डॉ सत्यपाल सिंग :उत्क्रांती सिद्धांत
डॉ सत्यपाल सिंग यांची उत्क्रांती सिद्धांताबाबतची टिप्पणी :
याची माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा चालू आहे .
या विषयी काही प्रश्न :
१. असं काही आहे का ?
२. ते नक्की काय म्हणाले याचे ट्रान्सक्रिप्ट कोणाकडे उपलब्ध आहे का ?
३. त्यांनी डार्विन चा सिद्धांत नाकारताना काही शास्त्रीय कारणे देऊन नाकारला का ? असेल तर ती कोणती ?
४. डार्विन च्या सिद्धांताला मर्यादा आहेत असे अभ्यासू तज्ञ् लोकं सांगतात .( हे ऐकीव आहे . मी तज्ञ् नाही )
३. डॉ सत्यपाल सिंग यांनी मांडलेल्या डार्विन च्या सिद्धांताला पर्यायी सिद्धांताची माहिती कोणाला आहे का ?(म्हणजे जर तसा काही मांडला असेल तर )
धन्यवाद
पूर्वी भारतात प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात होतीअसे खुद्द पंतप्रधानही म्हणाले होते.माईसाहेब, "सुश्रुत" हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे काय ? प्लास्टिक सर्जरीचे उल्लेख भारतात इसविसनपूर्व ८०० पासून सापडतात. सुश्रुत ऋषी (इ स पूर्व ६ वे शतक) यांना आजच्या वैद्यकीय क्षेत्रात, जागतिक स्तरावर केवळ प्लास्टिक सर्जरीचेच नव्हे तर सर्वच सर्जरीचे जनक समजले जाते. जेव्हा युरोपात अंधारयुग चालू होते, त्या काळात भारतात सुश्रुताने प्लास्टिक सर्जरी, मोतीबिंदू , इत्यादी अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया शेकडोने केल्या. त्यांची माहिती व प्रक्रिया "सुश्रुतसंहिता ($)" या ग्रंथात शब्दबद्ध झाली आहे. सुश्रुतानंतर आलेल्या अनेक वैद्यकिय तज्ज्ञांनी या ग्रंथातिल ज्ञानसंपदेत अधिकाधिक भर टाकलेली आहे. मोदीविरोधाच्या भरात निदान भारताचा खरा इतिहास विसरणे किंवा दुर्लक्षित करणे हा अंधत्वाचा कळस झाला ! अश्या खर्या इतिहासाची हेटाळणी करणे, हे मानसिक गुलामगिरीचे व Self-flagellationचे लक्षण असते. अवांतर : माहित नसलेल्या विषयाबाबत जालावर थोडाशी विचारणा करून मगच किबोर्ड वापरला तरी सपशेल तोंडघशी पडणे सहज टाळता येईल... नाही तर "उचलली जीभ..." हे आहेच, म्हणा ! =)) =)) =)) ********************************* $ : The Suśruta-saṃhitā, in its extant form, in 184 chapters contains descriptions of 1,120 illnesses, 700 medicinal plants, 64 preparations from mineral sources and 57 preparations based on animal sources. The text discusses surgical techniques of making incisions, probing, extraction of foreign bodies, alkali and thermal cauterization, tooth extraction, excisions, and trocars for draining abscess, draining hydrocele and ascitic fluid, removal of the prostate gland, urethral stricture dilatation, vesicolithotomy, hernia surgery, caesarian section, management of haemorrhoids, fistulae, laparotomy and management of intestinal obstruction, perforated intestines and accidental perforation of the abdomen with protrusion of omentum and the principles of fracture management, viz., traction, manipulation, apposition and stabilization including some measures of rehabilitation and fitting of prosthetic. It enumerates six types of dislocations, twelve varieties of fractures, and classification of the bones and their reaction to the injuries, and gives a classification of eye diseases including cataract surgery.पूर्वसूरींचा नावलौकिक सद्यकालासाठी पुरेसा नाहीय. काहीतरी नवनिर्माण हवे आहे. विसाव्या शतकात थोडीफार चालना मिळाल्यासारखी दिसते. हा प्रवाह जोमदार व्हायला हवा.याबद्दल वाद असूच शकत नाही. पण सद्या दोन प्रकारचे एकेरी लोकच फार दिसतात... एक तर ते इतिहासाचे अतिशयोक्त वर्णन करणारे असतात किंवा आपला सर्व इतिहास अत्यंत क्षूद्र आणि लाजिरवाणा असल्याचे मानणारे. माझ्यामते दोन्हीही तितकेच निषिद्ध आहेत. आपल्या खर्या इतिहासाकडे दुर्लक्ष किंवा त्याची उपेक्षा करण्यापेक्षा, त्यातून (आपणही बरेच काही केले आहे / करू शकतो) हा बोध घेऊन आताच्या काळात काही उत्तम करण्यासाठी प्रेरणा घेणे जास्त योग्य होईल. तसेच, माझ्या प्रतिसादाचा मूळ रोख माईसाहेब या आयडीच्या प्रतिसादाच्या संदर्भात (आधीच लिहिल्याप्रमाणे) असा होता... मोदीविरोधाच्या भरात निदान भारताचा खरा इतिहास विसरणे किंवा दुर्लक्षित करणे हा अंधत्वाचा कळस झाला ! अश्या खर्या इतिहासाची हेटाळणी करणे, हे मानसिक गुलामगिरीचे व Self-flagellationचे लक्षण असते.