Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

||हुच्चभ्रूंची कैसी लक्षणे ||

अ — अनन्त्_यात्री, Fri, 12/01/2017 - 07:06
हुच्चभ्रूंचे कैसे बोलणे | हुच्चभ्रूंचे कैसे चालणे समानांशीच सलगी करणे | कैसे असे ।। दुर्बोध वाङमयाचे आधारू | क्लिष्ट व्होकॅबचे भांडारू। चोखंदळांचे महामेरू | चिवित्रान्न भोगी || उठपटांग ज्ञानराशी | उदंड असती जयांपाशी | गुगलपरिपुष्ट आयक्यूशी । तुळणा कैची ।। यांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक शष्प न कळोनि निचभ्रू लोक | वाचनमात्र राहती || हुच्चभ्रू तितुके मिळवावे । नीचभ्रू अवघे इग्नोरावे । समतोलत्वाचे देखावे | परी करावे चातुर्ये ।। अता नीचभ्रूपणाचा त्याग । करोनि साधावा सुयोग।। विदग्धतेची लगबग । येरू म्हणतो करावी ||

प्रतिक्रिया द्या
8498 वाचन

💬 प्रतिसाद (34)
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 12/01/2017 - 07:48 नवीन
लैच हुच्च झालय स्त्रोत्र पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 12/01/2017 - 08:17 नवीन
:) मस्तंच.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 12/01/2017 - 08:18 नवीन
वा!!!
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 12/01/2017 - 09:07 नवीन
वा वा!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/01/2017 - 09:13 नवीन
ह्या ह्या ह्या ह्या... जब्बार हानलय!
  • Log in or register to post comments
र
रुस्तम Fri, 12/01/2017 - 09:30 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 12/01/2017 - 09:54 नवीन
लैच =))
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 12/01/2017 - 09:55 नवीन
भन्नाट नीचभ्रू नाखु
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 12/01/2017 - 10:11 नवीन
यांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक शष्प न कळोनि निचभ्रू लोक | वाचनमात्र राहती || हा.... हा .... अग्दी पर्फे़ट ! टाळ्या, टाळ्या, टाळ्या ! चाबूक ..... तोडलंस .. मित्रा !
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 12/01/2017 - 12:24 नवीन
हुच्चभ्रूंची "ऐसी" लक्षणे मस्त!
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 12/01/2017 - 14:50 नवीन
कोणी नवा प्रसवी कथा-कविता, हुच्चभ्रूंना दिसे दवणीयता नुसते म्हणा सार्त्र-काफ्का, कंपूप्रवेश सत्वर :प कविता जब्राच!!
  • Log in or register to post comments
ग
गबाळ्या Fri, 12/01/2017 - 18:50 नवीन
मला खूप आवडले. "कमेंटती", "इग्नोरावे" हे शब्दप्रयोग मस्त आहेत. आणि लक्षणे तर चपखलच आहेत :)
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sat, 12/02/2017 - 12:50 नवीन
स्तोत्र मस्त आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 12/02/2017 - 15:03 नवीन
हुच्चभ्रूंचे बैठकीत जाऊन बैसे जो विनाकारण तोची एक मूर्ख।
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 12/02/2017 - 15:31 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 12/02/2017 - 19:58 नवीन
आमचेकडून कवितेला 'रोचक' अशी श्रेणी देणेत येत आहें. - यत्रकुत्रापि भ्रूः असि एस. ;-)
  • Log in or register to post comments
स
सचिन Sat, 12/02/2017 - 19:49 नवीन
जबरदस्त !!
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sat, 12/02/2017 - 20:47 नवीन
भीषण सुंदोर व्वा, काय ती काव्य प्रतिभा. लय भारी :) अनंताचे कैसे विडम्बने | अनंताचे कैसे लिहिणे | स्तोत्राची जिल्बी पाडणे | हुच्च् असे ।। या निमित्ताने आमचीपण झैरात प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू । अखंड जिल्बीचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।। http://www.misalpav.com/node/40845
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 12/04/2017 - 05:26 नवीन
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 12/05/2017 - 22:03 नवीन
भारीच =)
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 12/13/2017 - 07:23 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Wed, 12/13/2017 - 07:44 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 12/13/2017 - 08:11 नवीन
लै म्हणजे लैच झकास
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 12/14/2017 - 06:47 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 07:22 नवीन
हुच्चभ्रूंचे अंतर्बाह्य दर्शन घडवलेत हो. साले आमि फुकटच न्यूनगंड बाळगून जगायचो.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/14/2017 - 09:13 नवीन
लै भारी !!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 12/15/2017 - 04:59 नवीन
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 12/24/2017 - 07:09 नवीन
जबराट...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 12/26/2017 - 09:04 नवीन
आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
र
राघव Tue, 12/26/2017 - 09:29 नवीन
=)) =)) मस्त लिहिलेत बुवा! पाणी पितांना न वाचावे ऐसे काही!! ;-)
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 04/26/2018 - 11:12 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 04/26/2018 - 12:49 नवीन
दुर्बोध वाङमयाचे आधारू | क्लिष्ट व्होकॅबचे भांडारू। चोखंदळांचे महामेरू | चिवित्रान्न भोगी ||गुगलपरिपुष्ट आयक्यूशी । तुळणा कैची ।। खासच . एक नं. मजा आली
  • Log in or register to post comments
न
निओ गुरुवार, 05/03/2018 - 12:53 नवीन
हा.. हा.. लय भारी!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 05/03/2018 - 16:51 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा