Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

|| गणेश पूजा ||

व — वैभवदातार, Tue, 11/07/2017 - 14:22
आज अंगारकी चतुर्थी निमित्त गणेशाची पूजा करू .. || गणेश पूजा || चला करू गणेशाचे आज पूजन नवविधा भक्तीने आपण करू त्याचे अर्चन || धृ.|| दहा इंद्रियांनी करू मानस पूजा नसे तुजवीण भाव दुजा ||१ || दुग्ध घृत मधु दही शर्करा स्नाने अभिषेक करतो मी मनोभावाने ||२ || दुर्वा जास्वदीं फुले अर्पूनि चरणी आरती करूया धूप दीप लावूनी ||३ || निनादति मंगल वाद्ये ताल मृदूंग वीणा वाजे वैभव नमितो गणेशा रूप सुंदर साजे ||४ ||

प्रतिक्रिया द्या
1941 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
सूड Tue, 11/07/2017 - 15:06 नवीन
दहा इंद्रियांनी करू मानस पूजा
आम्हाला पाच आणि उरलेलं गट फीलींग धरलं तर सहा. दहा कसे काय व्बॉ?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 11/08/2017 - 05:43 नवीन
दहा तर दहा तुला काय फरक पडतो रे? त्या पेक्षा भावना बघ त्या जास्त महत्वाच्या... आरती प्रचंड आवडली आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ख
खेडूत Wed, 11/08/2017 - 06:39 नवीन
जोडीनं पूजा केली की धा होणार नाहीत का? शिंपल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 11/08/2017 - 06:45 नवीन
पॉइंट आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
व
विशुमित Wed, 11/08/2017 - 06:53 नवीन
ha ha ha ..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
स
सूड Wed, 11/08/2017 - 07:16 नवीन
जोडीनं पूजा केली की धा होणार नाहीत का?
दूर्दृष्टी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
अ
अनन्त्_यात्री Wed, 11/08/2017 - 07:23 नवीन
वापर करून करतात ती ऐंद्रिय पूजा असते- मानस पूजा नव्हे. मग (दहा अथवा कमी-जास्त) इंद्रियांनी मानस पूजा कशी करता येईल ही शंका येत आहे. की मन हे एक इंद्रियच गृहित धरले आहे? कवी / तज्ञांनी मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 11/08/2017 - 07:31 नवीन
वेळेला केळ आणि उपासाला सिताफळ अशी एक म्हण आहे. तदनुसार कधी कधी इंद्रीयांची मानसपूजा करायची वेळ येउ शकते माणसावर पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/08/2017 - 08:37 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
अ
अनन्त्_यात्री Wed, 11/08/2017 - 09:50 नवीन
||आपल्या मर्मग्राही मार्गदर्शनामुळे अभूतपूर्व अंतर्दृष्टी मिळाली. शब्दांचे वैयर्थ्य व संकल्पनांमधील परस्परसंबंधांची यथार्थ कल्पना आली|| ||धन्यवाद || :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सूड Wed, 11/08/2017 - 11:06 नवीन
तदनुसार कधी कधी इंद्रीयांची मानसपूजा करायची वेळ येउ शकते माणसावर
त्या मानसपूजेवरही एखादी फक्क्ड कविता येउदेत. ईक्षुदंडांसह!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
अ
अनन्त्_यात्री Wed, 11/08/2017 - 11:49 नवीन
टायटल तर ठरले. आता फक्कड कवितेचे शिवधनुष्य उचलण्याची व त्यास प्रत्यंचा लावण्याची नम्र विनंती मिपाविडम्बनशिरोमणींना करण्यात येत आहे. फार कळ सोसायला लावू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा