कोळंबीचं लोणचं
Primary tabs
साहित्य
१/२ किलो कोळंबी, साफ करून
१ मोठ्या लिंब एवढा चिंचेचा गोळा
१ चमचा मेथीदाणे
२ मोठे चमचे लाल तिखट [असल्यास काश्मीरी पण थोडी वापरावी, लोणच्याला रंग सुंदर येतो]
२ मोठे चमचे हळद
१ चमचा मोहरी
१/२ चमचा हिंग
मीठ चवीनुसार
४ मोठे चमचे तेल
कृती
हि पाककृती आईची, तिच्याकडून शिकलो, अगदीच सोप्पी आणि झटपट होणारी. कोळंबी स्वच्छ धुवून, कोरडी करून घावी. त्याला एक चमचा हळद, तिखट आणि थोडं मीठ लावून बाजूला ठेवावी. चिंच गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढून घ्यावा.
कढईत तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी आणि मेथीदाणे ची फोडणी करावी. ह्यात हळद आणि लाल तिखट टाकून, काही सेकंद परतून, लगेच चिंचेचा कोळ टाकावा. गॅस बारीक करून, २ मिनिटे कोळ शिजू द्यावा. आता ह्यात कोळंबी टाकून, ती छान शिजेस्तोवर परतून घावी [कोळंबीला शिजायला जास्ती वेळ लागणार नाही, फार तर ३ ते ५ मिनिटे].
चव घेऊन, तिखट, मीठ पाहिजे तसे वाढवावे. गॅस बंद करून हे लोणचं थंड झाले कि कोरड्या, स्वच्छ काचेच्या बरणीत भरून फ्रिज मध्ये ठेवावे. गरम पोळी किंवा सोलकढी-भाता सोबत तोंडीलावणी साठी अगदी मस्त आहे हे लोणचे! फ्रिज मध्ये ठेवल्यास किमान १० दिवस तरी सहज टिकते.[अर्थात त्या आधीच खाऊन संपते!]
मस्तं.. अश्याच मस्तं पाकृ येऊ देत आणखी.
भारी..!!!!!!
दुष्टात्मा....
चिकन टाकून करता येईल का??
मला कोळंबी नाही आवडत.
चिकनच्या लोणच्याची एक वेगळी पाककृती टाकेन, कोडी पचडी (आंध्र स्टाईल चिकन पिकल). ह्याच पाककृतीत फेरफार करून बघायचे असेल, तर बोनलेस चिकनचे तुकडे, कोरडे करून मग तेलात फ्राय करून घ्यावेत. त्याच तेलात इतर कृती वरील प्रमाणे करावी, शेवटी फ्राय केलेले चिकनचे तुकडे टाकावेत.
चिकनचं लोणचं किमान २ ते ३ दिवस मुरू द्यावे, मग खायला घ्यावे. कोडी पचडी एकदा करून, मग त्याची सविस्तर रेसिपी टाकेन
??
रम टेम्प्रेचरला? - खराब नाही होणार?
की फ्रिज मध्ये?
अर्थातच फ्रिज मध्ये!
ही घ्या आमची रेशिपी - हाकानाका
लोणचे
जाहिरात! जाहिरात!
बाकी, कोळंबी लोणचे झकास!
याचिसाठी केला होता अट्टाहास
येता ऐतवार झक्कास व्हावा!!
वाह, छान आहे.
एकादशीला असलं काही टाकून का जळवताय ओ! ;-)
खरंय, आज लक्षात राहिलं नाही, नाहीतर नसती टाकली! :-)
मोहोरी बारीक का मोठी ? काळी की लाल ?
कश्याने जास्त चांगलं होईल ??? लोणच
स्लर्प ssssss !
स्लर्प ssssss ! *(गुणिले) १११
यम्म्म्म्म यम्म्म्म्म :)
फोटो कातील आलेत. छानच आहे रेसिपी.
तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
_//\\_
पाणी सुटलं तोंडाला असले खल्लास फोटो बघून!!
हे असले जीवघेणे फोटू टाकून (दूष्ट!
)हा केड्या मला एकदिवस खायला भाग पाडणार आहे. 
:-)) :-))