Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दोन घटना

आ
आनन्दा
गुरुवार, 12/07/2017 - 06:53
🗣 57 प्रतिसाद
हल्ली हल्ली ऐकिवात आलेल्या दोन घटना. १. आमच्या शेजारच्या गावात एक वेडसर गृहस्थ होते, त्यांना वेड कधी लागले माहीत नाही, त्यापूर्वी गडगंज श्रीमन्त, कराराने आंब्याच्या बागा घेउन लाखो कमवायचे त्या काळात (१९८०), पण नंतर अचानक वेड लागले, आणि मग ते वेडाच्या भरात कसेही वागू लागले.. दणकट शरीर, कमरेला कायम कोयती, आणि शिवराळ भाषा यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जात नसे. बाबा डोक्टर होते, आणि तसा त्यांचा आणि बाबांची जुनी ओळख, त्यामुळे ते १५ दिवस, महिन्यातून एक फेरी घरी टाकायचेच. बर यायचे ते पण सरळ नाही, त्यांच्या गाण्यांचा आवाज साधारण ५०० मीटरवरून ऐकायला यायचा, आणि मग आम्ही विचार करायचो, की आता हे कोणाकडे जाणार आहेत म्हणून.. आले की कोपभर चहा, आणि थोड्याश्या गप्पा (वेडसर झालेले असले तरी व्यवहाराचे भान सुटले नव्हते. भगत झाले, वैद्य झाले, अगदी मेंटल होस्पिटलपर्यण्त नेउन झाले, पण काही गुण नाही) त्यांचे येणे म्हणजे सुट्टीला गावाला गेल्यावर थोडासा विरंगुळा होता आम्हाला. मधे मी वर्षभर अमेरिकेत गेलो, त्यामुळे मग फारसा संबंध राहिला नाही. वर्षभराने परत आल्यावर घरी गेलो तेव्हा विचारले, क्ष्क्ष्काका येतात का नाही हल्ली? तर भाऊ म्हणाला, तुला माहीत नाही? ते बरे झाले. म्हटलं कसे काय? त्यावर त्याने एक गंमत सांगितली. रत्नागिरीजवळ एका गावात कोणी गृहस्थ "बघतात", त्यांच्याकडे त्यांचा मुलगा विचारायला गेला होता. त्यांनी उपाय सांगितला. तर झालं होतं असं, की त्यांच्या घराच्या खाली एक पिंपळ होता, केव्हातरी रात्री यांनी त्या पिंपळाखाली आग घातली, त्यामुळे त्या मुंज्याने यांना पकडले होले म्हणे. उपाय काय सांगितला? तर सोपा उपाय, एका पानावर जेवण वाढून त्या पिंपळाखाली नेऊन ठेवा आणि प्रार्थना करा म्हणजे तो यांना सोडेल. त्याप्रमाणे यांनी केले, आणि ते गृहस्थ बरे झाले की हो.. पैसे किती घेतले? शून्य. घटना २: एक मुलगा ५-६ वर्षांचा, पोटात असह्य दुखते म्हणून त्याचे आईवडील त्याला रत्नगिरीतील एका चांगल्या डॉक्टरकडे घेउन गेले. शक्य त्या सगळ्या तपासण्या करून झाल्या, पण निदान होत नव्हते. पोटदुखी थांबेना. एका मीटिंगच्या वेळेस डॉक्टरने सुचवले, तुमचा कदाचित विश्वास नसेल, आणि मी सुचवणे योग्य नाही, तरी पण मला एकदा असे वाटते की तुम्ही अन्य मार्गांचा विचार करावा. एव्हढ्या सूचनेवरून ते एका "जाणत्याकडे" बघायला गेले. त्यांनी काहीतरी उपाय सांगितला पण त्याने गुण आला नाही. मग ते दुसर्‍या एका भगताकडे गेले. आता खरी गंमत सुरू होते.. तो भगत म्हणाला, की मला असा आदेश झालेला आहे की तुमचे काम अमुक अमुक माणसाकडे सोपवले आहे (त्याच्याकडेच ते अगोदर गेले होते), तेव्हा मी यात पडणार नाही. तुमचे काय करायचे ते त्यांना सांगितलेले अहे, तेव्हा तुम्ही परत त्यांच्याकडेच जा. त्याच्या सांगण्यावरून ते परत जुन्या माणसाकडे आले, तेव्हा त्याने म्हणे याच्या पूर्वजन्माची कथा सांगितली, की तो म्हणे दक्षिणेतील एका मंदिरात पुजारी होता, आणि काहीतरी पूजेची इच्छा मनात राहून गेलेली आहे, त्यामुळे त्याला हा त्रास होत आहे. तुम्ही त्या देवळात जा, आणि काही विधी सांगितले त्या देवळात करायला. (हे देऊळ तिरुपती सारखे कॉमन प्रसिद्ध देऊळ नव्हे) गंमत म्हणजे त्या मुलाची पोटदुखी त्या उपायाने गेली. पैसे? तो माझा आणि त्या पुजार्‍याचा हिशोब आहे. तुमच्याशी काही संबंध नाही. माझी तर्कबुद्धी मला या घटनांचे स्पष्टीकरण देत नाही.. नेमके काय झाले असेल? दोन्ही घटना माझ्या पडताळणीत तरी सत्य घटना आहेत.
वर्गीकरण
अध्यात्म

प्रतिक्रिया द्या
16510 वाचन

💬 प्रतिसाद (57)
ज
जागु Fri, 12/08/2017 - 10:08 नवीन
मी पण अशा गोष्टी ऐकल्या आहेत पण मला विश्वास बसायला जरा कठीण जात.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 12/08/2017 - 13:10 नवीन
जगात दोन प्रकारची स्पष्टीकरणे असतात. वैज्ञानिक आणि अवैज्ञानिक. तात्विक पातळीवर दोन्ही सारखीच कुचकामी असतात. मात्र वैज्ञानिक स्पष्टीकरण देणे नॉर्मल मानले जाते. अवैज्ञानिक स्पष्टीकरण मात्र स्वतःच्या इज्जतीच्या रिस्कवर द्यावे लागते.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 12/08/2017 - 14:16 नवीन
हि तात्विक पातळी काय असते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पुंबा Mon, 12/11/2017 - 07:47 नवीन
पैसे? तो माझा आणि त्या पुजार्‍याचा हिशोब आहे. तुमच्याशी काही संबंध नाही.
हे समजले नाही. तुम्ही पुजार्‍याला पैसे दिलेत असे का?
  • Log in or register to post comments
ए
एमी Mon, 12/11/2017 - 08:43 नवीन
मी पुजाऱ्याला पैसे दिले + मी माझे पैसे कोणाला, कशासाठी देतो तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Mon, 12/11/2017 - 09:25 नवीन
हो पण हे आनन्दा का सांगताहेत? त्यांनी का पैसे दिले? की ज्याने पैसे दिले त्याने आनन्दांना असे सांगितले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
आ
आनन्दा Mon, 12/11/2017 - 18:43 नवीन
हिशोब देवळाचा पूर्वजन्मीचा पुजारी, म्हणजेच तो मुलगा आणि सदर व्यक्ती यांचा आहे असे त्यंचे मत.. त्यामुळे प्रत्यक्ष पैशाचा व्यवहार झालेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा