Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोक

श — शब्दानुज, Fri, 12/01/2017 - 10:48
सखी तिचे गुपित माझ्यासमोर उघड करते तिने मुलांवर टाकलेल्या जाळांचे हिशोब देते प्रसंगावर या मला खळखळून हसायचे होते पण बाजुला माझ्या लोक उभे होते. नजरेने त्याच्या माझे काळीज चिरत होते वासनांचे कैवारी माझ्या पुढ्यातच बसले होते शिव्यांच्या लाखोलीसाठी अोठ अधिर झाले होते पण बाजुला माझ्या लोक उभे होते "त्यास" आज मी अखेरचे न्याहळत होते डोळ्यात त्याच्या माझा भुतकाळ पहात होते मिठित त्याच्या आजतरी पोटभर रडायचे होते पण बाजुला माझ्या लोक उभे होते. परतीच्या वाटेवरचे वाहन माझे डोळे दिपवते दुस-याच क्षणी धक्याने मी खाली कोसळते अपेक्षेने मी आजुबाजुच्या लोकांकडे मदतीसाठी पाहते पण बाजुला माझ्या लोक उभे होते ! माझे रक्तही मला सोडून जात होते बाजुची सगळी गर्दी केवळ कुजबुजत राहते माझेच गीत मी पुन्हापुन्हा गुणगूणत राहते "पण बाजुला माझ्या लोक उभे होते ??"

प्रतिक्रिया द्या
908 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा