Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नावातली गंमत

ग
गबाळ्या
Mon, 12/11/2017 - 08:59
🗣 80 प्रतिसाद
मिपावर मी अनेक वेगवेगळी सदस्यनामं पहिली आहेत. काही गंमतशीर, काही गूढ तर काही अतिशय बोलकी. अशी नावं, त्यांचे मतितार्थ, ते निवडण्यामागचे प्रयोजन जाणून घ्यायला सर्वांनाच खूप आवडेल म्हणून ही चर्चा. चला तर जाणून घेऊ या एकमेकांच्या सदस्यनामाबद्दल. मी मूळचा खेड्यातला. त्यामुळे राहण्या, वागण्या, बोलण्या, लिहण्यामध्ये एकंदरीतच गबाळेपणा (बऱ्याच जणांच्या लेखी खेड्यातील लोक गबाळे असतात). सफाईदार पणा नाही कि तो असल्याचा आव नाही. एकदम रोखठोक. खेड्यातला येरा गबाळा म्हणून मी "गबाळ्या" हे नाव घेतले. तुमच्या सदस्यनामाची गोष्ट काय?

प्रतिक्रिया द्या
18660 वाचन

💬 प्रतिसाद (80)
अ
अनिंद्य Fri, 12/15/2017 - 04:46 नवीन
@ गबाळ्या, लिष्टीत माझेही नाव ? सांगतो, सांगतो - अनिंद्य चा अर्थ - ज्याची निंदा होऊ शकत नाही असा जो तो (बहुव्रीही समास). मुळात अनिंद्य एक बंगाली / संस्कृत नाव आहे. माबदौलत पृथ्वीतलावर अवतरण्याची वाट बघत मातृकुक्षीत असतांना मातोश्री प्रख्यात बंगाली लेखकांची ढिगाने पुस्तके वाचीत असत. त्यापैकी शंकरच्या एका पुस्तकातल्या नायकाचे नाव होते अनिंद्य.... झाले, आम्हाला जन्मतःच हे नाव मिळाले. तस्मात - अनिंद्य हे माझे फष्ट नेम आहे, तेच सदस्यनाम घेतले आहे :-) - अनिंद्य
  • Log in or register to post comments
ग
गबाळ्या Fri, 12/15/2017 - 06:46 नवीन
तुमच्या नावाच्या उगम समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
च
चौथा कोनाडा Fri, 12/15/2017 - 16:36 नवीन
सुंदर नाव ! पहिल्यांदाच ऐकलं / वाचलं ! बाकी बंगाली नावे सुंदर्च असतात ! एक सुरेख ठेवा आहे तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
ज
जागु Fri, 12/15/2017 - 05:51 नवीन
छान इंटरेस्टींग धागा. चित्रगुप्तची व्याख्या मस्त आहे. माझ माहेरच नाव जागृती आणि माझ्या बर्‍याच मैत्रीणी जागु म्हणून हाक मारतात म्हणून मी माझा आयडी जागु ठेवला.
  • Log in or register to post comments
ग
गबाळ्या Fri, 12/15/2017 - 06:47 नवीन
चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि तुमच्या सदस्यनामाच्या माहिती बद्दल ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
प
पगला गजोधर Fri, 12/15/2017 - 07:56 नवीन
मी पुण्यपत्तनस्थ असलो तरीही विद्वान नाही, प्रत्येकवेळा मला, का ? कसं काय ? असे अनेक प्रश्न पडतात... जगभर फिरलो आणि २ बुकं जास्त शिकलो तरीही, जगात आजूबाजूचे आजही खूप काही शिकवून जातात... अजूनही मला माझ्यातल्या अज्ञानाची जाणीव सहज करून देतात. लोकांनी 'उत्तर' असे म्हटले, की मला 'दक्षिण का नाही ?' हा प्रश्न विचारावासा वाटतो.... .. म्हणून मी 'पगला'... आणि मध्यंतरी राजू श्रीवास्तव ने गजोधर हे गावंढळ काल्पनिक पात्र उभे केलेले, ते आवडले म्हणून 'गजोधर'
  • Log in or register to post comments
ग
गबाळ्या Fri, 12/15/2017 - 20:34 नवीन
वाह वा ! तुम्ही स्वतःला जरी "पगला" म्हणवून घेत असला तरी तुम्ही खरे साधक वाटता. सत्य आणि माहितीच्या शोधात असलेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ट
टर्मीनेटर Fri, 12/15/2017 - 09:45 नवीन
मला हे नाव घ्यावेसे वाटण्याचे कारण असे कि, मी अनेक वर्षे मिपा चा वाचक होतो त्यामुळे अनेक जणांचे रोचक व हटके आयडी परिचयाचे होते. पण एकदा कुठल्या तरी धाग्यावर मला प्रतिसाद द्यावासा वाटला त्यासाठी सदस्यत्व घेणे भाग होते.फॉर्म भरत असताना नेमका त्यावेळी कुठल्यातरी चॅनल वर आर्नोल्ड श्वार्झनेगर चा "द टर्मिनेटर" हा चित्रपट सुरु होता.मग काय आधी लिहिलेले स्वतःचे नाव काढून घेतला मी 'टर्मीनेटर' हा आयडी.
  • Log in or register to post comments
ग
गबाळ्या Fri, 12/15/2017 - 20:35 नवीन
"द टर्मिनेटर" भारी चित्रपट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
म
मराठी कथालेखक Fri, 12/15/2017 - 14:24 नवीन
माझ्या आयडी बद्दल फारसे काही सांगण्यासारखे नाही.. साधा सरळच आहे.. मिपावर एक कथा प्रकाशित करण्याच्या हेतूने आलो होतो मग पुढेही लिहित राहिलो.
  • Log in or register to post comments
ग
गबाळ्या Fri, 12/15/2017 - 20:35 नवीन
तुमच्या कथा नक्कीच वाचू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ग
गामा पैलवान Fri, 12/15/2017 - 20:55 नवीन
गबाळ्या, अस्मादिकांना काय नाव घ्यावं ते सुचेना. मग मनाला भावणार्‍या वैशिष्ट्यांची एक यादी बनवली. त्यानुसार सदस्यनाव कसं असावं याचे ठोकताळे बांधले. १. नाव प्रसिद्ध असावे, पण सर्वतोमुखी नको. बाजीराव, शिवाजी, इत्यादि बाद. २. नाव शक्यतो भारतीय असावे. आईन्स्टाईन, नील्स बोर, इत्यादिंना गौणप्राधान्य. ३. नावातून क्षात्रवृत्ती सूचित व्हावी. त्यामुळे सेनानी, क्रांतिकारक, खेळाडूंना प्राधान्य. ४. या नावाने आचरटपणा करण्यास शरम वाटू नये. त्यामुळे स्वातंत्र्यसेनानी (टिळक, सावरकर, इत्यादि) बाद. भारतीय शास्त्रज्ञही (सत्येंद्रनाथ बसु, जगदीशचंद्र बसु, चंद्रशेखर व्यंकट रामन, श्रीनिवास रामानुजन, इत्यादि) बाद. ५. नाव फार प्राचीन नको. शक्यतो अर्वाचीन असावे. कारण प्राचीन नावे खूपदा सर्वतोमुखी असतात. या सर्व चाळण्यांतून शेवटी सेनानींची ३ नावे उरली. जर्मन विद्युच्चढाईचा (ब्लिट्झक्रीग) जनक हाईन्झ गुडेरियन, फ्रेंचांना (१९५४) आणि अमेरिकनांना (१९७६) व्हियेतनामात धूळ चारणारे जनरल ङ्गुयेन गियाप आणि राघोबादादा उपाख्य राघोभरारी. राघोबादादा फार बदनाम आहेत. जनरल ङ्गुयेन गियाप यांची मराठीतली आद्याक्षरे गुंगी अशी काहीशी होतात. हाईन्झ गुडेरियनची आद्याक्षरे तर विचारायलाच नकोत! मग क्रीडाक्षेत्राकडे काही मिळतंय का ते बघूया म्हंटलं. सुदैवाने पारंपारिक भारतीय मल्लविद्येचा मानकरी सापडला. तो आयुष्यात एकही लढत हरला नव्हता. इंग्लंडच्या दौर्‍यात अनेक नामवंत युरोपीय मल्लांना सहज धूळ चारली. जगप्रसिद्ध कुस्तीगीर होऊनही तो शेवटपर्यंत उतला नाही, मातला नाही, घेतला वसा टाकला नाही. त्याचं नाव गामा पैलवान. अशी आहे अस्मादिकांच्या सदस्यनामनिवडीची चित्तरकथा! ही कथा आगोदर मायबोलीवर प्रकाशित झाली आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गबाळ्या Fri, 12/15/2017 - 22:01 नवीन
वाह! गामा पैलवानजी वाह ! मिपाकर नाव निवडताना इतका विचार करून नाव निवडतात हे आमच्या समोर आणून दिल्याबद्दल धन्यवाद !!! हि कथा तुम्ही आम्हाला सांगितली नसती तर कधीच कळाली नसती. तुमची निवड मस्त आणि प्रेरणादायी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चौथा कोनाडा Wed, 12/27/2017 - 10:03 नवीन
भारी आहे स्टोरी, तुमच्या नावा मागची ! अन नाव हटके, युनिक आहे, आवडलं हे सांगायला नकोच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चामुंडराय Mon, 12/18/2017 - 02:34 नवीन
गबाळ्या साहेब, आमच्या नावाचे जाऊ दे पण तुम्ही तुमचे नाव सार्थ केले बर्का. स्वतःला खेड्यातला येरा गबाळा म्हणवताय पण अंतरी नाना कळा - इतरांना छान लिहायला लावलेत. माझ्या नावाचे म्हणाल तर माझ्या माहितीप्रमाणे मराठीतील पहिला शिलालेख चामुंडरायाने लिहिला म्हणून त्यापासून प्रेर्ना घेऊन आंजावर पांढऱ्यावर काळे करण्यासाठी तेच सदस्य नाम घेतले.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 12/18/2017 - 02:43 नवीन
मराठीतील पहिला शिलालेख चामुंडरायाने लिहिला
माफ करा, पहिला "लिहिला", हे सयुक्तिक वाटत नाही, तर आतापर्यंत "आढळलेल्या" पुराव्यात, हा शिलालेख सर्वात जुना. त्याही पेक्षा जुना शिलालेख जर उद्या पुरातत्व विभागाला सापडला, तर सदर उल्लेखलेला शिलालेख सेकंड लास्ट जुना होईल.... तुमच्या माहिती साठी, बहुतेक कर्नाटकातच कुठेतरी,एका मंदिराच्या भिंतीवर मराठी वाक्य आहे त्यापेक्षाही जुने. . पण मला खात्री नाही, कोणी जाणकारच सांगु शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
ग
गबाळ्या Mon, 12/18/2017 - 23:19 नवीन
चामुंडराय, आपला आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
च
चामुंडराय Mon, 12/18/2017 - 19:55 नवीन
पग साहेब, मी देखील या बद्दल मिपावरच वाचल्याचे स्मरते परंतु ती माहिती किती खरी आहे या बद्दल साशंकता आहे म्हणूनच माझ्या माहितीप्रमाणे असा उल्लेख केला आहे =)
  • Log in or register to post comments
ओ
ओरायन Tue, 12/19/2017 - 18:48 नवीन
वा चांगलाच धागा आहे, आयडी जन्मकथांसाठी.. लहानपणी , आम्हीं मुले, वडील, भाऊ किंवा अन्य नातेवाईक उन्हाळ्याच्या दिवसात, राञी उकाड्यामुळे गच्ची वा टेरेसवरी झोपत असु. डोळ्यांसमोर विस्तीर्ण आकाश ..व त्यातील अगणित तारे..मग कोणी जाणकार ग्रह,तारे, नक्षञ..यांची नावे सांगत.कशी ओळखायची ते सांगत..मृग नक्षत्र.ओळखू यायला लागले.व गंमत ,कुतूहल वाटु लागले.ज्या मृग नक्षत्राने मला प्रधमच ओळख करून दिली..त्याची मोहिनीै अजुनपण तेवढ्याच प्रमाणात आहे..जसे इंग्रजीतील अल्फाबेटस् मधील ऐ प्रधम, तसेच आकाश न्याहाळतांना, ओरायन किंवा मृग नक्षत्र प्रथमच...म्हणून माझा आयडी तोच.
  • Log in or register to post comments
ग
गबाळ्या Fri, 12/22/2017 - 21:06 नवीन
ओरायन, खूपच सुंदर! लहानपणीचे खेड्यातले माळवदावर झोपण्याचे दिवस आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओरायन
श
शब्दानुज Wed, 12/20/2017 - 11:05 नवीन
आमची कथा मी लहान असताना (अजुनही लहानच आहे.. लहान म्हणजे खुप लहान ) आम्हाला प्रसिद्ध लेखक आणि त्यांची टोपणनावे पाठ करावी लागायची. त्यात कुठले तरी बापु होते. (बघा आमचे पाठांतर ) मग शाळेत आम्ही आमचे नाव कुबड्याबापु असे ठेवले आणि काहीबाही लिहित गेलो. पण मग कॉलेज करत असताना असले नाव ठेवले असते तर 'इंप्रेशन' कसे पडणार म्हणून नाव बदलायचे ठरवले. (अर्थात अभियांत्रिकीच्या गदारोळात असाइनमेंटचे लिखाण देणाराच प्रसिद्ध होत असे आणि आमचे टोपणनाव जाणून घेण्यासाठी अजुनपर्यंत कुणीच आले नाही..हाय रे कर्मा..) शाळेत खुपसे अनुज आणि अग्रज होते. मग तेच लावू असे ठरले. पण यात मेख अशी की मी एकूलता एक. त्यामुळे अग्रज वा अनुजच्या शक्यता नव्हत्या. शेवटी शब्दांनाच आपले भाऊ मानले आणि आम्ही झालो शब्दानुज.. मिसळपाववर तेच नाव वापरत आहे आणि पुढे.. पुढे काही नाही. एवढचं..!
  • Log in or register to post comments
ग
गबाळ्या Fri, 12/22/2017 - 21:07 नवीन
शब्द खरोखरच तुमचे भाऊ आहेत असे वाटायला लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज
ग
गावठी फिलॉसॉफर Wed, 12/20/2017 - 11:17 नवीन
गावात कोणालाही फुकटचे सल्ले देत फिरणारा आणि नवीन फिलॉसॉफी मांडणारा.... गावठी फिलॉसॉफर
  • Log in or register to post comments
ग
गबाळ्या Fri, 12/22/2017 - 21:08 नवीन
आमच्या गावातल्या काही लोकांची आठवण आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गावठी फिलॉसॉफर
व
वकील साहेब Mon, 12/25/2017 - 12:55 नवीन
व्यवसाय, पेशा अथवा चरितार्थाचा एकमेव उद्योग वकिली हाच आहे. कधीही कुठेही गेलो की नावाने कुणी हाक मारल्यावर मागे वळून पाहण्याच्या शक्यते पेक्षा कुणी वकील साहेब म्हणून हाक मारली तर अस्मादिकांनी मागे वळून पाहण्याची शक्यता अधिक. पेशा मुळे हे नाव शरीरालाच चिकटले म्हणायचे म्हणून आम्ही वकील साहेब
  • Log in or register to post comments
द
दासबोध.कॊम Wed, 12/27/2017 - 09:27 नवीन
मिपाकरांची नावे वाचताना असे लक्षात आले की यातली बरीच नावे ही अनावश्यक आणि आचरट आहेत. त्यातून कुणाला काही बोध होण्याची तीळमात्र शक्यता नाही. मी इंटरनेटवर सतत नवीन काहीतरी शोधून वाचन असतो .हे वाचता वाचता वरील नावाचे एक संकेतस्थळ पाहण्यात आले. ते बनवणार्‍यांनी खरच मेहनत घेऊन हजारो पुस्तके त्याच्यावर उपलब्ध केलेली आहेत, असे लक्षात आले. त्यामुळे असे ठरवले की हेच नाव घ्यावे ,त्यानिमित्ताने कोणालातरी उत्कंठा उत्पन्न होऊन ,जाऊन दे संकेतस्थळ तरी पाहतील आणि फायदा होईल त्यांचा. खरच एकदा सर्वांनी जाऊन ते संकेतस्थळ पहावेच. दरम्यान लोकांनी मलाच या संकेतस्थळाचा कर्ता म्हणून टाकले ! असे ना हरकत नाही !
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 12/27/2017 - 10:40 नवीन
शीर्षक आणि वस्तुस्थितीत फरक असतो कधी कधी ;) हार्ड अँड फास्ट नाही पण दिस्क्लेमर आधीच प्रोफाईल पानावर टाकले की दिशाभूळ होणे टळते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दासबोध.कॊम
प
पुंबा Fri, 12/29/2017 - 10:24 नवीन
तसं माझं आधीचं नाव 'सौरा' होतं, पण सौंदर्य सारखीच कुचंबणा माझी पण झाली, सगळ्यांना तो मुलीचा आयडी वाटलेला. म्हणून मग बदलून पुंबा घेतलं. पुंबा हे माझे सर्वात आवडते कॅरेक्टर आहे. तसा लायन किंग हा चित्रपटच मला महत्प्रिय आहे पण यातले टिमॉन अँड पुंबाची जोडी अफाट आवडते. शक्तिशाली पण अतिशय निरागस असणारा, कुणाच्याही मदतीला धावून जाणारा, स्वार्थी अश्या टिमॉनच्या मैत्रीचे मोल जाणणारा, 'हाकुना मटाटा' असा मंत्र जगणारा करूणामयी पुंबा. मला आवडतो आणि म्हणून तेच सदस्यनाम घेतलं.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 12/29/2017 - 18:29 नवीन
मी ही कुठली तरी आद्याक्षरे असावी असे समजत होतो नित्यानंद नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ग
गामा पैलवान Sat, 12/30/2017 - 10:28 नवीन
मलाही ते पुंडलिक बारटक्के वाटलेलं. नर्मदाबाईंचे बंधू असावेतसा अंदाज होता. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा