Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धार्मिक फसवणूक - एक गैरसमज

A
arunjoshi123
Wed, 02/21/2018 - 18:18
🗣 58 प्रतिसाद
http://www.misalpav.com/node/42032 या धाग्यावर खालील प्रतिसाद आलेला. त्याच्या उत्तरार्थ हा धागा आहे. गंमत म्हणून वाचा.
गर्दी, त्याचा तुच्छतादर्शक 21 Feb 2018 - 3:15 pm | बिटाकाका गर्दी, त्याचा तुच्छतादर्शक उल्लेख याबतीतील मुद्दा इतर उदाहरणामुळे पटला. त्यामुळे ते नास्तिकांचं एक राहू देतो. ------------------------------------------- पण धार्मिक स्थळी ते ज्या देवाला मानतात त्याचे काही सेकंदासाठी दर्शन घेण्यासाठी जी रेटारेटी, फसवणूक (स्वतःची आणि दुसऱ्यांची) चालते, हे कसे समर्थनीय आहे? देव चराचरात आहे हि शिकवण सर्व ईश्वरवाद्यांना का मान्य नसावी? हे एकूणच ईश्वरवादी व्यवस्थेचे फेल्युअर मानावे का? यामुळेच नास्तिकांचे फावते असे म्हणणे चुकीचे ठरेल काय?
============================================== हा एक वेगळा विषय आहे म्हणून वेगळा धागा काढत आहे. या लेखातलं कोणतंही विधान बिटाकाकांना वा कुणाला उद्देशून नाही, केवळ त्यांच्या विधानांचा संदर्भ आहे. (शिवाय यनावालांचा ट्यार्पि वाढवतो म्हणूनही माझ्यावर खूप टिका झालेली आहे. असो.). लेखात यनावाला (= अश्रद्ध) शब्द स्पेलिंग सोपं आहे म्हणून वापरलाय. =======================================
पण धार्मिक स्थळी ते ज्या देवाला मानतात त्याचे काही सेकंदासाठी दर्शन घेण्यासाठी जी रेटारेटी, फसवणूक (स्वतःची आणि दुसऱ्यांची) चालते, हे कसे समर्थनीय आहे?
अर्थातच कोणत्याही प्रकारची, कोणत्याही व्यवस्थेशी निगडित असलेली फसवणूक कायदेशीर रित्या वा नैतिक रित्या समर्थनीय नसते. यात दुमत असायचं कारण नाही. मात्र आधुनिक जगात, खासकरून चुकीची विधाने करू शकण्याचे संवैधानिक स्वातंत्र्य असल्यामुळे, लोकांचे फसवणूक कशाला म्हणायचे याचे फंडे गंडलेले आहेत. कोणत्याही व्यवहारात दोन व्यक्ति आपसांत जे काही करार करतात त्यांचं उल्लंघन करणे म्हणजे फसवणूक. कोण्या विशीष्ट प्रकारचा करार करणे हीच फसवणूक असू शकत नाही. मला नक्की काय म्हणायचं हे इंग्ग्रजीत सुद्धा लिहितो. Subject to compliance of applicable frameworks, execution of a particular kind of contract in itself cannot be said to be some kind of cheating. Again, subject to compliance of applicable frameworks, only an intentional breach of a pre-concluded contract can be called chicanery. मंदिरात जे काही आर्थिक व्यवहार होतात, त्याला यनावालांसारखा अश्रद्ध पार्टी असतो का? म्हणून देवाचे दर्शन घडवतो वा देवाची कृपा घडवून आणतो असा भटात आणि भक्तात करार झाला तर यनावालांनी म्हटल्यामुळं तो फ्रॉड होत नाही. हां, पण म्हटल्याप्रमाणे देव दिसला नाही वा कृपा झाली नाही, तर यनावाला देखील दखल देऊ शकतात. तो प्रॉपर फ्रॉड होतो. दुसरी केस धरू, एक थर्ड पार्टी म्हणून यनावालांना असं वाटतं आणि असं आहे ही कि त्या भटाला स्वतःला ठाऊक आहे असलं देव बिव काही नसतं, पण भक्ताला हे माहित नाही. भक्त १०० काय १००० रुपये द्यायला तयार होऊ शकतो त्याला नीटपैकी पटवलं तर. यनावालांना नि भटाला मनातल्या मनात खरं काय ते माहीत आहे पण ते एकमेकांशी काही बोलत नाही. मग आता? इथे देखील यनावाला काही करू शकत नाही. जेव्हा दोन व्यक्ति करार करतात तेव्हा त्यांनी आवश्यकता असल्याप्रमाणे करारात सर्विस डेलिवरी स्टँडर्ड्स (तत्सम कायतरी) मंजे मान्य केलेली सेवा वा उत्पादन नक्की कसं, कुठे, कधी द्यायचं आहे याचे डिटेल लिहायचे असतात. अन्यथा ते कायद्यानुसार वा परंपरागत पद्धतीनुसार जसं देतात तसं गृहित धरलं जाईल. आता समजा यनावालांनी अस्तिकांचं सोंग आणायचं आणि भटाला जेलमधे टाकायचं असं ठरवलं, नि एक व्यवस्थित करार केला, त्यात नीट लिहिलं कि असा असा देव दाखवायचे पैसे मिळतील, इ इ. खर्‍या भटानं असा करार केला असता का वा केला असता तर यनावालांनी डेलिवरी झालीय, रिसिट द्या बिल द्या ही अध्यात्मिक चर्चा कशी केली असती हे जरा बाजूला ठेऊ. पण ज्या भटाची मूळात स्वतःचीच श्रद्धा नाही, त्याचं काय? तर अर्थातच यनावाला त्याला कोर्टात खेचतील. तिथं काय होईल? तर सर्वप्रथम कोर्ट कराराची चौकट आहे ती पाळली गेली आहे का ती पाहिली जाईल. उदा. भटाचं नि यनावालांची जन्माची प्रमाणपत्रं, डोकं जाग्यावर आहे का किंवा करार करताना होतं का, कराराच्या वेळी हातात बंदूका तर नव्हत्या, देव दिसायचा कर दिलाय का, कोणत्या कायद्याचं उल्लंघन करत नाही ना, इ इ पाहिलं जाईल. हे सगळं व्यवस्थित असेल तर, नि समजा जज विचारसरणीने "आपल्या यनावालांचा" गुरु (असा काही पदार्थ असणे संभव असेल तर) असेल तर म्हणेल देव दाखवणे म्हणजे काहीच न दाखवणे तेव्हा सर्विस डिलिवरी झाली आहे नि पेमेंट करावा. एक जज म्हणू शकतो कि देवाचं जे काय वर्णन आहे तसलं काहिही दाखवा, त्याला देवच मानलं जाईल करारापुरतं. थोडा अजून वेगळा जज म्हणू शकतो कि देव हा एक व्हॅलिड पदार्थ नाही, तेव्हा त्याचा उल्लेख असलेली कलमे सोडून बाकी करार लागू असेल. म्हणजे एकूणात करार कॅन्सल होईल. या शेवटच्या दोन्ही केसेसमधे भटाला पैसे परत द्यावे लागतील. सुज्ञलोक म्हणतील अरे यना, मूर्ती पाहून घे नि अर्धे पैसे दे पण यना मानणार नाहीत. आता यना भटाला जेलमधे टाका म्हणतील. पण एखादी सेवा देऊ न शकणे म्हणजे गुन्हा नव्हे. हा पर्फॉमन्स डीफॉल्ट झाला, क्षमतांच्या अभावाने. म्हणून कोर्ट काही तसं करणार नाही. ------------------------------------------------------------------------------------------ थोडक्यात, अगदी स्वतःचा देवावर विश्वास नसताना देव दाखवतो म्हणून पैसे घेऊन न दाखवणं हा देखील गुन्हा असू शकत नाही. आणि हे अनैतिक आहे असं फक्त यनावाला म्हणतात. त्याला तरी कुठं सिद्ध करता येतं भटाचा मूळी देवावर विश्वासच नाही? याला फक्त ब्रिच ऑफ काँट्रक्ट म्हणतात. ईंग्रजीत लिहितो. A mere breach of contract is not tantamount to ill-intended, criminal contract. ---------------------------------------------------------------------------------------- आता जर कपिलमुनी तिथे अवतरले नि त्यांना वाटलं कि यनावर अन्याय झालाय. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अहो, हे देव मंजे बीटकॉइन टाइपचं प्रकरण आहे. असलं काही नसतं, याची काही व्यवस्था नसते, याला काही मूल्य नसतं, तेव्हा याच्यावर बॅन पाहिजे. आणि देव दाखवण्याचं काँट्रॅक्ट्च बेकायदेशीर केलं पाहिजे. मग संसद आणि न्यायालय देव आहे का नाही हे कुणी सांगायचं याचा अधिकार कुणाला आहे यावर भांडू लागतील. तितक्यात भटाच्या नशीबानं त्याचे कान फुंकायला घाटपांडे साहेब आले नि तू देखील एक पी आय एल टाकून दे. देव मानायचाच नसेल तर त्याच आधारावर नाणी नि नोटा बंद करा. आम्ही का मानायचं कि त्यांच्यात मूल्य असतं? ते तरी दिसतं का? नि ते ही भयानक असंबंद्ध, अनियंत्रित आणि नुकसानदायक हेलकावे खात बदलत असतं. तेव्हा तुम्ही बँका बंद करा वा चालू ठेवायच्या असतील तर कॅश रिझर्व रेशो १००% ठेऊन चालवा. तुम्ही अगोदर तुम्ही जे आहे मंता ते मूल्य काढून डोळ्यासमोर दाखवा मग मी त्याच प्रकारे देव दाखवतो. आता संसदेत नि न्यायालयात दुसर्‍या एका विषयावर भांडण चालू होइल. त्यानंतर संसदेत एक कमिटी बनेल - देव आणि मूल्य या संबंधित, समान संकल्पना आहेत काय त्यांना एकमेकांचे कायदे लागू होणे शक्य आहे काय या विषयावर. -------------------------------------------------------- शेअरबाजारात काय होतं? गुंतवणूकीची वाढ होईल म्हणून आपण पैसे लावतो. मी पैसे वाढवून देईन असं थेट कुठं लिहिलं नसलं तरी कंपनीची जी फोरकास्टीव विधानं असतात ती नि बाजारात तिनं शेअर विकायला काढलेत ही गोष्ट एकत्र पाहीली जाईल आणि ते देखील एक कंस्ट्रूड काँट्रॅ़क्ट मानलं जाईल. पण समजा ती कंपनी बुडली तर मी काय करू शकतो? कंपनीच्या मालकाला धंदा चालवता आला नाही म्हणून मी जेलमधे घालू शकत नाही. माझ्या रिस्कवर मी ती गुंतवणूक केली. थेट असं म्हणता येईल कि माझ्या समाधानासाठी मी संभाव्य फसवणूकीचा करार केला. शेअर असो वा देव असो, स्वतःच्या संभाव्य फसवणूकीत परिणत होणारा करार करणं वा करवून घेणं बेकायदेशीर वा अनैतिक नाही. ९०% (रिटेल) लोकांचे पैसे मार्केटात बुडतात. मग शेअरबाजार बंद करणार आहात का? आपला स्वभाव असले प्रकार मानत नसेल माणसानं देवापासून, बाजारापासून दूर राहावं, पण उगाच फसवणूक फसवणूक म्हणून कांगावा करू नये. कोणाला देवाला १००० रु देऊन कोटी रुपयांची कृपा झाली, किंवा असाच आंतरसंबंध आहे असं मानलं गेलं तर आपण मधे का पडावं? ज्या शेअरात पोटेंशिअल आहे त्यामागे जशी झुंबड उडते तशी इथे उडणारच. म्हणून माझं म्हणणं असं पडतं कि ज्याचा देवात अनध्यात्मिक रस आहे त्याचा नि त्याच्या रसाचा उचित सन्मानच करावा. ---------------------------------- आता एक दुसरा संबंधित मुद्दा - समाजाच्या लोककल्याणवादी वर्गाचा, सजग वर्गाचा फोकस हा व्यवस्थात्मक अन्याय सर्वात अधिक कोठे आहे तिथे असावा हे रास्त वाटतं. आज जो धार्मिकार्थिक अन्याय आहे तो नगण्य आहे. व्यक्तिशः मला धार्मिकार्थिक अन्याय नष्ट करणे हेच करियर बनवणार्‍या लोकांची कीव येते (तसा माझा पिंड बुद्धींची कीव इ करवणारा अजिबात नाही. मानवी मूर्खता, विक्षिप्तता, विचित्रता मी मानवी जीवनाचं सन्मान्य सौंदर्य मानतो.). आजच्या व्यवस्थांत अनेकविध प्रकारच्या श्रमांचं, कौशल्यांचं, शक्तींचं, उत्पादनांचं, सेवांचं, क्षमतांचं, अधिकारांचं अतिशय अन्यायकारक असं आणि रिग्ड स्वरुपात मूल्यमापन होत आहे. इतिहासात तुलतेन अतिच. ज्या गृहितकांवर प्रत्यक्ष बाजार चालतोय, अर्थव्यवस्था चालतेय, राज्यव्यवस्था चालतेय नि त्यांत निष्पाप, सामान्य माणूस लूटला जात आहे. ही लूट कायदेशीर आहे आणि तिला अनैतिक म्हणणारा वर्ग असोच, तिचे विक्राळ रुप माहित असणारा वर्ग, जगात खूपच नगण्य आहे म्हणून हे जवळजवळ नैतिक देखील झालं आहे. धार्मिक लूटीची मात्रा या लूटीच्या अब्जावधी पटींनी कमी आहे. आज आपण ५००० वर्षापूर्वीच्या वेदकालीन ब्राह्मणाने घेतलेल्या दक्षिणेची निर्भत्सना करतो. ५००० वर्षांनंतर आपलं देखील ऑडिट होणार आहे आणि कदाचित त्यांचेकडे खूप जास्त ऐवज असतील आपल्या "मानवतापणाचं आणि बुद्धिमत्तेचं" आकलन करायला. आपल्या टिकांचा फोकस आज सृजित केलेल्या व्यवस्था हव्यात, आज अंमलात असलेल्या व्यवस्था हव्यात खासकरून दूरस्थ थांबून विचार केला असताना असं दिसत असेल कि या व्यवस्थांनी होणारी लूट, होणारा अन्याय खूप आहे, राजरोस आहे नि तिला संवैधानिक मुलामा आहे शिवाय सामाजिक नैतिकतेचं प्रतिष्ठान देखील आहे. आजचे समाजसुधारक असलो तरी भविष्यातले टिकापात्र होणार नाही ना अशी काळजी लोकांनी घ्यायला हवी. अशा एकूण संदर्भात मला मंदिरातली फसवणूक, आता हे शब्द अयोग्य नाहीतच ठरवलं तरी, चीड आणत नाही. ----------------------------
देव चराचरात आहे हि शिकवण सर्व ईश्वरवाद्यांना का मान्य नसावी? हे एकूणच ईश्वरवादी व्यवस्थेचे फेल्युअर मानावे का?
असं गृहितक व्यवस्था चालवण्यासाठी आवश्यक आहे असं वाटत नाही. असं नाही मानलं तरी चालतं. शरीर हे शरीर चालवतं हे जास्त लॉजिकल असलं तरी शरीर मेंदू चालवतो असं म्हणणारेच जास्त निघतील. मेंदूचं काम जास्त महत्त्वाचं कसं? चेतासंस्थेच्या अवयवांचे प्रस्थ का? शरिरातील विविध अवयवांना वेगवेगळे महत्त्व द्यायचे निकष काय? अनेक जीवांना अनेक अवयवच नसतात. कधि कधी मेंदूही नसतो. पण सगळा घोटाळा लोक सोडवत बसणार नाहीत. सर्वसाधारणपणे व्यवस्था अशा असाव्यात कि अल्पसंख्य अशा भांडखोर नि डोक्याचा भुगा करणार्‍या सर्व ज्ञानी लोकांनी सगळे डोके लावून बनवलेल्या असाव्यात. त्यांनाच त्या परस्परांस स्वीकार्य असाव्यात. किमान पहिले दुसरे स्थान असं काहीतरी असावं. सामान्य माणसाला फार जास्त डोकं न लावता (म्हणजे डोकं न लावता असं नव्हे) व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. विवेकवादी नावाच्या नवमूर्ख पंथानं प्रत्येकच व्यक्तिनं व्यक्तिगत स्तरावर सर्व ज्ञानातत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा अशी हूल पेटवून ठेवली आहे. हे काही शक्य नाही. या लोकांनी अत्यंत प्रभावशाली पद्धतीनं असलेल्या पारंपारिक व्यवस्था व्यवस्था एकतर्फी दिवाळखोर जाहीर केल्या आहेत. पर्यायी व्यवस्था दिली वा अस्तित्त्वात आणायला यूनो वा डब्ल्यूटीओ सारखा फोरम बनवला नाही. अशा काळात सर्वच प्रकारचे विचार मानणारे लोक असतील नि याला काही कोण्या एका व्यवस्थेचा, विचाराचा फेल्यूअर म्हणता येणार नाही. कधी मेरिट्ला महत्त्व आल्यास, येऊ दिल्यास नि या चराचर-ईश्वरवादात मेरीट असल्यास तो पुन्हा फोफावेल. ================================ लेखकास, मंजे मला, सर्व धर्म, पंथ, जाती, विचारधारा, अस्मिता, इ इ चा आत्यंतिक आदर आहे. कोणत्याही विधानाचा टोकाचा अर्थ काढून 'अर्थाचा अनर्थ भागवताच्या चिंध्या' असा प्रकार होऊ नये अशी आशा आहे.
वर्गीकरण
धर्म

प्रतिक्रिया द्या
18805 वाचन

💬 प्रतिसाद (58)
म
महामहोपाध्याय गुरुवार, 02/22/2018 - 18:21 नवीन
जोशी साहेब, महान..
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 02/22/2018 - 19:59 नवीन
झाली का फिट्टमफाट? :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 02/23/2018 - 07:29 नवीन
इतक्यात ?! छे, छे, हा वाद अनादी आणि अनंत आहे. तो असा चारपाच लेखांत आणि चारपाचशे प्रतिसादांत थोडाच संपेल ?! =)) यनावालांच्या पुढच्या लेखाची प्रतिक्षा करा (लेखांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रतिसाद देण्याइतका वेळ त्यांना नसतो) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
A
arunjoshi123 Wed, 05/22/2019 - 10:07 नवीन
यनावालांनी घटना वाचली आहे म्हणे. ते तिचा दाखला देत नास्तिक व्हा एक किती मोठा जोक आहे ते सध्याला राहू देत. पण घटना तशी पाळायचीच म्हटलं तरी ती कशी बनतेय हे फार विचित्र आहे. ============= (फक्त ) राष्ट्रपतींनी थेट सही केली तर एखादा कागद घटनेचा भाग होतो का अशी पी आय एल टाकली गेली आहे. कलम ३५ ए च्या वैधतेबाबत. ते कलम पब्लिकपासून काँग्रेसनं चक्क ७० वर्षे चोरुन लपवून ठेवलं हे असो. ते माफ. पण साला राष्ट्रपतीनं (मंजे राजेंद्र प्रसादनं) घटना कशी अमेंड करावी ती पद्धत टाळून एक सहि मारली कि घटना बदलते? तिच्यात कलमं अ‍ॅड होतात? अरे काय देश आहे का थोतांड?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 05/22/2019 - 13:40 नवीन
अजोंचा प्रतीसाद? तोही ६ महिन्यांनी? मला वाटले त्यांचा आयडी उडवला गेला असावा, म्हणून ते येथे लिहीत नसावेत. तुम्हाला लिहिताना पाहून बरे वाटले. _/\_
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 05/22/2019 - 14:07 नवीन
वेलकम बॅक, अजो! तुम्ही लिहीत रहा राव, वाचावसं वाटतं.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 05/22/2019 - 15:23 नवीन
शामजी, वामनजी धन्यवाद. सध्याला व्यस्त आहे. मोकळा झालो कि अवश्य लिहिन.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 05/22/2019 - 21:48 नवीन
च्यायला... मिपा म्हंजे मिपा आहे.. !! :-) हे असले जड काथ्याकूट वाचलेत ना, की ते आपलं डोक्याचं पार बुंगाट होऊन जातंय बघा.. या आस्तिक्/नास्तिकांच्या चर्चा.. देव आहे/नाही याबद्दलचा इतका वितंडवाद.. शब्दांच्या जाळ्यात मुळात आपण नक्की वाचत काय होतो हेही विसरून जाणारी माझ्यासारखी बापुडी जनता.. म्हंजे एक स्वतःच्या डोक्याला आणिक काही खाद्य नाही मिळाले म्हणून, स्वतःच लावून घेतलेला शॉट असल्यासारखं भासतंय.. बाकी इतके अभिनिवेशात चर्चा करणारे सर्व विद्वान पाहिलेत ना, की कधी कधी असं वाटतं, ते आदी शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, रामदास स्वामी...... गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, साईबाबा, स्वामी समर्थ.... तिकडे ठाकूर, विवेकानंद, रमणमहर्षी, योगी अरविंद.. आणि असे माहित असलेले/नसलेले अगणित महात्मे.... सगळे गांजा पिऊन वा भांगेची नस लावूनच लोकांना काहीतरी सांगत असले पाहिजेत.. लोकांचं आयुष्य बरबाद करण्यापलिकडे या प्रभृतींना कसलंही काम नव्हते बहुदा! मला काही कळत नाही एवढं जरी मला स्वतःला नीट कळलं ना, तरी पुरे झालं हेच खरं! :-) राघव
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा