Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डॉ सत्यपाल सिंग :उत्क्रांती सिद्धांत

A
A.N.Bapat
Tue, 01/23/2018 - 13:27
🗣 86 प्रतिसाद
डॉ सत्यपाल सिंग यांची उत्क्रांती सिद्धांताबाबतची टिप्पणी : याची माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा चालू आहे . या विषयी काही प्रश्न : १. असं काही आहे का ? २. ते नक्की काय म्हणाले याचे ट्रान्सक्रिप्ट कोणाकडे उपलब्ध आहे का ? ३. त्यांनी डार्विन चा सिद्धांत नाकारताना काही शास्त्रीय कारणे देऊन नाकारला का ? असेल तर ती कोणती ? ४. डार्विन च्या सिद्धांताला मर्यादा आहेत असे अभ्यासू तज्ञ् लोकं सांगतात .( हे ऐकीव आहे . मी तज्ञ् नाही ) ३. डॉ सत्यपाल सिंग यांनी मांडलेल्या डार्विन च्या सिद्धांताला पर्यायी सिद्धांताची माहिती कोणाला आहे का ?(म्हणजे जर तसा काही मांडला असेल तर ) धन्यवाद

प्रतिक्रिया द्या
27179 वाचन

💬 प्रतिसाद (86)
श
श्रीगुरुजी Fri, 01/26/2018 - 06:27 नवीन
खरे आहे. तो प्रतिसाद म्हणजे पराकोटीचा मूर्खपणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ग
गामा पैलवान गुरुवार, 01/25/2018 - 14:17 नवीन
अमितदादा, .... ती गोष्ट वेदात नाही किंवा पूर्वजांनी माकडाचा माणूस झालेला पाहिलं नाही अशी बाळबोध कारणे देत नसावेत. अधिक संशोधन व्हायला पाहिजे यावर तुमच्याशी एकमत आहे. डॉक्टर सत्यपाल सिंहांचं विधान थोडं विवाद्य आहे हे ही मान्य. मात्र वेद हे काही बाळबोध कारणांचे जनक मानले जाऊ नयेत. पुंजवादाचे ( = क्वांटम फिजिक्स) एक प्रणेते वर्नर हायझेनबर्ग यांचे हे उद्गार सुप्रसिद्ध आहेत : "After the conversations about Indian philosophy, some of the ideas of Quantum Physics that had seemed so crazy suddenly made much more sense" त्यामुळे वेदांचा उल्लेख प्रेरणादायी साहित्य म्हणून केला जावा असं माझं मत आहे. वेद हे बाळबोध कारणांचे जनक मानले जाऊ नयेत. अर्थात हे मत डॉक्टर सत्यपाल सिंहांना सुद्धा लागू पडतं. त्यामुळे त्यांचं विधान थोडं दुरुस्त करून म्हणेन की डार्विनला ज्या प्रकारची उत्क्रांती अपेक्षित होती तिचा मागमूस पारंपरिक वैदिक साहित्यांत आढळून येत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 01/26/2018 - 05:27 नवीन
१) " माकडापासून माणूस उत्क्रांत झाला" या वाक्यास विरोध आहे का? २) सरसकट डार्विनचा उ०वाद संपूर्ण खोटा आहे? ३ ) क्रमांक एक यास विरोधी शारिरीक कारण म्हणजे मानवाच्या पायास हातासारखा अंगठ नाही,पायाने तो फांदी धरू शकत नाही. शेपूट नाहिसे झाल्याची छोटीशी हाडाची खूण दिसते तसा कोणत्या मानवाचा हाडाचा सापळा मिळालेला आहे का की जिथे अंगठ्याचे हाड बाजुस आहे? ४) सत्यपाल अथवा इतर कोणास तूर्तास बाजूला ठेवून उत्तरे शोधा.
  • Log in or register to post comments
A
A.N.Bapat Fri, 01/26/2018 - 08:04 नवीन
कंजूस राव , विरोध डार्विन ला किंवा डार्विन विरोधालाही नाही . विरोध आहे तो स्वतःचा सखोल अभ्यास नसताना आणि गरज नसताना एखाद्या विषयावर बोलण्याची हौस भागवण्याला आहे . विरोध आहे तारतम्याच्या अभावाला. कुठल्याही शास्त्रीय प्रमेयाबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात काही वावगे नाही . परंतु हे प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्याला त्या विषयाचे पुरेसे ज्ञान/ अभ्यास असेल, आणि प्रश्नचिन्ह तार्किक असेल तर च ते संयुक्तीक ठरेल , असे वैयक्तिक मत अन्यथा ती वायफळ बडबड . ( तुम्हाला पटतंय का मी लिहिलेलं हे ?) जावडेकरांनी योग्य केले .
  • Log in or register to post comments
A
A.N.Bapat Fri, 01/26/2018 - 08:04 नवीन
कंजूस राव , विरोध डार्विन ला किंवा डार्विन विरोधालाही नाही . विरोध आहे तो स्वतःचा सखोल अभ्यास नसताना आणि गरज नसताना एखाद्या विषयावर बोलण्याची हौस भागवण्याला आहे . विरोध आहे तारतम्याच्या अभावाला. कुठल्याही शास्त्रीय प्रमेयाबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात काही वावगे नाही . परंतु हे प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्याला त्या विषयाचे पुरेसे ज्ञान/ अभ्यास असेल, आणि प्रश्नचिन्ह तार्किक असेल तर च ते संयुक्तीक ठरेल , असे वैयक्तिक मत अन्यथा ती वायफळ बडबड . ( तुम्हाला पटतंय का मी लिहिलेलं हे ?) जावडेकरांनी योग्य केले .
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 01/26/2018 - 09:03 नवीन
A.N.Bapat,
विरोध डार्विन ला किंवा डार्विन विरोधालाही नाही . विरोध आहे तो स्वतःचा सखोल अभ्यास नसताना आणि गरज नसताना एखाद्या विषयावर बोलण्याची हौस भागवण्याला आहे . विरोध आहे तारतम्याच्या अभावाला.
या न्यायाने डार्विनच्या थियरीला पण विरोध व्हायला हवा ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: A.N.Bapat
A
A.N.Bapat Fri, 01/26/2018 - 09:32 नवीन
जरूर . फक्त याची जाणीव हवी की हा वैज्ञानिक सिद्धांत आहे . त्याचा अभ्यास असावा व मग त्यातील त्रुटी शोधाव्यात . सापडल्यास त्या त्रुटींबद्दल पिअर रिव्युड जर्नल्स मध्ये लिहावे . जिथे या तुम्हाला सापडलेल्या त्रुटींवर इतर या सिद्धांताचा अभ्यास केलेले ज्ञानी पुरुष भाष्य करतील ., तुमच्याशी सहमत किंवा असहमत होतील , आजवर ज्ञात असलेल्या शास्त्राधारे .हा सर्वमान्य राजमार्ग . शास्त्रीय संशोधनाबाबत खरे खोटे करण्याचा . तुमच्या मूळ प्रश्नाचे उत्तर : विरोध जरूर करावा . कुठल्याही शास्त्रीय सिद्धांताला पण ... सत्यपाल सिंह यांनी त्यांच्या निष्कर्षाप्रति पोचण्यापूर्वी या सिद्धांताचा अभ्यास केला होता का याबद्दल साशंक आहे . त्यांनी दिलेल्या कारणमिमांसेवरून . अशा परिस्थितीत त्यांनी या विषयावर भाष्य करणे गरजेचेच होते का ? जबाबदारी च्या पदावर असताना बोलताना तारतम्य बाळगणे जरुरी असे वैयक्तिक मत . जावडेकर साहेबांनी योग्य केले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 01/26/2018 - 15:08 नवीन
A.N.Bapat, तुमचा संदेश वाचला. त्यावरची माझी मतं सांगतो. १.
फक्त याची जाणीव हवी की हा वैज्ञानिक सिद्धांत आहे
नेमका इथेच तर घोळ आहे. डार्विनचा नियम हा खरोखरीच वैज्ञानिक सिद्धांत आहे, की केवळ एक मतप्रदर्शन आहे. २.
सत्यपाल सिंह यांनी त्यांच्या निष्कर्षाप्रति पोचण्यापूर्वी या सिद्धांताचा अभ्यास केला होता का याबद्दल साशंक आहे . त्यांनी दिलेल्या कारणमिमांसेवरून .
वेदांचा उल्लेख हा कारणमीमांसा म्हणून होऊ नये, तर एक प्रेरणा म्हणून व्हावा. त्यामुळे डॉक्टर सत्यपाल सिंहांचं विधान थोडं दुरुस्त करून म्हणेन की डार्विनला ज्या प्रकारची उत्क्रांती अपेक्षित होती तिचा मागमूस पारंपरिक वैदिक साहित्यांत आढळून येत नाही. ३.
त्यांनी या विषयावर भाष्य करणे गरजेचेच होते का ?
हो. याचं कारण असं की (माझ्या माहितीनुसार) डार्विनने कुठेही माकडापासून माणूस निर्माण झाला असं विधान केलेलं नाहीये. तरीपण असंकाही विधान जर पाठ्यपुस्तकात आलं असेल तर त्याचा छडा लावायला हवाय. ४.
जबाबदारी च्या पदावर असताना बोलताना तारतम्य बाळगणे जरुरी असे वैयक्तिक मत .
एक सर्वसाधारण नियम म्हणून मान्य. प्रस्तुत प्रसंगात डॉक्टर सिंहांचं शब्दांकन अपरिपक्व आहे. मात्र त्यांच्या विधानामागील हेतू समजावून घेणं फारसं कठीण नाही. ५.
जावडेकर साहेबांनी योग्य केले .
सहमत आहे. अर्थात जावडेकर साहेबही या विषयातले तत्ज्ञ नाहीत. त्यामुळे त्यांच्या विधानातनं निश्चित दिशेने मार्गदर्शन होत नाही. परंतु एक सर्वसाधारण शिस्त म्हणून ते योग्य बोललेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: A.N.Bapat
श
श्रीगुरुजी Sat, 01/27/2018 - 10:48 नवीन
विरोध आहे तो स्वतःचा सखोल अभ्यास नसताना आणि गरज नसताना एखाद्या विषयावर बोलण्याची हौस भागवण्याला आहे . विरोध आहे तारतम्याच्या अभावाला. सखोल अभ्यास कोणाचाच नाही. सत्यपाल सिंगांच्या विधानानंतर अनिकेत सुळे नावाच्या शास्त्रज्ञाने एक ऑनलाईन पिटीशन तयार करून सत्यपाल सिंहांनी आपले विधान मागे घेण्याची त्यात मागणी केली आहे. एका वाहिनीवर बोलताना अनिकेत सुळे म्हणाले की मी अंतराळ संशोधक आहे. मला जीवशास्त्रातले फारसे कळत नाही. परंतु डार्विनचा सिद्धांत पुराव्याने सिद्ध झाला आहे. जीवशास्त्राचा फारसा अभ्यास नसताना एक अंतराळ शास्त्रज्ञ ठामपणे डार्विनच्या सिद्धांताच्या बाजूने बोलू शकतो तर रसायनशास्त्रात द्विपदवीधर व एम फिल असलेले सत्यपाल सिंह डार्विनच्या सिद्धांताच्या विरूद्ध का बोलू शकत नाहीत? मुळात डार्विनचा सिद्धांत म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयासारखा गणिती सिद्धांत नाही जो कोणत्याही प्रकारच्या काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत सिद्ध होतो. डार्विनचा सिद्धांत हे त्याच्या निरीक्षणावर आधारीत एक दावा आहे जो दावा अजून सर्वमान्य नाही व निर्विवाद सिद्ध झालेला नाही. अशा दाव्यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असेल तर त्यासाठी एवढा आकांडतांडव करण्याची गरज नव्हती. ऑनलाईन पिटीशन सारखे हास्यास्पद मार्ग चोखाळण्याऐवजी एखाद्या जैवशास्त्रज्ञाने विज्ञानाचा आधार घेऊन सत्यपाल सिंहांचे विधान खोडले असते तर ते जास्त योग्य ठरले असते. असे करण्याऐवजी ऑनलाईन पिटीशन वगैरे करून सत्यपाल सिंहांना आपले विधान मागे घेण्याची विनंती करणे ही शुद्ध दडपशाही व झुंडशाही झाली. कुठल्याही शास्त्रीय प्रमेयाबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात काही वावगे नाही . परंतु हे प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्याला त्या विषयाचे पुरेसे ज्ञान/ अभ्यास असेल, आणि प्रश्नचिन्ह तार्किक असेल तर च ते संयुक्तीक ठरेल , असे वैयक्तिक मत अन्यथा ती वायफळ बडबड . ( तुम्हाला पटतंय का मी लिहिलेलं हे ?) सत्यपाल सिंहांना विरोध करणार्‍यांपैकी किती जणांना या विषयाचे पुरेसे ज्ञान व अभ्यास आहे. वर अनिकेत सुळे यांचे उदाहरण दिलेच आहे. त्यांच्या बरोबरीने काही विज्ञानकथा लेखकही आले होते. विज्ञानकथा लेखकांना तरी विज्ञानाचे पुरेसे ज्ञान व अभ्यास असतो का? जर सत्यपाल सिंहाचे विधान वायफळ बडबड असेल तर त्यांना विरोध करणारेही तशीच वायफळ बडबड करीत आहेत. जर डार्विनचा सिद्धांत निर्विवाद सिद्ध झाला असेल तर तसे वैज्ञानिक दृष्ट्या दाखवून द्या व सत्यपाला सिंहांना वैज्ञानिक मार्गाने विरोध करा. ऑनलाईन पिटीशन करून, सत्यपाल सिंहांवर आगपाखड करून डार्विनचा सिद्धांत सिद्ध होणार नाही. असे केलेत तर त्यामागे निव्वळ राजकारण आहे असा वास आल्यावाचून राहणार नाही. जावडेकरांनी योग्य केले . कशावरून? जावडेकरांचा या विषयातील अभ्यास व ज्ञान किती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: A.N.Bapat
क
कंजूस Sat, 01/27/2018 - 12:26 नवीन
सत्यपालांचे एक शास्त्रीय निवेदन,शिवाय ते एक मंत्री असा विषय आहे हे ध्यानात ठेवून पुढे काही डार्विन सिद्धांतावर लिहित नाही. मागे एकदा एका मंत्र्याने परळच्या केइएम हॅास्पिटलातल्या रेडिओलजी केन्द्राचे उदघाटन करून भाषण ठोकले - " इथल्या लोकांना आता रेडिओचे कार्यक्रम सुस्पष्ट ऐकू येतील ~~~~~" चालायचंच.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/27/2018 - 20:24 नवीन
आमच्या डोंबोलीतल्या खासदाराने एका कॅरम स्पर्धेचे उद्-घाटण करतांना नारळ फोडला आणि सर्व नारळपाणी कॅरम बोर्डावर ओतले. असो, मेरा भारत महान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 05:58 नवीन
नारळ फोडून पाणी फिरवले व त्या पाण्याने ज्या मशीनचे उद्घाटन केले , तेच बंद् पडले. अशीही उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 01/28/2018 - 13:21 नवीन
तशा स्वभावाच्या व्यक्ती, आजूबाजूला बघीतल्या की, माणसापासूनच माकड झाला असावा, अशी पण शंका मनांत येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
र
राही Sun, 01/28/2018 - 08:23 नवीन
१)वेदांचेच प्रामाण्य पुन्हा प्रस्थापित करायचे तर मधली बदलांची अडीज तीनहजार वर्षे वायाच गेली म्हणायची. २)सांगे वडिलांची कीर्ति तो येक मूर्ख.(दासबोध) ३)जुने जाऊं द्या मरणालागुनी, जाळुनि किंवा पुरुनी टाका सडत न एक्या ठायी ठाका, सावध, ऐका पुढल्या हाका.(केशवसुत) ४) आजच्या मानवाचे हजारो वर्षांपूर्वीचे पूर्वज आणि आजच्या माकडांपैकी एका जातीचे हजारो वर्षांपूर्वीचे पूर्वज यांत पुष्कळ साम्य होते. नंतर या जातींचे विकसन वेगवेगळ्या प्रकारे होत गेले आणि आजची माकडे आणि मानव घडत गेले. (आजच्या) माकडातून (आजचा) मानव निघाला असा सिद्धांत कोणीच मांडत नाही. किंवा माकडातून मानव निघाला असेही म्हणणे योग्य नव्हे. जसे की नीॲंडर्थल मानव याच्या प्रजातीविषयी एकमत नाही. अनेक तज्ज्ञ त्याची प्रजाती सध्याच्या मानवाहून वेगळी मानतात. ५) अंगठा बाजूला असलेल्या प्राण्याचा सांगाडा समजा जरी मिळाला तरी तो मानव या प्रजातीचा नसेल. कारण ' मानव' या प्रजातीत अंगठा बाजूला असत नाही. ६) वरील मुद्द्याबाबत भाषाशास्त्रातले एक जवळचे उदाहरण देण्याजोगे आहे. कोंकणी आणि मराठी या भाषा अपभ्रंश या एका मधल्या टप्प्यावरील भाषेतून निर्माण झाल्या. ही अपभ्रंश म्हणजे आजची कोंकणी नव्हे किंवा आजची मराठीसुद्धा नव्हे. म्हणून मराठीतून कोंकणी निर्माण झाली हा समज चुकीचा आहे. असो.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 01/28/2018 - 13:17 नवीन
राही, तुमच्या गाडीने चुकीच्या जागी वळण घेतलंय. काल कोल्हापुरात दुर्दैवी बसने पुलावरून कलंडण्याआधी घेतलं तसं. १.
१)वेदांचेच प्रामाण्य पुन्हा प्रस्थापित करायचे तर मधली बदलांची अडीज तीनहजार वर्षे वायाच गेली म्हणायची.
वेद प्रेरणामयी आहेत. तुम्ही त्यांचं प्रामाण्य काढताय. चुकीचं वळण. २.
२)सांगे वडिलांची कीर्ति तो येक मूर्ख.(दासबोध)
विषयांतर. ३.
३)जुने जाऊं द्या मरणालागुनी, जाळुनि किंवा पुरुनी टाका सडत न एक्या ठायी ठाका, सावध, ऐका पुढल्या हाका.(केशवसुत)
विषयांतर. ४.
४) आजच्या मानवाचे हजारो वर्षांपूर्वीचे पूर्वज आणि आजच्या माकडांपैकी एका जातीचे हजारो वर्षांपूर्वीचे पूर्वज यांत पुष्कळ साम्य होते. नंतर या जातींचे विकसन वेगवेगळ्या प्रकारे होत गेले आणि आजची माकडे आणि मानव घडत गेले. (आजच्या) माकडातून (आजचा) मानव निघाला असा सिद्धांत कोणीच मांडत नाही. किंवा माकडातून मानव निघाला असेही म्हणणे योग्य नव्हे. जसे की नीॲंडर्थल मानव याच्या प्रजातीविषयी एकमत नाही. अनेक तज्ज्ञ त्याची प्रजाती सध्याच्या मानवाहून वेगळी मानतात.
मात्र तरीही शालेय पाठ्यपुस्तकांत 'माकड व माणसाचा पूर्वज एक आहे' हे अंतिम सत्य म्हणून शिकवलं जातं. निदान डॉक्टर सत्यपालसिंहाची तशी समजूत आहे. ५.
५) अंगठा बाजूला असलेल्या प्राण्याचा सांगाडा समजा जरी मिळाला तरी तो मानव या प्रजातीचा नसेल. कारण ' मानव' या प्रजातीत अंगठा बाजूला असत नाही.
हा काय प्रकार आहे ते कळलं नाही. ६.
६) वरील मुद्द्याबाबत भाषाशास्त्रातले एक जवळचे उदाहरण देण्याजोगे आहे. कोंकणी आणि मराठी या भाषा अपभ्रंश या एका मधल्या टप्प्यावरील भाषेतून निर्माण झाल्या. ही अपभ्रंश म्हणजे आजची कोंकणी नव्हे किंवा आजची मराठीसुद्धा नव्हे. म्हणून मराठीतून कोंकणी निर्माण झाली हा समज चुकीचा आहे.
अपभ्रंश नावाची भाषा अस्तित्वात असल्याचे पुरावे (बहुधा उपलब्ध) आहेत. परंतु माणूस व माकडाचा समान पूर्वज अस्तित्वात असल्याचा कसलाही पुरावा (माझ्या मते) उपलब्ध नाही. कुणाकडे असल्यास मी माझी समजूत बदलावयास तयार आहे. शिवाय भाषेचे नियम जीवसृष्टीस थेटपणे कितपत लागू करता येतील हा वेगळा मुद्दा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
क
कंजूस Mon, 01/29/2018 - 02:17 नवीन
राही, क्रमांक ५) - पाय असलेला साप आहे तो उत्क्रांतीतील एक अवस्था धरू तसं माकडाचा पाय आणि माणसाचा सपाट पाय यामधली एक अवस्था दाखवणारा मनुष्य सांगाडा मिळणे फार महत्त्वाचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सुबोध खरे Mon, 01/29/2018 - 05:56 नवीन
@ राही येथे गवतास फाटे फुटतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मराठी कथालेखक Tue, 01/30/2018 - 15:25 नवीन
प्रतिसाद आवडला. वेदाच्यांच सहाय्याने आजही प्रत्येक गोष्टीच आकलन करण्याचा प्रयत्न करणं चुकीचंच ठरेल. वेद लिहणारे ज्ञानी असतील पण त्यांच्या त्यावेळच्या ज्ञानाला मर्यादाही असू शकतात हे मान्य केलं नाही तर आपली अधोगती निश्चित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
श
श्रीगुरुजी Sun, 01/28/2018 - 14:47 नवीन
>>> मात्र तरीही शालेय पाठ्यपुस्तकांत 'माकड व माणसाचा पूर्वज एक आहे' हे अंतिम सत्य म्हणून शिकवलं जातं. निदान डॉक्टर सत्यपालसिंहाची तशी समजूत आहे. शालेय पुस्तकात डार्विनच्या सिद्धांताबरोबर एक चित्र असते. त्यात डाव्या बाजूला गुडघ्यांवर वाकून चालणारे माकड असून ते क्रमाक्रमाने उत्क्रांत होत शेवटी त्यांचे रूपांतर ताठ चालणा-या मानवात होते असे दाखविले होते.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 01/28/2018 - 21:16 नवीन
गुरुजी, मुळात उत्क्रांतीचा सिद्धांत समजायला अत्यंत किचकट आहे.. त्यामुळे मुलांना समजायला सोपे म्हणून कदाचित तसे चित्र काढले असतील. पण त्या चित्रामुळे अनएक गैरसमज निर्माण होतात हे मात्र खरे. उत्क्रांती बद्दल इथेच एक लेखमालिका आली होती, म्हात्रे काका किंवा घासुगुर्जी यांची. आपल्याला शाळेत शिकवलेला (किंवा आपल्याला समजलेला) डार्विनचा सिद्धांत आणि आजचे त्याचे स्वरूप यात प्रचंड तफावत आहे (डार्विनचा सिद्धांत बहुधा भांडवलशाहीला पाठबळ देण्यासाठी वापरला गेला, आजचा सिद्धांत अगदीच वेगळा आहे त्या बाबतीत).. सैद्धांतिक स्वरूपात तरी तो पूर्ण आहे, पुरावे येत जातील तसा तो अधिकाधिक स्थिर होत जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आनन्दा Sun, 01/28/2018 - 21:18 नवीन
जाता जाता, परवाच माझ्या ५ वर्षांच्या मुलीने माकडाचा माणूस कसा झाला म्हणून विचारले.. तिला उत्तर देताना चांगलीच भंबेरी उडाली होती ते आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
मुक्त विहारि Sun, 01/28/2018 - 21:36 नवीन
जिथे खूप माकडे असतील अशा शेतात न्या (कोकणात अशी बरीच शेते आहेत.) आणि मग एखाद्या बफेला न्या. माकडे शेतात जशी नासधूस करतात, तशीच अन्नाची नासधूस माणूस बफे मध्ये करतो. शेपटी सुटली तरी स्वभावधर्म जात नाही. असे सांगायचे. प्रतिसाद हलकाच घ्या. स्वगत : माणसा पासूनच माकड झाले असावे का? असाच विचार मनांत येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sun, 01/28/2018 - 23:57 नवीन
हसून हसून मेलो.. सांगलीतल्या एक लग्नाचा बफे आठवला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/29/2018 - 18:26 नवीन
=)) =)) =)) तुम्ही उगाचच शेतीत गेलात आणि जग एका थोर मानववंशशास्त्रज्ञाला मुकले की हो ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 01/31/2018 - 00:47 नवीन
निरिक्षण केले की, "नेत्याला सगळे समजते," हा माणसांचा आणि माकडांचा गुणधर्म, समजायला जास्त वेळ लागत नाही. पण एक आहे, टोळीतला नेता मरण पावला की, माकड टोळीत, नेता वंशपरंपरेने निवडला जात नाही. नेता निवडी बाबतची, "माकडांची प्रगल्भता", सर्व माणसांत यायला खूप वेळ लागेल.काही काही समाजात ही सुधारणा आहे.पण ती अपवाद म्हणूनच. असो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
द
दीपक११७७ Tue, 01/30/2018 - 12:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
द
दीपक११७७ Tue, 01/30/2018 - 12:20 नवीन
मुवि काका यांना हा प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
न
नाखु Tue, 01/30/2018 - 18:46 नवीन
इकडे शहरातील माकडांना प्रशिक्षण देण्यात वेळ काढायचा, शिक्के मारत प्रत्येक विषयात मोदी, भाजपा गेलाबाजार हिंदू (ओढूनताणून) आणायचं ,तर बसलेत खेड्यात शेती करत!! हा प्रीतीसाद फक्त मुवींना आहे मिपावरील आमची माणसं आणि (त्यांनी) केलेली आपलीच माती या मालिकेचा प्रत्यक्ष अनुभवी प्रेक्षक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
म
मुक्त विहारि Tue, 01/30/2018 - 23:57 नवीन
ह्यांच्यात दोनच फरक... शेपूट दिसत नाही...हा प्रत्यक्ष आणि "आपल्या टोळीतील सदस्याला सांभाळून घ्यायचे " हा निरिक्षण केले तर दिसणारा दुसरा फरक. बादवे, माकडाला पकडून परत त्याला काही दिवसांनी सोडले तर, त्याला परत आपल्या टोळीत घेत असतील का? ह्याचा पण प्रयोग कुणीतरी करून बघायला पाहिजे. "मिपावरील आमची माणसं आणि (त्यांनी) केलेली आपलीच माती या मालिकेचा प्रत्यक्ष अनुभवी प्रेक्षक नाखु" ह्याबाबत काय बोलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सुबोध खरे Mon, 01/29/2018 - 05:54 नवीन
एका माणसाने माकड पाळले होते. पण आचरटपणात दोघांत इतकी स्पर्धा लागली होती कि कुणी कुणाला पाळले होते याबद्द्दल शंका यावी --पु ल
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Tue, 01/30/2018 - 12:27 नवीन
The human Y chromosome has twice as many genes as the Chimpanzee Y chromosome. Humans have at least 78 genes and Chimpanzees have only 37. The Y chromosomes of Chimpanzees and humans are radically different in the arrangement of their genes. Both of these facts make it impossible for apes to have evolved into humans because there are no genetic mechanisms that would account for the vast differences between the ape and human Y chromosomes. Below are maps of the Chimpanzee and human Y chromosomes: Image removed. The top map is the Chimpanzee Y chromosome and the lower map is the human Y chromosome. "Ape to human evolution" theory asserts that the Chimpanzee Y chromosome (top one) evolved into the human Y chromosome (the lower one) and few changes were necessary. That is obviously baloney - there is no way that could have happened. There is no genetic mechanism that could have rearranged the genes in the Chimpanzee Y chromosome to become the human Y chromosome. The two chromosomes are so different it is like comparing the chromosomes of humans to those of chickens. The regions of both chromosomes are color coded to identify the gene family or DNA type as follows (MSY means male specific region of the Y chromosome): darwinconspiracy वरुन साभार
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Tue, 01/30/2018 - 12:37 नवीन
Darwinians also were determined to hide any evidence that contradicted their beloved evolution theory. That is why atheist scientists simply concocted a lie and told us apes and humans both have 24 pairs of chromosomes. An atheist scientist named Theophilus Painter took the lead and published a paper in 1921 claiming humans have 24 pairs of chromosomes. Other atheist scientists “confirmed” this in other scientific papers. It was not until 1956 that the fraud came to an end because evolution theory had gained enough support to not need to be buttressed by the 24 chromosome lie. The “apes and humans have the same number of chromosome lie” had done its damage to the truth - Adolf Hitler, Joseph Stalin, Mao Tse-Tung all pointed to the “24 chromosome lie” as a reason for them to ban the teaching of creationism from German, Russian and Chinese schools. We bet you did not know that atheists claimed that “apes and humans have the same number of chromosomes.” Unless you were studying genetics before 1956, you probably never knew that scientists used to claim humans and apes both had 24 pairs of chromosomes so we should offer you some evidence for this. Below is a link to Wikipedia – the link gets you to the Wikipedia biography of Theophilus Painter, the atheist scientist who published a “scientific paper” incorrectly claiming humans have 24 pairs of chromosomes. https://en.wikipedia.org/wiki/Theophilus_Painter It is worthy to note that even now, scientists are prevaricating about this matter and they insist they did not lie to us about humans having 24 pairs of chromosomes. Instead they tell us they made an “understandable mistake” and it was very difficult to accurately count all the way up to 24 pairs of chromosomes. It is absurd for atheists to assert that the counting of just 23 pairs of chromosomes was so difficult that none of them could do it correctly for over 30 years. Guess what? They had no trouble counting the much larger number of chromosomes for other animals, such as dogs who have 39 pairs. darwinconspiracy वरुन साभार
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 01/30/2018 - 15:31 नवीन
बरं उत्क्रांतीवाद खरा नाही असं म्हणायचं तर मानव (आणि इतर बहूपेशीय सजीव) नेमके कसे अस्तित्वात आलेत याची दुसरी /पर्यायी थिअरी काय आहे ?
  • Log in or register to post comments
स
सागर Tue, 01/30/2018 - 15:51 नवीन
http://shyammanav.blogspot.in/2012/11/blog-post.html
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/30/2018 - 18:41 नवीन
श्याम मानव यझ प्रकारातला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर
द
दीपक११७७ Wed, 01/31/2018 - 05:57 नवीन
बरं उत्क्रांतीवाद खरा नाही असं म्हणायचं.........
सध्यातरी Ape to human evolution थेरीशी सहमत नाही
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा