Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जरी अज्ञात देशाचा

अ — अनन्त्_यात्री, Wed, 10/25/2017 - 07:52
जरी अज्ञात देशाचा किनारा गाठला होता तरी वारा शिडामधला जरा खंतावला होता दूरवरचे दिवे तिथले झळाळून पेटले होते तरी अंधार हटवादी जरा रेंगाळला होता वितळत्या चंद्रबिंबाने दशदिशा भारल्या होत्या तरी त्या चांदरातीचा कवडसा गोठला होता

प्रतिक्रिया द्या
2246 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ए
एस Wed, 10/25/2017 - 08:14 नवीन
वा! खूप छान आहे कविता. पण किमान दोन कडवी अजून असायला हवी होती. कवितेचा अर्थ पूर्णांशाने पोचत नाही किंवा कविता अपूर्ण वाटतेय असे जाणवले. 'दिवे तिथले' मध्ये 'दिवे तेथले' असा बदल करून पाहा. गेयता वाढेल.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 10/25/2017 - 10:05 नवीन
...प्रतिसादांबद्दल व सूचनांबद्दल आभार ! जीवनातल्या अपूर्णतेबद्दलच ही कविता लिहिली असल्याने ती अपुरी वाटत असतानाच थांबलोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 10/29/2017 - 18:14 नवीन
प्लस वन टू एस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Wed, 10/25/2017 - 08:17 नवीन
अजून एक. 'किनारा गाठला होता' ह्या गद्य भासणाऱ्या ओळीत 'गाठला किनारा होता' असे केले तर पद्यमय वाटेल. सॉरी! न विचारताच आगंतुकपणे सल्ले देतोय. :-)
  • Log in or register to post comments
अ
अनुपम गुरुवार, 10/26/2017 - 07:47 नवीन
व्वा!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/27/2017 - 20:20 नवीन
सुंदर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Haye Ni Haye Nakhra Tera Ni, High Rated Gabru Nu Maare... ;) :- High Rated Gabru Official Song
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 10/30/2017 - 05:49 नवीन
...प्रतिसादांबद्दल आभार !
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 10/31/2017 - 20:24 नवीन
अतिशय सुंदर कविता!आपल्या सर्वाधीक आवडलेल्या कवितांपैकी एक! मोहाच्या प्रवाहात,अगदी योग्य ठिकाणी 'गोठलेली' कविता!!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 11/01/2017 - 04:18 नवीन
मर्मग्राही प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा