Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा की मायबोली की मिपा आणि मायबोली ? ?

ग
गबाळ्या
Wed, 11/29/2017 - 03:30
🗣 70 प्रतिसाद
मी मिपाचा नवीन सदस्य आहे. मिपावर चे काही साहित्य वाचता वाचता प्रतिक्रियांमध्ये बऱ्याचदा मायबोली (https://www.maayboli.com) चा उल्लेख आढळला. म्हणून मला प्रश्न पडला आहे कि मिपा आणि मायबोली मध्ये काय फरक आणि साम्य आहे? दोन्ही ठिकाणचे सदस्यत्व असण्याची काय कारणे असावीत ?

प्रतिक्रिया द्या
17612 वाचन

💬 प्रतिसाद (70)
भ
भीडस्त Wed, 11/29/2017 - 07:08 नवीन
मलाही हेच प्रश्न पडले आहेत . उद्बोधन करणारा कुणी त्राता आहे का ??? खरं म्हयी एकाच टिकटात समदी गाणी वाजाय पायशेन. वायली वायली टिकटा घ्याया नाय लागली पायशेंन ....
  • Log in or register to post comments
ए
एमी Wed, 11/29/2017 - 10:08 नवीन
मिपा, माबो, ऐसी सगळीकडे अकाउंट काढून १-२ महिने रेंगाळून बघा. जे जास्त आवडेल तिथे जास्त बागडा.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Fri, 12/01/2017 - 13:34 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ग
गबाळ्या Wed, 11/29/2017 - 16:10 नवीन
ऐसी काय आहे? दुवा देऊ शकाल का?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 11/29/2017 - 17:47 नवीन
दे दान सुटे गिराण असे एकाच कोपय्रावर ओरडून काय होणार? गल्लीगल्लीत वरडायला लागतं.
  • Log in or register to post comments
स
समयांत Wed, 11/29/2017 - 18:10 नवीन
मलाही हा नेहमीच प्रश्र्न पडतो.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 11/29/2017 - 18:11 नवीन
मिपा हे मित्रांच्या कट्ट्यासारखं आहे. इथे प्रसंगी कायपण भंकस मारायला अनुमती आहे. मायबोली आणि आयशी ह्यांच्या नांवातच आई असल्याने तिथं सारखं उपदेशाचं अमृत प्यायची तयारी ठेवावी लागते! आमाला अमृतापेक्षा मिसळीचा जास्त ओढा असल्याने...... :)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 12/01/2017 - 09:08 नवीन
<<< मायबोली आणि आयशी ह्यांच्या नांवातच आई असल्याने तिथं सारखं उपदेशाचं अमृत.....>>> . :-))) मिपा हे मित्रांच्या कट्ट्यासारखं आहे. +१००१ हेच लिहिणार होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
र
रंगीला रतन गुरुवार, 12/07/2017 - 06:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सुजल Wed, 11/29/2017 - 22:09 नवीन
फरक असा आहे कि हि दोन वेगवेगळी संकेत स्थळ आहे आणि साम्य असं कि सगळे लेखक दोन्ही कडे आपले तेच तेच लेख टाकतात . त्यामुळे दोन्ही कडे त्याच त्याच लेखांची ( रिपीट ) संख्या खूप आहे . तुम्हाला जे आवडत असेल तिथे बागडावे .
  • Log in or register to post comments
ए
एमी गुरुवार, 11/30/2017 - 01:33 नवीन
त्यामुळे दोन्ही कडे त्याच त्याच लेखांची ( रिपीट ) संख्या खूप आहे. >> मलातरी असेकाही वाटले नाही. फक्त माबोवर किंवा फक्त मिपावर लिहिणारे बरेच आहेत. === गबाळ्या, ही घ्या ऐसीची लिंक http://www.aisiakshare.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजल
म
माहितगार गुरुवार, 11/30/2017 - 07:59 नवीन
तुम्ही संकेतस्थळांची अधिकृत धोरणे मानत असाल तर मिपा आणि माबो धोरणात जरासा फरक आहे. दोहोंची धोरणे लक्षात घेतलीतर मिपावर टोपणनावाने लेखन करण्याची मुभा अधिक सोईस्कर आहे -त्यामुळे लेखनात अधिक मोकळेपणा येतो -त्यामुळे मी माबोवर न लिहिता केवळ मिपावर लिहितो. माबोच्या अधिकृत धोरणानुसार बहुधा तुमचे व्यक्तिगत माहिती देणे अधिक बंधनकारक आहे, आणि डूआयडी परवानगी नाही. मिपावर डूआयडीने संपादक मंडळास अमान्य गोंधळ केला तरच अडचण - मिपाचे मूळ संस्थापक लेखन स्वातंत्र्याच्या बाजूने होते ती संस्कृती इथे अद्यापही कमी अधिक प्रमाणात मूळ धरून आहे. ऐसि अक्षरे वैचारीक दृष्ट्या मिपापेक्षा हुच्च प्रस्थापित असल्यामुळे असेल कदाचित लेखन स्वातंत्र्य हुच्च लोकांसाठी तांत्रिकदृष्ट्या मिपापेक्षा अधिक आहे पण प्रत्यक्षात प्रत्येक विषयावर आपला स्वतःचा वेगळा धागा काढण्याचे स्वातंत्र्य मिपावर अधिक आहे. ऐसि आणि मिपात आणखी एक सांस्कृतिक फरक ऐसिवर भारतीय संस्कृतीशी प्रामाण्य तोळामासा आहे शिवाय -वाचक मिपापेक्षा कमी आहेत. मिपावर भारतीय आणि विशेषतः मराठी संस्कृतीत असल्यासारखे वाटते आणि वाचकही मिपाला अधिक आहे. या दोन कारणांनी मी ऐसिपेक्षा मिपा प्रीफर करतो.
  • Log in or register to post comments
स
समयांत गुरुवार, 11/30/2017 - 08:03 नवीन
भारीच, आवडलं आपल्याला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ए
एमी गुरुवार, 11/30/2017 - 09:19 नवीन
माबोच्या अधिकृत धोरणानुसार बहुधा तुमचे व्यक्तिगत माहिती देणे अधिक बंधनकारक आहे, आणि डूआयडी परवानगी नाही. >> असं काही नाहीय. संयुक्ता चे सदस्यत्व घ्यायला फोन करून वेरिफाय करायचे खरे नाव वगैरे (जे आता अनाहितासाठी पण असेल) पण इतरवेळी कोणीही कसलीही व्यक्तीगत माहिती मागत नाही. डुआयडी ला 'परवानगी' इथेतरी कुठे आहे? पण ते असतातच! तिकडेही आहेत. गोंधळ घातला कि उडवतात. परत येतात. ते चालूच असतं. चालूच राहणार. पण माबो आता बरीच clean झालीय. राजकीय हणामार्या कमी झाल्यात. त्यांनी ज्या नव्या सोयी आणल्या आहेत त्यापण चांगल्या आहेत. === ऐसिवर भारतीय संस्कृतीशी प्रामाण्य तोळामासा आहे शिवाय -वाचक मिपापेक्षा कमी आहेत. >> +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
फ
फारएन्ड Sat, 12/02/2017 - 15:54 नवीन
अ‍ॅमी यांचे बरोबर आहे. माबो वर लिहायला तुम्हाला वैयक्तिक माहिती देण्याची गरज नाही. काही स्पेसिफिक उपक्रमांत तर स्वयंसेवक म्हणून भाग घ्यायचा असेल तर द्यावी लागते, तीही सर्व उपक्रमांना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/30/2017 - 10:25 नवीन
ऐसिवर भारतीय संस्कृतीशी प्रामाण्य तोळामासा आहे
म्हणजे नक्की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ए
एमी गुरुवार, 11/30/2017 - 11:29 नवीन
+१ केल्यानंतर मीपण कंफ्यूज झाले 'नक्की काय म्हणायच आहे' 'ऐसीवर भारतातील चालू घडामोडीबद्दल चर्चा फारशी नसतेच' असा काहीतरी अर्थ मी काढला होता... बहुतेक चुकला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ए
एमी गुरुवार, 11/30/2017 - 11:30 नवीन
+१ केल्यानंतर मीपण कंफ्यूज झाले 'नक्की काय म्हणायच आहे' 'ऐसीवर भारतातील चालू घडामोडीबद्दल चर्चा फारशी नसतेच' असा काहीतरी अर्थ मी काढला होता... बहुतेक चुकला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
च
चौथा कोनाडा Fri, 12/01/2017 - 16:57 नवीन
प्रमाण तोळामासा आहे म्हण्जे : तोळा = १२ ग्रॅम (आजच्या मेट्रिक नुसार १० ग्रॅम) मासा = १ ग्रॅम तोळामासा म्हण्जे समजा मिपा वाचक संख्या १२ असेल तर ऐसि अक्षरे वाचक संख्या १ (एकच) आहे. (संदर्भ : आयुर्वेदिक मोजमापे पद्धत) हे वरील ठीक किंवा कसे यावर जाणकारांनी खुलासा करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
क
कपिलमुनी गुरुवार, 11/30/2017 - 11:04 नवीन
असे फक्त तेच समजतात ! ऐसी म्हणजे शोभा डे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/30/2017 - 11:39 नवीन
त्या हिशोबाने मिपावर बरीच गटारेसुद्धा बघितली आहेत...मग मिपाला "मुंबै" म्हणायचे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार गुरुवार, 11/30/2017 - 12:12 नवीन
ऐसी म्हणजे शोभा डे !
अगदी या वरून सोशल मिडियावर फिरणारी एक मराठी कविता आठवली- कॉपीराईट आणि कवि माहित नसल्यामुळे पूर्ण देता येणार नाही पण सारांशात देण्याचा प्रयत्न करतो. " दोस्ता, कुठे बेपत्ता झालास ? बऱ्याच दिवसांत गाठभेट नाही ! भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! अगदी डिलक्स नाही, पण शोभेलसा बार पाहू, .... ... अर्धा सोडा, अर्धे पाणी; संगतीला विल्स घेऊ, .... .... ... ... डावे-उजवे करीत करीत, आपण चिअर्स म्हणू, दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! नवे साहित्य, जुने वाङ्मय, विदेशातील संमेलन, कवितांचे तेच तेच, कथांमध्ये तर नाहीच दम, कादंबरीत ना कस, असंतोष यांच्यात नाही दिसत, नव्या सांस्कृतिक धोरणाचा यासंबंधी निकाल करू, दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! ... .... फैज आणि गालीबची फेरउजळणी एकदा करू, शहरीकरणात सांस्कृतिकतेची, नवी जाणीव जमवून पाहू... दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! चौथा पेग होईल तेव्हा ..... जेवणाची गरज नसेल म्हणून आणखी एक निप मागवू, उठताना क्रेडिट कार्डाऐवजी, बिल दोघंही शेअर करू, आपल्याच 'सच्चेपणा'ला आपणच सलाम ठोकू, अन् दोस्ता, भेट पुन्हा एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू !!!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/30/2017 - 09:50 नवीन
मिपा व मायबोली म्हणजे दादर-गिरगावसारखे आहे रे गबाळ्या. खरेदीसाठी लोक दोन्ही ठिकाणी पूर्वी जायचे. पण काहीना दादर-रानडे रोडच आवडायचा तर काहींचे 'प्रार्थना समाज' शिवाय पान हलायचे नाही.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/30/2017 - 10:25 नवीन
आयला माई आहेत अज्जून....आम्हाला वाट्ले....असो ख्या ख्या ख्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/30/2017 - 10:51 नवीन
माई अष्टचिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
च
चौथा कोनाडा Fri, 12/01/2017 - 17:01 नवीन
आईच्च्या गावात ..... साक्षात माईसाहेब .... डोळ्यावर विश्वास बसनां ! माईसाहेब सप्रेम नमस्कार ! कश्या आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
प
प्राची अश्विनी गुरुवार, 11/30/2017 - 14:09 नवीन
ऐसीवर मोजून आठ दहा डोकीच लिहीत असतात.
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 11/30/2017 - 14:26 नवीन
तिन्हीकडे कॉमन असणारे आणि तिन्हीकडे तितकेच फेमस असणारे फार लोक नसावेत.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/30/2017 - 17:46 नवीन
बॅटमन्ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ए
एमी Fri, 12/01/2017 - 02:44 नवीन
एकही नाहीय! प्रत्येक फेमस आयडीने आपापली साईट ठरवून टाकलीय आणि तिकडेच लिहितात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
र
रुस्तम Fri, 12/01/2017 - 06:20 नवीन
उदा. माबो वर अक्कलशून्य आणि इथे सिंथेटिक जिनिअस आहेत की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
प
पुंबा Fri, 12/01/2017 - 14:32 नवीन
जव्हेरगंज मला आठवतात त्याप्रमाणे एकमात्र तिन्हीकडे लिहिलेले.. माबो+मिपा, मिपा+ऐसि असे बरेच आहेत. मिपा आणि ऐसी दोन्हीकडे वजन राखून असणारे पण बरेच आणि खुप भारी आयडी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Fri, 12/01/2017 - 16:11 नवीन
मला आठवतंय त्यानुसार: • जव्हेरगंज मअंजावर नवीन असताना त्यांनी ऐसीवरदेखील काही कथा टाकलेल्या. फारसे प्रतिसाद न आल्याने ३-४ धाग्यानंतर तिकडे फिरकले नाहीत. माबोवर अधूनमधून लिहितात; नियमीत नाही. • बॅटमॅन माबोवर कधीच दिसला नाही. मिपावर एकदा ब्लॉक झाल्यानंतर परत इकडे फिरकला नाही. सध्या फक्त ऐसीवर असतो. • सिंजी माबो, मिपा नियमित. ऐसी अधूनमधून. === माबो+मिपा, मिपा+ऐसि असे बरेच आहेत. मिपा आणि ऐसी दोन्हीकडे वजन राखून असणारे पण बरेच आणि खुप भारी आयडी आहेत. >> नावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
अ
अभ्या.. Fri, 12/01/2017 - 19:35 नवीन
ऐसी आणि मिपा दोन्हीकडे असणारे भारी आयडी म्हणजे नंदन, आदूबाळ, बिकासेठ, कंजूस (तिकडे आचरट बाबा) आणि मनोबा. गब्बर, अनुराव, अमी, बापट, हे भारी आयडी आहेत पण फक्त ऐसीवर रमतात. ब्याट्याला मिपावर येणे का जमत नाही ते सांगता येत नाही पण तो ऐसीवर फुल रमलेला असतो. काही आयडीना फक्त स्वतःचे लेखन टाकून त्यावरचे छान छान प्रतिसाद पाहून थांक्यु थांक्यु करायचे असते ते रेग्युलरली दोन्हीकडे रतीब टाकतात. आमचं आता वय झालं, कथेकरी कोण ते बघायचे अन मंदिरात कीर्तनाला बसायचे. बासस्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Sat, 12/02/2017 - 01:25 नवीन
"नावं?" लिहिल्यानंतर थोडा अजून विचार केल्यावर आदुबाळ आणि अभ्या मिपा, ऐसी दोन्हीकडे असतात हे आठवलं होतं :D नंदन, बिका दोन्हीकडे फक्त वामा असतात असे मी म्हणेन. वर्षातून एखाददुसरा प्रतिसाद.... मनोबा नाहीय मिपावर! वामादेखील नाही. गब्बर, अनुराव, अमी, बापट >> अमी कोण? हो बाकीचे तिघे आणि बॅटदेखील फक्त ऐसीवर असतात. बरेच मिपाकर ऐसी नियमीत वाचत असतात असा अंदाज आहे. आणि बरेच माबोकर मिपा नियमीत वाचतात. === एकही नाहीय! प्रत्येक फेमस आयडीने आपापली साईट ठरवून टाकलीय आणि तिकडेच लिहितात. >> असे लिहिताना माझ्या डोळ्यासमोर बेफी, विद्या, चैतन्य, ऋन्मेष असे माबोवरचे आयडी होते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
श्रीगुरुजी Sat, 12/02/2017 - 04:00 नवीन
ऐसी वर फक्त गब्बरचे प्रतिसाद अभ्यासू व वाचनीय असतात. तो मिपावर यायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पुंबा Mon, 12/04/2017 - 06:36 नवीन
+११ अनु राव पण..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पुंबा Mon, 12/04/2017 - 06:33 नवीन
ऐसी आणि मिपा दोन्हीकडे असणारे भारी आयडी
गवि, अभ्या हे राहिले. तिन्हीकडे लिहिणारे फारएन्ड राहिले की..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभिजीत अवलिया Sat, 12/02/2017 - 04:42 नवीन
मिपा आणि ऐसी दोन्हीकडे वजन राखून असणारे पण बरेच आणि खुप भारी आयडी आहेत.
सचिन काळे साहेब आहेत दोन्हीकडे. रविवारच्या त्यांंच्या लेखाची दोन्हीकडे उत्सुकतेने वाट बघितली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
म
मार्मिक गोडसे Sat, 12/02/2017 - 05:42 नवीन
सचिन काळे साहेब मिपा,माबो आणि ऐसी ह्या तिन्ही ठिकाणी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अभ्या.. Fri, 12/01/2017 - 19:40 नवीन
मी लिहिलेले तिन्हीकडे, ऐअसीवर बरे प्रतिसाद मिळाले, मायबोलीवर सुखद धक्का म्हणजे बरेच चांगले प्रतिसाद पहिल्याच अन एकमेव कथेला मिळाले. मिपावर मात्र हक्काने बोलतात, बरेच प्रतिसाद अगदी अपेक्षित मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ए
एमी Sat, 12/02/2017 - 01:31 नवीन
मायबोलीवर सुखद धक्का म्हणजे बरेच चांगले प्रतिसाद पहिल्याच अन एकमेव कथेला मिळाले. >> हो ते पाहिलेलं :) पण तुदेखील तिकडे नंतर दिसला नाहीस.... मला वाटतं फेमस लेखकांनी आपापली साईट निवडून घेतलीय. जव्हेरगंजनापण माबोवर चांगले प्रतिसाद येतात; पण ते तिकडे रमलेत असं वाटत नाही; त्यांना मिपाच आवडत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
क
कंजूस Fri, 12/01/2017 - 08:18 नवीन
बॅटमन्ना माबोवर? अगागा शान्तंपापम्। तिन्हीवर पिंका टाकतो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ग
गबाळ्या गुरुवार, 11/30/2017 - 19:00 नवीन
उत्सुकतेपोटी मी अलेक्सा रँकिंग वरून हि माहिती गोळा केली maayboli misalpav aisiakshare Overall Statistics Global Rank 111,909 196,557 451,795 Rank in India 9,325 18,225 182,226 Daily Pageviews per Visitor 7.5 3.7 8.4 Daily Time on Site 10:17 5:53 8:02 Visitor Distribution India 87.80% 76.80% 45.00% United States 11.20% 7.60% 52.10% Colombia - 9.80% - United Arab Emirates - 5.90% -
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 11/30/2017 - 19:28 नवीन
अलेक्सा मराठी मधील रँकपण पुरवते मायबोलीचा मराठी संकेतस्थळातील ओव्हर ऑल रँक ११ वा आहे तर संवाद साधण्याची सुविधा असलेल्या मराठी संकेतस्थळात पहिला आहे. मिपा ओव्हर ऑल १५ व्या क्रमांकावर तर संवाद साधण्याची सुविधा असलेल्या संकेतस्थळात दुसर्‍या क्रमांकावर येईल . (उपक्रम सध्या चर्चेस बंद असूनही ओव्हर ऑल मध्ये २५ व्या क्रमांकावर दिसते आहे) माझ्या आठवणी प्रमाणे मनोगतची स्थिती मी मागच्या वेळी पाहिली त्या पेक्षा सुधारली असेल ते ओव्हर ऑल २८ व्या क्रमांकावर दिसत आहेत. (मला वाटते त्यांच्या मालकांचा पब्लिक संपर्क अलिकडे वाढण्याचा बेनिफीट होत असेल का चुभूदेघे) ऐसी अक्षरे मराठीच्या ओव्हर ऑल पहिल्या पन्नासाच्या यादीत दिसत नाहीए. हि अलेक्सा रँकींग काळाच्या ओघात काही वेळा महिना परत्वे- बरीच खालीवर होत रहातात. अवांतर : मराठी विकिपीडियाचे रँकींग ३४ पर्यंत खाली गेल्याचे दिसत आहे. सम्दर्भ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गबाळ्या
क
कंजूस Fri, 12/01/2017 - 00:41 नवीन
केवळ फरक जाणून घ्यायचा उद्देश आहे का? आपापल्या आवडीचे विषय चर्चा करणारे जिथे मिळतात तिथे तो विषय काढणे हा उपाय असतो. तिनही ठिकाणी पिंका टाकत फिरणारा कोण रे तो? गबाळे तुम्ही काहीच लिहिलं नाही. चर्चा घडवायला तुमची चार मतं टाका.
  • Log in or register to post comments
ग
गबाळ्या Fri, 12/01/2017 - 18:03 नवीन
मागचे काही दिवस मी या तिन्ही साईट्स चे निरीक्षण केले व त्यावरून मला जाणवलेल्या काही गोष्टि. १. सभासद नोंदणी, लिहिण्याचे स्वातंत्र्य, साईट ची एकंदरीत मांडणी या सर्व गोष्टी तिन्ही कडे जवळपास सारख्याच आहे (प्रथमदर्शनी तरी) २. काही सभासद (मुख्यत्वे सक्रिय) दोन्ही किंवा तिन्ही ठिकाणी समान आहेत. ३. मिपा हे जरा सर्व समावेशक आणि नवीन सदस्यांना प्रोत्साहित करणारे व्यासपीठ वाटते तर बाकी दोन्ही ठिकाणी जरा कंपूबाजी वाटते (हे माझ्या स्वतःच्या लिखाणाला तसेच इतरांच्या लिखाणाला मिळालेल्या प्रतिसादावरून वाटले. इथे मला सकारात्मक, नकारात्मक तसेच तटस्थ प्रतिसाद मिळाले आणि तोंडदेखल्या कौतुकापेक्षा आणि उगाच केलेल्या टीकेपेक्षा मला ते निःपक्षपाती प्रतिसाद आवडले) ४. मिपावर मात्र कधीकधी प्रतिक्रिया अगदी भरकटत जातात आणि वैयक्तिक पातळीवर एकमेकांचे खच्चीकरण कारण्यापर्येंत पोहोचतात. बाकी दोन्ही ठिकाणी मला हे प्रमाण कमी वाटले. ५. तिन्ही साईट्स ची रचना फक्त नवीन लिखाणाला जास्त महत्व देणारी वाटली. परंतु, जुने दर्जेदार साहित्य शोधणे तिन्ही कडे कठीण आहे. मिपावर तर मला अजून "शोध" सुविधा सापडलेलीच नाही. ६. एकंदरीत काय की जसे म्हणतात की "२ मराठी माणसे एकत्र आली कि ३ मराठी मंडळे तयार होतात - १ माझे, १ त्याचे आणि १ दोघांचे" असा प्रकार वाटला. नवीन, जुन्या जाणकार, तसेच दोन्ही कडे सक्रिय असणाऱ्या सदस्यांचे काय मत आहे?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 12/01/2017 - 18:41 नवीन
<< ४. मिपावर मात्र कधीकधी प्रतिक्रिया अगदी भरकटत जातात आणि वैयक्तिक पातळीवर एकमेकांचे खच्चीकरण कारण्यापर्येंत पोहोचतात. बाकी दोन्ही ठिकाणी मला हे प्रमाण कमी वाटले. >> कित्येक वेळा हे भरकटणं सर्प्राइझींग अन सुखदायक असल्याचं मला जाणवलंय ! एका विषयातून दुसरा अन त्यांचे अनेक पदर उलगङत जातात, मजा येते असं हरवुन जायला. मिपाचं हेच बलस्थान वाटतं. वैयक्तिक खच्चीकरण वै कदचित होत असावे ते त्या त्या जाणकारांनाच माहित, पण एकमेकांच्या टोप्या उडवल्या जातात ते वाचायला मजा येते ! एकंदरीत मिपा माय फेव्हरेट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गबाळ्या
क
कंजूस Sat, 12/02/2017 - 03:15 नवीन
तिन्ही ठिकाणांवर आहे. १) ज्योतिषावर चर्चा माबोवर चांगली चालते. २) पर्यटनाचे अनुभव माबो. ३) पासपोर्ट चर्चा. आंतरराष्ट्रीय प्रश्न ऐसीवर मिपाबद्दल इथे बरेच लिहिले आहेच. *>>मिपावर तर मला अजून "शोध" सुविधा सापडलेलीच नाही.>> - मिपाचे android appपाहा त्यावरून झकास चालते शोध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गबाळ्या
ट
टवाळ कार्टा Sun, 12/03/2017 - 11:26 नवीन
२ मराठी माणसे एकत्र आली कि ३ मराठी मंडळे तयार होतात - १ माझे, १ त्याचे आणि १ दोघांचे
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गबाळ्या
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा