Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

॥ रमू नको या जगात ॥

ख — खिलजि, Fri, 02/16/2018 - 09:10
रमू नको या जगात दुःखांचा राजा तू दुःख कनवटीला असे घे दुःखांची मजा तू विरह असो , प्रेम असो असो प्रेमाचा भंग तो कुणीही तुला काही म्हणो तू मात्र अभंग हो जळो कुणी , कुणी मरो जगण्यात काय ते जळीस्थळी दुःख ज्याला त्याला मरण्यात काय ते दुःख दुःख दुःख कुणी पहिले नसेल ते सुख सुख सुख कुणी स्पर्शिले नसेल ते वंद तू धर्मास या कर्माचे मर्म जाण मोक्ष असा ना मिळतो विरहाचे कर्मकांड अंतरी तू शोध घे विरहाचे काय ते सोड वस्त्र देहाचे आत्म्याचे पाय ते उडून जा किरणासम भेद घे तू आत्म्याचा मोक्ष प्राप्त होई तुज आवाज हा परमात्म्याचा सिद्धेश्वर विलास पाटणकर C

प्रतिक्रिया द्या
2803 वाचन

💬 प्रतिसाद (4)
च
चांदणे संदीप Fri, 02/16/2018 - 09:12 नवीन
आवडली. Sandy
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 02/16/2018 - 16:27 नवीन
वेलकम बॅक !!! मात्र निराशाजनक काहीही लिहु नका. आशावादी कविता लिहायचा प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 02/19/2018 - 06:06 नवीन
प्रयत्न करतोय ... धन्यवाद सर्वाना
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 02/19/2018 - 16:43 नवीन
तुमच्या जुन्या कविता वाचायला कुठे भेटतील?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा