Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

||दत्त स्तुती ||

व — वैभवदातार, Mon, 12/04/2017 - 10:31
काल झालेल्या दत्त जयंती साठी मी लिहिलेला अभंग ||दत्त स्तुती || अनसूयानंदन ब्रह्मा विष्णू महेश्वर अवतरले भूवरी दत्त दिगंबर ||धृ || तीन शिरे सहा हात रूप तुझे हाती कमंडलू भगवी वस्त्रे साजे ||१|| अनसूया माता पतीचरणी लीन चरणजल स्पर्शिता बालके तीन ||२|| त्रिशूल डमरू शंख चक्र गदा हाती मागे उभी कामधेनू श्वान पुढे वसती ||३|| भूत पिशाच्चे तुजला पाहुनिया पळती जो ध्यातो भक्तीने हृदयी त्या वसती ||४|| श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती पीठापूर कुवरपूर गाणगापूरी राहती ||५|| वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्थ अक्कलकोटी अवतार दत्तांचे रूपे कोटी कोटी ||६|| औदुंबर वृक्षातळी वास असे निरंतर दर्शन देई भक्ता अवधूत दिगंबर ||७|| त्रिगुणात्मक शक्तींचे स्थान असे तूंचि वंदन तुजला करिता सात्विक वृत्ती साची ||८|| बहुजन्मी पुण्य केले आजि फळा आले दत्तकृपा होऊनिया 'मी' पण हे गळले ||९|| दत्तचरणांवरती मी मस्तक ठेवतो कृपा असू दे अवधूता वैभव मी नमितो ||१०||

प्रतिक्रिया द्या
3211 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्रचेतस Mon, 12/04/2017 - 10:34 नवीन
अभंग, भारुड, ओवी ह्यात नेमका फरक काय?
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Mon, 12/04/2017 - 14:01 नवीन
आउट ऑफ सिलॅबस प्रश्न विचारु नका हो. त्यापेक्षा कॅलेंडर पहा, म्हणजे पुढच्या कवितेचा मुहूर्त कळेल. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 12/04/2017 - 14:51 नवीन
तुम्हास येत्या बुधवारी येणारी संकष्टी चतुर्थी अपेक्षित आहे काय ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
अ
अनन्त्_यात्री Mon, 12/04/2017 - 11:49 नवीन
...... ∞ ||
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 12/04/2017 - 13:13 नवीन
हा अभंग आहे?
  • Log in or register to post comments
B
babu b Mon, 12/04/2017 - 13:17 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 12/04/2017 - 18:11 नवीन
वैभवदातार, कविता आवडली. फक्त भुते, पिशाच्चे दूर पळतात हे दुरुस्त करायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे दत्त लिंगदेहांस गती देतो. त्यामुळे भुते, पिशाच्चे आवर्जून दत्ताकडे जात असावीत असा अंदाज आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 12/05/2017 - 08:21 नवीन
<<<फक्त भुते, पिशाच्चे दूर पळतात हे दुरुस्त करायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे दत्त लिंगदेहांस गती देतो.>>> ==>> हे जरा विस्कटून सांगता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा