Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिवाणखान्याची सजावट

फ
फुंटी
Sat, 02/10/2018 - 05:11
🗣 10 प्रतिसाद
दिवाणखान्यात सजावट म्हणून पुस्तकं ठेवण्याकडे कल अधिक दिसून येतो.समृद्ध वगैरे जीवनशैलीला ते शोभत.इतर सजावटीच्या साहित्याच्या तुलनेत पुस्तक स्वस्त आणि आकर्षक दिसतात..आपल्या विद्वत्तेचं दर्शन होत..त्यासाठी या काही टीप्स- ◆काही जाडजूड ग्रंथ मांडावेत. ◆त्यासाठी आकर्षक काचेचा दरवाजा असलेलं फर्निचर करावं.ते शक्यतो सागवान लाकडाच ,पॉलिश केलेलं असावं. ◆त्यात पुस्तकं उभी मांडून ठेवावी.दिसायला छान दिसतात. ◆संग्रहात एखादं दोन वाचलेली पुस्तकं ठेवावीत म्हणजे कुणी पाहुण्यांनी विचारलं तर त्या पुस्तकांबद्दल सांगता येत ऐनवेळी पंचाईत होत नाही. ◆भगवद्गीता,पु ल देशपांडे, व.पु काळे यांची काही पुस्तके असणे अनिवार्य आहे.(तुम्ही नव्या पिढीचे असाल तर चेतन भगत) ◆पायरेटेड पुस्तके शक्यतो सजावटीसाठी वापरू नयेत. ◆शोकेसला लॉक करावे त्याची चावी सहज उपलब्ध होणार नाही अशी ठेवावी.म्हणजे पाहुणे पुस्तक हाताळत नाही आणि त्याच आयुष्य वाढते.तसेच वाचायला नेतो म्हणून ढापण कठीण जात. ◆'पन्नास रुपयात कोणतेही पुस्तक' स्कीम मधल्या पुस्तकांना सजावटीसाठी शक्यतो वापरू नये. ◆दोन चार कुणालाही सहज माहीत नसलेल्या इंग्रजी लेखकांची पुस्तके ठेवावीत.चौकस,सखोल वाचनाचे दर्शन होते. ◆पुस्तकांना वाळवी लागली असेल तरी त्यावर चकार शब्द काढू नये.वाळवी लागणे हे पुस्तक वाचत नसल्याचे लक्षण आहे. ◆लिखाणाचं महागातलं पेन,नक्षीदार कागद असावेत.स्वतःसाठी लिहितो अधूनमधून या वाक्यासह फेकावेत. ◆या सगळ्या सेट सोबत नम्रपणा अंगी बाणवून घ्यावा.साहित्यावर बोलताना आवश्यक असतो. ◆स्थानिक साहित्यिक कार्यक्रमातील नामवंत साहित्यिकांना पुष्पगुच्छ देतानाच एखादा फोटो असावा. ◆आपले फोटो असलेल्या साहित्यिक बातम्यांची पेपर कटिंग शक्यतो लावू नयेत.

प्रतिक्रिया द्या
3553 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ख
खेडूत Sat, 02/10/2018 - 07:13 नवीन
ताज्या मासळी सारखं फ्रेस आहे! :) फर्वंर्द हाय का? की उपरोधाने लिहीलं आहे?
  • Log in or register to post comments
फ
फुंटी Sat, 02/10/2018 - 08:00 नवीन
उपरोध हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
क
कंजूस Sat, 02/10/2018 - 17:58 नवीन
मासलीबद्दल माहित नाही पण फ्रेस नक्कीच. आत एलीडी लाइटिंग हवेच. साहित्याला मंद प्रकाश हवा की नको?
  • Log in or register to post comments
फ
फुंटी Sun, 02/11/2018 - 09:49 नवीन
कृत्रिम प्रकाश अर्थात हवाच... साहित्यातून काही प्रकाश पडेल की नाही शंकाच असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
द
दमामि Sun, 02/11/2018 - 02:54 नवीन
मस्तच!!!
  • Log in or register to post comments
ए
एमी Sun, 02/11/2018 - 03:00 नवीन
खि खि :D
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 02/14/2018 - 09:54 नवीन
पूर्वी आपले हिन्दी सिनेमातील नट यांच्यामधे वाचनाची आवड नसतानाही घरात अशी पुस्तके दिसलीच पाहिजेत अशी फ्याशन होती. त्याचे फटू फिल्म फेअर मधे येत कधी कधी !
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Wed, 02/14/2018 - 15:42 नवीन
५० रु ला एक पुस्तक !! इतके म्हाग !!! वाशी स्टेशनजवळ एक दुकान आहे. तिथे १०० की २०० रु किलो पुस्तके मिळतात.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज गुरुवार, 02/15/2018 - 03:37 नवीन
:D
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 02/15/2018 - 12:58 नवीन
आमच्या एका मिपाकर मित्राचे घर आठवले हे वाचून. अर्थात त्याचा व्यासंगही तेवढाच आहे म्हणा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा