Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मातृभाषा

श — शिव कन्या, Wed, 02/21/2018 - 19:49
तू काना, मात्रा, विलांटी, शिरोरेखा घेऊन माझ्या वहीत हळूहळू लिहित जातोस, तेव्हा मी तुझे राजस हात लोभस डोळे पहात राहते. तुझ्यात इतका जीव का गुंतावा? तू माझ्या हातांचे देवनागरी चुंबन घेऊन म्हणावे, मातृभाषा कि काय तिच्यातच जीव अडकतो बघ, आई गंssss म्हटल्याशिवाय प्राणसुद्धा जात नाही.... शाईचे बोट धरुन तू परत रात्रीच्या शांतप्रहरी काना, मात्रा, विलांटी, शिरोरेखा घेऊन माझ्या वहीत तुझेमाझे हितगुज हळूहळू लिहित राहतोस... शिवकन्या

प्रतिक्रिया द्या
6399 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
पैसा गुरुवार, 02/22/2018 - 04:34 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 02/22/2018 - 09:11 नवीन
सुरेख काव्य
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 02/22/2018 - 09:29 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 02/22/2018 - 09:49 नवीन
आहा...मस्तच.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 02/22/2018 - 11:01 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/22/2018 - 13:17 नवीन
रोचक , पण प्रांजळपणे सांगायचे झाल्यास वही नेमकी कुणाची असा अनाहुत प्रश्न येऊन अर्धाक्षणभर अडखळल्यासारखे झाले. वही कुणाचीही असो प्राण कंठाशी आल्यावर आई गंssss ची हाक पोहोचते पण तो पर्यंत तिचा विसर पडणार्‍यांचे काय ? सारखे नसते प्रश्न पडणार्‍या माहितगाराचे काय करायचे असा प्रश्न कुणास पडल्यास मनमोकळे क्षमस्व.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या गुरुवार, 02/22/2018 - 19:12 नवीन
प्रश्न माहितगारालाच जास्त पडतात.... विचारात चला.... उत्तर मिळेल न मिळेल, वेगळा भाग...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ज
जव्हेरगंज गुरुवार, 02/22/2018 - 15:36 नवीन
आहा...! मस्तच!!!
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या गुरुवार, 02/22/2018 - 19:10 नवीन
सर्व रसिक वाचकांचे आभार.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 02/22/2018 - 19:26 नवीन
छान लिहिलेय पण आम्ही वेलांटीत व ला वेलांटी देत नाही हो.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या गुरुवार, 02/22/2018 - 19:37 नवीन
वेलांटी हे शब्द रूप एकदम बरोबर. पण विलांटी हे ध्वनी रूप एकदम चूक नाही. आम्ही आपलं ते व ला टोपपदर दिला..... कलाकार आहात, कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा