Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक खडतर आत्मपरीक्षण

झ
झपाटलेला फिलॉसॉफर
Tue, 02/06/2018 - 06:31
🗣 1 प्रतिसाद
मी अंध भक्त नाही मला काळजी आहे ती 2019 ची.भाजप सध्या लोकांपासून दूर जात चालली आहे. प्रत्येक योजना 2022 ला पूर्ण करू असे वायदे आहेत मग बजेट 18-19 चे कसे ? नमामि गंगे च काय झालं ? पहिल्या बजेट मध्ये काश्मिरी पंडितांना परत काश्मीर मध्ये बसवण्यासाठी तरतूद केली गेली होती . त्याचं काय केलं ? अल्पसंख्यानक मंत्रालयाला वाढीव पाच हजार कोटी आणि आपल्या मंदिरांचा प्रसादावर जिएसटी ? स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत किती सार्वजनिक शॉचालय बांधली गेली ? का सगळी स्वच्छता आम्हीच करायची ? भाजप ला निवडून दिलं मध्यमवर्गीयांनी त्यांना काय मिळाले ? सत्तेत नसताना इन्कम टॅक्स लिमिट पाच लाख करा असे जेटलीच भांडत होते ना ? ह्याच जेटलींनी सत्तेत आल्यावर प्रेसिडेंशियल नोटिफिकेशन नं कलम 370 रद्द करू असे म्हणाले होते का नव्हते ? नदी जोड प्रकल्प कुठे आहे ? इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये महाराष्ट्रात काय झाले आहे ? अजून ह्यांना Nh4 पूर्ण करता आला नाही . ते चंद्रकांत दादा तर स्वतः ला कोण समजतात कुणास ठाऊक त्याना चार वर्षात सांगली कोल्हापूर आणि सांगली इस्लामपूर रस्ते करायला जमले नाहीत. फडणवीसांचा अभ्यास आणि ऑडिट काही पूर्ण होत नाही, काय करतायत ते त्यांनाच ठाऊक म्हणून मी अंध भक्त नाही आणि हो मागच्या जिल्हापरिषद निवडणुकीत आयुष्यात पहिल्यांदा मी थरथरत्या हातानी काँग्रेस ला मतदान केले कारण पप्पू डोंगरे ह्या संघाच्या मुशीत आणि हिंदुत्तवाच्या विचारात घडलेल्या माणसाला मी मतदान करूच शकत नव्हतो . पै दिलीप सूर्यवंशी, दिनकर पाटील यांचा भाजप मला तरी मान्य नाही ..... साभार : समीर गोरे

प्रतिक्रिया द्या
1914 वाचन

💬 प्रतिसाद (1)
ग
गणेश.१० Wed, 02/07/2018 - 17:33 नवीन
आपल्याकडे राजकारणाचा उद्देश सत्ता मिळवणे आणि त्यातून स्वतःचा (देशाचा नाही) आर्थिक विकास साधने एवढाच उरलेला आहे. लोकशाहीला घराणेशाही, व्यक्तिकेंद्रित पक्षरचना, प्रादेशिक अस्मितेचा अतिरेक, कायदा सुव्यवस्थेचा गैरवापर, मोडकळीस आलेली न्यायव्यवस्था असे अनेक गंभीर आजार झालेले आहेत. आणि दुर्दैवाने आपल्या आयुष्यात तरी यावर उपचार होतील असे मला वाटत नाही. काँग्रेस,भाजप, डावे, उजवे, आणि अशा कित्येक पक्षांना धंद्याचे स्वरूप आले आहे -- उमेदवार आणि व्यापाऱ्यांकडून पैसे गोळा करायचे, निवडणुका जिंकायच्या, सत्ता मिळवायची, व्यवस्थेच्या पुरेपूर गैरवापर करून केलेली गुंतवणूक काही पटीने वसूल करायची, त्यातून येणार पैसे परत पुढील निवडणुकीत लावायचा असे हे साधे सरळ व्यापारी गणित आहे. सामान्य माणसाने मात्र आयुष्यभर पोट जेमतेम कसे भरेल याचंच गणित सोडवत बसायचं. राजकारणी आणि त्यांना चिकटलेली सर्व मंडळी यांचा मिळून एक वेगळा वर्गच आज आपल्या डोक्यावर उभा राहिलाय. आणि दुर्दैवाने हे चित्र निराशावादातून नाही वास्तवातून निर्माण झालं आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा