अहेवपण ...
कातरवेळी अस्वस्थ मनाला
दुरच्या दिव्यांची वाटे आस
स्तब्ध-निःशब्द सूर्यास्तवेळा
कितीक स्मरती हळवे भास
उगाच ओठी शब्द अडकती
दूर कोणी कोकिळ बोलतो
तुडुंब मनाचे आगर भरतां
उद्रेकाला मग वाट शोधतो
नाद खगांचे, स्वर समीराचा
कातळडोही अनाम खळबळ
विजनवास व्रतस्थ मनाचा
गर्द सावल्या सावळ सावळ
पैलतीरी उभे दुत प्रकाशी
कुणी छेडले सनईचे सूर
अहेवपण सजले सरणावर
प्रिया मनी हे कसले काहूर?
© विशाल कुलकर्णी
💬 प्रतिसाद
(15)
प
पद्मावति
Tue, 11/14/2017 - 13:45
नवीन
अतिशय सुरेख!
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Tue, 11/14/2017 - 14:36
नवीन
+1
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 11/15/2017 - 13:02
नवीन
+१ . येकच नंबर.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Wed, 11/15/2017 - 06:12
नवीन
क्या बात.... काय लिहितोस... बेहद्द आवडले...
वाचताना आरती प्रभुंची "विश्रब्ध मनाच्या कातरवेळी" ही कविता आठवत होती.
त्या कवितेमधला "अहेवपण" असाच अस्वस्थ करुन गेला होता....
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Sat, 11/25/2017 - 10:52
नवीन
अजुन काय हवं माझ्यासारख्या नवख्या कविला. माझ्या ओळी वाचताना तुम्हाला आरतीप्रभु यांचे स्मरण व्हावे...
ही आजवरची सगळ्यात मोठी दाद आहे माझ्या लेखनाला. _/!\_
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 11/15/2017 - 06:42
नवीन
आह!!
- Log in or register to post comments
ज
जागु
Wed, 11/15/2017 - 06:50
नवीन
सुंदर.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 11/15/2017 - 08:35
नवीन
निराश केलं नाहीस
जियो
हळवा प्रापंचिक नाखु
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Sat, 11/25/2017 - 10:53
नवीन
धन्यवाद देवानु !
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 11/15/2017 - 09:05
नवीन
सुरेख लिहिलंय !
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 11/15/2017 - 10:47
नवीन
अतिशय तरल कविता. यानिमित्ताने सूड यांची 'नवमी' ही कविता आठवली.
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 11/16/2017 - 13:45
नवीन
बरोबर. मलाही ती आठवत होती पण नेमकं नाव ,कवी विसरले होते.
- Log in or register to post comments
ए
ए ए वाघमारे
Sat, 11/18/2017 - 05:27
नवीन
सुंदर
- Log in or register to post comments
र
रातराणी
Tue, 11/21/2017 - 19:40
नवीन
_/\_ विशालदा अप्रतिम आहे कविता!
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Sat, 11/25/2017 - 10:53
नवीन
मनःपूर्वक आभार मंडळी !
- Log in or register to post comments