Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काथ्याकूट

भ
भीमराव
गुरुवार, 12/14/2017 - 16:55
🗣 3 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, रामराम, कस्काय बरय ना? सहज विचार करत होतो कि बाबा आपल्याला मिसळपाव का आवडतं? आसं काय आहे ईथं जे सारखं ईथ यायला भाग पाडतं? वाचायला मिळणारे वैविद्ध्यपुर्ण लेख आणि ईथ होणाऱ्या स्पर्धा यांच्यासोबतच ईथ अजुन १ गोष्ट आहे ती म्हणजे काथ्याकूट. जुण्या काळापासुन आपल्या लोकांना लष्कराच्या भाकरी भाजणे, स्वतःचच खरं करणे, वाद घालने याचे लै लै नाद, त्याच नादाचं हक्काचं आपलं हे व्यासपीठ, परंतु काथ्या कुटत असताना काही लोक्स खंडीच्या वरणात लघुशंका करायला नटुनच बसलेले असतात. या काथ्याकुटातुन होणारे स्कोर सेटलींग व फाटे फोडणे सोडलं तर हा विभाग कडक टिआरपीचा आहे, तर नमनाला एवढ तेल सांडुन मला फक्त इतकच विचारायच/सांगाय/सुचवायच होतं की, आपण दिवसांचे बंधन देऊन काथ्याकूट महाचर्चा ठेवायची का? विषय ठरवुन द्यायचा, सहभागी सदस्य सुद्धा आधीच ठरवायचे, दिवसांच(ठराविक काळाने चर्चा बंद व्हावी) व शब्दांचं प्रतीसादासाठी बंधन(फापटपसारा टाळण्यासाठी) ठेवायचं, आणि चर्चा-परिसंवाद-काथ्याकूट करायला आमंत्रीत करायचं, या मधे वाचकाची भुमिकेत असलेल्या मिसळपावकऱ्यांना सुद्धा प्रतीसादाचा अधिकार ठेवता येईल पण ऊगाच पिंक टाकणारे कमी नाहीत, तर मंडळी कस्काय मंग करायचा का बेत?
वर्गीकरण
प्रस्ताव

प्रतिक्रिया द्या
1797 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ज
जानु गुरुवार, 12/14/2017 - 18:53 नवीन
मिपा चा झी आणि आजतक करायचा का?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 12/14/2017 - 21:53 नवीन
थोड्क्यात बिर्याणीचं फोडणीच्या भातात रूपांतर करायचं. अजिबात नको!!
जुण्या काळापासुन आपल्या लोकांना लष्कराच्या भाकरी भाजणे, स्वतःचच खरं करणे, वाद घालने याचे लै लै नाद, त्याच नादाचं हक्काचं आपलं हे व्यासपीठ, परंतु काथ्या कुटत असताना काही लोक्स खंडीच्या वरणात लघुशंका करायला नटुनच बसलेले असतात.
काही प्रमाणात खरं आहे. पण जर आविष्कारस्वातंत्र्याचा पुरस्कार करायचा असेल तर पॉर्न सहन करण्याची तयारीही हवी! नसेल तर पान उलटण्याची सुविधा आहेच.. जुण्या काळातला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 12/16/2017 - 09:59 नवीन
> आविष्कारस्वातंत्र्याचा पुरस्कार करायचा असेल तर पॉर्न सहन करण्याची तयारीही हवी! पॉर्न सहन करावं लागतं ? बहुतेक लोक तर आनंदाने त्याचा उपभोग घेतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा