Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काही सांगायचे आहे

स — संदीप-लेले, Sat, 11/11/2017 - 06:36
काही सांगायचे आहे, सांगावया जमेल का? ज्यांनी ऐकायचे, त्यांना ऐकावया जमेल का? अनुभव टिपताना, मन शब्दबंबाळले शब्द त्यातला शहाणा, वेचावया जमेल का? रेष असो ललाटीची, वा असो तळहाताची नसणार सरळ, हे मानावया जमेल का? चित्रमय जग सारे, काय सोडू? काय भोगू? मयसभा कोणती ते, ओळखाया जमेल का? हाती लागला परीस, सर्वांच्याच हाती सोने धूर पिऊन सोन्याचा, जगावया जमेल का? तोल साधता साधेना, हातवारे झाले कैक हात हाती घेउनीया, सावराया जमेल का? लख्ख प्रकाश दिवसा, पहाटेस स्वप्नाधार अंधारून येता, धीर धरावया जमेल का? दुसऱ्यांचे ऐकुनिया, कळा फिरवीत गेलो कधी आतला आवाज, ऐकावया जमेल का? रोज गुऱ्हाळही तेच, तोच नाद घुंगरांचा त्या तालात नवा सूर, आळवाया जमेल का? ... संदीप लेले

प्रतिक्रिया द्या
844 वाचन

💬 प्रतिसाद (1)
त
तृप्ति २३ Sun, 11/12/2017 - 19:33 नवीन
खूप मस्त कविता केली आहे. तृप्ती http://www.truptiskavita.com
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा