आधार कार्ड - अपडेट आणि नेमकी माहिती...
नमस्कार मिपाकर्स..
आधार कार्ड काढणे / न काढणे व वेगवेगळ्या ठिकाणी लिंक करणे याची भवती न भवती बरेच दिवस सुरू आहे.
३१ डिसेंबरला आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आणि ३१ मार्च पर्यंत मोबाईल सर्विस प्रोव्हायडरला देणे आवश्यक ही बातमी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऐकली होती. यानंतर हळूहळू ओला आणि अॅमेझॉनचेही आधार कार्ड लिंक करा असे मेसेज येऊ लागले. बँक आणि मोबाईलच्या मेसेजला कधीच फाट्यावर मारले आहे. त्यामुळे ओला अॅमेझॉनचा प्रश्नच नाही.
याबाबत शोधाशोध करून फारसे हाती लागले नाही त्यामुळे इथे काथ्याकुटात धागा काढत आहे.
माझे वैयक्तिक विचाराल तर सरकारकडे / NIC कडे आपला महत्वाचा डेटा नीट सांभाळणारी व्यवस्था / यंत्रणा आहे का? व कितपत कार्यक्षम आहे याची मला वैयक्तीक शंका असल्याने अजूनही आधार कार्ड काढले नाहीये. अगदीच नाईलाज झाला तरच काढेन.
या धाग्यावर आधार कार्ड संबंधी महत्वाचे अपडेट, तुमची मते, तुमचा सरकारी यंत्रणेचा NIC चा अनुभव वगैरे वगैरे माहिती देऊन ज्ञानात भर टाकावी ही विनंती.
एचडिएफसी बँकेने पासपोर्ट + ग्रीन कार्ड पाहून तिकडेच मागे कळवले होते - इकडे येण्याची गरज नाही तिकडूनच खाते चालवा. नो प्राब्लेम.असे नुसते बँकेला कळवून फायदा नाही. परदेशी स्थायी वास्तव्याचे पुरावे (रेसिडेंट व्हिसा व अॅड्रेस प्रूफ) देऊन, बँकेतले "एसबी" खाते "एनआरओ" खात्यात परिवर्तित केले असते, तर असे झाले नसते.