Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा!

स — सत्यजित..., Tue, 02/06/2018 - 22:03
जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा कळू लागले जीवनाचे फिरंगी,इशारे पुन्हा! कुण्या डोंगरी एक पणती सुखाने,जळू लागली तमाच्या तमेचे तिला येत गेले,पुकारे पुन्हा! कळ्या वेचल्या काल माझ्या करांनी,गुन्हा जाहला फुलू लागले श्वास-श्वासांत माझ्या,निखारे पुन्हा! पुन्हा लेखणीला नवा बाज चढला,लिहू लागलो तुला पाहिले अन् जुने स्वप्न झाले,कुंवारे पुन्हा! तुझी लाट झालो तसे वाटले की विरावे अता कुण्या वादळाने नको दाखवाया किनारे पुन्हा! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
4306 वाचन

💬 प्रतिसाद (10)
स
सानझरी Tue, 02/06/2018 - 22:16 नवीन
सुंदर लिहीलीए गझल..
तुझी लाट झालो तसे वाटले की विरावे अता कुण्या वादळाने नको दाखवाया किनारे पुन्हा!
क्या बात!
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Wed, 02/07/2018 - 03:05 नवीन
छान
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 02/07/2018 - 04:01 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 02/07/2018 - 12:38 नवीन
अतीउत्तम.. बढिया.. लिहित राहा..
  • Log in or register to post comments
द
दमामि Sun, 02/11/2018 - 02:58 नवीन
+१२३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/08/2018 - 04:53 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
J
Jayant Naik गुरुवार, 02/08/2018 - 14:07 नवीन
फार सुंदर . गझलेचा मूड फार मस्त सांभाळला आहे.
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा गुरुवार, 02/08/2018 - 14:53 नवीन
आवडली हो एकदम.. :)
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Fri, 02/09/2018 - 07:54 नवीन
जबरदस्त!!!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 02/09/2018 - 12:05 नवीन
सर्व प्रतिसादक रसिकांचे अनेक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा