Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सैल असावी मिठी जराशी...

प — प्राची अश्विनी, Wed, 01/31/2018 - 03:46
सैल असावी मिठी जराशी, हळूच वळुनी तुला बघाया, अर्ध्या मिटल्या तव नयनांचे, ओले हळवे चुंबन घ्याया.. रेशीम काळे केस उडोनी, कुरळ्या लाटा बाहुंवरती, मऊ मुलायम आखीव रेखीव, घटद्वयांना व्यर्थ लपवती... जरा विसावून सिंहकटीवर, मधूर मादक श्वास फुलावे, अधीर कोडे या विश्वाचे, गहि-या डोही उकलून यावे.. पहाटवारा लगबग करतो, घेऊन येतो थोडे केशर, स्वर्णीम करतो शर्मिल गाला, तलम तृप्तीचे शिंपून अत्तर.. ( पहिली ओळ रेखोकडून उधार घेतली आहे..)

प्रतिक्रिया द्या
17028 वाचन

💬 प्रतिसाद (43)
प
प्रचेतस Wed, 01/31/2018 - 03:56 नवीन
सुंदर कविता.
( पहिली ओळ रेखोकडून उधार घेतली आहे..)
रेखो म्हणजे कोण?
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 01/31/2018 - 05:04 नवीन
धन्यवाद! रेणुका खोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अनुप देशमुख Sun, 02/04/2018 - 09:24 नवीन
रेखो आहेत का मिपावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
प
प्राची अश्विनी Mon, 02/05/2018 - 04:01 नवीन
माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप देशमुख
म
मारवा Wed, 01/31/2018 - 04:36 नवीन
रेशीम काळे केस उडोनी, कुरळ्या लाटा बाहुंवरती, मऊ मुलायम आखीव रेखीव, घटद्वयांना व्यर्थ लपवती... घटद्वय लपवले जातात ? म्हणजे कुठले घटद्वय ?
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 01/31/2018 - 04:40 नवीन
म्हणजे हे स्त्रीचे पुरुषाने केलेले वर्णन आहे की पुरुषाने स्त्रीचे केलेले वर्णन टीसि? सिहकटी आणि घटद्वय मुळे कन्फ्युज झालोय
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 01/31/2018 - 05:06 नवीन
मारवा, मारवा, __/\__. आता काय बोलू? जे आवडेल ते मानायला हरकत नाही.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
च
चिगो Wed, 01/31/2018 - 14:15 नवीन
माझ्यामते, पुरुषाने स्त्रीचे हळवेपणाने केलेले वर्णन असावे.. प्राचीजी, कविता आवडली. सुंदर शृंगारीक कविता.. अवांतर : मागे कुठल्यातरी धाग्यावर 'पुरुष बायकांच्या भावनांना / समस्यांनादेखील पुरुषांच्याच नजरेने पाहतात..' अश्या आशयाची प्रतिक्रीया आणि त्यावर चर्चा वाचली होती. माझ्यामते, ही कविता म्हणजे कवियत्रीने स्त्रीच्या सौंदर्याचे व भावनेचे 'परकाया प्रवेशातून' केलेले वर्णन आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/01/2018 - 03:15 नवीन
तसंही म्हणता येईल. स्त्री ने लिहिलेली पण पुरुषाच्या दृष्टीने म्हणूनच मारवा गोंधळले. पण ही कविता एका सुंदर क्रीडेचं वर्णन आहे की जिचा स्त्री पुरुष दोघांनीही सम आनंदात भोग घेतलाय. त्यामुळे हे त्यानं म्हटलंय की तिनं याला तेव्हढं महत्त्व रहात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
च
चांदणे संदीप Wed, 01/31/2018 - 05:38 नवीन
व्हेरिएशन म्हणून "सैल नसावी मिठी जराही" असंही छान वाटेल. Sandy
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 01/31/2018 - 05:57 नवीन
सैल नसावी मिठी जराही वळून दुज्या कुशीवर जाया आसुसल्या अधीर अधरांचे न जावे अमृतचुंबन वाया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
प
प्राची अश्विनी Wed, 01/31/2018 - 06:38 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/01/2018 - 03:08 नवीन
किंवा सैल नसावी मिठी जराही दुज्या कुशीवर वळून जाया आसुसलेल्या अधीर-धरांचे अमृतकुंभ न जावे वाया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
स
सत्यजित... Wed, 01/31/2018 - 10:22 नवीन
अनुमोदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
प
पगला गजोधर Wed, 01/31/2018 - 08:00 नवीन
सैल असावा बेल्ट जरासा, सोसे ना ताण, तुटे बघाया, चरबीच्या तव, उदर अवनीचे, हर्क्युलिसासम खांदी कसे पेलावे.. कवटाळे तो थुलथुलीत ढेरी प्यांटच्या पुंगळ्या पायांवरती मऊ मुलायम आखीव रेखीव, महाकुंभा त्या व्यर्थ लपवती... दे जरा विसावू गजकटीवर, तुंदीलतनुते श्वास गुदमरावें, अधीर कोडे मेदगोळ्याचे, वजनकाट्यावर उमजुनी यावे.. पहाटे थोडी लगबग करता, धाप लागते पाच मीटरवर, मनाविरुद्ध त्याच्या ताणता त्याला, इलॅस्टिकपेक्षा त्याचे नशीब बत्तर.... ( प्रेरणा ॠ. दि. कडून घेतली आहे..) --बेजारबुवा
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 01/31/2018 - 11:40 नवीन
बेजारबुवा :) :) :) रच्याकने हा/ ह्या / ही / हे ॠ. दि कोण? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 01/31/2018 - 13:22 नवीन
ऋजुता दिवेकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
प्राची अश्विनी Wed, 01/31/2018 - 13:29 नवीन
;););)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सत्यजित... Wed, 01/31/2018 - 10:20 नवीन
अतिशय सुरेख कविता! अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 01/31/2018 - 11:34 नवीन
वाह! बेजारबुवांची कविताही आवडली.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 01/31/2018 - 11:43 नवीन
खरे सांगायचे तर पहिल्या चार ओळीतच इतका गुरफटुन गेलो की पुढे वाचायचे भानच राहिले नाही. अतिशय सुरेख पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 01/31/2018 - 15:38 नवीन
कोणाला lgbt आठवले नाही याबद्दल देवाला नारळ ठेव.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/01/2018 - 03:06 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नाखु Wed, 01/31/2018 - 16:24 नवीन
आणि नादमधुर नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 01/31/2018 - 16:36 नवीन
अतिशय सुंदर कविता. सुरेश भटांच्या गझलांची आठवण झाली. 'मालवून टाक दिप' सारखी यालाही चाल लावता येईल का? प.ग. चे विंडबनही आवडले. तुफान हसलो. ;-)))) अर्थात मला हि समस्या नाही.
  • Log in or register to post comments
म
मिसळपाव Wed, 01/31/2018 - 21:58 नवीन
एखादं शिल्प किती सुंदर आहे याचं वर्णन काय करणार? तद्वत, हि कविता किती छान आहे हे कसं सांगणार? कविताच परत एकदा वाचून ती किती छान आहे याची अनुभूती घ्यावी! व्वा! अवांतरः आत्ताच्या पिढीला बरंच काही मिळतंय. पण उघड्या-नागड्या - शाब्दिक आणि दृय्ष्य - वासनेच्या आजच्या या बाजारात त्याना दुर्दैवाने बरंच काही गमावायलाही लागतंय. या अशा कवितेतला नर्म शृंगार, गर्भित अनुरंग, त्यातली धुंदी अनुभवणं दूरकी बात रही, त्याचा रसास्वाद तरी घेता येत असेल का? आणि खेदाची गोष्ट म्हणजे काय हातून निसटलंय हेही त्याना माहिती नाहीये बहुदा. असो. सौंदर्यस्थळं बदलतायत तशी सौंदर्यदृष्टीही बदलत असणार. आपल्याला मिळालेल्या सौंदर्यदृष्टिने वेगळ्या काळातल्या सौंदर्यस्थळांकडे पाहाणं टाळावं म्हणजे झालं! मी आपला परत एकदा कविता वाचतो, ते उत्तम :-) टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/01/2018 - 03:05 नवीन
धन्यवाद आणि पटलं तुमचं म्हणणं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/01/2018 - 03:17 नवीन
सर्वांनी कविता वाचली मुद्दाम वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मुळेच लिहायला हुरूप येतो.__/\__
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास गुरुवार, 02/01/2018 - 05:29 नवीन
वाह, क्या बात !!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 02/01/2018 - 06:00 नवीन
छान, सुंदर ....... !
  • Log in or register to post comments
व
वीणा३ गुरुवार, 02/01/2018 - 06:50 नवीन
अतिशय सुंदर कविता, विडंबनही झकास !!!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/01/2018 - 18:16 नवीन
सुंदर मनोगती कविता ! बेजारबुवांनीही (हसूनहसून) बेजार केले ! :)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 02/02/2018 - 08:04 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 02/02/2018 - 16:19 नवीन
भारी आहे !!!!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 02/03/2018 - 04:24 नवीन
ब-याच दिवसांत तुम्ही काही लिहिलं नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
M
mr.pandit Sat, 02/03/2018 - 05:34 नवीन
खुप सुंदर लिहीलय बेजारबुवांचे विडंबनही मस्त
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 02/03/2018 - 18:25 नवीन
अत्यन्त सुंदर कविता. खुप आवडली. बेजारबुवांची रचना पण मस्तच :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 02/04/2018 - 05:39 नवीन
छान !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sophia Loren Mambo Italiano
  • Log in or register to post comments
J
Jayant Naik Mon, 02/05/2018 - 06:31 नवीन
फार सुंदर कविता. आवडली .असेच लिहित जा ! शुभेच्छा
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 02/05/2018 - 08:02 नवीन
सुंदर! नेहमीप्रमाणेच!! :-)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 02/05/2018 - 10:07 नवीन
वाह !! अतिशय सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 02/05/2018 - 14:44 नवीन
हे आमचं बरंका! बैल असावी कुडी जराशी न वळूनी मला बघाया अर्ध्या मिटल्या देहनयनांचे अवघे रक्त चुसून घ्याया रेशीम काळे केस उडोनी, कुरळ्या लाटा बाहुंवरती, मऊ मुलायम निद्रसनी त्या, छिद्रशय्येस व्यर्थ लपवती... जरा विसावून सिंहकटीवर, मधूर मादक घाम फुलावे, अधीर कोडे या नि:श्वासे, गहिऱ्या स्तरी उफलून यावे.. बुंगाटवारा लगबग करतो, भले होईल थोडी पुर्पुर, शोषण करिते स्वर्णिम शुंडा, तलम तृप्तीचे शिंपून अत्तर.. -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 02/06/2018 - 02:47 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा