Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सवाई संगीत महोत्सव हा सांस्कृतिक दहशतवाद?

द
दासबोध.कॊम
Fri, 12/22/2017 - 12:28
🗣 79 प्रतिसाद
(आपल्या संगीतप्रेमी मित्रांना खालील पुरावे अवश्य वाचावयास द्या!) सवाई महोत्सव हा सांस्कृतिक दहशतवाद- इति मंबाजी बीग्रेड (संगीत, अर्थात पंधरावे महापातक) नुकताच पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात, आनंदात पार पडला. या आनंदात विरजण पाडायचे काम संभाजी महाराजांचे नाव घेऊन चालविल्या जाणा-या एका टोळीने केले. त्याचा परिणाम असा होऊ शकतो की रसीक श्रोते मराठा समाजाला नावे ठेऊ शकतात, तसे झाले तर तो आपल्या शत्रूचा विजय ठरेल. तसा तो ठरू नये म्हणून हा लेखन प्रपंच. समर्थ रामदास मोठेच संगीत प्रेमी! आजही हिंदुस्थानी शास्त्रीय संगितात रामदासी मल्हार इ. नावात रामदासी असा शब्द असलेले समर्थ निर्मित राग गायले जातात. संगीतगायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धातमाता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, दस्तक टाळी दे रे राम,(ताल शास्त्रातले काही प्रकार आहेत हे) नृत्यकला मज दे रे राम असे रामाकडे मागणे मागणारे समर्थ त्यामुळेच परंपरेने संगीताचे जतन व संवर्धन करण्यास सांगतात. समर्थ परंपरेतील शिष्य असलेले तंजावर नरेश व्यंकोजीराजे भोसले यांचे पुत्र तुळजेंद्रराजे भोसले यांनी समर्थांच्या मण्णारगुडी येथील मठात बसून लिहिलेला संगीत-रस-सारामृत हा ग्रंथ, संगीत शास्त्रातला खूप महत्वाचा ग्रंथ आजही मानला जातो. (www.dasbodh.com वर उपलब्ध) असो, तात्पर्य, आपली संस्कृती ही संगीतास पूज्य मानणारी आहे. म्हणूनच आपली सरस्वती वीणा धरण करते, कृष्ण मुरली धारण करतो, गजानन मृदंग धारण करतो. मग ब्रिगेडला संगिताचे वावडे का? असा प्रश्न तुम्हाला पडाला असेल तर तुम्ही अजूनही ब्रिगेडला हिंदूच समजण्याची चूक करीत आहात. आम्ही गेली अनेक वर्षे कंठशोष करून सांगत आहोत की ब्रिगेड मध्ये एकही अस्सल रक्ताचा मराठा नाही. हा सर्व बाटग्यांचा भरणा असून त्यांना विशेष रूपाने आर्थिक सहाय्य इस्लामिक देशांमधून चालविल्या जाणा-या जिहादी संघटनांकडून आहे. त्यांचा “जाणता” रझा कोण आहे हे ही आपणास ठाऊक असेलच. परंतु याचा आणि सवाई चा काय संबंध? संबंध आहे ना! असे आहे, की इस्लाम मध्ये संगीत निशिद्ध मानलेले आहे! त्यामुळेच इस्लामचे तळवे चाटणा-या ब्रिगेडी(संपादित)ना स्वराधिराज भारतरत्न पं. भीमसेन जोशींनी सुरु केलेली ही सांस्कृतिक चळवळ एक दहशतवादच वाटणार यात नवल नाही! खरी पोटदुखी अशी आहे की या उत्सवाच्या निमित्ताने अनेक मुसलमान गायक-वादक-कलाकार आपली कला सरस्वतीदेवी चरणी अर्पण करतात! हे इस्लामच्या विरोधातले आहे! त्यामुळे हे असले बाटगे पुढे करून याला खरा विरोध कट्टर मुसलमानच करत आहेत याबाबत आम्हाला शंकाच नाही. सवाई मध्ये आजवर कला सादर केलेल्या जन्माने मुसलमान पणा वर्तनाने हिंदुस्थानी कलाकारांची खालील यादी पहा म्हणजे सर्व ध्यानात येईल! उ. झाकीर हुसेन, उ. विलायत खां साहेब, उस्ताद अमजद अली खां, उ. उस्मान खां, बेगम परवीन सुल्ताना (या तर चक्क कुंकू लावतात!), उस्ताद अमान अली बंगश, उस्ताद अयान आली बंगश, उ. शुजाद हुसेन खान, उस्ताद अल्ला रखा खां, उस्ताद शौकत हुसेन खां, उस्ताद रफ़िकुद्दिन सबरी, उस्ताद डांगर बंधू, उस्ताद बिस्मिल्ला खा, उस्ताद निशात खां, उस्ताद इर्शाद खां, उस्ताद सुल्तान खां, ....यादी मोठी आहे व न संपणारी आहे. तात्पर्य: सवाई गंधर्व ला विरोध संभाजीराजांच्या विचारांचे वारस करत नसून त्यांना हाल हाल करून संपविणा-यांच्या विचारांचे वारस करीत आहेत.आपण जाणताच, आपण पुराव्याशिवाय काही बोलत नाही, त्यामुळे हे घ्या पुरावे. इस्लाम आणि संगीत इस्लाम नुसार संगीत हे पंधरावे महापाप आहे. इस्लाम मधील धर्ममार्तंडांच्या मतांनुसार आणि धर्मग्रंथांनुसार संगीताला निषिद्ध अर्थात हराम मानलेले आहे. ज्यात गायन, स्वरवाद्य वादन, तालवाद्य वादन, नृत्य, संगीत श्रवण, वाद्य विक्री व खरेदी या सर्व बाबींचा समावेश केलेला आहे. या सर्व बाबी आता आपण पुराव्यानिशी पाहूयात. वाक्य व पुढे कंसात पुरावा क्रमांक दिलेला आहे. इमाम जफ़र अस-सादिक सांगतात की प्रेषिताने सांगितले आहे, "मी बासरी, ड्रम आणि तबला वाजविणे तुझ्यासाठी निषिद्ध केलेले आहे." (1) प्रेषित(स.) असेही सांगतात की, "सर्वशक्तिमान देव अल्लाहने लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, जगावर एक दया म्हणून मला पाठविले आहे आणि त्याने बासरी वादन, वाद्य वादन, आवाजाचे सर्व खेळ, मूर्ती (पूजा) आणि अज्ञानींच्या सर्व सवयींचा नाश करण्याचे आदेश दिले आहेत. " (2) इमाम जफ़र अस-सादिक सांगतात, "ज्या व्यक्तीने अल्लाहकडून आशीर्वाद प्राप्त केले आहे आणि जेव्हा हे आशीर्वाद घेऊनही तो बासरी वाजवतो तेव्हा असे करून जणू तो त्या आशीर्वादांचा आव्हेरच करतो आहे. "(3) सहाव्या इमाम (ए.एस.) यांनी असेही सांगितले आहे की, "जसे पाणी हिरवळ(शेवाळे) वाढायला मदत करते तसेच व्हायोलिन वाजविणे हे ढोंगीपणाला प्रोत्साहन देते. " (4) इमाम (अ.)असे देखील म्हणतात, "जर ड्रम आणि झांजा एकाद्या मुसलमानाने चाळीस दिवस आपल्या घरात वाजविल्या, तर अल्लाह 'फ़कंदर' नावाच्या एका सैतानाला त्या घरी पाठवितो. सैतान त्या व्यक्तीच्या शरीराच्या प्रत्येक पेशी मध्ये घुसून जातो. या सैतानाच्या प्रवेशामुळे ती व्यक्ती आपला आत्मसन्मान आणि स्वत:ची कीर्ती इ. सर्व काही गमावून बसतो. मग तो जे काही बोलतो किंवा त्याच्याविषयी कोण काय म्हटले आहे त्याबद्दल तो काळजी करणार नाही. मग, या माणसामध्ये हा सैतान वारा फ़ुंकतो. परिणामी तो निर्लज्ज होतो. इतका की त्यामुळे त्याचा स्त्रियांचा अपमान/शीलभंग झाल्यास त्याचेही त्याला काही सोयरसुतक असण्याचा काहीही संबंध येत नाही. " (5) मुअद्दा इब्न ज़ियाद म्हणतो, "मी इमाम जाफर अब्द-सौदी (ए.एस.) च्या सहवासात होतो, जेव्हा एका व्यक्तीने म्हटले होते की," मी शौचालयात जातो तेव्हा माझ्या शेजारच्या मुली गातात ते मला ऐकू येते. कधीकधी, मी (शौचालया मध्ये) जास्त वेळ बसून राहतो जेणेकरून मी अधिक काळा ते गाणे ऐकू शकेन. " त्यावर चिडून इमाम (ए.एस.) म्हणाले: "संगीत आणि गाणी लक्षपूर्वक ऐकण्यापासून परावृत्त हो, हे थांबव! " मग हा मनुष्य पुढे म्हणाला, "मिया, मी संगीत संमेलनांना जात नाही! मी फक्त कानावर सहज पडेल तेच ऐकतो! " इमाम जाफर अस-सादिक (ए.एस.) म्हणाले, "तुम्ही या कुराणाच्या आयती वाचल्या नाहीत काय ... “खरोखरीच ते ऐकणे, ते पहाणे व त्याचे मनन करणे, हे सर्व त्याला प्रश्नार्थकच आहे” (सूरत अल-ईस्रा ', 17:36) त्या मनुष्याने उत्तर दिले, "मला या विषयी माहिती नव्हती. मी माझ्या कृत्यांबद्दल खेद वाटतो, भविष्यात मी असे करणार नाही. मी माझ्या पूर्वीच्या पापांसाठी पश्चात्ताप करतो आणि मी माझ्या पालनकर्त्याकडून क्षमा मागतो. " त्यांची अवस्था पाहून इमाम (अ.) म्हणाले, "उठ ! जा आणि घुस्ल कर आणि सलात कर आणि माफी साठी प्रार्थना कर. (चुकून कानावर पडलेले गाणे ऐकून) तू निश्चितपणे एक भयानक व प्राणघातक पाप केलेले आहेस आणि एका भयानक परिस्थितीत तु सामील झाला आहेस. तु त्याकरिता पश्चात्ताप केला आहे आणि मी त्यासाठी अल्लाहचा आभारी आहे. आणि मी ज्या गोष्टी त्याला नापसंत आहेत त्या सर्व गोष्टींसाठी अल्लाहची क्षमा मागतो. निश्चितच, अल्लाह केवळ वाईट गोष्टींना नापसंत करतो. वाईट गोष्टी वाईट लोकांसाठीच सोडा कारण त्यांचे भवितव्य वेगळॆच असणार आहे.” (6) अमीर उल-मुमिनिन 'अली (ए.एस.) म्हणतात, "ज्या घरात वाइन असते किंवा ड्रम, खंजिरी/डफ़, किंवा बासरी वाजविणारे असतात त्या घरात देवदूत पाऊल सुद्धा ठेवत नाहीत. या घराच्या रहिवाशांच्या प्रार्थना देखील अल्लाहला अस्वीकार्य आहेत. ते बरकतीपासून (भरभराटीपासून) वंचित ठेवले जातात. " (7) हजरत इमाम अली आर-रिदा (अ.) म्हणाले आहेत, "वाद्य वादन ऐकणे हे मोठ्या पापांपैकी एक आहे." (8) मुहम्मद पैगंबर (स.) म्हणतात, "सतार वाजविणारा व्यक्ती कयामत च्या दिवशी काळ्य़ा तोंडाचा करून मगच पेश केला जाईल.. त्याच्या हातात आगीची सतार धारण केलेली असेल. अग्नीच्या ज्वाळांनी धगधगणा-या गुर्ज नावाच्या शस्त्राने ७०,००० देवदूत त्याला तोंडावर आणि डोक्यावर मारत रहातील. गायक आपल्या कबरीमधून उठतानाच अंध, बहिरे आणि मुके बनून बाहेर येतील. व्यभिचार करणा-यासारखीच त्याची अवस्था होईल (थोडक्यात संगीत उपासना व व्यभिचार ही प्रेषितांच्या मते एकाच दर्जाची पापे आहेत). तालवाद्ये वाजविणारे व बासरी वाजविणारे यांचेही हेच हाल होतील " (9) हजरत इमाम 'अली आर-रिया (ए.एस.एस.) टीका, "एक व्यक्ती दैवी संताप निमंत्रित करते तेव्हा बासरी वादन, ड्रम वादन आणि बुद्धिबळा सारख्या गोष्टी त्याच्या घरामध्ये चाळीस दिवस चालत असतात. जर या चाळीस दिवसात त्याला मृत्यु आला तर त्याला एखाद्या पापी व धर्माचे नियम मोडणा-या माणासाप्रमाणे गती मिळेल. त्याची जागा जहान्नुम मध्ये( नरकात) असेल. आणि हे किती भयंकर ठिकाण आहे! " (10) फजल इब्न शाजाइन यांनी इमाम अली अर-रिदा (ए.एस.एस.) यांचे मतानुसार,संगीत म्हणजे मोठे पाप आहे म्हणून सांगितले आहे: "आणि वाद्य वाजवण्याच्या धुंदीत असणे हे देखील मोठे पाप आहे." (11) सर्व मुजाहिदीन लोकांसाठी, इस्लामी मतानुसार एकमते हे सत्य आहे की वाद्य निर्मिती, विक्री आणि खरेदी हे हराम/निशिद्ध आहे आणि संगीत क्रियाकलापांमधून मिळणारे उत्पन्न हे सुद्धा हराम आहे. संगीत वाद्यांचा समावे समावेश असलेले सर्व व्यवहार अवैध आहेत. वाद्य बाळगणे देखील हराम आहे. त्यांना (वाद्ये व ते बाळ्गणारे, वाजविणारे, संगीत उपासना करणारे) नष्ट करणे आवश्यक आहे. "तोहफुल उकुल" या पुस्तकात नोंद झालेल्या इमाम जाफार अ-सौदीक (ए.एस.)त्याचप्रमाणे, शेख हुर अल -मिमिली याने इमाम जफर अल सादिक (ए.एस.) पासून खालील परंपरा नोंदविली: "अल्लाहने सर्व प्रकारच्या वस्तूंचे निर्माण करण्यास मनाई केली आहे जी केवळ हरम पद्धतीने वापरली जाते; आणि अशा गोष्टी ज्या फक्त पाईप (एक वाद्य), बासरी, बुद्धीबळ आणि सर्व प्रकारचे जुगार, प्रतिमा, पुतळे यांसारख्या वाईट गोष्टी निर्माण करतात. या सर्व वस्तुंची निर्मिती हराम आहे. " इमाम (ए.एस.) शेवटी म्हणाले, "मग गाणे किंवा संगीत शिकणे व शिकविणे, संगीत गाणे व संगीत वाजविणे, या गोष्टींसाठी पैसे देणॆ किंवा घेणे किंवा या दोन्ही दोषांमधली हरप्रकारे वागणे हे हराम/निषिद्ध आहे." (12) जो मनुष्य (संगीत, गायन) आदि अनावश्यक गोष्टींवर वेळ खर्च करतो तो भरकटलेला आहे. (कुराण ३१.६) आणि त्यांच्यापैकी (संगीत, गायन, वादन करणारे) ज्यांना बहकविता येईल त्यांना बहकव, ऐकत नसतील त्यांच्यावर तोफ़ा, घोडदळानिशी स्वारी कर(कुराण १७:६४) • 1. अल काफी • 2. मुस्तड्रक-उल-वासन, अध्याय 79 • 3. वसैल उल-शिया • 4. वसैल उल-शिया • 5. वसैल उल-शिया • 6. संगीत प्रकरण अल-काफी • 7. वसैल उल-शिया • 8. मुस्तड्रक उल- वसैल • 9. मुस्तड्रक उल- वसैल • 10. मुस्तनाद अल ताराकी • 11. मुस्तानाड नारकि • 12. पुस्तिका पहा; "तासीर मौसीकी बार आसाब" पृष्ठे 3,6, 10. संदर्भ वेबसाईट quran.com, www.al-islam.org ब्रिगेडच्या इस्लाम कनेक्शनचे अजून पुरावे इथे पहा. http://muslimbrigade.blogspot.in/p/blog-page_27.html
वर्गीकरण
संगीत
इस्लाम

प्रतिक्रिया द्या
26408 वाचन

💬 प्रतिसाद (79)
ग
गामा पैलवान Fri, 12/22/2017 - 15:32 नवीन
जिहाद्यांची पोलखोल केल्याबद्दल रामदास.कॉम यांचे आभार. -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 12/22/2017 - 16:13 नवीन
परंतु सामना एकतर्फी होईल काय? काही आयडी उडालेले असल्याने एकटे बाबूमोशाय किती लढणार?
  • Log in or register to post comments
ह
हारुन शेख Fri, 12/22/2017 - 21:07 नवीन
कमाल आहे. कसाही संबंध जोडून इस्लामला/मुसलमानांना झोडपायचे हा अजेंडा दिसतोय लेख लिहिणाऱ्याचा. शिवाय लेखात दिलेले कुरानातले तीनही ( १७:३६, १७:६४ आणि ३१:६) संदर्भ धादांत खोटे आहेत. (मी तपासून पाहिले) खोटं बोलायचं वर रेटून बोलायचं तसला प्रकार दिसतो. या लेखातले बाकी संदर्भही तपासावे लागतील कारण जर तीन संदर्भ/ उद्धरणं चुकीची निघाली आहेत तर बाकीच्या इतर सगळ्याच अवतरणांची विश्वासार्हता संशय निर्माण करते. नुसती अवतरणे न देतां कुठल्या पुस्तकातल्या कुठल्या पानांवरुन ही सगळी अवतरणे घेतली आहेत तेही लेखकाने वाचकांसमोर मांडावे. तळटीपांचे आकडे टाकून अख्खं पुस्तक रेफरंस म्हणून देणं एका अभ्यासकाला साजेसं नाही. उलट सगळा मामला मोघम करुन वाचकांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. अभ्यासूपणे लेख लिहिण्याचा भास निर्माण करण्याचा लेखक प्रयत्न करतो आहे पण विवक्षित आणि नेमका संदर्भ देत नाहीय. संपादक असला धादांत खोटी नाटी उद्धरणं देणारा प्रचारकी लेख संस्थळावरून काढून टाकतील अशी आशा करतो. वरचा लेख लिहिणाऱ्या लेखक महाशयांना ब्रिगेडवर टीकाच करायची होती तर ती सरळ समोरून आणि थेट करता आली असती पण तसे करण्यातून त्यांना सोशल मिडीयावरच्या मुस्लिमद्वेष्ट्या लोकांची सहानुभूती मिळवता आली नसती असे दिसते. इस्लाममधल्या संगीतविषयक (खऱ्या ? खोट्या?) मतांचा आधार घेऊन नथीतून तीर मारायचे कारण तेवढेच दिसते मला तरी. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न असावा कदाचित पण तो फसला आहे. भारतीय संगीताच्या क्षेत्रात मुसलमानांची दैदीप्यमान परंपरा आहे. इस्लाम धर्म जर इतक्या टोकाचा संगीतद्वेष्टा असता तर ही परंपरा टिकली नसती. पिढ्या दर पिढ्या संगीतात उज्ज्वल कामगिरी करणारे प्रतिभावान उस्ताद निर्माण झाले नसते. त्यांनी जिव्हाळ्याने गाणं गायलं नसतं संगीताची घराणी टिकली नसती. त्यांना हिंदू-मुस्लिम राजाश्रय मिळाला नसता. नवी वाद्ये,नवे गायनप्रकार, नवनवे राग निर्माण झाले नसते. इस्लाममध्ये संगीतविषयक कडवी/ कट्टर मते असतील. मी सरसकटपणे असं काही नाहीच असं म्हणणार नाही पण त्याचा किती परिणाम मुस्लिम जनमानसाच्या संगीतप्रियतेवर झाला आहे ? तेही पहा ना. पोथ्यांमधे असलेली मते आणि प्रत्यक्षातील लोकांचे वागणे यात जमिन-अस्मानाचा फरक आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 12/22/2017 - 23:08 नवीन
धागालेखकाकडून खुलाशाची अपेक्षा आहे. स्वत: न वाचलेले संदर्भ असतील तर तसं स्पष्टपणे लिहायला हवं. आणि ते खोटे निघाले तर क्षमा मागायला पाहिजे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख
प
पुंबा Sun, 12/24/2017 - 16:23 नवीन
हारून शेख, संपूर्ण सहमत. इस्लाम धर्माची शिकवण आणि भारतिय मुसलमानांची शतकानुशतकांपासून चालत आलेली मुसलमान संस्कृती यात भेद करणे आवश्यक आहे. धर्माची शिकवण जशीच्या तशी स्विकारायची हे कधीही व्यवहार्य नसते. म्हणून तर भारतीय मुस्लिम वेगळे ठरतात कट्टर अरबी मुस्लिमांपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख
म
मराठी कथालेखक Mon, 12/25/2017 - 08:03 नवीन
इस्लाममध्ये संगीतविषयक कडवी/ कट्टर मते असतील. मी सरसकटपणे असं काही नाहीच असं म्हणणार नाही पण त्याचा किती परिणाम मुस्लिम जनमानसाच्या संगीतप्रियतेवर झाला आहे ? तेही पहा ना. पोथ्यांमधे असलेली मते आणि प्रत्यक्षातील लोकांचे वागणे यात जमिन-अस्मानाचा फरक आहे.
हे अगदी पटलं. शास्त्रीय संगीत , त्यातली घराणी ई बद्दल मला फारसे ज्ञान नाही . पण जर मुस्लिमांचा संगीताला विरोध अगदी कडवा असता अगदी अलिकडच्या काळातील अत्यंत लोकप्रिय मुस्लिम गायक (रफी, नूरजहापासून अतिफ अस्लम पर्यंत), संगीतकार (नौशादपासून रहमान, साजिद-वाजिद) , वादक (झाकीर हुसेन , बिस्मिल्ला खा) ई कलाकार कायम भितीखाली वावरले असते, कदाचित त्यांना कलाकार म्हणून जगणे कठीण होवून या क्षेत्रातून माघार घ्यावी लागली असती. पण कुणाच्याही बाबतीत असे काही झाल्याचे (धमकी, हल्ले ई) ऐकण्यात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख
म
माहितगार Mon, 12/25/2017 - 11:24 नवीन
...पण कुणाच्याही बाबतीत असे काही झाल्याचे ... ऐकण्यात नाही.
प्रस्थापित त्यांच्या समोरील सामाजिक दबावाचे अडथळे कसे पार पाडतात याची कल्पना नही. पण कुठेही सर्वसामान्य एकदा चालत नाही म्हणून सांगितले की वाटी न जाण्याची शक्यता अधिक असेल. १९६७ - २०१७ हा काळ सौदीत कला आणि इतर काही विषयात अधिक कट्टरतेत गेला आणि तेथील कट्टरतेचा प्रभाव जगभर कमी अधिक प्रमाणात नक्कीच पडला असावा. (उदा. ऑस्ट्रेलियातील एक संदर्भ) शेजारच्या पाकीस्तान बांग्लादेशातील स्थिती या काळात अधिक आव्हानात्मक झाली असावी. भारतात सर्वच स्थिती वाईट नसेल तर अद्याप सर्वच आलबेलही नसावे (संदर्भ), भारतात १९७० च्या दशका नंतर मुस्लीम स्त्री कलावंतांचे प्रमाण वाढण्या एवजी कमी होत गेले असावे. तस्लिमा नसरीन ना अजूनही भारताच्या मोठ्या भागात मोकळेपणाने फिरता येत नसावे . संगिताच्या क्षेत्रात अलिकडे आसामातील आणि कर्नाटकातील एक एक बातमी नवोदीतांस्मोरील आव्हानांची कल्पना देऊ शकते. कलाकार मंडळी यातून मार्ग काढतच नाही असे नाही पण अद्याप आव्हाने बाकी आहेत हे ही लक्षात घेणे जरुरी असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
माहितगार Mon, 12/25/2017 - 12:36 नवीन
फतव्यामुळे काश्मिरी मुस्लीम मुलींना त्यांचा बँड बंद करावा लागल्याची टाईम्स ऑफ ईंडिया वृत्त आणि एन डी टि व्ही चर्चा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 07/14/2018 - 13:15 नवीन
* २७ एप्रिल २०१८ : पाकीस्तानात वाढलेल्या कडवेपणामुळे पाकीस्तानी कव्वालीवर आलेली वाईट वेळ . * ११ जुलै २०१८, केरळात कोणा एका सलाफी प्रचारकाने गाणे आणि संगिताविरुद्ध कडव्या भूमिकेचा प्रचार चालवला तर सायरा नावाची मल्याळी गायिकेने ताठ मानेने केलेले गायन आणि संगिताचे समर्थन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
A
arunjoshi123 Fri, 12/29/2017 - 08:59 नवीन
इस्लाममध्ये संगीतविषयक कडवी/ कट्टर मते असतील. मी सरसकटपणे असं काही नाहीच असं म्हणणार नाही पण त्याचा किती परिणाम मुस्लिम जनमानसाच्या संगीतप्रियतेवर झाला आहे ? तेही पहा ना. पोथ्यांमधे असलेली मते आणि प्रत्यक्षातील लोकांचे वागणे यात जमिन-अस्मानाचा फरक आहे.
एकूणात हे मत एकदम सुभानल्ला आहे, पण "असतील" शब्दामधे बर्‍याच लोकांना बिझनेस पोटेंशियल दिसते. ================ लेखकावर जास्त हेत्वारोप करणं अयोग्य आहे. लेखकानं मुस्लिम संगीतकारांचं योगदान मान्य केलं आहे. सामान्य मुसलमान श्रोता याबद्दल त्यानं काही लिहिलेलं नाही, पण त्याचं मत उलटं असावं असं मानायचं कारण नाही. कुराणाचे संदर्भ, भाषा, संस्कृती, आवृत्त्या, कुराणाच्या पश्चात विकसित झालेले ग्रंथज्ञान, त्याचे महत्त्व, लोकमान्यता, त्यांचा इतिहास आणि त्याचा गैर-इस्लामिक संस्कृतींवर झालेला परिणाम ही बाब संगीताच्या बाबतीत तितकी थेट नाही असं प्राथमिक चौकशीतून कळतं. ================= तसा गीतेचा संदर्भ देऊन तिच्यात "भावांना मारून टाक" असं लिहिलंय असं सांगता येतं. कोणी कोणत्या मानसिकतेने कोणत्या उद्देशाने कशाचे काय इंटरप्रिटेशन केले आणि ते कोणाच्या हाती लागले नि त्याने त्याचा वापर कोणत्या संदर्भात गुंफवून टाकला याचा भरोसा देता येत नाही. लेखक जर हॅबिच्यूअल इस्लाम हेटर नसेल तर त्याच्यावर टिका अस्थानी असेल. कारण मूळात त्याच्या चुंबकाची सुई कुराणाकडे नाही, ती देशविरोधी तत्त्वांकडे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख
द
दासबोध.कॊम Sat, 12/23/2017 - 11:41 नवीन
Please check quran.com for quranic references. Rest article is translation of an article from al-islam.org. verified before posting. This dinial is well known tool of these people.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 12/25/2017 - 09:17 नवीन
इतक्या पराकोटीचा तिरस्कार असणारा प्रतिसाद आणि लेख मिपावर असणेच शरमेचे आहे
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दासबोध.कॊम
A
arunjoshi123 Fri, 12/29/2017 - 09:14 नवीन
कपिलमुनी, देशद्रोह्यांचा, समाज फोडणार्‍या लोकांचा पराकोटीचा तिरस्कार असणं तब्येतीला चांगलं असतं. आणि सेन्स ऑफ शेम पराकोटीला पोचला असेल तर सिलेक्टिव वाचन करणे, सिलेक्टिव अर्थ काढणे हे देखिल शरमेचंच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
द
दासबोध.कॊम Sat, 12/23/2017 - 11:53 नवीन
quran.कॉम वॉर जाऊन music असे सर्च केल्यावर मुहसीन खान नामक माणसाचे इंग्रजी ट्रान्सलेशन येते. येथे कुराणाची अनेक व्हर्जनस आहेत.पैकि मुहसीन खा साहेबांच्या व्हर्जन मध्ये हा अर्थ दिलेला आहे. ते काफीर नसून मुसलमानच आहेत स्वतः. वरील आयती त्यातूनच घेतलेल्या आहेत. राहिला प्रश्न अन्य हदीत चा तर त्या खालील लेखातून आहेत तशा उचलल्या आहेत. https://www.al-islam.org/greater-sins-volume-1-ayatullah-sayyid-abdul-husayn-dastghaib-shirazi/fifteenth-greater-sin-music
  • Log in or register to post comments
ह
हारुन शेख Sat, 12/23/2017 - 13:49 नवीन
तुम्ही लिहिलेला लेख हा कुठल्यातरी वेबसाईटवरच्या खोडसाळ मजकूराचं भाषांतर आहे हे वाचून आश्चर्य वाटलं नाही. ती अहमदिया मुसलमानांची वेबसाईट आहे म्हणजे त्यातलं म्हणणं जगातल्या सगळ्या मुसलमानांचं अधिकृत म्हणणं आहे असंही नाही पण ते एक असो. मला पंथापंथांच्या वादात रस नाही. या वेबसाईटवरचा एक लेख घेऊन सर्वच्या सर्व मुसलमानांना झोडपणे हे काही भडकाऊ कंटेट लिहिणाऱ्या सनातनी वेबसाईट्सवरचे लेख घेऊन सगळ्या हिंदूंना झोडपण्यासारखेच आहे. अतिशय अयोग्य अॅप्रोच आहे तुमचा. तुम्ही कुरानातली जी तीन उद्धरणं दिली ती खाली देत आहे. तुम्ही वर जी उद्धरणं दिली आहे ती किती वेगळी आहे आणि मूळ आयत काय सांगतेय ते तुमच्या लक्ष्यात येईलच अशी अपेक्षा आहे. 'एखाद्या अशा गोष्टीमागे लागू नका जिचे तुम्हाला ज्ञान नसेल. निश्चितच डोळे, कान आणि ह्रदय या सर्वांच्याकडे जाब विचारला जाईल.' (सूराह १७: आयत ३६) '(सैतानाला उद्देशून) तू ज्याला ज्याला आपल्या आमंत्रणाने फूस लावू शकतो, लाव. त्यांच्यावर आपले स्वार आणि प्यादे चालून आण. संपत्ती आणि संततीमध्ये त्यांच्याबरोबर भागीदारी कर. आणि त्यांना आश्वासनाच्या जाळ्यात अडकव.पण लक्ष्यात असू दे की तुझे ( सैतानाचे) आश्वासन एका फसवणुकीशिवाय दुसरं काहीही नाही.' (सूराह १७: आयत ६४) 'आणि माणसांपैकी काहीजण असेही असतात की जे मनमोहक कहाण्या खरेदी करुन आणतात जेणेकरुन (त्या कहाण्यांचा उपयोग करुन) इतर लोकांना अल्लाहच्या मार्गापासून ज्ञानावाचून भटकवावे आणि या मार्गावरुन चालण्याचे आवाहन चेष्टा मस्करीत उडवून लावावे. अशा लोकांसाठी भयंकर अपमानजनक शिक्षा ( आम्ही राखून ठेवली) आहे.' (सूराह ३१: आयत ६) कुरानात संगीतविरोधी मत आढळत नाही.मुसलमानांच्या इतर काही पुस्तकांत संगीतविषयक कट्टर मते असतीलही. मी ते नाकारत नाहीये पण ती मतं बऱ्यापैकी 'पुराणातली वांगी पुराणात' अशीच राहिली आहेत. संगीताच्या बाबतीत फार थोडे मुसलमान पोथीनिष्ठ वागतात किंवा वागत आले आहेत. तसं नसल्यास मुसलमानांच्या संगीतातल्या इतक्या मोठ्या योगदानाचं मूल्यमापन तुम्ही कसं कराल ? तुमच्या एकूण लिखाणातून मुसलमान बघा किती संगीतविरोधी आहेत असा प्रचारकी सूर लागलाआहे तो वस्तुस्थितीशी अतिशय विसंगत आहे. ब्रिगेडबद्दल तुमच्या मनात राग असल्यास तो तर्कसंगत पद्धतीने मांडा त्यासाठी मुसलमानांची संगीतविषयक मते लिहून ब्रिगेड जिहादी विचारसरणीची संस्था आहे हे सिद्ध करायला जाणे हा 'अव्यापारेषु व्यापार' आहे. कशाचाही कशाशीही आणि कसाही संबंध जोडून, काहीतरी उथळ लिखाण करुन तुम्ही स्वत:चे ( त्यासोबतच दासबोध.काॅम आणि समर्थ रामदासांच्या वारश्याचे) हसे करुन घेत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दासबोध.कॊम
म
महाठक Sun, 12/24/2017 - 06:25 नवीन
अहो हारून शेख साहेब कुठे शेणात दगड मारताय. आम्ही हिंदू दुर्लक्ष करतोय असल्या मूर्ख लेखांना. दासबोध नाव पण त्यातील एक टक्का पण अक्कल नाही या लेखात. सोडून द्या. एवढी अक्कल असती तर अनेक मुस्लिम कलाकार झाले अथवा आहेत त्यांच्याकडे पाहून तरी या id ला काही समजले असते. पण नाव सोना बाई आणि हाथी कथलाचा वाळा. तसेच हे दासबोध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख
A
arunjoshi123 Fri, 12/29/2017 - 09:26 नवीन
आम्ही हिंदू दुर्लक्ष करतोय असल्या मूर्ख लेखांना.
लेखकाने मांडलेल्या समस्यांपैकी नक्की काय तुमच्यामते दखल घेण्याजोगं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महाठक
अ
अभिजीत अवलिया Sun, 12/24/2017 - 07:40 नवीन
हारुनजी, व्यवस्थित शब्दात, संंयतपणे लेखाची पिसे काढलात. मुद्देसूद प्रतिवाद खूपच आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख
न
नाखु Sun, 12/24/2017 - 16:00 नवीन
या भागातील रामदास स्वामी उल्लेख केला त्याआडून रामदास स्वामी यांच्यावर चिखलफेक होऊ नये अशीच इच्छा.
तुमच्या एकूण लिखाणातून मुसलमान बघा किती संगीतविरोधी आहेत असा प्रचारकी सूर लागलाआहे तो वस्तुस्थितीशी अतिशय विसंगत आहे. ब्रिगेडबद्दल तुमच्या मनात राग असल्यास तो तर्कसंगत पद्धतीने मांडा त्यासाठी मुसलमानांची संगीतविषयक मते लिहून ब्रिगेड जिहादी विचारसरणीची संस्था आहे हे सिद्ध करायला जाणे हा 'अव्यापारेषु व्यापार' आहे. कशाचाही कशाशीही आणि कसाही संबंध जोडून, काहीतरी उथळ लिखाण करुन तुम्ही स्वत:चे ( त्यासोबतच दासबोध.काॅम आणि समर्थ रामदासांच्या वारश्याचे) हसे करुन घेत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
A
arunjoshi123 Fri, 12/29/2017 - 09:29 नवीन
अवलिया जी, और ब्रिगँम्बो खुष हुवा, असं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
A
arunjoshi123 Fri, 12/29/2017 - 09:25 नवीन
ती अहमदिया मुसलमानांची वेबसाईट आहे
मग हे त्यांचं रचलेलं असेल, इतर पंथ निर्दोष आहेत इतकं स्पष्टीकरण पुरेसं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख
स
सतिश गावडे Sat, 12/23/2017 - 13:04 नवीन
स्वतःला दासबोध डॉट कॉम म्हणवता आणि विवेक अजिबात नाही. कसे काय?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 12/29/2017 - 10:17 नवीन
लेखात कसा म्हणे त्यांनी कुणाचा विवेकभंग केला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अरविंद कोल्हटकर Sat, 12/23/2017 - 16:19 नवीन
माझी हारून शेख ह्यांच्याशी पूर्ण सहमति आहे. 'सवाई'विरुद्ध आरडाओरडा करणार्‍यांचा संगीतविरोधी अजेंडा काय असेल तो असो - आणि त्याचा तुम्ही जरूर प्रतिवाद करावा - पण इस्लाम संगीतविरोधी आहे असा सोयीस्कर अर्थ काही आयतांमधून काढायाचा, त्यावरून इस्लाम = 'सवाई'विरुद्ध आरडाओरडा करणारे असा शोध लावायचा आणि ते सूत पकडून आपली इस्लामविरोधी गरळ येथे ओतायची हे योग्य वाटत नाही. आपणापैकी कोणासच अरेबिकमध्ये लिहिलेले कुरान वाचता येत नाही. किंबहुना त्यातील अरेबिक भाषा प्राचीन असून बहुतेक मुस्लिमांनाहि ती समजत नाही ही वस्तुस्थिति आहे. बहुसंख्य मुल्ला-मौलवींची परिस्थिति फार वेगळी नाही. (ह्या बाबतीत हिंदु धर्माकडे पहा. आपल्यापैकी बहुतेकांना मनुस्मृति मुळातून वाचता येत नाही. कोणाच्यातरी भाषान्तरावरून आपली मते बनवून आपण वितंडवाद घालत बसतो. येथेच अलीकडे झालेला 'न स्त्री: स्वातन्त्र्यमर्हति' ह्याचा वाद आठवा. घरच्या पूजा सांगणार्‍या भटभिक्षुकांपासून तथाकथित संतमहंतांपर्यंत बहुतेकांना आपले प्राचीन ग्रंथ मुळातून वाचता येत नाहीत तरी ते सनातन धर्माची व्याख्याने देत फिरत असतात आणि सर्वसामान्यांची दिशाभूल करत असतात.)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 12/26/2017 - 15:30 नवीन
हे असले बाटगे पुढे करून याला खरा विरोध कट्टर मुसलमानच करत आहेत याबाबत आम्हाला शंकाच नाही.
मूळ लेखातील कट्टर हा शब्द बहुतेकांच्या नजरेतून सुटलाय बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर
A
arunjoshi123 Fri, 12/29/2017 - 09:59 नवीन
सवाई'विरुद्ध आरडाओरडा करणार्‍यांचा संगीतविरोधी अजेंडा काय असेल तो असो - आणि त्याचा तुम्ही जरूर प्रतिवाद करावा
हाच लेखाचा गाभा आहे असं वाटतं.
त्यावरून इस्लाम = 'सवाई'विरुद्ध आरडाओरडा करणारे असा शोध लावायचा आणि ते सूत पकडून आपली इस्लामविरोधी गरळ येथे ओतायची हे योग्य वाटत नाही.
संभाजी ब्रिगेड पंढरपूरची वारी पण बंद करा असं म्हणू शकते. ट्रॅफिकच्या दृष्टीने वारकर्‍यांचा ताप या महोत्सवापेक्षा खूप जास्त होतं. हा महोत्सव कधी झाला म्हटलं तर अर्धे पुणेकर माहित नाही म्हणतील. तेच वारी ९५% लोकांना माहित होते आणि त्रास देते. तर कट्टर मुसलमान कोणाच्या विरोधात आहेत आणि ब्रिगेडी कोणाच्या विरोधात आहेत ते लोक एकच आहेत. त्यामुळं आपण ज्याला सुत म्हणताय तो चांगला दोरखंड आहे. --------------- बाय द वे, या लेखाच्या निमित्ताने अनेक लोकांनी लेखकाची भूमिका किंचितही न समजून घेता आपल्या उजव्या विचारसरणी विरोधातली गरळ ओकून घेतली आहे असे वाटते. ===========================
येथेच अलीकडे झालेला 'न स्त्री: स्वातन्त्र्यमर्हति' ह्याचा वाद आठवा. घरच्या पूजा सांगणार्‍या भटभिक्षुकांपासून तथाकथित संतमहंतांपर्यंत बहुतेकांना आपले प्राचीन ग्रंथ मुळातून वाचता येत नाहीत तरी ते सनातन धर्माची व्याख्याने देत फिरत असतात आणि सर्वसामान्यांची दिशाभूल करत असतात.
जग म्हणजे विद्वत्ता गाजवायची लागलेली स्पर्धा नाही. अशा स्पर्धेतच सगळा रस असलेल्या लोकांचं एक छोटं जग असतं. तिथं बसून ते सार्‍या जगावर पिंका टाकत असतात. बाकीचे लोक सद्भावनेने आपल्या परिने सहभागी होतात. त्यात सगळा मूर्खपणा बघणं हा एक विद्वज्जनांचा मूर्खपणा आहे. ज्या लोकांनी कमी अभ्यास केला वा ज्यांना करायला मिळाला नाही वा ज्यांची क्षमता नाही अशा लोकांच्या सत्सहभागाचा आदर झाला पाहिजे. ------------------------------- अतिरेक्यांना कुराण वाचता येत नाही. पण त्यांना कुराणातल्या जिहादचा हवाला देऊन अतिरेकी बनवलं जातं, जीव द्यायला सांगीतलं जातं. अशावेळी कोणी "कट्टर मुसलमान कुराणतल्या जिहादच्या संकल्पनेनं अतिरेकी बनत आहेत" असं म्हटलं त्यालाच झोडपणार कि काय? कुराणात काय म्हटलं आहे हे कुठं महत्त्वाचं आहे? त्याचं पॉप्यूलर इंटरप्रिटेशन काय आहे, समाजमान्यता काय आहे हे कोण पाहणार? -------------------- संभाजी ब्रिगेड चालवायला असे किती पैसे लागणार आहेत? पण तिचे प्रणेते निर्माण करायला गडगंज पैसाच लागेल ना? देशातल्या सर्वात प्रभावशाली ४% लोकांचा द्वेष करणारी संघटना टिकवून ठेवायची मंजे हुशार लोक कसे पटवायचे? आता पोटेंशियल फायनान्शियर्सची लिस्ट बनवा मंजे सूत आणि दोरखंडामधले फरक कळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर
द
दासबोध.कॊम Sat, 12/23/2017 - 17:53 नवीन
आपले मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि एकंदर इस्लामचा अभ्यास पाहून बरे वाटले .आपण माझ्या वर्षानुवर्षे पडलेल्या शंकांचे समाधान करू शकता ; खरोखरीच मला माहिती नाही म्हणून विचारतो आहे . अहमदिया ,शिया,सुन्नी ,बोहरी, सूफी वगैरे वगैरे पंथांमध्ये नक्की काय फरक आहे व कशामुळे हे एकमेकांशी इतके अंतर राखून राहतात ? भारतातले मुसलमान स्वतःला कुठल्या प्रकारामध्ये धरतात ? शियांनी सुनीचा व सुन्नी नि शीयांचा जीव घेण्याइतपत काय घडलेले आहे ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 12/23/2017 - 18:42 नवीन
लेखात आपापसात संबंध नसलेले दोन वेगवेगळे काँटेक्स्ट वडाची साल पिंपळाला लावले आहेत. दोन्ह विषय वेगवेगळ्या चर्चेस टाकले तर प्रशस्त राहीले असते. आणि या प्रतिसादाने धागा लेखा पेक्षा तिसराच विषय चर्चेस घेऊन स्वतःच विषयांतर करू इच्छित आहात. ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दासबोध.कॊम
प
पंतश्री Mon, 07/16/2018 - 11:18 नवीन
हे वाचा इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दासबोध.कॊम
प
पंतश्री Mon, 07/16/2018 - 11:18 नवीन
https://www.misalpav.com/node/17500
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंतश्री
म
माहितगार Sat, 12/23/2017 - 18:59 नवीन
या वृत्ता नुसार सवाई गंधर्व मुळे ट्रॅफीक इश्यूज आहेतआ, आजू बाजूच्या परिसरात ध्वनी प्रदूषण होते, आणि शालेय अभ्यास आणि खेळ तासांचे नुकसान होते असे काही आक्षेप नोंदवले गेलेले दिसतात. वृत्त नीट अभ्यासले तर इतर प्रसंगांना ध्वनीक्षेपकांना रात्री १० पलिकडे वेळ वाढवून मिळत नाही पण सवाईला रात्री १२ पर्यंत वेळ वाढवून मिळते . हे खरे दुखण आहे. प्रसंगी आवाजाच्य भिंतींना मोकळीक दिल्यास हा वाद त्यांच्या कडून घातला जाण्याची शक्यता कमी वाटते आहे, सर्वसामान्यांनी आवाज केला तर ध्वनी प्रदुषण आणि संगित कर्यक्रमात केले तर होत नाही हा त्यांच्या मते दुटप्पी पणा आहे. ह्या आक्षेपांवर चर्चा करण्यास हरकत नाही. पण आक्षेप नोंदवताना एका ठिकाणी मात्र त्यांची गल्लत होत असावी ती म्हणजे ऑर्गनायझर्स आणि उपस्थितांवराचा राग ते कलाकारांवर सुद्धा काढू इच्छित दिसताहेत हे तर्सुसंसंगत वाटत नाही. आवाजाच्या भिंती बद्दल आवाजाच्या भिंती ऑर्गनाईज करणार्‍यांवर कारवाई करावी आवाजाच्या भिंतीउपलभ्ब्ध करणार्‍यांवर कारवाईचे मागणी ठिक पण त्याच्यावर ज्याचे गाणे अथवा म्युझीक वाजते त्या गायक वादकावर राग काढण्यात पॉईंट आहे का ? बाकी आक्षेप नोंदवण्यास हरकत नाही पण सर्व सामाजिक आणि राजकीय कामे एकाच संघटनेच्या नावावर करणे त्या संघण्टनेस नक्की नावा रूपाला आणते का की वेगवेगळी कामे वेगवेगळ्या संघटेनेच्या नावाने करणे श्रेयस्कर या बद्दल शंका वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अरविंद कोल्हटकर Sat, 12/23/2017 - 21:12 नवीन
धागाकर्त्याने भाषान्तर करून घातलेल्या इस्लामच्या संगीतविरोधी वचनांमध्ये खालीलहि आहे.
जो मनुष्य (संगीत, गायन) आदि अनावश्यक गोष्टींवर वेळ खर्च करतो तो भरकटलेला आहे. (कुराण ३१.६) आणि त्यांच्यापैकी (संगीत, गायन, वादन करणारे) ज्यांना बहकविता येईल त्यांना बहकव, ऐकत नसतील त्यांच्यावर तोफ़ा, घोडदळानिशी स्वारी कर. (कुराण १७:६४)
आता पहा - मूळ लेखन अरेबिक, तेहि बहुधा जुने आणि बहुसंख्यांना न समजणारे, त्याचे कोणीतरी इंग्रजीत भाषान्तर केले (कारण सोप्या अरेबिकमधलेहि भाषान्तर धागाकर्त्याला समजत नसावे असा माझा तर्क आहे) आणि त्या इंग्रजीचे धागाकर्त्याने मराठी करून आपल्यापुढे पुरावा म्हणून ठेवले आहे. त्यातहि (संगीत, गायन) आणि (संगीत, गायन, वादन करणारे) हे शब्द कंसात आहेत. ह्यावरून वाटते की ते शब्द मुळात नसून कोणा भाषान्तरकर्त्याने त्याला भासणारा अर्थ अधिक स्पष्ट व्हावा म्हणून ते वाढवले आहेत. माझ्याजवळ कुराणाचे एक इंग्लिश भाषान्तर आहे (मौ.वहिउद्दिन खान कृत) त्यातील कुराण ३१.६ चे भाषान्तर इतकेच आहे - "And among men there are some who spend their time in idle diversions only to lead people qway from the path of God, and, without knowledge, hold it up to ridicule; for such there is a humiliating punishment in store." त्याच पुस्तकातील १७.६४ चे भाषान्तर असे आहे: "Go ahead and entice whomsoever of them you can, with your voice, and mount assault against them with your cavalry and infantry and be their partner in wealth and offspring, and make promise to them - Satan promises nothing but delusion." ह्या भाषान्तरामध्ये कोठेहि संगीत, नृत्य, वादन ह्यांचा उल्लेख नाही. हे खरे आहे की इस्लाम कट्टरतेने पाळणार्‍यांमध्ये अनेक जण कसल्याहि आनंद उत्पन्न करणार्‍या गोष्टींचा दुस्वास करतात पण हा दुस्वास कितपत कुराणातून येतो आणि कितपत त्यांनी लावलेल्या कुराणाच्या अर्थामधून येतो हे सांगणे अवघड असते. हिंदु, ख्रिश्चन वगैरे धर्मांमध्येहि असे कडकडीत वैराग्याचे समर्थक असतातच पण आपण ते धर्म अशा वैराग्य आलेल्यांच्या चष्म्यामधून पहात नाही. इस्लामलाहि तोच न्याय लावायला हवा.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 12/24/2017 - 04:35 नवीन
हिंदु, ख्रिश्चन वगैरे धर्मांमध्येहि असे कडकडीत वैराग्याचे समर्थक असतातच
हिंदुंमधील वैराग्य व्यक्तिगत आहे ते इतरांच्या कलागुणांवर लादण्याची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्यवस्था नाही . कलांमध्ये हरवून गेलेल्या व्यक्तीच्या वैराग्यावरही हिंदू धर्मात साशंकता फारशी नसते. तपस्व्याच्या तपस्या-भंगासाठी कलागुणांचा वापर डिस्टर्ब करण्यासाठी केला तर फारतर तपस्वी शाप देऊ शकतो पण वस्तुत क्रोधीत होणे आणि शाप देणे हेही तपस्व्याने संयम गमावणे ठरते म्हणजे कुणी तपस्या-भंगाचा उद्देश ठेवला तरी तपस्व्याने संयम ठेवणे अभिप्रेत असते अभिव्यक्तीला दडपणे अपेक्षीत नसते. त्यामुळे हिंदू धर्मातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तुलना ख्रिश्चन आणि इस्लाम मधील अभिव्यक्ती वरील बंधनांसोबत होऊ शकते का या बद्दल साशंकता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर
म
माहितगार Sun, 12/24/2017 - 05:02 नवीन
इस्लामलाहि तोच न्याय लावायला हवा.
धागा लेखकाने सवाई गंधर्व महोत्सवाच्या बाहेर होणार्‍या ट्रॅफीक आणि ध्वनीक्षेपक बद्दलच्या चर्चेत इस्लाम कुठून ओढून आणला ते माहित नाही. बाकी इंग्रजी विकिपीडिया Islamic_music#Permissibility_of_music तील संदर्भ बरोबर असतील तर बंधन टाकणारे अर्थ काढण्यास जागा असावी त्या शिवाय नैसर्गीक कलात्मक अभिव्यक्तीवर बंधने टाकणारी त्यांची समाज व्यवस्था सहज आकार घेऊ शकत नसावी. ; शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य किती नाकारता अथवा टाळता अथवा अर्थांचा खीस किती पाडता यावर बरेच काही अवलंबून असते पण संस्कृती म्हणून अमुर्त कलेचे काही मर्यादीत प्रकार सोडले तर संस्कृती म्हणून इस्लामिक संस्कृती आणि काही प्रमाणात ख्रिश्चन संस्कृतीने काही अपवाद सोडले तर बर्‍याच नैसर्गीक मानवी कला अभिव्यक्तींना बर्‍यापैकी काळ दूर ठेवणे भाग पाडले असावे असे वाटते. व्यक्तीगत अभिव्यक्ती स्वांतत्र्य जोपासण्यासाठी हिंदू संस्कृतीतही व्यक्तीला संघर्ष करावा लागू शकतो त्या पेक्षा कदाचित इस्लामी संस्कृतीत व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अधिक संघर्षाला सामोरे जावे लागते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर
A
arunjoshi123 Fri, 12/29/2017 - 10:14 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/Violence_in_the_Quran इस्लाममधे हिंसा नाही असं आम्ही क पार्टिकडून ऐकतो. मग ग पार्टी त्याच्या विपरित मत सांगते. वरचा विकिपिडीयावरचा लेख वाचलात तर लक्षात येईल कि प्रकरण दिसतं तितकं सरळ नाही. तुम्ही कुराणाला निर्दोष सोडायच्या मानसिकतेनेच बसले आहेत (कारण तुम्हाला सहिष्णू मुस्लिमांना काय वाटेल याची चिंता आहे.) म्हणून तुम्ही सोपा अर्थ लावत आहात. उदा. कुराणाच्या काळात कंस नव्हते का? शब्द कंसात आहेत म्हणजे मूळ लेखनात नाहीत, अभिप्रेत नव्हते? हे कायय? =============================== https://en.wikipedia.org/wiki/Islamic_music#Permissibility_of_music अगदी विकिपेडिया पण म्हणतो कि प्रकरण तितकं सरळ नाही. मग धागालेखकाला अंध द्वेष्टा ठरवायची इतकी काय घाई?
Permissibility of music[edit] The question of permissibility of music in Islamic jurisprudence is historically disputed.[2] Imam al-Ghazzali, one of the most famous Muslim scholars, writing almost a thousand years ago, reported several hadith and came to the conclusion that music is permitted, saying: “All these Ahadith are reported by al-Bukhari and singing and playing are not haram.”[3] Despite this, some Salafist groups interpret the chapters of Luqman and Al-Isra in the Quran as evidence that music is haram,[4] although this is disputed by others who disagree.[5] Those who do not allow music believe that Muhammad censured the use of musical instruments when he said: "There will be among my Ummah people who will regard as permissible adultery, silk, alcohol and musical instruments".[6] Islamic scholars of the past who agreed upon this include Abu Hanifa, Al-Shafi'i, Malik, Ahmad bin Hanbal, Al-Tabari, Al-Hasan Al-Basri, Al-Bukhari, Al-Tirmidhi, Al-Nawawi, Al-Bayhaqi, Al-Tahawi, and Al-Qurtubi.[citation needed] However, those who argue that music is halal (permitted) state that this hadith relates to usage—at the time the polytheists used music and musical instruments as part of their worship- and does not apply to all music.[3] They also point out that in the Quran, it is stated that Hazrat Dawud was given the Psalms.[7] (an-Nisa, 4/163; al-Isra, 17/55). In other Islamic resources, it is stated that the Psalms given to Hazrat Dawud were sent down in the month of Ramadan, that it contained sermons and words of wisdom and that Hazrat Dawud usually recited it accompanied by a melody and a musical instrument;[8] therefore music is permitted. Supporters of this view also point out that in classical Islamic jurisprudence and Sharia, the Quran is the higher authority on correct Islamic practice; the hadith, while important, are secondary to the Quran.[9] Those who saw the permissibility of music include some of the most famous Muslim scholars, jurists, philosophers and Sufi poets of the Muslim world, including Abu Bakr ibn al-Arabi, Ibn al-Qaisarani, Ibn Sina, Abu Hamid al-Ghazali, Rumi, Ibn Rushd, and Ibn Hazm. Al-Ghazali also reports a narration from al-Khidr, where he expressed a favorable opinion of music, provided it be within the usage limitation of virtuous areas.[citation needed][10][11] Al-Ghazali has been referred to by some historians as the single most influential Muslim after the Islamic prophet Muhammad.[12] Certain schools of Sunnis as well as some Shiites hold that music is forbidden with the sole exception being that women can play the Daf, a traditional one sided drum, at celebrations and festivals.[13] However some Islamic groups and denominations deem music permissible including many Sufi orders who use music as part of their worship.[14] According to some authorities Islam does allow singing without musical accompaniment within prescribed circumstances—namely that the performer be of the same gender as the audience,[15] although this contradicts a well-known hadith in which two girls sang a song to the Prophet Muhammad and he instructed Abu Bakr to let them, stating, "Leave them Abu Bakr, for every nation has an 'Id (i.e. festival) and this day is our 'Id.".[16] Others hold that music is permitted in Islam provided that the lyrics are not obscene or vulgar.[15] Based upon the Shia ahadith, Grand Ayatollah Sadiq Hussaini Shirazi (an opponent of the current theocratic regime in Iran) ruled that all music and instrument playing is haram, no matter the purpose.[17] However, this is not the official position of the Islamic Republic of Iran. Grand Ayatollah Ali Khamenei, the current supreme leader of Iran, has stated his admiration of western music,[18] and music is permitted in Iran as long as it is either Iranian folk music, Iranian Classical music, or Iranian pop music.[19]
===================================== आता मी हे सिनेमात पाहिलेलं, पण प्रकरण अगदी हिंदूंत देखील इतकं सोज्वळ नाही. नवरंग चित्रपटात मी हिरोला "एके काळी संगीत केवळ धार्मिकच असायला हवे असा दंडक होता" असे म्हणतो असे आठवते. अगदी माझी निरिक्षणे देखील तशी आहेत, कि एका काळामागे साध्या माणसांवरची रचना कोणती याचं उत्तर "नाही " असं येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर
म
मदनबाण Sun, 12/24/2017 - 06:48 नवीन
ब्रिगेडच्या इस्लाम कनेक्शनचे धागे-दोरे इथे दिल्याबद्धल धन्यवाद !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]
  • Log in or register to post comments
स
सचिन Sun, 12/24/2017 - 18:48 नवीन
माझी हारून शेख ह्यांच्याशी पूर्ण सहमति आहे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 12/29/2017 - 10:20 नवीन
आणि ब्रिगेडशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
ह
हुप्प्या Sun, 12/24/2017 - 22:52 नवीन
https://www.youtube.com/watch?v=CZXLOcQ-LYA
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 12/26/2017 - 06:52 नवीन
एकमेव अबकड वाद्य चालत पण उर्वरीत ह,ळ, क्ष, ज्ञ वाद्ये स्वर्ग प्राप्तीसाठी चालत नाहीत हे श्रद्धेच्या नावावर खपवता येऊ शकते पण तर्कांवर बसवणे कठीण जाते मग संगिताचा व्यासंग किंवा हव्यासाची तुलना दारूच्या व्यसनाशी करणे हा दिशाभूल करणारा मार्ग पत्करला जातो. जर संगिताचा हव्यास , व्यासंग आणि छंद असणे पाप असेल तर हाच नियम इतर अनेक ह्व्यास/ व्यासंग/ छंदांना लावता येतो तेवढे करुन माणसातली बहुतेक कलात्मक प्रेरणा मारल्या नंतर माणूस केवळ वस्तुंचे उत्पादन करण्या सोबत प्रजोत्पादन करणारे यंत्र म्हणून शिल्लक रहातो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
प
पगला गजोधर Mon, 12/25/2017 - 05:05 नवीन
हारून शेख यांनी अतिशय अभ्यासू व समर्पक प्रतिक्रिया देऊन, इथे एकप्रकारे, विखार पसरवू पाहणाऱ्या एकाच्या, सणसणीत कानाखाली चपराक दिलीये... आता एकतर ते किंवा त्यांच्या सारखे विषयाला फाटे फोडून, गिरे तो भी टांग उपर, या थाटात प्रतिक्रिया देतील, किंवा १ -२ दिवस गप बसतील, नंतर हळूच परत कुजबूजी पिल्लू सोडतील... त्यांचे चॉईस ऑफ वर्ड पहा.... उदा.
जन्माने मुसलमान पण वर्तनाने हिंदुस्थानी कलाकारांची खालील यादी पहा
इथे पण शब्द माझ्या सारख्या माणसाला खुपतो, मनुवादी लोकांना हा 'पण' खुपणार नाही....
बेगम परवीन सुल्ताना (या तर चक्क कुंकू लावतात!),
एकही अस्सल रक्ताचा मराठा नाही. हा सर्व बाटग्यांचा भरणा असून
इथे तुम्हाला मनुवादी शुद्ध/अशुद्ध वंश/डीएनए मेंटयालिटी दिसते... यातुन त्यांचे संगीतातील रागाचे नव्हे , तर विखारी 'नथु दे राम' या रागाचेच त्यांनी किळसवाणे प्रदर्शन घडवले आहे...
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 12/25/2017 - 11:44 नवीन
या समज गैरसमजां मागच्या मुद्यात धर्म आणि संस्कृती यांची गल्लत हा ही एक सहज लक्षात न येणारा मुद्दा असावा जसे वर 'कुंकू लावणे' याचा उल्लेख आला आहे. कुंकू लावणे, रांगोळी काढणे इत्यादी शब्द रहीत भारतीय शास्त्रीय गायन या सांस्कृतीक बाबी आहेत कुंकू लावण्या बद्दल हिंदूंमध्ये आणि न लावण्या बद्दल इस्लाम मध्ये धार्मीक आधार मिळण्याची शक्यता कमी असावी . तिच गोष्ट अमुर्त रांगोळी अथवा शब्द आणि वाद्य नसलेले शास्त्रीय गायन यांना विरोध करण्यासारखे इस्लाम मध्ये काही नसावे. योगासनाती विशीष्ट उचारणे काढून टाकली केवळ खेळ म्हणून पाहीले तर योगासनात अ-इस्लामिक फारसे नसावे तरीही गैरसमज चालत रहातात. त्याच वेळी मेंदी, बांगड्या अशा सांस्कृतीक गोष्टी धार्मिक हस्तक्षेपा शिवाय शेअर पण होताना दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 12/25/2017 - 12:11 नवीन
योगासनाती विशीष्ट उचारणे काढून टाकली केवळ खेळ म्हणून पाहीले तर योगासनात अ-इस्लामिक फारसे नसावे तरीही गैरसमज चालत रहातात.
धाग्याशी विषयांतर, तरीही सहमत... मी मॅरेथॉन झाल्यावर सर्वांग सुंदर स्ट्रेचिंग करतो, जर कोणी अट्टहासाने त्यास योगासन म्हणत असेल तर त्याचाही निषेध व्हावा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 12/25/2017 - 13:15 नवीन
कैच्या कै! स्ट्रेचिंगला योगासने कोणी का म्हणेल? जर तुम्ही एखाद्या योगासनाशी साधर्म्य दाखवणाऱ्या स्टेप्स करत असाल तर त्याला योगासनंच म्हणायला हवं! आणि तसेही समजा एखाद्याने म्हणले योगासनं तर लगेच त्याचा निषेध वगैरे कशाला करायला हवा? अशावेळी ते भाषांस्वातंत्र्य, सहिष्णुता वगैरे कुठे जाते काय माहित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
मराठी कथालेखक Mon, 12/25/2017 - 13:24 नवीन
योगासनंही इस्लामला अमान्य आहेत असं अनेकदा ऐकण्यात येत, त्यावरुन आठवलं काही काळापुर्वी हमसफर नावाची एक पाकिस्तानी मालिका बघत होतो (झी जिंदगी वाहिनीवर) त्यामध्ये एक स्त्रीपात्र (अर्थातच मुस्लिम) योगासनं करताना दाखवली आहे असे मला आठवते. मला योगासनं येत नाहीत म्हणून मी १००% खात्रीने सांगत नाही. पण मला ते योगासनच वाटले. कुणी ती मालिका पाहिली असल्यास सांगू शकेल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 12/25/2017 - 13:40 नवीन
योगासनंही इस्लामला अमान्य आहेत असं अनेकदा ऐकण्यात येत,
बरेच ख्रिश्चन आणि इस्लामीक धर्ममार्तंड -कदाचित सोबत उच्चारल्या जाणार्‍या ओम ध्वनी मुळ सुर्य नमस्काराच्या बाबतीत सुर्याला इश्वर मानल्यामुळे , स्त्रीयांच्या बाबतीत पब्लिक प्लेस मध्ये केल्यामुळे - अमान्य म्हणत असावेत, पण लॉजीक पेंड खातय हे लक्षात घेत नसावेत . कुणी उभ्याने कुणी पळताना कुणी चालताना कुणी झोपताना, कुणी नहाताना ओम किंवा अजून काही इतर धर्मीय शब्दोच्चार करत असेल तर तुम्ही उभे रहाणे, झोपणे, चालणे, पळणे , नहाणे सोडाल की टाळावे वाटणारे उच्चार टाळून तेवढी अ‍ॅक्टीव्हिटी करणार ? बेसिकली धर्म आणि संस्कृती यांची गल्लत करण्याचे उत्तम उदाहरण आहे. बाकी सौदीने या नव्हेंबर पासून योगाला खेळ म्हणून मान्यता दिल्याची बातमी आहे. इराण या दुसर्‍या कट्टर देशात आधी पासून मान्यता आहे. केवळ पाकीस्तान आणि अजून एखाद दुसरा देश शिल्लक रहात असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
A
arunjoshi123 Fri, 12/29/2017 - 10:41 नवीन
हारून शेख यांनी अतिशय अभ्यासू व समर्पक प्रतिक्रिया देऊन, इथे एकप्रकारे, विखार पसरवू पाहणाऱ्या एकाच्या, सणसणीत कानाखाली चपराक दिलीये...
हारुनजींनी "लेखकाने दिलेले" कुराणाचे संदर्भ कसे चूक/अपुरे आहेत नि सामान्य भारतीय मुस्लिम कसा संगितप्रेमी आहे हे सांगीतले आहे. ===================================== बाकी उरलेल्या विषयात लेखकाचीच चपराक खणखणीत आहे. =================================================
इथे पण शब्द माझ्या सारख्या माणसाला खुपतो, मनुवादी लोकांना हा 'पण' खुपणार नाही....
तो हिंदुस्थानी शब्द शास्त्रीय संगीतातला आहे का पासपोर्टवरचा आहे हे एकदा विचारून पहा. ====================
बेगम परवीन सुल्ताना (या तर चक्क कुंकू लावतात!),
भारतीय पद्धतीने लग्न करणारे फॉरेनर, दिवाळी साजरी करणारे अहिंदू अधिकारी, अर्थातच विशेष जवळचे वाटतात. --------------- या कुंकू लावतात हे लेखकाला आवडतं हे तुम्हाला किळसव्वाणं वाटतं हे बघून मला तुमची कीव येते. माझी किव बघून पुढे तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटेल, गेस करतोय. ============================
एकही अस्सल रक्ताचा मराठा नाही. हा सर्व बाटग्यांचा भरणा असून
वंशशुद्धी अर्थहिन आहे हे एक (अर्धवट) शास्त्रीय, पुरोगामी मत असू शकतं. अस्सल मराठा ही संकल्पना महाराष्ट्राच्या संस्कृतीशी निगडीत आहे. लोकांनी स्वतःला अस्सल मराठा मानण्यात काही गैर नाही. -------------- बाटगे शब्द टाळता आला असता. धर्मांतर आपल्या देशात, धर्मात मान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
A
arunjoshi123 Fri, 12/29/2017 - 10:41 नवीन
हारून शेख यांनी अतिशय अभ्यासू व समर्पक प्रतिक्रिया देऊन, इथे एकप्रकारे, विखार पसरवू पाहणाऱ्या एकाच्या, सणसणीत कानाखाली चपराक दिलीये...
हारुनजींनी "लेखकाने दिलेले" कुराणाचे संदर्भ कसे चूक/अपुरे आहेत नि सामान्य भारतीय मुस्लिम कसा संगितप्रेमी आहे हे सांगीतले आहे. ===================================== बाकी उरलेल्या विषयात लेखकाचीच चपराक खणखणीत आहे. =================================================
इथे पण शब्द माझ्या सारख्या माणसाला खुपतो, मनुवादी लोकांना हा 'पण' खुपणार नाही....
तो हिंदुस्थानी शब्द शास्त्रीय संगीतातला आहे का पासपोर्टवरचा आहे हे एकदा विचारून पहा. ====================
बेगम परवीन सुल्ताना (या तर चक्क कुंकू लावतात!),
भारतीय पद्धतीने लग्न करणारे फॉरेनर, दिवाळी साजरी करणारे अहिंदू अधिकारी, अर्थातच विशेष जवळचे वाटतात. --------------- या कुंकू लावतात हे लेखकाला आवडतं हे तुम्हाला किळसव्वाणं वाटतं हे बघून मला तुमची कीव येते. माझी किव बघून पुढे तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटेल, गेस करतोय. ============================
एकही अस्सल रक्ताचा मराठा नाही. हा सर्व बाटग्यांचा भरणा असून
वंशशुद्धी अर्थहिन आहे हे एक (अर्धवट) शास्त्रीय, पुरोगामी मत असू शकतं. अस्सल मराठा ही संकल्पना महाराष्ट्राच्या संस्कृतीशी निगडीत आहे. लोकांनी स्वतःला अस्सल मराठा मानण्यात काही गैर नाही. -------------- बाटगे शब्द टाळता आला असता. धर्मांतर आपल्या देशात, धर्मात मान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्रकाश घाटपांडे Mon, 12/25/2017 - 07:21 नवीन
धर्मग्रंथातील ज्या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत तसेच निरोपयोगी ठरल्या आहेत त्या आचरणार आणू नये. मग त्या कोणत्याही धर्मातील असोत. लोकही अशा गोष्टी बाजूला टाकतात.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 12/25/2017 - 09:25 नवीन
ह्या लेखात सरळ सरळ उचलेगिरी आहे आणि उगीच्च केलेली भंकस आहे . असल्या सडक्या मेंदूंनाच हाकलले पाहिजे. बाकी त्या वडा चटणी महोत्सवाबद्दल : तुम्ही त्याला जातीय आणि धार्मिक रंग देत आहात . जे ब्रिगेड करत आहे तेच तुम्ही करताय कहीही फरक नही
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा