Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सैल नसू दे मिठी जराही!

स — सत्यजित..., Wed, 01/31/2018 - 22:03
अंगांगाची झाली लाही... सैल नसू दे मिठी जराही! मेघामाजी उनाड तडिता तू सागर मी अवखळ सरिता मला वाहू दे तुझ्या प्रवाही... सैल नसू दे मिठी जराही! पदरामधुनी लबाड वारा घिरट्या घालत फिरे भरारा गंध तनुचा दिशांत दाही... सैल नसू दे मिठी जराही! माझ्याशी तर वाद घालते मला नाही,ते तुला सांगते पायामधली पैंजण काही... सैल नसू दे मिठी जराही! रोम-रोम रोमांचित होवू स्पर्शच केवळ स्पर्शच लेवू अधरा दे अधरांची ग्वाही... सैल नसू दे मिठी जराही! चंद्रसरींनी चिंब भिजू दे तुझे चांदणे मनी रूजू दे धरेस दुसरे नकोच काही... सैल नसू दे मिठी जराही! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
5727 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
प्रचेतस गुरुवार, 02/01/2018 - 01:17 नवीन
क्या बात है..! जबरदस्त
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/01/2018 - 03:18 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/01/2018 - 05:32 नवीन
वाहवा!
  • Log in or register to post comments
व
वीणा३ गुरुवार, 02/01/2018 - 06:48 नवीन
एकदम मस्त !!! जामच गोंधळ आहे, मिठी सैल असावी का नसावी कळेना झालाय :P दोन्ही मिठ्या छानच वाटतायत ;)
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी गुरुवार, 02/01/2018 - 07:08 नवीन
मस्तच !!! अफलातून !!!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/01/2018 - 18:14 नवीन
मस्तं !
  • Log in or register to post comments
श
शेखरमोघे गुरुवार, 02/01/2018 - 21:03 नवीन
सुन्दर!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 02/03/2018 - 14:17 नवीन
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 02/03/2018 - 17:34 नवीन
काय सुरेख जुगलबंदी !
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 02/03/2018 - 18:44 नवीन
ये. एक मिठीसी कविता है!!! दै मिपा समाचार वाचनीय रोमांचकारी जुगलबंदी दै मिपासत्ता
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 02/05/2018 - 08:02 नवीन
सुंदर लिहिलेयस रे भावा! :-)
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Mon, 02/05/2018 - 16:56 नवीन
स्नेहांकिता,नाखु,राघव मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Mon, 02/05/2018 - 18:25 नवीन
वाह भाई वा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा