Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाज

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 02/15/2018 - 04:33
******************* पोर वेडी पोट पकडुन झोपते माय दिसता भूक विसरुन नाचते देव सांगा राहतो कुठल्या घरी? बंद दाराच्या गजातुन शोधते एकदा भेटायचे बाबा तुला पत्र कोरे रोज हटकुन टाकते ग्राहकांची नेहमी गर्दी तिथे पोर आहे..., माय विनवुन सांगते भूक त्यां डोळ्यात आहे दाटली वेळ थोडा पदर पसरुन मागते भाकरीचा चंद्र द्या हो ईश्वरा त्याचसाठी देह वाटुन टाकते रोज आत्मा खर्चते माझाच मी लाज माझी मीच उधळुन सोडते ******************* © विशाल विजय कुलकर्णी

प्रतिक्रिया द्या
3947 वाचन

💬 प्रतिसाद (11)
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 02/15/2018 - 05:34 नवीन
थोड़ी आवश्यक सुधारणा.. लाज पोर वेडी पोट पकडुन झोपते माय दिसता भूक विसरुन नाचते देव सांगा राहतो कुठल्या घरी? बंद दाराच्या गजातुन शोधते एकदा भेटायचे बाबा तुला पत्र कोरे रोज हटकुन टाकते ग्राहकांची नेहमी गर्दी तिथे पोर आहे..., माय विनवुन सांगते भूक त्यां डोळ्यात आहे दाटली वेळ थोडा पदर पसरुन मागते भाकरीचा चंद्र द्या हो ईश्वरा त्याचसाठी देह वाटुन टाकते रोज आत्मा खर्चते माझाच मी लाज माझी मीच उधळुन सोडते © विशाल विजय कुलकर्णी
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 02/15/2018 - 09:35 नवीन
सुन्न :(
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 02/15/2018 - 10:22 नवीन
विषण्ण करून गेली कविता! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 02/15/2018 - 10:56 नवीन
_/!\_
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 02/16/2018 - 04:46 नवीन
सुन्न करणारी कविता!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 02/16/2018 - 10:23 नवीन
. काय प्रतिक्रिया लिहावी तेच समजत नाहीये. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Fri, 02/16/2018 - 11:08 नवीन
...
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 02/16/2018 - 11:36 नवीन
:( फार विषण्ण करणारी कविता..
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 02/19/2018 - 09:19 नवीन
_/!\_
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 02/19/2018 - 18:20 नवीन
आणि भेदक अशा जखमा प्रकट आणि अव्यक्त ही अवतीभवती आहेत माणसांच्या जंगलातला नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 02/22/2018 - 06:54 नवीन
धन्यवाद नाखुशेठ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा