लावणी
लावणी
पदर ढळला खांद्यावरुनी लाजेने झाले मी चूर
नका रोखून पाहू मला धडधडे माझा ऊर ||१ ||
रात्र चढली पुनवेची आजि जवळ कोणी नसे
इश्कामध्ये या तुमच्या दाजी झाले मन वेडेपिसे ||२ ||
पान खाऊन आले दाजीबा ओठाला रंगली लाली
सुगंधी गजरा शृंगार करुनि मी वाट पहाते रंगमहाली ||३ ||
स्पर्श होता तुमचा माझे अंगअंग शहारले
श्वास होती एकरूप आपले दुसरे विश्व न उरले |||४ ||
सहवासामध्ये तुमच्या राया स्वत्व माझे हरवले
शृंगारक्रीडा करता करता तन मन भान हरपले ||५ ||
वर्षू दे तुमची प्रीती मजवरी सचैल आज मी न्हाले
रात्र सरली पहाट झाली आकंठ तृप्त मी झाले ||६ ||
--शब्दांकित (वैभव दातार)
रात्र चढली पुनवेची आजि जवळ कोणी नसेम्हणजे सगळे रात्री "आजी"ला एकटे सोडून गेलेले दिसताहेत.इश्कामध्ये या तुमच्या दाजी झाले मन वेडेपिसे ||२ || पान खाऊन आले दाजीबा ओठाला रंगली लालीम्हणजे धाकट्या बहिणीची आणि दाजीची भानगड दिसतीये. (हलकेच घ्या)