Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फुलपाखरा

म — मिसळलेला काव्यप्रेमी, गुरुवार, 11/23/2017 - 00:06
का जागतेस तू शोना? काय विचार करत असतेस तू? का झोप येत नाही? कोण? मी?  तू जागी आहेस ना म्हणून,  मी पण जागतोय . चमचम चांदणीसारखी टिमटिमत राहतेस कधी कधी वाटतं दिवसभर  थोडा थोडा मी  जमा होत जातो तुझ्या डोळ्यात आणि मग रात्री झोपेला तुझ्या डोळ्यात उतरायला जागाच उरत नाही . असं होतय का रे फुलपाखरा? त्रास देतो ना बाबा असा? दूर निघून जातो आणि लेकरु बाबाला शोधत राहतं! . एक गंमत करुया आज झोपलीस ना की बाबाला तुझ्या स्वप्नात बोलावं स्वप्नात मग बाबा आणि बाबाची डॉल खुप खेळतील, हसतील, धावतील आईला घेऊला का बरोबर? नको, आधि आपण खुप मस्ती करु मग मस्ती केली म्हणून  रागवायला येईलच ना ती? तेव्हा, तिला पण आपल्या खेळात सामील करुन घेऊ तिला कळणारच नाही कि ती कुणाच्या पार्टीत आहे मज्जा ना? . पण कोकरा, स्वप्नचं रे ते सकाळी ऊठलीस की संपेल मग परत मी दिवसभर थोडा थोडा साचत जाईन तुझ्या डोळ्यात आणि परत तु जागत राहशील, छे.. नकोच्च..  . का जागतेस तू शोना? काय विचार करत असतेस तू? का झोप येत नाही? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२२/११/२०१७)

प्रतिक्रिया द्या
2661 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ए
एस गुरुवार, 11/23/2017 - 00:10 नवीन
'बाबाला तुझ्या स्वप्नात बोलावं' चं 'बोलवावं' करूयात का? बाकी कविता तरल नेहमीसारखीच.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 11/23/2017 - 04:53 नवीन
फारच आवडली, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 11/25/2017 - 06:59 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा