भावगीत
( धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना.. ह्या भावगीताच्या चालीवर म्हणता येते.)
दोन जीवांची इथे भेट झाली
रात्र सारी आज चांदण्यात न्हाली ||धृ ||
तुला पाहता मन हे मोहरले
तुझे माझे नेत्री शब्द अश्रूरूप झाले
शब्दावीण संवाद अंतर्यामी झाला
तुझे माझे मनी आज अनुराग झाला ||१ ||
तुझे लाजणे ते अन् हसून बघणे
मोग-यांचे गजरे केसांत गं माळणे
तुझ्या स्पर्शाने तनु रोमांचित होई
तुझा आणि माझा श्वास एकरूप होई ||२ ||
तुझे माझे नाते चिरंतन राहो
प्रेमभाव आपुल्या मनी वृद्धिंगत होवो
एकमेका साथीने जीवन जगणे
शरीरे वेगळी मन एकरूप होणे ||३ ||
कवी आणि गीतकार : वैभव दातार
भ्रमणध्वनी :८८९८४८२३८२
💬 प्रतिसाद
(3)
क
कपिलमुनी
Mon, 12/18/2017 - 13:45
नवीन
छान आहे गीत !
- Log in or register to post comments
व
वैभवदातार
Mon, 12/18/2017 - 14:32
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 12/18/2017 - 15:15
नवीन
हिमाचल विजय-पराजय यावर काव्य सुमन यावे
अखिल मिपा खफ चा धागा आणि धाग्याची धुळवड, कब्बडी वजा चर्चा केली संघाच्या नियमित हुकुमी सदस्यांनी केलेली एकमुखी मागणी
- Log in or register to post comments