही एक कारण असावे. जवळजवळ सहा महिन्यांनी एकदा स्टेटमेंटस फाईल करत असता ही गोष्ट माझ्या ध्यानात आली, सहा महिन्यांनी क्रेडीट कार्ड कंपनीकडे ते पैसे परत मागणे मला प्रशस्त वाटेना त्यात ते मिळतील ह्याची खात्री देखील नव्हती. तरी प्रयत्न करायला काय जातं असं म्हणून फोनवर बोलणी केली. आणि आश्चर्य म्हणजे माझे पूर्ण ३५० डॉलर्स मला परत मिळाले. ह्यात क्रेडीट कार्ड कंपनीची चूक झाली होती, त्यांचा फसविण्याचा उद्देश नव्हता त्यामुळे 'कॅशलेस व्यवहार' होता म्हणूनच सहा महिन्यांनी का होईना तो सिद्ध करता आला. माझ्या स्व:ताच्या ह्या अनुभवांवरून मी तुमच्या निरीक्षणाशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
म
मिल्टन Sat, 10/28/2017 - 07:48 नवीन
तुमच्या शीर्षकातील 'भ्रष्टाचार' ह्या शब्दामुळे संभाषणाची गाडी थोडीशी मूळ मुद्द्यापासून दूर गेली. साधारणत: 'भ्रष्टाचार' हा शब्द सरकारशी जोडला गेला आहे. त्यात मोदी सरकारने कॅशलेस व्यवहाराची पुष्टी केली आहे त्यामुळे त्याविरुद्ध कोणी बोलल्यास ते मोदींच्या धोरणां विरोधात बोलल्याचा संशय येतो व संभाषणाची गाडी भरकटते.
सहमत आहे. भ्रष्टाचार हा केवळ सरकारमध्येच होतो आणि इतर ठिकाणी जी काही होते ती फसवणुक असे अनेकांना वाटत असते. खरं तर भ्रष्टाचार ही पण एक फसवणुकच असते आणि फसवणुक/चोरी हा पण एक प्रकारचा भ्रष्टाचार असतो आणि दोन्हींचा परिणाम सारखाच असतो. दुसरे म्हणजे कोणत्याही मुद्दाला लगेच मोदी समर्थन आणि विरोध अशाप्रकारे स्वरूप प्राप्त होते हे तुमचे म्हणणे पूर्ण मान्य. त्यातून नोटबंदीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर सोशल मिडिया आणि इतर ठिकाणी (मिपावर सुध्दा) घमासान चालू होते त्यातून कॅशलेस म्हणजे भ्रष्टाचारावर रामबाण उपाय असेच काहीसे वातावरण निर्माण झाले होते की निर्माण केले गेले होते. समजा भ्रष्टाचार आणि फसवणुक यांच्यात फरक करायचाच असेल तर समजा कॅशलेसमुळे भ्रष्टाचार कमी झाला तरी फसवणुकीचे मार्ग आणि शक्यता अजून वाढू शकतील याविषयी काय? असो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/28/2017 - 09:28 नवीन
कॅशलेसमुळे भ्रष्टाचार कमी झाला तरी फसवणुकीचे मार्ग आणि शक्यता अजून वाढू शकतील याविषयी काय? कॅशलेस मुळे भ्रष्टाचार कमी होईल असे नाही तर भ्रष्ठाचार शोधून काढणे सोपे जाईल. मूळ मानवी स्वर्थी वृत्ती बदलत नाही तेंव्हा जुने मार्ग बंद झाले तरी लोक नवे नवे मार्ग शोधून काढणारच. तेंव्हा भ्रष्टाचाराचे मार्ग वाढणार नाहीत तर फक्त बदलतील. ( जुने बंद होऊन नवे सुरु होतील) त्यामुळे जर भ्रष्टाचाराला शिक्षा तात्काळ झाली तरच भ्रष्ठाचार कमी होईल. यासाठी तपास संस्था पोलीस आणि न्यायसंस्था अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करणारे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
अ
असंका Sun, 10/29/2017 - 07:57 नवीन
कॅशलेस = अदृश्यता / तुलनात्मक बेफिकीरी as compared to cash transaction. दृष्टीआड सृष्टी attitude. कॅशलेस > COD (COD is costlier than cashless in most of the cases) ऑनलाईन = जास्त पोहच / स्केल + अनामिकता/ अदृष्यता / Out of direct physical reach ----> Easier to cheat
मी थोडा विचार करत होतो. की स्वतःच्याच पैशाच्या बाबतीत फक्त डोळ्याला दिसत नाही म्हणून माणूस बेफिकिर होइल का? माझ्या मते अजून एक मुद्दा विचारात घ्यायला हवा- एखाद्या व्यक्तीकडे हातात असलेली रोख रक्कम ही सहसा खात्यातील रकमेपेक्षा कमी असते. ती हातातून गेली की शिल्लक राहिलेली रोख रक्कम कमी होते. म्हणजे समजा, मला शंभर रुपये खर्च करायचे आहेत आणि हातात दोनशे रुपये रोख आणि डेबिट कार्डच्या खात्यात दहा हजार रुपये शिल्लक आहेत. आता जर मला रोखच द्यायची असेल, तर मी दहा वेळा विचार करीन, कारण माझी शिल्लक रोख रक्कम एकदम निम्मी होणार आहे. कार्डवरून शंभर रुपये खर्च करताना मी अगदीच विचार करणार नाही!! कारण त्यातून शंभर गेले तरी भरपूर रक्कम शिल्लक राहिलेली असेल! माझा असा अनुभव आहे, की जेव्हा केव्हा माझ्याकडे खात्यात कमी आणि हातात रोख रक्कम जास्त होती(!), तेव्हा मी कार्ड वापरताना जास्त विचार करायचो!! (पण अशा वेळा कमी होत्या हेही खरं! ) समजा तुमच्या इमारतीच्या पाण्याची मोटर बंद पडली. आता खालच्या टाकीत कितीपण पाणी असो, घरातलं पाणी तुम्ही जपूनच वापरताल!!! पुन्हा मोटर चालू झाल्यावर मनसोक्त (भसाभस!) पाणी वापरल्यावर कसा आनंद झाला असेल आठवून बघा....
  • Log in or register to post comments
म
मिल्टन Sun, 10/29/2017 - 16:33 नवीन
हो हा पण एक मुद्दा असू शकेल. एकूणच अशाप्रकारचे व्यवहार करताना नक्की मानसिकता काय असते हा संशोधनास मोठा वाव असलेला विषय आहे. रोखीत व्यवहार करताना खर्च बेताचेच केले जातात पण कार्ड असेल तर भराभर स्वाईप करून मोठी बिले होऊन अडचणीत आलेले कित्येक लोक असतात. ही नक्की काय मानसिकता आहे? कशामुळे हे होते? बराच रोचक विषय असेल हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
न
नंदन Sun, 10/29/2017 - 08:30 नवीन
आवडला. 'प्रेडिक्टेबली इरॅशनल'ची (हे शीर्षक बर्‍याचशा जालचर्चांनाही लागू पडावे म्हणा!) वाचायच्या यादीत भर घातली आहे. सहज होणारी, कुठलाही वाईट हेतू नसताना केली जाणारी अगदी छोट्या स्वरूपाची ऑनलाईन पायरसी (इ-पुस्तके किंवा चित्रपट/मालिका जालावर अनधिकृतपणे वाचणे/पाहणे/उतरवून घेणे) हीदेखील बहुधा याच स्वरूपाच्या 'दृष्टीआड सृष्टी'त मोडावी.
  • Log in or register to post comments
र
राही Sun, 10/29/2017 - 16:28 नवीन
विपुलतेमुळे वस्तूचे उपयोगित्व कमी होते. वस्तूपासून मिळणारा आनंदही कमी होतो. वस्तूला क्षुल्लकत्व येते. त्यामुळे वस्तू हरवली/ चोरीला गेली तरी हळहळ वाटत नाही आणि उलट्या बाजूने आपण कुणाची तरी वस्तू हिरावली/ लुबाडली तरी अपराधी वाटत नाही पण रोकडीची विपुलता असताना दुसऱ्याचा एक रुपयासुद्धा उचलताना मात्र खंत वाटते हे निरीक्षण रोचक वाटले.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 10/30/2017 - 06:03 नवीन
लेखाच्या आशयाशी सहमत आहे. लेख वाचताना १० वर्षांपूर्वी अर्धवट वाचलेल्या एका पुस्तकाचे स्मरण झाले. पुस्तक आहे स्पीड ऑफ ट्रस्ट. रोख रकमेऐवजी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात पेमेंट्स होऊ लागल्यास मनी लाँडरींगसारख्या प्रकारांची व्याप्ती वाढेल असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा