जे न देखे रवी...
सोडुन गाव मी माझा ...
Primary tabs
सोडुन गाव मी माझा
उडून आलो यैसा
पश्चिम स्वप्न उराशी
अन डोळ्या समोर पैसा
प्रफुल्ल रान ते हिरवे
अन २० घरांची वाडी
विसरून पार ते गेलो
भरधाव हाकतो गाडी
बेधुंद रांगडा पाउस
कस्तुरी गंध मातीचा
ते हरवून बसलो सगले
आवडे श्वास येसीचा
त्या पारावरच्या गप्पा
जोश्यांची सुन्दर पारू
मिटउन टाकले सारे
जोडीला डिस्को अन दारू
ती उशास मांडी आईची
अंगाइच्या प्रेमळ ओळी
जरी इथे संपदा बाजुला
मी घेतो झोपेची गोळी
अतिशय सुंदर भावगर्भ कविता. प्रत्येक कडवं हृदयस्पर्शी आहे. पु. ले. शु.
-ऋषिकेश
फारच छान!
मन्याशेठ,
अतिशय सुरेख कविता! प्रत्येक कडव्याला अगदी भरभरून दाद द्यावी अशी!
तुमच्या प्रतेय्क शब्दासोबत तुम्ही आम्हालाही तुमच्या गावाला घेऊन गेलात, तिकडचं सगळं चित्र आमच्यासमोर उभं केलंत!
क्या बात है...
आपला,
(हळवा) तात्या.
वा, फारच सुंदर कविता.
मनापासून आवडली...
खूपच छान.
साधी सोपी तरी चित्रमय कविता आवडली. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
अतिशय साध्या पध्दतीने मनाला भुरळ घालणारी व आपल्या गावची मनापासुन आठवण काढावी अशी ही भावपूर्ण कविता खरच खुप आवडली.
-विजय
वा वा. सुंदर कविता. आवडली.
जरा वृत्तात बसवून घेतली नीट, तर अधिक मजा येईल. गणवृत्तापेक्षा किंवा छंदापेक्षा जातींमध्ये ही रचना मस्त होईल.
उदाहरणार्थ, उद्धव वापरून बघा. एकूण-१४ मात्रा. ....खंड २ + ८ + ४
त्या | पारावरच्या | गप्पा
जो | श्यांची सुन्दर | पारू
२ | ८ | ४
या पद्धतीने.
या ओळी कशा चपखल वृत्तात आलेत तशा इतरही आल्यास फार सुंदर रचना होईल.....
अगदी जोश्यांच्या पारूसारखी...... गोरी, घारी, लाजरी, नखरेल....
आपला,
(आस्वादक) धोंडोपंत
ती उशास मांडी आईची
अंगाइच्या प्रेमळ ओळी
जरी इथे संपदा बाजुला
मी घेतो झोपेची गोळी
अप्रतिम. फारच छान. लिहीत रहा. थांबू नका.
आपला,
(प्रभावित) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
केश्या,
झकास विडंबन टाक. इतका चांगला माल आलाय बंदरावर.
आपला,
(चाहता) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
मनोजराव,
कविता आवडली.........च्यायला पाटोद्याचं शिवार उभं केलं डोळ्यासमोर.
येऊ दे अशाच सुंदर कविता !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे