Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

परदेशी पाहूण्यांना फिरवून आणण्याकरिता स्थळ सुचवा

म
मराठी कथालेखक
Wed, 02/07/2018 - 13:05
🗣 82 प्रतिसाद
नमस्कार मिपाकर आमच्या हिंजवडी (पुणे)स्थित कार्यालयाला भेट देण्यास काही परदेशी (युरोपीय) पाहुणे येणार आहेत (यात तीन स्त्रिया , तीन पुरुष आहेत). चार-पाच दिवसांच्या भेटीत एकदा त्यांना साधारण सहा ते सात तासात फिरवून आणता येईल असे स्थळ कृपया सुचवा.
  • हे फिरणे कामाच्या दिवशी असेल
  • दुपारी तीनच्या सुमारास हिंजवडीमधून निघावे असे नियोजन आहे
  • फिरुन झाल्यावर रात्रीचे जेवण (यात मद्यपान असेल) करुन रात्री दहापर्यंत पाहूण्यांना हिंजवडीतील हॉटेलपर्यंत पुन्हा सोडता यावे
  • वाहनांची सोय आमच्या कार्यालयाकडून करण्यात येईल त्यामुळे त्याची चिंता नाही पण प्रवास फार दूरचा नसावा. खास करुन रात्री मद्यपानानंतर कुणाला जास्त दूर प्रवास नको असतो.
मी जाधवगडचा विचार करत होतो, पण गुगल मॅप्स जरी दीड ते पावणे दोन तास प्रवास दाखवत असला तरी प्रत्यक्षात हिंजवडीपासूनचा एका बाजूचा प्रवास अडीच तासापर्यंत आहे असे कळाले. म्हणजे येण्या जाण्यात पाच तास जातील, इतका मोठा प्रवास नको आहे. आणखी काय पर्याय असू शकतील ? धन्यवाद
वर्गीकरण
पर्यटन

प्रतिक्रिया द्या
17081 वाचन

💬 प्रतिसाद (82)
क
कपिलमुनी Wed, 02/07/2018 - 13:25 नवीन
सदाशिव पेठ , लक्ष्मी रोड , तुळशीबाग फिरवून आणा ! टू व्हीलरने प्रवास केल्यास अजुन मजा येइल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 02/07/2018 - 13:26 नवीन
पुणे दर्शन सहलीतली ठिकाणे थोडी अधिक उणे करून स्वत:च्या वाहनाने करता येईल.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 02/07/2018 - 13:28 नवीन
ही कोणती ठिकाणे आहेत?मुख्य म्हणजे परदेशी पाहूण्यांना आवडू शकेल अशी ठिकाणे त्यात आहेत का ? स्वतःच्या वाहनाने जाण्याची गरज भासणार नाही. कंपनीकडून वाहनांची सोय केली जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ध
धर्मराजमुटके Wed, 02/07/2018 - 13:32 नवीन
त्यांना घाट दाखवा, एखादा गड किल्ला दाखवा (शनिवार वाडा सोडून) ! काहीही दाखवा पण भारताची खराब इमेज मनात घेऊन जातील असे कटाक्षाने टाळा.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 02/07/2018 - 14:58 नवीन
सगळे बघुन झाल्यावर रात्री इमेज विसरायचा पोग्राम आहेच की. डोन्ट वरी धर्मराजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
स्मिता. Wed, 02/07/2018 - 15:10 नवीन
तुमच्या प्रतिसादाचा रोख विनोदी असला तरी मूळ प्रतिसाद दुर्लक्ष करण्यासारखा नाही. पाश्चिमात्य लोकांना आपल्याकडच्या गरीबी, गर्दी, गलिच्छपणा, प्रदूषण, इ. नकारात्मक गोष्टीच प्रकर्षाने दिसत असतात आणि त्यावरच चर्चा करायला आवडते. त्यामुळे शक्य असल्यास आपल्या देशाची प्रगत आणि सुंदर बाजूच दाखवा असा आग्रह मी करेन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मराठी कथालेखक Wed, 02/07/2018 - 18:24 नवीन
कोणता घाट ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
क
कपिलमुनी Wed, 02/07/2018 - 13:37 नवीन
हिन्जेवाडी मधुन लवासा ला जावून या , सनसेट सुंदर दिसेल , येताना चांगले हॉटेल आहेत.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 02/07/2018 - 18:25 नवीन
लवासाचा विचार चांगला वाटतोय , पण या महिन्यात तिथे फिरण्यासारखे आहे का ? साधारणपणे लोक तिथे पावसाळ्यातच जातात ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बबन ताम्बे Wed, 02/07/2018 - 14:30 नवीन
आगाखान पॅलेस आणि राजा केळकर म्युझियम दाखवु शकता. तुमच्या लिमिटेड वेळामधे हे होऊ शकते. वेळ असेल ते पु.ल. देशपांडे उद्यान ही दाखवू शकता. छान आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 02/07/2018 - 14:41 नवीन
धन्यवाद.. केळकर म्युजियमचा विचार करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
प
पुंबा Wed, 02/07/2018 - 14:42 नवीन
शनिवार वाडा भुलेश्वर मंदीर पु ल देशपांडे उद्यान
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 02/07/2018 - 18:26 नवीन
हं.. दगडी बांधकामाचे भुलेश्वर मंदिर चांगले आहे पण परदेशी लोकांना मंदिर बघण्यात रस असेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा गुरुवार, 02/08/2018 - 08:37 नवीन
भारतीय मुर्तीकलेबद्दल पाश्चात्यांना आकर्षण असते. भुलेश्वर मंदीरात अतिशय सुंदर कोरीव शिल्पे आहेत. नक्कीच आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
प
प्रचेतस गुरुवार, 02/08/2018 - 09:20 नवीन
भुलेश्वर आवडण्यासारखेच आहे मात्र तुमच्या वेळेत ते बसणारे नाही, हिंजवडीपासून साधारण शंभर सव्वाशे किमी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा गुरुवार, 02/08/2018 - 11:22 नवीन
अरे हो! वेळेचा मुद्दा ध्यानात यायला हवा होता. तीन वाजता निघून होण्यासारखे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
च
चाणक्य गुरुवार, 02/08/2018 - 17:49 नवीन
भाजे,कार्ला, बेडसे लेणी होऊ शकतील. लोहगड पण.होईल कारण वरपर्यंत गाडी जाते आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
अ
अभिजीत अवलिया Wed, 02/07/2018 - 16:00 नवीन
मगरपट्टा दाखवा.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Wed, 02/07/2018 - 16:06 नवीन
परदेशी लोकाना म्युझियम फार चांगला चॉइस ठरेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 02/07/2018 - 16:23 नवीन
केळकर संग्रहालय आणि पाताळेश्वर दाखवा. पाताळेश्वर लय भारी आहे आणि फिरंग्यांना जनरली बघता येत नाही अशा प्रकारची जागा आहे. आगाखान प्यालेस अगदीच सामान्य आहे यापुढे.
  • Log in or register to post comments
न
निशाचर Wed, 02/07/2018 - 17:45 नवीन
हेच लिहिणार होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
मराठी कथालेखक Wed, 02/07/2018 - 18:20 नवीन
पाताळेश्वरबद्दल मलाच माहिती नाही.. काय आहे हे, कुठे आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
द
दासबोध.कॊम Tue, 02/13/2018 - 09:19 नवीन
जंगली महाराज मन्दिराला लागून जी लेणीवजा मन्दिरे आहेत तीच पाताळेश्वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
च
चौथा कोनाडा Tue, 02/13/2018 - 12:36 नवीन
पुण्यनगरीतील कातळशिल्प : पाताळेश्वर लेणी http://www.shantanuparanjape.com/2016/07/blog-post.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
व
विशुमित Wed, 02/07/2018 - 16:34 नवीन
लवासा आणि मगरपट्टा दाखवू नका. पवारांची ईमेज घेऊन गेल्याने येथील काही सन्माननीय सदस्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. अॅग्रो टुरिजम ची एखादी साईट दाखवा हे सुचवू इच्छितो.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 02/07/2018 - 16:35 नवीन
लवासा आणि मगरपट्टा दाखवू नका. पवारांची ईमेज घेऊन गेल्याने येथील काही सन्माननीय सदस्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. अॅग्रो टुरिजम ची एखादी साईट दाखवा हे सुचवू इच्छितो.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Wed, 02/07/2018 - 17:57 नवीन
लोकांपुढे सगळे भारतीय आहोत. त्याना कोण पवार आणि कोण फडणवीस? त्यान्चा मतलब स्वस्तात चांगले काम करून मिळण्याशी परदेशात मोर्चे काढून आपण जातो त्याना दाखवायला कसे आम्ही जाती मध्ये विभागले गेलो आहोत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुखीमाणूस Wed, 02/07/2018 - 18:12 नवीन
अर्थात 8 वर्षापूर्वीचा.. मी जिथे काम करत होते त्या टीम चा ग्लोबल प्रमुख फार भारताच्या प्रेमात होता. त्याने ग्लोबल मीट ठेवली पुण्यात. एकूण 22 जण होते मग एक दिवस पुणे दर्शन अपरिहार्य होते. मला आठवतंय त्याप्रमाणे आम्ही खालील ठिकाणी त्याना फिरवले जे बहुधा आवडले. पर्वती राजा केळकर सन्ग्रहालय पाताळेश्वर आगाखान पॅलेस शेवटी त्याना क्याम्प भागात नेले. तिथे शोप्पिन्ग व रात्रीचे जेवण.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 02/07/2018 - 18:31 नवीन
धन्यवाद.. पाताळेश्वरचा विचार करतो.. मी आधी एकदा बघून येईन जमल्यास. जेवायला बार्बेक्यू नेशन असा विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
क
कपिलमुनी Wed, 02/07/2018 - 18:27 नवीन
गांधीजी बद्दल खूप आकर्षण असते बऱ्याच लोकांना . त्यामुळे त्या संबंधी दाखवा. अर्धा दिवस खूप कमी आहे.
  • Log in or register to post comments
अ
अरविंद कोल्हटकर Wed, 02/07/2018 - 20:30 नवीन
राका केळकर म्यूझिअम, कात्रजचे सर्पोद्यान ह्यामध्ये ३ तास सहज जातील. नंतर श्रमपरिहार सुरू.
  • Log in or register to post comments
श
शेखरमोघे Wed, 02/07/2018 - 21:17 नवीन
कार्ल्याची लेणी आणि चाकणमधील एखादा (माहितीचा) कारखाना असा पुण्याचा जुना + नवा भाग दाखवून तुम्हाला सयाजीला बार्बेक्यू नेशनला नक्कीच ५-६ तासात परतता येईल. आणखी एक पर्याय : महादजी शिन्द्यान्ची छत्री (जुने पुणे) + National War Museum + एखाद्या microbrewery मध्ये सन्ध्याकाळ + जेवण (Effingut ?) + जाता येताना जमतील तेव्हढ्या data centresच्या इमारती बाहेरून बघणे (नगर रोडच्या सुरवातीला अनेक आहेत).
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 02/08/2018 - 07:27 नवीन
कार्ल्याची लेणी पण चांगला पर्याय होवू शकेल माझ्या ध्यानातच नाही आले. शिवाय येता जाता तळेगाव-वडगाव ई मधला निसर्गरम्य परिसर बघता येईल. ट्रॅफिकही जास्त नसेल ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे
क
कंजूस गुरुवार, 02/08/2018 - 01:30 नवीन
विश्रामबाग वाडा शिंदे छत्री बनेश्वर केळकर संग्रहालय ( मला असं म्हणायचं आहे की पुणे दर्शन पिएमटी करवते यातून ठिकाणं आणि क्रम घ्या आणि स्वत: कारने त्यातली मोजकी करा म्हणजे वेळेचं आयोजन करता येईल. बनेश्वर अशासाठी घेतलं आहे की वरती घाटातून पुणे शहर दिसते तसेच खेड शिवानगर रोडवर एखादे चांगले गर्दी नसलेले रेस्तरां झाले असेल तर आवडेल.)
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 02/08/2018 - 07:28 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्रचेतस गुरुवार, 02/08/2018 - 03:41 नवीन
भाजे किंवा बेडसे लेणी उत्तम पर्याय वाटत आहे. एकतर २००० वर्षापूर्वीचे अजूनही सुस्थितीत असलेले स्थापत्य, हिंजवडीपासून जवळ. ३ वाजता निघूनही आरामात दिवसाउजेडी सगळे बघून होता येते, बेडसे त्यातले त्यात अधिक उत्तम. अतिशय स्वच्छ परिसर. माफक चढण. भोवतालचा आसमंतही सुंदर. गर्दी जवळजवळ नाहीच.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 02/08/2018 - 05:43 नवीन
पाहुण्यांचे साधारण इन्टरेस्टस काय आहेत हे पण पाहून घ्या. माझ्या मते भाजे पर्फेक्ट !!! कमी दमणुक (फक्त २५० पायर्‍या) वाली भाजे लेणी अतिशय सुंदर ट्रिप होईल. कार्ला उंच व गर्दीचे ठिकाण आहे. भाजे हे बेडसे पेक्षा जास्त महत्वाचे लेणे समजले जाते. अन हा रुट भारी राहिल (कमी ट्रॅफिक अन जाता जाता शेती, फ्लॉरिकल्चर फार्म, ग्रामिण भाग इ. ) हिंजवडी - मारुंजी - कासारसाई (धरणही पाहता येईल.) - बबेडओहळ - शिवणे - कडधे - काळे कॉलनी - पवना डॅम (जलाशयाचे सुंदर दर्शन) लोहगडच्या हिरव्या परिसरातून भाजे लेणी. इथं येई पर्यंत साडेचार -पाच वाजतील. सुर्यास्ताच्या कलत्या उन्हात लेणी व सुर्यास्त पाहुन होइल. वेळ हाताशी असेल दुधिवरे खिंडीच्या अलीकडंच डोंगराच्या कुशीतलं हभप बाबामहाराज सातारकर स्थापित विठठल मंदिर पाहता येईल. (तुमचे अध्यात्मिक इंप्रेशन पडेल. पुढे मागे आयटीकामाला कंटाळून बुवा झालाच तर हे रेडीमेड ग्राहक :-) तुमच्याकडं वेळ कमी आहे (अन नंतर तीर्थप्रसादाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे तुम्ही) नाही तर मारुंजीत शेतकर्‍याच्या रानात ग्रामिण भोजनाची सोय करता आली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मराठी कथालेखक गुरुवार, 02/08/2018 - 07:29 नवीन
भाजे पेक्षा कार्ल्याला कमी चालावं लागतं बहूधा.. शिवाय कार्ल्याच्या लेण्या मोठ्या आहेत ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Fri, 02/09/2018 - 10:22 नवीन
भाज्याची चढण मला कार्ल्यापेक्षा सोपी वाटली. कार्ल्याच्या लेण्याजवळ एकवीरा देवीचं मंदिर असल्यामुळं तिथं भावकांची गर्दी, घाई असते. बाजरूपणा आलाय. पायर्‍या पायर्‍यावर पुजासाहित्याची दुकानं आहेत. मला आठवतंय त्यानुसार काही लेण्या (बहुधा उंचीवरील) वासे लावून बंद केलेत, अपघात होऊ नये म्हणुन ! या कारणांसाठी मला भाजे लेणी बरी वाटतात.
.. शिवाय कार्ल्याच्या लेण्या मोठ्या आहेत ना ?
या बाबत प्रचेतस साहेब्च टिपण्णी करू शकतील ! अणि हो ..... कार्ला, भाजे, बेडसे या पैकी काही ठरलंतर प्रचेतससाहेबांनाच गाईड म्हणुन बरोबर न्या की ( अर्थात त्यांना वेळ असेल तर )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
सिरुसेरि गुरुवार, 02/08/2018 - 05:03 नवीन
पाताळेश्वर , आगाखान पॅलेस , गोल्फमैदान
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 02/08/2018 - 06:12 नवीन
आगाखान पेलेस वा वर सुचवल्याप्रमाणे एखादा किल्ला वा सिंहगड ?.. आपली वाचनालये, धरणे..ह्यात भव्य्,दिव्य ऐतिहासिक काही नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 02/08/2018 - 06:14 नवीन
पण एक शंका - परदेशी तुमचे/कंपनीचे पाहुणे आहेत पण प्रवेश शुल्क इकडच्यांना दहा रु परदेशींना दहा डॅालर ( ६५०रु~~) काय करणार?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 02/08/2018 - 06:33 नवीन
बेडसे लेणी पाहायला शुल्क नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
म
मराठी कथालेखक गुरुवार, 02/08/2018 - 07:30 नवीन
जे काही पैसे पडतील ते आम्हीच भरु नंतर कंपनीकडे क्लेम करायचेत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
पिलीयन रायडर गुरुवार, 02/08/2018 - 07:01 नवीन
लेण्या किंवा पाताळेश्वर इत्यादी जागाच सुचवेन. परदेशी लोकांसाठी ते नक्कीच खास असेल. म्युझियम दाखवू नका, त्यात फार काही राम नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 02/08/2018 - 07:33 नवीन
धन्यवाद... पाताळेश्वर अथवा कार्ला वा बेडसे अशा पर्यायाचा विचार करतो आहे . पण पाताळेश्वराला जायचे म्हणजे उगाच कंटाळवाण्या ट्रॅफिकमधून जावे लागेल त्यामुळे बेडसे वा कार्लाला झुकते माप. दोन्हीत जास्त चांगले काय आहे ? शिवाय कुठे कमी चालावे लागेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रचेतस गुरुवार, 02/08/2018 - 07:52 नवीन
कार्ले लेणी अतीव सुंदर आहेत पण प्रचंड गर्दी, पायथ्याला गलिच्छता आहे. कार्ले लेणीचा चैत्यगृह एकमेवाद्वितीय, पण बेडसेचे पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभही अतिशय सुंदर. निवांतपणा बेडसेलाच मिळेल. कार्ले भाजे दोघांचीही चढाई सारखीच आहे, बेडसेला किंचित अधिक पायऱ्या आहेत इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 02/08/2018 - 09:11 नवीन
धन्यवाद. गुगल मॅप्सवरही बेडसेचे फोटोज अधिक चांगले दिसत आहेत. बेडसेचा विचार करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कबीरा गुरुवार, 02/08/2018 - 09:48 नवीन
हिंजेवाडी मधून निघून लोणावळा गाठा, लोणावळा फिरून झाले की येताना मुळशी मार्गे परत या. २-३ तास छान भटकंती होईल. वाटेत जमल्यास हाडशी मंदिर दाखवा.
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील गुरुवार, 02/08/2018 - 11:16 नवीन
हिंजवडीचा उल्लेख "हिंजेवाडी" केल्याबद्दल निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कबीरा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा