Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनातल्या मनात मी...

स — सत्यजित..., Mon, 11/06/2017 - 18:44
मनातल्या मनात मी तुलाच गुणगुणायचे अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे! तुटून तारका क्षणात आसमंत लांघते उगाच रात्र-रात्र मी नभात चमचमायचे! गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे! कुठून ऊब एवढी मिळायची मला तरी? तुझे फुलासमान शब्द ओठ पांघरायचे! पहाट कोवळ्या उन्हात अंग वाळवायची जशी सुरेल भैरवीच भूप आळवायचे! असून ठाव नेमकी कुठे असेल डायरी पुन्हा पुन्हा उगाच मी कपाट आवरायचे! अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे... —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
2640 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ए
एस Mon, 11/06/2017 - 18:57 नवीन
गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची
उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!
वाह! अगदी 'तुझ्याच अंगणी स्वरांचा...' ची आठवण आली. खूपच छान!
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 11/07/2017 - 06:03 नवीन
वाह!! सुंदर!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 11/08/2017 - 04:09 नवीन
छान!पण भटांची आठवण झाली. मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो..
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 01/09/2018 - 17:28 नवीन
एस,पुंबा,प्राची...मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा